मागे - पुढे
24.04.2020
आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग एकतीसावा दिवस. काल रात्री मन स्थिर करण्याची गोळी घेऊन झोपलो आणि खरंच मन स्थिर झालं असावं. ब-याच महिन्यांनी शांत झोपलो. रात्रीत एकदाही उठलो नाही. आज पाणी येणार नाही तरी सहा वाजताच उठलोय. साफसफाईत तासभर गेलाच. पिंपळपाने उकळत ठेवलीयत. सौ.लाही उठवलं आहे. वरच्या टाकीला भर लावायला मागे गेलो तर बीनाचे कुटुंब सत्त्याकडून उर्मिलाच्या विहीरीचे पाणी पंपाने भरून घरात नेतेय. नळाला पाणी नसले की हे असेच हाल होतात. पुढच्या दारी आलो तर आज शुक्रवार असल्याने मासळी बाजार फूल भरला होता. थोडया वेळाने सौ. ने जाऊन रेणव्या (मासे) आणल्या. त्या नीट करायला ही मागे गेली आणि कावळे व मांजरे हाकवायला मी ! आता ते मला एवढं ओळखतात की मी मागच्या दरवाजाकडे येतोय हे दिसले तरी पळत सुटतात ! तर मागच्या दारी बंदूकडे पाण्याचा टँकर आणलाय . काय करणार , नळाला एक तर आठवडयातून दोनदा पाणी नसते आणि आलेच तरी नेहमीच पुरेसे येईल असे नसते. #पाणीहवादिलवस्ती !
आमची माजी विद्यार्थीनी व लोकमत कार्यालयातील शोभना कांबळेकडून स. 09.34 ला मेसेज आलाय .
*काय केले तुम्ही लॉकडाऊनमध्ये*♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
लॉकडाऊनच्या सुरुवातीला सर्वांनाच त्याचं अप्रुप वाटलं. पण कालावधी वाढत गेला तशी बेचैनी आणि कंटाळा वाढत गेला.
पण काही लोक त्यातही मजा शोधली. मन रमवायचा आपापला मार्ग शोधला. गप्पा, पत्ते, कॕरम, बुद्धीबळ यासारख्या बैठ्या खेळांमुळे अनेकांचा वेळ मजेत गेला.. जातोय.
तुम्ही काय केलेत लॉकडाऊनमध्ये? लादलेला असला तरी तो एन्जॉय केलात का? तुमच्या गमतीजमती इतरांपर्यंत नेऊ या आणि इतरांच्या आपणही जाणून घेऊन.... ✒ त्यासाठी अर्थातच *लोकमत* तुमच्यासोबात आहेच.
लॉकडाऊन काळात तुम्ही काय काय धमाल केलीत ते फक्त दहा ओळींमध्ये लिहा आणि आपले नाव व पासपोर्ट फोटोसह 9420528788 या क्रमांकावर शुक्रवार २४ एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत पाठवा..
वरील मेसेजला माझा हा प्रतिसाद लगेच स. 10.28 ला पाठवलाय.
मी माझ्या काही इंग्रजी ब्लाॅग्जवर अनेक वर्षे लिखाण करीत होतो . पण त्यामानाने मराठी ब्लाॅगवर लिखाण कमीच होते. लॉक डाऊनच्या काळात मला कोरोना लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर घराच्या मागे पुढे घडणा-या व जगातही घडणा-या घटनांवर मराठीतून लिहिण्याची अभिनव कल्पना सुचली व लॉक डाऊनच्या काळात मी दररोज त्याबाबत एका खेडयातून लेखन करीत आहे. माझ्या हया ब्लाॅगचे नांव ओन्लीदेवीदास (onlydevidas) आहे व त्याची लिंक https://onlydevidas.blogspot.com ही आहे. कोरोना गेल्यानंतरही एका खेडयात घडणा-या व जगात घडणा-या घटना या खेडयाच्या चष्म्यातून पाहण्याचा हा प्रयत्न सुरूच राहणार आहे. अवश्य वाचा , ही सर्व रसिकांना नम्र विनंती.
नांव : श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील
दुपारी जेवण झालं. वामकुक्षी कालच्यासारखीच झाली ! म्हणजे ती व्हिडीओ बघत बसली , मी डोळे मिटून ऐकत लवंडलो ! काय करणार ! संध्याकाळ तर होतेच. ती झालीही. आज झाडांना देण्याएवढे पाणी दोन दिवस साठवत होतो त्यामुळे भरपूर पाणी दिले. दिवाबत्ती केली. कोरोनाच्या बातम्यांचा आलेख हेलकावतो आहे. त्याप्रमाणेच आमच्या काळजांचाही ! आज जड जेवण न घेता उकडया तांदळाची पेज प्यायलो. पेज पीता पीता जनसेवा ग्रंथालय वाचकगट या
व्हॉट्सॲप ग्रूप वर श्री. प्रसाद सुजाता सुरेश पाष्टे यांची पोस्ट वाचनात आली. ती अशी :
*https://youtu.be/sSaVwHFY3oQ*
*काल quarantine मध्ये अनेकांनी घराच्या घरी पुस्तक दिन साजरा केला.* *तसा आम्हीही काही प्रमाणात केला. या quarantine मध्ये मी संवेदनशीलतेने पाहिलेलं या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून एक पहिलीच चित्रफीत (video) केली आहे.* *त्यामध्ये पुस्तकांविषयीची एक कविता आणि लीळा पुस्तकांच्या या पुस्तकातील छोटासा भाग वाचलेला आहे. माझा हा पहिलाच प्रयोग आहे, आपल्याला अपेक्षित बदल आणि आपल्या दृष्टीतील नाविन्यता जरूर कळवा. सोबत लिंक जोडत आहे. पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया देऊन, चॅनेलला लाईक, शेअर, आणि सबस्क्राईब कराल. धन्यवाद.*
https://youtu.be/sSaVwHFY3oQ या चँनेलला मी लाईक, शेअर, आणि सबस्क्राईबही केले.
त्यातच, जनसेवा ग्रंथालय वाचकगटवर लेखकमित्र श्री. अमोल पालये याने आणखी एक यूट्युब चॅनेल https://youtu.be/VHiP5LTRmwM कविता क्वारंटाईन बाबत पोस्ट केली. हेही सुंदर यूट्युब चॅनेल आहे.
त्याचवेळी कवयित्री शिक्षिका सौ. वसुंधरा जाधव यांचा व्हॉट्सॲपवर मेसेज आला. https://youtu.be/Y-9NhQadpMg हे यूट्युब चॅनेल मी सूरू केल आहे तरी कृपया याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब ही करा जेणे करून मला प्रोत्साहन मिळेल🙏🏻🍫🍫 मी जाधवांच्या https://youtu.be/Y-9NhQadpMg या चँनेललाही लाईक, शेअर, आणि सबस्क्राईबही केले. त्यांची कवितेबाबतची अभ्यासूवृत्ती व चॅनेलची मुख्य कल्पना मला खूप आवडली. त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे.
आमचा रत्नागिरी जिल्हा आजच कोरोनामुक्त झालाय. त्याबाबत सर्व रत्नागिरीकरांचे अभिनंदन करणारा लेख माझ्या mycityratnagiri या ब्लाॅगवर प्रकाशित केला. https://mycityratnagiri.blogspot.com/2020/04/Coronafree-district-ratnagiri.html?m=1 या सगळयात अकरा कधी वाजले ते कळले नाही. चला, तर मग झोपायला. गुड नाईट.
( क्रमश: )

धन्यवाद सर!!
उत्तर द्याहटवासहजस्वभावाने आपला तसेच इतरांचाही उल्लेख केला आहे. चांगल्याबद्दल चांगले करावे हीच माझी भूमिका आहे.
उत्तर द्याहटवा