सत्य ते गंगेस ठावे !
सत्य ते गंगेस ठावे ! मी कहाणी सांगणारा !
पाप न्हाते , पुण्य होते ; धन्य होतो नाहणारा !
ठेवले बगलेत ज्यांनी लपवुनी आहे सु-याला
वाटते त्यांना तसा तो राम नाही पावणारा !
भावनांना हात जेव्हा घातला काही खुळ्यांनी
कायद्याने हात त्यांचा कलम केला वाढणारा !
एक वेडा दाखवाया लागला स्वप्नें नको ती ...
वाटला त्याला अडाणी काय जो तो भेटणारा ?
देश म्हणजे गावचा तो पार नाही बैठकीचा
गावगप्पांनी कधी हा देश नाही चालणारा !
... देह उर्फ देवीदास हरिश्चंद्र पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा