ONLY DEVIDAS !
Me to myself & You ! Top Marathi and Hindi articles, poems and gazals.
फक्त देवीदास ! साहित्यिक देवीदासाचा स्वतःशी आणि तुमच्याशीही सुरू असलेला सुसंवाद !
आयुष्य तितकेसे सोपे नसतेच कुणालाही . आयुष्याकडे बघतांना बरेच काही जाणवते
, आढळून येते. स्वतःच्या व इतर अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची ही शिदोरी...फक्त देवीदासाच्या शब्दांत... खास तुमच्यासाठी !
ही एक हिंदी रचना आहे. गझल स्वरूपात. यात जो मतला ( पहिल्या दोन ओळी ) आहे त्याचा अर्थ असा आहे :
लिहू तर इच्छितो ... पण भीती वाटते ...
इतकेच तर करू पाहतो , पण भीती वाटते
थोडक्यात , माणसाला कसली ना कसली तरी , कुणाची ना कुणाची तरी भीती वाटत असते. इथे लिखाणाची भीती वाटतेय. कसल्या तरी दहशतीमुळे लिहूही शकत नाही, इतकंही करू शकत नाही , अशी स्थिती झाली आहे.
आता आपण पुढील ओळींचीही माहिती घेऊ.
हरतो एवढ्यासाठी की जिंकू शकत नाही
जिंकायला तर पाहतो , पण भीती वाटते !
भीती ही जिंकण्याच्या आड येते. भीतीमुळे जिंकायची इच्छा असूनही हरावं लागतं.अशी ही भीती वाढत जाते आणि पुढील ओळीत आणखी डोके वर काढते .
रात्र तर निघून जाईल... तिच्यासवे चंद्रही !
स्वप्नं तर बघू इच्छितो , पण भीती वाटते !
हे असं आहे. रात्रीबरोबर चंद्रही निघून जाईल आणि ज्याचं स्वप्नं बघायचं तो स्वप्नीचा चंद्रच गेला तर स्वप्नं तरी कुणाचं बघायचं आणि कसं बघायचं ! ही भीती इथे आहे.
पुढे पुढे तर प्रेयसीच्या भेटीबाबतही साशंकता निर्माण होते...कवी म्हणतो :
भेट वा भेटू नको, भेटण्याची आस तर आहे
भेटायला तर हवे आहे , पण भीती वाटते !
माणसाचं मन डगमगतं. हिचकिचतं. मागे पुढे होतं. प्रेमात तर फारच द्विधा मन:स्थिती होते ! तिची भेट हवीहवीशी आहे , भेटावसं असंही वाटतं... पण समाजाचे पहारे जिकडे तिकडे उभे असतात. आता असं असल्यावर काय करणार ? प्रेमात सफल कसं होणार ? ही भीती प्रितीच्याच मूळावर येतेय की काय !
पाहू या पुढे काय होतंय...शायर म्हणतो :
कदाचित मलाच नीट बोलता येत नसावे
बोलावेसे खूप वाटते..., पण भीती वाटते !
आता बोलण्याची हातोटी सगळ्यांकडे नसते. काही जण बिनधास्तपणे हवं नको ते सहज बोलून मोकळे होतात. पण काहींचे फार हाल होतात. त्यांना आपले म्हणणे नीट मांडताच येत नाही. ते व्यक्ती समोर आली की हडबडून जातात , एक तर तोंडातून शब्दच बाहेर पडत नाही किंवा पडलेच तर अस्पष्ट पडतात. ततपफ होते. ऐकणाऱ्याला कळतच नाही की हा काय म्हणतोय ! मग भलतेच ओठांवर येते आणि पाय काढता घेतला जातो ! माणूस ओशाळून जातो.
काहीही असो ; भीती ही भीतीच असते. किती काही म्हटले तरी ती वाटतेच ! अगदी त्या हिंदी गझलमध्येही म्हटले आहे की " प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता हैं..." म्हणजे मनात भीती असते म्हणून तर शायर म्हणतो की प्रेमाचे पहिले पत्र लिहायला वेळ तर लागतोच ! ती गझलच ऐकू या की...
किती मनापासून जगजितसिंगानी गायिली आहे ही गझल ! त्या महान कलाकाराला सलाम !
थोडक्यात, हे केवळ काव्य नाही , तर या रचनेत भीतीचे काही प्रकार सांगितले आहेत. थोडीफार भीती वाटणे तसे स्वाभाविक असते. किंबहुना, माणसाला ती आवश्यकच असते. पण ही भावना वाढीस लागली तर मात्र तिच्यावर उपाययोजना आवश्यक ठरते.
भीती ही अशीभावना आहेजिच्यावर मात करण्याचीही काहींना भीती वाटते. यावर उपाय म्हणजे स्वयंसूचना . मी बिनधास्त होत आहे , मी कशालाही घाबरत नाही , अशा स्वयंसूचना मनाला सतत देत राहणे , हा याच्यावरचा बिनखर्चाचा आणि सहज करता येतो असा , खात्रीशीर उपाय आहे. हळूहळू मनातली भीती जाऊ लागते !
#pyarka_pahla_khat_likhaneme_derto_lagati_hai
#जगजितसिंग
#more_in_hindi :
............
कोरा.काॅम या साईटवर देवीदास हरिश्चंद्र पाटील यांच्या हिंदी कविता , गझला , गीत , लेख यासाठीचा मंच :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा