Pages

शुक्रवार, १४ जून, २०२४

वराडचो चिवडो , मालवणचो खाजो घेवा

 दिवा एक्स्प्रेस 

#मालवणी_मुलखातून

कोंकण रेल्वे सुरू झाली तो दिवस आता इतिहासाचा एक महत्वाचा भाग झाला आहे. कोंकणच्या निसर्गातून धावणारी ही आगीनगाडी खूप सुंदर दिसते. गंमत म्हणजे कोकण रेल्वे ज्या मार्गावर धावते त्याचा जास्तीत जास्त भाग हा अतिशय सुंदर निसर्गातून जातो. पावसाळ्यात तर हे दृष्य अधिक मोहक दिसते.‌ 

आजचा विशेष लेख : 

आजचा हा लेख कोंकण रेल्वेवर नसून तो कोंकण रेल्वेत भेटणाऱ्या अनेक विक्रेत्यांवरील एका व्हिडीओवर आहे. देवीदास पाटील क्रियेशन ( devidas patil creation) या यू ट्यूबवरील चॅनेलने कोंकण रेल्वेतील या विक्रेत्यांची ही दखल घेतली आहे. मडगांव - दिवा एक्स्प्रेसमधला विक्रेत्यांबरोबरचा हा छोटासा प्रवास या व्हिडीओत दाखवलेला आहे. आपण सावंतवाडी रोड स्टेशनवर जेव्हा दिवा ट्रेनमध्ये चढतो , जागा शोधून बसतो, निवांत होतो, रेल्वे सुटते आणि तेव्हा थोड्याच वेळात कानावर विक्रेत्यांचे मालवणी भाषेतले बोल कानावर येऊ लागतात. " वराडचो चिवडो घेवा, मालवणचो खाजो घेवा " , " पुरणपोळी घेवा, पुरणपोळी " , " भेळ, भेळ, भेळ, भेळ " , " वडापाव घ्या " , " चहा घ्या, चहा " , "आंबोळी घ्या, आंबोळी " असे अनेक आवाज कानावर येऊ लागतात. यात पुरूष विक्रेत्यांच्याबरोबरीने स्त्री विक्रेत्याही असतात. या सर्वच विक्रेत्यांची लगबग, मालवणी आर्जव, त्यांचे परस्परांशी असलेले अतिशय सहकार्याचे व आपुलकीचे संबंध हे सारे दुनियेच्या व्यवहारात खूप उठून दिसतात. ही सारी वैशिष्ट्ये वराडचो चिवडो , मालवणचो खाजो घेवा या व्हिडीओत दाखवली गेली आहेत. 



कोंकण रेल्वे मडगांव दिवा ट्रे़


कोंकण रेल्वे




कोंकण रेल्वेच्या प्रवास


कोंकण रेल्वेतील गंमती

कोंकण रेल्वे प्रवास

कोंकण रेल्वे


विशेष म्हणजे, कोंकण रेल्वेतील हया विक्रेत्यांचेही काही प्रश्न असू शकतात आणि पुढे कधी तरी त्यांचीही दखल नव्या व्हिडीओमधून घेण्याचे सुतोवाच या व्हिडीओत करण्यात आले आहे. व्हिडीओ छोटा असला तरी कोंकण रेल्वेतील विक्रेत्यांवर प्रकाश टाकणारा आहे व त्यांच्या प्रश्नांकडे सूचक बोट दाखवणारा आहे. अवश्य पहा व आपली बहुमोल प्रतिक्रिया अवश्य द्या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा