Pages

शनिवार, २२ जुलै, २०२३

Hadasa hone ke baad

हादसा होने के बाद



दिन बितते गये हादसा होने के बाद

लोग भुलते गये हादसा होने के बाद


शर्म से शर्म की भी नजर झुक गयी

बेशर्म खुलते गये हादसा होने के बाद


कोई आया मदतगार नमक छिडकनेको

जख्म भरते गये हादसा होने के बाद


किसीने भाषण दिया, किसीने फोटो लिये

वोही चमकते गये हादसा होने के बाद


इतना सब कुछ हुआ , लोग मरे मगर

चर्चेही बनते गये हादसा होने के बाद ...


#shameonthem 

#Hadasa

#manipur_hadasa

....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०७.२०२३ सायं . ०४.००

साहित्य हा समाजाचा आरसा 

जेव्हा जेव्हा हादसे होतात तेव्हा तेव्हा वरीलप्रमाणे साहित्यही जन्म घेतं. कारण साहित्य हा समाजाचा आरसा आहे ! साहित्यिक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. जेव्हा समाजात #मणिपूर सारख्या घटना घडतात , जेव्हा मानवी संस्कृतीच शरमेने मान खाली घालते , पण स्त्रीयांची नग्न धिंड काढण्यासारखे दुष्कृत्य करणारे दुष्ट नराधम निगरगट्टपणे उजळ माथ्याने वावरतात व काही विशिष्ट लोक त्यांचे समर्थन करतात , तेव्हा संवेदनशील साहित्यिकाला त्यावर भाष्य केल्याशिवाय राहवत नाही. 


दुनिया पाषाणांची

मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते 

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही

असे कवीश्रेष्ठ सुरेश भट लिहून गेले

आहेत.‌ खरे तर , लोकांच्या मानसिकतेपायी अगतिक होऊन श्रेष्ठतम साहित्यिकांच्याही लेखणीतून असे निराशामय शब्द व्यक्त होतात , तिथे माझ्यासारख्या यत्किंचित लेखकाचं काय ! माझीही निराशा लपून राहिलेली नाही. म्हणूनच मी वरील रचनेच्या सुरूवातीलाच म्हटलंय : 

दिन बितते गये हादसा होने के बाद

लोग भुलते गये हादसा होने के बाद 


लोकांची असंवेदनशील मानसिकता


याचं कारण असं आहे की अनेक हादसे झाले तरीही त्यावर पुरेश्या संवेदनशीलतेने लोक व्यक्त होत नाहीत. व्यक्त झाले तरी त्यात सातत्य नसतं. वाईट अनेकांना वाटते. पण तसे स्वतः जवळच वाटणे वेगळे आणि सार्वजनिकरित्या व्यक्त होणे वेगळे. दुष्कृत्याविरूद्ध आंदोलनवगैरे करणे तर त्याहून पलिकडचे ! जलद समाज माध्यमांमुळे आजकाल लोकांना दररोज नवा विषय मिळतो . दररोजचे विषय चघळून चघळून लोकांच्या जाणीवाही बोथट होत जातात. त्यामुळे हादसा होऊन दिवस लोटत राहतात तसे लोक घटना विसरून जातात. झाल्याचं तर आणखी काही दिवस चर्चा होत राहतात !

अपडेटसही येत राहतात 

अशा दुर्दैवी हादसादायक घटनांचे अपडेटसही येत असतात. नुकताच मणिपूरमध्ये आणखी एक अतिप्रसंग घडला . आता तर टोळक्याने महिलेवर सामुदायिक बलात्कार केल्याची बातमी आहे. भर रस्त्यावर इतका किळसवाणा प्रकार घडण्यामागची विशेषतः पुरूष वर्गाची घाणेरडी मानसिकता आपला सुसंस्कारीत देश कुठे चालला आहे हे दर्शवते आहे. असहाय्य असो वा कशीही असो , स्त्रीवर इतक्या तात्काळ बलात्कार कसा काय केला जाऊ शकतो , हाच खरा प्रश्न आहे ! अंतर्मनात प्रचंड द्वेष भिनल्याशिवाय अशा प्रसंगी तात्काळ ताठरता येणार नाही. विज्ञानाच्यादृष्टीनेही याचा विचार केला गेला पाहिजे. तसेच , आपण इतिहासातल्याप्रमाणे आदिवासीपणाकडेच चाललो आहोत , ते का ? पुढे जाण्याऐवजी आपण मागेच का जाऊ इच्छितोय , याच्यामागच्या मानसिकतेचाही शोध घेतला गेला पाहिजे. 

हादसे का होतात ? 

असे सगळे होते खरे... पण तुम्ही एक विचार केला आहे का : हादसे का होतात ? हादसा ही आपल्याला अचानक घडणारी गोष्ट वाटते. दिसायला तरी ते तसे दिसते. प्रत्यक्षात ते तसे असते का ? हे बघूया प्रत्यक्ष एका व्हिडिओत. 

Hadase kyu hot hai


#सुरेश_भट

#समाजमाध्यमे

#manipur_hadasa

manipur case

Manipur incident

#हादसा_होने_के_बाद

#हादसाहोनेकेबाद_क्याहोताहै

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा