रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

Lovely Messages 8

 

दिन विशेष

Whatsapp Messages fwd. By Mr. Anil Anant Shivalkar,  Ratnagiri 

        श्री. अनिल अनंत शिवलकर , रत्नागिरी 
                 




 


[8/15, 14:09] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष*


▪️१९४७: भारत देश स्वतंत्र झाला.


▪️१९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.


▪️१९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.


▪️१९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.


▪️१९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.


▪️१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.


▪️१८६५: रेकी चे निर्माते मिकाओ उस्ईई यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९२६)


▪️१८६७: रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९२२)


▪️१८७२: क्रांतिकारक, तत्त्वचिंतक योगी अरविंद घोष यांचा जन्म.


▪️१८७२: भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ श्री अरबिंदो यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५०)


▪️१८७३: भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४२)


▪️१९०४: मोटार व्हीलचेअर चे शोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९२२)


▪️१९१२: इंदौर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४)


▪️१९१३: लेखक कवी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ बी. रघुनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३)


▪️१९१५: ऊर्दू कथा, पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९१)


▪️१९१७: लेखिका अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१)


▪️१९२२: लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.


▪️१९२९: साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोमरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९९९)


▪️१९४५: बांगला देशच्या पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचा जन्म.


▪️१९४७: चित्रपट अभिनेत्री राखी गुलझार यांचा जन्म.


▪️१९५८: अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिंपल कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९)


▪️१९६१: भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म.


▪️१९६४: बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म.


▪️१९७१: भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म.


▪️१९७५: भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक विजय भारद्वाज यांचा जन्म.


▪️१९९२: भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहान यांचा जन्म.


▪️१९४२: स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९२)


▪️१९७४: स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली (जन्म: १५ डिसेंबर १९०३)


▪️१९७५: बांगला देशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९२०)


▪️२००४: गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९४१)


▪️२००५: भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२७)


▪️१९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.


▪️१९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.


▪️१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.


▪️१९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.

..............

[8/16, 14:44] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *रविवार दि. १६ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.


▪️१९४६  कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.


▪️२०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.


▪️१८७९: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५)


▪️१९०४: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८)


▪️१९४८: भारतीय-डच रॉक संगीतकार बेरी हे यांचा जन्म.


▪️१९५०: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांचा जन्म.


▪️१९५२: गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म.


▪️१९५४: पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म.


▪️१९५७: भारतीय वकील व राजकारणी आर. आर. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)


▪️१९५८: अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका मॅडोना यांचा जन्म.


▪️१९६८: भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म.


▪️१९७०: नेपाळी-भारतीय अभिनेत्री मनीषा कोईराला यांचा जन्म.


▪️१९७०: अभिनेता सैफ अली खान यांचा जन्म.


▪️१९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन.


▪️१९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९४८)


▪️२०००: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९५२ - नवी दिल्ली)


▪️२००३: युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन यांचे निधन.


▪️२०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)


▪️२०१८: भारताचे १०वे पंतप्रधान व कवी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन (जन्म:२५ डिसेंबर १९२४)


....................


[8/17, 15:49] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *सोमवार दि. १७ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.


▪️१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.


▪️१९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.


▪️२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.


▪️१८८८: श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.


▪️१८९३: हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)


▪️१९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)


▪️१९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)


▪️१९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.


▪️१९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म.


▪️१९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.


▪️१९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.


▪️१३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.


▪️१८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)


▪️१९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)


▪️१९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.

.............


[8/18, 18:54] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.


▪️१९२०: अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार.


▪️२००५: जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.


▪️२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.


▪️१७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)


▪️१७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १७८३)


▪️१७९२: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म.


▪️१८७२: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)


▪️१८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)


▪️१९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)


▪️१९२३: लेगस्पिनर गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९५५)


▪️१९३४: गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म.


▪️१९३६: हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म.


▪️१९५६: भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म.


▪️१९६७: पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म.


▪️१९८०: अभिनेत्री प्रीती जंघियानी यांचा जन्म.


▪️१९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९१३)


▪️१९९८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९४८)


▪️२००८: रहस्यकथाकार नारायण धारप यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)


▪️२००९: दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांचे निधन.


▪️२०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन.


.................


[8/19, 13:58] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *बुधवार दि. १९ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष*


▪️जागतिक छायाचित्रण दिन


▪️२९५ ख्रिस्त पूर्व: प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनसचे पहिले मंदिर पूर्ण झाले.


▪️१९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.


▪️१८७१: विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राइट यांचा जन्म.  


▪️१८८६: स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९३५)


▪️१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी एस. सत्यमूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४३)


▪️१९०३: लेखक चरित्रकार गंगाधरदेवराव खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)


▪️१९०७: केंद्रीय मंत्री सरदारस्वर्ण सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९४)


▪️१९०७: भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान हजारी प्रसाद द्विवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९७९)


▪️१९१३: भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक पीटर केम्प यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९३)


▪️१९१८: भारताचे ९वे राष्ट्रपती आणि ८वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)


▪️१९४७: अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९०६)


▪️१९७५: शिक्षणतज्ञ, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचे निधन.  


▪️१९९०: पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक रा. के. लेले यांचे निधन.

▪️

१९९३: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२९)


▪️१९९३: निर्भिड पत्रकार य. द. लोकुरकर यांचे निधन.


▪️१९९४: रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते लिनसकार्ल पॉलिंग यांचे निधन. 


▪️२०००: भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४८)


▪️२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन.


...............


[8/20, 14:12] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *गुरुवार दि. २० ऑगस्ट २०२०* 


🧷  *दिनविशेष* 


▪️१८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.


▪️१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.


▪️२००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.


▪️१८९६: भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७६)


▪️१९४०: भारतीय- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रेक्स सेलर्स यांचा जन्म.


▪️१९४१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च २००६)


▪️१९४४: भारताचे ६वे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २१ मे १९९१)


▪️१९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म.


▪️२००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी यांचे निधन.


▪️२०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)


▪️२०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन.


▪️२०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)


▪️२०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)


..............

[8/24, 14:22] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *सोमवार दि. २४ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन


▪️१६९०: कोलकाता शहराची स्थापना.


▪️१६०८: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल.


▪️१८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.


▪️१८३३: गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)


▪️१८७२: केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७)


▪️१८८०: निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)


▪️१८८८: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९५७)


▪️१८८८: मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२)


▪️१९०८: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)


▪️१९१७: किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्म.


▪️१९१८: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)


▪️१९२७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांचा जन्म.


▪️१९२७: भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी यांचा जन्म.


▪️१९२९: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यासर अराफत यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)


▪️१९९३: क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू दि. ब. देवधर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८९२)


▪️२०००: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचे निधन. (जन्म: ३० जून १९२८)


▪️२००८: चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार वै वै यांचे निधन.


▪️२०१९: भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९५२)


...................


[8/26, 14:26] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *बुधवार दि. २६ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.


▪️१९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.


▪️१९१०: भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. 


▪️१९२२: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म. 


▪️१९२७: प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.


▪️१९२८: हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म.  


▪️१९४४: लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म.


▪️१९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन.  


▪️१९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन.


▪️१९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन.


▪️१९९९: डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.


▪️२०१२: चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचे निधन. 


...................


[8/29, 14:00] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️भारतीय क्रीडा दिन 


▪️१९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.


▪️१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.


▪️१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.


▪️१९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.


▪️१९०१: सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म.  


▪️१९०५: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. 


▪️१९१५: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्म.  


▪️१९२३: भारतीय क्रिकेट खेळाडू हिरालाल गायकवाड यांचा जन्म.


▪️१९२३: इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा जन्म.


▪️१९५८: अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार मायकेल जॅक्सन यांचा जन्म.  


▪️१९५९: दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांचा जन्म.


▪️१९७६: इस्लाम क्रांतिकारक बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचे निधन. 


▪️१९८२: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचे निधन.  


▪️१९८६: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचे निधन.  


▪️२००७: स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांचे निधन.  


▪️२००८: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.  

..............


[8/30, 12:41] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *रविवार दि. ३० ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.


▪️१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.


▪️१८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.


▪️१९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.


▪️१८१३: बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९६१)


▪️१९३०: संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल २००८ – डोंबिवली, मुंबई)


▪️१९३०: अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म.


▪️१९३४: लेग स्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००५)


▪️१९३७: मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७०)


▪️१९५४: बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर लुकासेंको यांचा जन्म.


▪️१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.


▪️१९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२)


▪️१९८१: शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन.  


▪️१९९४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)


▪️१९९८: स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)


▪️२००३: अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)


................


▪️२०१४: भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८)


▪️२०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)

................................

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

दोन मराठी गझला

      सत्य 


रोखलेली आसवें मोकळी कर !

काळजाशी तू मला एकदा धर !


कोणते हे अंतरी दु:खं आहे ?

कोंडलेले हुंदके बोलु दे तर !


मेघ हृदयी थांबले का कळेना...

सांग हृदयी थांबली का बरे सर...


हया उन्हाला रोजचे सोसशी तू 

काय बोलू ; सावली भाजते जर !


कोणते हे सत्य जे झाकशी तू ?

हा कशाला चेहरा चेह-यावर ?



.... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील


..............................................


        दरी 


मला आता जरा शंका तुझी आली खरी आहे

सुखा तू थांब दाराशी ; व्यथा माझ्या घरी आहे !


कधीपासून ते मीही स्वत:शी बोललो नाही

तुला जे सांगतो आहे मनाच्या मंदिरी आहे !


तुला आता हवी आहे कथा माझ्या जवानीची

तुलाही वाटते आहे ... तिथे काही तरी आहे ... !


तुझ्यावर शेर एखादा मला आता करू दे ना...

मला तू सांग आता जे तुझ्याही अंतरी आहे !


कितीसे खोल जावे मी ... कितीसे खोल जावे तू ...

कळेना खोल प्रेमाची कितीशी ही दरी आहे !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  



रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

विचित्र स्वप्नें


  विचित्र स्वप्नें - 1

 स्वप्नांची दुनिया 

स्वप्नांची दुनिया फार वेगळी असते ! पाहिलेली स्वप्नें आणि पडलेली स्वप्नें यात फरक आहेच. जागेपणी पाहिलेली स्वप्नें निराळी व झोपेत पडलेली स्वप्नें निराळी ! काही तारीखवार पडलेली स्वप्नें खाली दिली आहेत : 

विचित्र स्वप्नें 

तारीख नक्की आठवत नाही. पण स्वप्नं लक्षात राहण्यासारखेच आहे ! विषय कोरोनाचा आहे. 


            दुपारी वामकुक्षीच्यावेळी डोळयांवर एक हॉस्पिटल दिसले. रूम खूप मोठी आहे. मी मध्यावर उभा आहे.  हॉस्पिटलमध्ये पेशंटस् , स्टाफ आहेत. स्टाफची कामे सुरू आहेत. माझ्या समोरच्या भिंतीला टेकून उजवीकडील काॅटवर झोपलेला एक उभटगोल चेह-याचा चाळीसपंचेचाळीशीतील मध्यमगौरवर्णीय पुरूष माझ्याकडे बघून हसतोय. त्याला बहुतेक डिस्चार्ज मिळणार असल्याचा भाव त्याच्या चेह-यावर आहे. अचानक त्याच्या शेजारी स्वामी समर्थ येवून काॅटवर बसतात. तेही माझ्याकडे बघून हसतात. त्यांच्या हातात जपमाळ असते. त्या हातानेच ते पुढे निर्देश करतात. मी तिकडे बघतो तर चक्क श्रीकृष्ण डाॅक्टरचा अॅप्रन घालून , स्टेथोस्कोप  लावून, सलाईन स्टँड नीट लावत असतो ! त्याने काही तरी निश्चय केलेला त्याच्या ठाम चेह-यावर दिसत होता.  अगदी तरूण वयातला हा श्रीकृष्ण आहे व तो आता कोरोनाच्या लढाईत डाॅक्टर बनून स्वत:च उतरतो आहे, असे मी मनात म्हणत असतानाच माझी लिंक तुटली. आता परमेश्वरच लढायला उतरला तर कोरोनावरचा विजय फार दूर नाही.

..........

11.06.2020.  

आज माझ्या भाचीला -  मीनलला मेसेज  केला. आज माझ्या स्वप्नात तिचे वडील  (ज्यांना आम्ही सारे भाऊ म्हणतो ) आले होते. त्यामुळे सकाळी उठल्यापासून मी बेचैन होतो. चहा घेतांना मी सौ. लाही सांगितलं. काल रात्री भाऊ माझ्या स्वप्नात आले होते. ते जयस्तंभाकडून राजीवडयात त्यांच्या मूळ घरी चालले होते व मी स्टेट बँकेकडून जयस्तंभाच्या दिशेने चाललो होतो. वेळ सकाळची असावी.  संपूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. एकही गाडी रस्त्यावर नव्हती. स्टेट बँकेसमोर आमची भेट होते. भाईंबद्दल ( त्यांचे अलिकडेच निधन पावलेले थोरले बंधू ) आमचे थोडे बोलणे झाले आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. इथे स्वप्नं संपले व मी जागा झालो.   मीनलने माझा मेसेेज वाचून लगेच रिप्लाय दिला तो असा : सध्या भाऊंची तब्येत थोडी खराब होती आता बरे आहेत . म्हणजे स्वप्नं खरं होतं तर.  मीनल व तिचे वडील तर सिंधुदुर्ग जिल्हयात स्थायिक झाले आहेत.  पण स्वप्नात भाऊ मला रत्नागिरीत निर्मनुष्य रस्त्यावर भेटतात , त्या निर्मनुष्य रस्त्याचा अर्थ काय ?  जयस्तंभ परिसर का दिसला ? निर्मनुष्य रस्त्याचा कोरोनाशी काही संबंध असेल का ? काय घडत आहे ? काय घडणार आहे ? 

.........

14.06.2020  दोन स्वप्नें  :

       आज दोन स्वप्ने पडली. एकाच इमारतीशी संबंधित . एकाच वेळेशी संबंधित.  माझ्या दोन माजी सहका-यांशी संबंधित .    

         पहिल्या स्वप्नात मी माझ्याच कार्यालयात एका टेबलाशेजारी उभा. माझ्या बाजूला कोणीतरी आहे. वेळ दुपारी दोनची आहे. टेबलाशी संबंधित व्यक्ती ( श्री. डोंगरे ) जेवून तोंड धुवून आली आहे व कोप-यातल्या फडक्याला हात पुसून टेबलकडे येत असते. माझ्या मागचा माणूस मला हातातला कागद द्यायला सांगतो. पण मी ती व्यक्ती खुर्चीत बसल्यावरच देतो म्हणून सांगतो. तेवढयात ती व्यक्ती खुर्चीत बसते व हसत हसत हात पुढे करते. त्याने पांढरा हाफ शर्ट परिधान केलेला असतो . तो पूर्वीचा माझाच सहकारी असतो.  मी माझा अर्ज त्याच्या हातात देतो . तो स्वीकारून त्यावर बहुधा आवक क्रमांक टाकतो आणि पोच म्हणून माझ्याच अर्जाची दुसरी प्रत मला तो देतो.  गंमत म्हणजे मी नोकरीत आहे की रिटायर्ड झाल्यानंतर मी कार्यालयात गेलो आहे , हे कळत नाही. दुसरे असे की समोरचा माणूसही प्रत्यक्षात माझ्या अगोदरच रिटायर्ड झालेला आहे ! 


            दुसरे स्वप्नंही लंच अवरच्याच वेळेचे दिसले. मात्र यात मी नोकरीत असल्याचे दिसले.  कार्यालयातील सद्याचे प्रबंधक  व माझे सहकारी मित्र ( श्री. नार्वेकर )  कलेक्टर कार्यालयात कामानिमित्त गेलेले असतात. गंमत म्हणजे दुपारी दीड वाजता मी चक्क त्यांच्याच खुर्चीत बसून जेवत असतो. ते मध्येच येतात , माझ्याबरोबर हसतात आणि मी काही बोलायच्या आतच ते आपला डबा घेऊन सरळ कँटीनला निघून जातात ! ते दरवाजातून बाहेर पडतांना पाठमोरे दिसतात. त्यांनीही पांढरा हाफ शर्टच परिधान केलेला असतो. त्याचवेळी माझ्या ताटाकडे माझे लक्ष जाते व ताटात खूपच भात वाढलेला दिसतो.  हे फार विचित्र आहे. काय घडणार आहे कोण जाणे !

.......... ( प्रत्यक्षात,  हा दिवस फार विचित्र गेला , इतका की आयुष्यात काही गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली . )......

..............   

24.06.2020

          घराच्या मागील बाजूस दक्षिण दिशेला नळाजवळ मी उभा असतो. समोरच मुलगा दात घासत उभा असतो. उजव्या बाजूला सौ. स्वयंपाकघरात काही तरी करीत असते . माझे लक्ष मुलाच्या हातातील टूथब्रशकडे जाते. ते फाटलेले दिसते. मी त्याला सांगतो , अरे हे कसले ब्रश वापरतोस . घरात त्या डब्यात बघ नवीन ब्रश आहे. हे बोलतो तोच मला जाग येते. ( पाचव्या दिवशी मांडणीवरील एका डब्यात खरोखरच कधी तरी आणून ठेवलेले मुलाचे नवे टूथब्रश सापडले ! )

...........

25.06.2020

मी माझ्या शेजारी चुलत भाव बजरंगाकडे जातो. त्याला विचारतो की अरे तू त्याचे ( मी कोणाचे नांव घेतले ते आठवत नाही)  पैसे का परत दिले नाहीस ? तर तो म्हणतो की माझे (म्हणजे त्याचे) दीडशे रूपये मिळाले नसते. मी ते उत्तर ऐकून बाहेर पडतो , तिथेच मला जाग आली. 

............

 28.06.2020

आज दुपारच्या झोपेत स्वप्नं पडलं . नवलाई मंदिराच्या प्रांगणात पाच सहा फूट पाणी आहे व त्यात मातीचा रंग मिसळलेला आहे. बहुधा खूपच पाऊस पडून गेला आहे. पाण्यात एक छोटी होडी असून त्या होडीत मी व माझी पत्नी आहोत. प्रांगणाच्या आयताकृती आकारात मी ती होडी वल्हवत फिरवतो आहे. उत्तरपूर्वेकडील कोप-यात होडी येते तेव्हा मात्र माझ्या हातातले वल्हे कुठे जाते ते कळत नाही व मी कठडयाचा आधार घेत घेत होडी पुढे ढकलतो आहे व त्याचवेळी मी पत्नीला काही तरी सांगत असतांनाच मला जाग आली. बहुधा साडेचारच्या सुमारास हे स्वप्नं पडत होते. 

.........

29.06.2020

आज तीन स्वप्नें पडली. तीनही स्वप्नांत मी प्रवासातच होतो !


1.आज सकाळीच स्वप्नात चक्क अमेरिकेला काही लोकांना सोबत घेऊन गेलो होतो ! तिथल्या वर्तमानपत्र जगतातल्या विभुतीशी अस्खलीत इंग्रजीत दहा पंधरा मिनिटे बरीच चर्चा एकटयानेच केली. पण नेमके विचारायचे होते तोेच मुद्दा विचारायला विसरलो, असा विचार लगेच केलेल्या परतीच्या प्रवासात मी स्वत:शी बोलतो आणि तेवढयात जाग आली ! गंमत म्हणजे त्या अमेरिकन माणसाचा चेहरा मला सडामि-यामधील एका माणसाच्या चेह-याशी मिळताजुळता वाटतो !


2. दुस-या स्वप्नात मी कुठल्या तरी विस्तीर्ण मोकळया सडयावर आहे. बहुतेक तो हातखंब्याचा सडा असावा. कुठून तरी चालत मी मुख्य रस्त्यावर येतो. काही वाहने जातांना दिसतात. कोणी तरी मला सांगतो की ते विमानाचे भाग वाहून नेले जात आहेत. ती वाहने पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असतात. त्याच वेळी तो माणूस पूर्वेच्या आकाशाकडे बोट दाखवतो. तिकडे एक चक्क काळया रंगाचे विमान पूर्वेकडून पश्चिमेकडेच येतांना दिसते. तो माणूस सांगतो की बंद पडलेल्या विमानाला ते वाहून आणत आहेत ! जमिनीवरून बंद पडलेल्या वाहनाला दुसरे वाहन ओढून नेते हे तसे नेहमीचेच. पण अधांतरी आकाशातून एक विमान चक्क दुस-या विमानाला ओढून नेते हे फारच विचित्र होते. एक तर त्या विमानाचा रंग काळा आणि ते एकच विमान मला दिसत होते. दुसरे कुठे होते ? वाहून कोण कोणाला नेत होते ? हे प्रश्न मनात यायच्या आतच माझे डोळे उघडले ! ( राफेलचा गुंता ? )


3. या स्वप्नातही मी कुठे तरी प्रवासालाच निघालेलो आहे. कुठल्या तरी भागात मी आलो आहे. तिथे एक खाजगी ट्रँव्हल्सची बस उभी आहे.  केबीनमधून डोके बाहेर काढून ड्रायव्हर मला कुठे जायचेय असे विचारतो. मी त्याला उत्तर दिशेकडील कोणते तरी एक ठिकाण सांगतो. पण तो म्हणतो की आमची गाडी अमूक ठिकाणापर्यंतच जाते. तिथपर्यंत सोडतो. पुढचं मी काही सांगू शकत नाही . मी पुढे वाहन मिळेल की नाही , काय करायचे , असा विचार करीत जागेवरच उभा असतांना माझे डोळे उघडतात !

........

03.07.2020

गेले तीन दिवस तीन स्वप्नें पडली. पहिल्या दिवशी रंगाने सावळे असलेले माझे जुने सहकारी स्वप्नात दिसले. दुस-या दिवशी माझे जुने साहेब दिसले . तेही रंगाने सावळेच आहेत ! तिस-या दिवशी माझा पुण्याला असलेला मुलगा रत्नागिरीच्या कलेक्टर कचेरीसमोरच्या  एका दुकानात दिसतो व रस्त्यावरून मी  त्याला खाली स्टँडच्या दिशेने जाण्यासाठी खुणावतो. 

............

11.07.2020

गोव्यात गेलेलो दिसलो. पण नक्की स्वप्नं आठवत नाही !

...........

17.07.2020

स्नप्नातही रात्र असते. हाँलमध्ये मी उजव्या कुशीवर झोपलो आहे. माझ्या मागे माझा मुलगा झोपलेला आहे. पत्नी कुठेच दिसत नाही. मात्र , माझ्या उशाला माझ्या डोक्याजवळ डोके ठेवून कोणी तरी पांढ-या शर्टातला तरूण झोपला आहे. तो माझी कळ काढू लागतो. डोक्याला हात लावतो. खांदयाला हात लावतो. मी मुलाला सांगतो हा बघ रे काय करतोय ... पण मुलगा काहीच बोलत नाही. मी त्या तरूणाचे दोन्ही हात पकडतो आणि त्याच्या मानेवर दाबून त्याला सांगतो की गप्प रहा, मी काहीही करू शकतो. असं म्हणत मी त्याच्या मानेवरचा दाब वाढवत नेतो. तो सुटकेचा प्रयत्न करीत असतो आणि तेवढयात मला जाग येते. त्रास देणारा तो तरूण म्हणजे कोरोनाचे प्रतिक तर नसेल ना ?

..........

20.07.2020

आज सकाळीच दोन स्वप्नें पडली. दोन्ही भयानकच ! सर्व घरात श्रावणाच्या स्वागतासाठी जोरदार स्वच्छता व शुध्दता केलेली आहे. या पार्श्वभूमीवर घरातच ही खतरनाक स्वप्नं पडावीत, हे काही चांगल्याचं लक्षण नाही. ती स्वप्नें पाहूया.

             1. घराच्या अगदी काटकोनातील वायव्य कोप-यात एका स्टुलावरील गोलाकार भांडयात नुकतेच आणलेले मासे ठेवलेले आहेत. शेजारीच मी उभा आहे. माझ्या पुढयातच पिवळया रंगाचा बोका त्या भांडयातच उडी मारतो . माझी कल्पना अशी असते की तो एक मासा घेऊन बाहेर जावून तो खाईल. पण तो बाहेर न पडताच अधिक मासे खाऊ लागतो. त्याच्या खाण्याचा विचित्र आवाज येत असतो. मी त्याला फटके मारू लागतो, पण तो मुटकुळी करून भांडयालाच चिकटतो आणि त्याही स्थितीत मचमच आवाज करीत मासे खातच राहतो. माझ्या फटक्यांना तो जुमानत नाहीय हे माझ्या लक्षात येते आणि तिथेच जाग आली !


     2. शेजारची साक्षी सद्या तिच्या माहेरी आहे. पण ती स्वप्नात आमच्या घरात लोळत पडलेली दिसतेय. मी तिला ढकलतोय, पण ती उठत नाहीय. चिवटपणे पडूनच राहते . ( दि. 07.08.2020 रोजी तिची सासू सांगून गेली की म्हणे ती आता सासरी येणारच नाहीय. )

........

04.08.2020 

          रात्रीची वेळ. स्वप्नात जुने घर दिसते. मागच्या पडवीतून वडील बाहेर दक्षिण दिशेला जातात. आई पडवीत ताठ सरळ उभी . मी माजघरातून आईच्या दिशेने जात असतांना आई मला वडील बघ बाहेर काय करतायत ते म्हणून सांगते . इथे स्वप्नाचा पहिला भाग संपतो व दुसरा लगेच सुरू होतो. दुस-या दिवशीची सकाळ दिसते. पुढच्या दारी उत्तरेला लाकडाच्या मोठया ओंडक्यावर मी , माझ्या उजवीकडे पांडवीन काकी व तिच्या उजवीकडे सुधरीन वहिनी हया दोघी विधवा असे पूर्व पश्चिम बसलेले असतो. अचानक माझा लक्ष घराच्या वायव्य कोप-याकडे जाते. बघतो तर माझे वडील केवळ लंगोटवर खाली वाकून जमिनीला तोंड लावतांना दिसतात. मी झटकन उठतो आणि त्या दिशेला जात असतानाच सुधरीन वहिनी मला अडवण्याचा प्रयत्न करते. मी तिचे हात झटकून वडिलांच्या दिशेने निघतो आणि इथेच मला जाग येते. वडील काही अंतरावर वाकलेल्या स्थितीतच असतात. 

..........

 05.08.2020

काल ते तसे विचित्र स्वप्नं पडले आणि आज... काल उत्तर दिशेला घटना घडत होत्या. आज दक्षिण दिशेला रस्त्याच्या कडेला असलेले गेट उघडून एक पाय रस्त्यावर टाकून मी गेटला धरून उभा आहे. समोर कोणी तरी आहे . बहुधा मी त्याच्याशी काही तरी बोलतो आहे. तेवढयात एक स्त्री मला डावीकडून चिकटते. तिची त्या जवळीकीची जाणीव होऊन मी उजवीकडे सरकतो आणि इथेच मला जाग येते. 

.........


गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

Lovely messages 7

 नमस्कार मित्र हो , 


काही मित्र आपल्याला दररोज शुभ संदेश पाठवतात. कोरोनामुळे तर हे फार अावश्यक झाले आहे. संदेश अनेक जण पाठवतात. पण काही जण एका विशिष्ट प्रकारचे संदेश पाठवतात. अशा संदेशांमुळे आपल्याला आयुष्यात दिशा मिळते. कधी कधी तर मन उदास झाले तर असे संदेश मनाला नवी उर्जा देतात. विशेष म्हणजे असे सुंदर व उपयुक्त संदेश पाठवणा-या व्यक्ती ते गोळा करण्यासाठी व इतरांना पाठवण्यासाठी अपार मेहनत घेत असतात. त्यांच्या या चांगल्या उपक्रमाची माहिती या पानातून देण्याचा हा प्रयत्न आहे. ही कल्पना ज्यांच्या नियमितपणे उत्तम संदेश पाठविण्यामुळे सुचली ते म्हणजे 


          श्री. संतोष रामचंद साळगांवकर

 या , आपण त्यांचे संदेश वाचू व अशा चांगल्या गोष्टींचा प्रसार करू.
...........
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते......
   🌹 *Good Day* 🌹
..........

*विरोधक तयार  करण्यासाठी*
*मारामारी करावी लागत नाही*
*तुम्ही चांगले कार्य करु लागला की*
*आपोआप विरोधक तयार होतात कारण*
*कर्तृत्ववान व्यक्तीचे कार्य बघितले जात नाही* ,
*परंतु  तो कोठे अडकतोय* 
*याकडे सर्वांचे मात्र लक्ष असते ...!*
       🌹 *सुप्रभात*  🌹
..........
*जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय*
*नवीन वाटांचा शोध लागत नाही*..

  *🌹शुभ सकाळ🌹*
..........
*जेंव्हा एखादी व्यक्ती त्यांची समस्या आपल्या समोर मांडते, तेंव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्‍वास ठेवते*
         🌹सु प्रभात🌹
.........
वेळ , मित्र आणि नाती
 ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,
 त्यांना किंमतीचे लेबल नसते.
 पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते 
     🌹 *शुभ सकाळ* 🌹
...........
*गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो.* *मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.*
    🌹शुभ सकाळ🌹
..........
_*चांगला रस्ता पाहिजे असेल तर* 
*गतीरोधक सहन करा*, 
*आणि चांगला माणूस बनायचं असेल तर* 
*विरोधक सहन करा.*_

*🌹 शुभ सकाळ🌹*
.......
*पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो,*
*मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो.*
     
       *🌹 शुभ सकाळ* 🌹
.......
*चूक नसतानासुध्दा निव्वळ वाद टाळण्याकरिता मागितलेली माफी,जीवनातील संयमाचं एक मोठं उदाहरण ठरतं.!!* 
*जीवनात संयम राखला तर आपले अस्तिव कुणीच संपवू शकत नाही.!!*

         🌹*शुभ सकाळ *🌹
.......
जगण्यातले सगळ्यात कणखर आव्हान म्हणजे ? मनाला लावून न घेणे व येणारया संकटाला धैर्याने सामोरे जाणे यालाच जीवन म्हणतात.
     🌹सु प्रभात🌹
......... 
*एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी ज्ञानाची गरज लागते, पण तिची जाणीव होण्यासाठी अनुभवाची गरज असते.*

🌹 *शुभ सकाळ* 🌹
.......
*लोकांना आपण का खटकतो...*

*आपण वाईट वागतो म्हणून नाही*,
*तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून...*

*शब्द फिरवणारे लाख मिळतील*
*पण... शब्द पाळणारा एखादाच मिळेल ..*

          *💐 शुभ सकाळ 💐*
.........
*चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय मृगातील रिमझिमचा आनंद द्विगुणीत हाेत नाही.*
*तसेच,*
*जीवनात संकटांची वादळे झेलल्या शिवाय सुखाची चव कळत नाही.*
 
*🌹शुभ सकाळ🌹*
.......
*आयुष्य हि फार अवघड शाळा आहे.इथे कॉपी करता येत नाही.*

*कारण इथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.*

        🌹 *शुभ सकाळ* 🌹
..........
*जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते जे स्वतः सोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात...*

  🌹*शुभ सकाळ*🌹
.......
घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात तेव्हा
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....!

           🌹 सुप्रभात 🌹
........
*आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य..."*
*जिंकलो तर स्वतःला आवरायचं*
 *आणि हरलो तर ईतरांना सावरायचं..."*
         
       *🌹सुप्रभात🌹*
.........
*घराचा प्रमुख होणे सोपे नाही, त्याची स्थिती पत्र्याच्या शेड सारखी असते. जो ऊन, पाऊस, वारा, वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो, परंतु त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की, ‘हा खुप आवाज करतो’.*

           🌹   *सुप्रभात*   🌹
.......