आपण
जखमेवरती मीठ दुज्याच्या चोळत बसतो आपण
पुन्हा पुन्हा ही एकच संधी शोधत बसतो आपणज्याचे त्याचे भविष्य ज्याच्या त्याच्या हाती असते तरीही ज्योतिष्याच्या नादी लागत बसतो आपण
सर्वज्ञानी स्वतःस समजून आपण बोलत जातो
खुळ्यापरी अकलेचे तारे तोडत बसतो आपण
जिकडे तिकडे माणूस म्हणुनी मिरवत असलो तरी
माणूसकीवर खुनी हल्ले चढवत बसतो आपण
किती चोरटे , किती लफंगे , किती बुवा अन बाबा !
फसूनसुध्दा त्यांच्या नादी लागत बसतो आपण
स्वतः स्वतःच्या निर्मळतेची जाहिरात करतो अन
क्षुद्र मनाची दूषित छिद्रे झाकत बसतो आपणकंपू करूनी नको नको त्या चर्चा करतो सा-या नसेल त्याच्या पाठीमागे बोलत बसतो आपण
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
----------------------------------------------------- काही नवेनवेसे...
काही नवेनवेसे . . . काही जुनेजुनेसे . . .
मज आजकाल बाई . . .वाटे हवेहवेसे . . .!
हातात हात माझ्या जेव्हा दिला तयाने . . .
मज वाटलेच नाही तेही खरेखरेसे !
तो चोर काळजाला घालीत हात आहे
लागे न ठाव त्याचा पण ते वाटे बरेबरेसे !
मज आजकाल माझा अंदाज येत नाही !
गिरकीत हाय करते मागे पुढेपुढेसे . . . !
हा तोच आरसा अन् हा तोच चेहराही !
बघणे मुळी न होई मजला पुरेपुरेसे . . . !
झाले तरी कळेना माझे असे कशाने . . .
बेचैन आतुनी मी ! होते कसेकसेसे !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
|
खास
काही तरी खास होते !
का होत हे भास होते ?
जादू कशाची कळेना
फुलले किती श्वास होते !
फुलले किती श्वास होते !
होवून सेकंद गेले
पण वाटले तास होते !
पण वाटले तास होते !
होते हवेहवेसे. . .
काही असे त्रास होते !
चाहूल लागे जराशी
कोणी आसपास होते !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
कड़े अन कपार मला
कड़े अन कपार मला
कुठे ना उतार मला !
कसे मी हसू उसने ?
इथे दू:ख्ख फार मला !
फुले देवुनी वर त्या --
फुलानी मार मला !
इथे माणसे फसवी
कशी तारणार मला !
अहा ! मानवी दृष्टी
चिरी जातवार मला !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
मन विषण्ण होते तेव्हा ....
मन विषण्ण होते तेव्हा त्यास कुठेतरी रमवावे लागते !
एका विषयाकडून दुस-या विषयाकडे वळवावे लागते !
दुस-याला शिकवणे तसे हल्ली फारच सोपे झाले आहे !
विसरतात बरेच लोक की आधी स्वत:स शिकवावे लागते !
यशस्वी माणूस जाणीत होता त्याच्या यशामागचे वाक्य --
काहीतरी कमविण्यासाठी काहीतरी गमवावे लागते !
कश्या सावल्या शोधीत येती उन्हास ह्या गरिबाच्या घरी ?
जिथे कवडसे जराश्या आशेचे ; ज्यांना लपवावे लागते !
रणांगणावर लढण्यावाचून खुला पर्यायच नसतो कुठला !
हारजीत ही नंतर ... आधी रणांगणाला पचवावे लागते !
....*********/////////-------@@@@@@@@@*****///+++++-
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
मीच मजला पेश केले पाहिजे
जगाच्या दारात नेेले पाहिजे
गुरू बनायचे असेल जर कधी
आधीच शोधले चेले पाहिजे
जगायचे सुखी आयुष्य पुढे तर
रोजचेच आता मेेले पाहिजे
अहंकार नष्ट व्हावा यासाठी
षढरिपू वागून गेले पाहिजे
' त्या ' भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी
सोबती , बाटल्या , पेेले पाहिजे
.............***//////*@@@@@@$$$$$$$$$#######
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
सोसणे
हे कसे माझे तुझेही बोलणे झाले
जे खरे बोलायचे ते टाळणे झाले
मी किती आतुर होतो भेटण्यासाठी
शेवटी भेटीत खोटे भेटणे झाले
जे कधीकाळी तुझ्या ओठावरी होते
तेच माझे नाव आता शोधणे झाले
कोठुनी आणू पुन्हा त्या चांदराती मी ?
हे फिके माझेच आता चांदणे झाले !
काय आयुष्यात आलो सोसण्यासाठी
सोसणेही एकट्याने सोसणे झाले !
खुशाल आता चाखतो मजा ह्या जीवनाची
मजेत आता लोक हो जगाया लागलो मी !
-----------------------------------------------------------------------------------
शब्द
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
शब्द
लोक जे वाचाळ काही सारखे चर्चीत होते
ते रिकामे लोक होते हे मला माहीत होते
बंगले बांधून गेले . . . झुंबरे लाऊन गेले
कोठुनी झाली कमाई ? उत्तरे टाळीत होते !
हाय हे चिक्कार गुत्ते , हाय ही चिक्कार दारू
सर्व हप्ते बांधलेले , जे नको ते पीत होते !
या दुकानी माल खोटा , त्या दुकानी माल खोटा
ग्राहकांना हे लुटारू सारखे फसवीत होते !
जीवघेणे वार होते . . . जीवघेणी धार होती . . .
ह्या अश्या शब्दांस माझे अर्पिले मी गीत होते !
----------------------------------------------------------------------------------
हट्ट
ते रिकामे लोक होते हे मला माहीत होते
बंगले बांधून गेले . . . झुंबरे लाऊन गेले
कोठुनी झाली कमाई ? उत्तरे टाळीत होते !
हाय हे चिक्कार गुत्ते , हाय ही चिक्कार दारू
सर्व हप्ते बांधलेले , जे नको ते पीत होते !
या दुकानी माल खोटा , त्या दुकानी माल खोटा
ग्राहकांना हे लुटारू सारखे फसवीत होते !
जीवघेणे वार होते . . . जीवघेणी धार होती . . .
ह्या अश्या शब्दांस माझे अर्पिले मी गीत होते !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
हट्ट
हा तुझा हट्ट असा चंद्र बघायासाठी !
हात हातात असा घट्ट धरायासाठी !
चित्त चोरून तुझे आज कुणी नेले ?
काय कारण झाले जीव जडायासाठी !
हाय ! सरकेल जशी रात पुढे एकांती . . .
जीव होतील पिसे एक बनायासाठी !
ठेव संकोच तुझा दूर अश्या ह्या वेळी
ही न आहेच घडी दूर सरायासाठी !
सरीमागून सरी कोसळती प्रेमाच्या !
ये अशी बिलग मला चिंब भिजायासाठी !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
भास
का फुलांचे वार व्हाया लागले
हाय , काटेही फुलाया लागले !
मी तुझ्याशी आज थोडे हासलो
लोक सारे का जळाया लागले ?
लाख कानांनी कहाणी ऐकली
मोजके डोळे गळाया लागले !
वाट माझी सांडली मागेच मी
पाय आता सापडाया लागले !
माळतो आहे तुला मी मोगरा
की मला हे भास व्हाया लागले ?
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
-------------------------------------------------------------------------------
आयुष्य आग आहे
आयुष्य आग आहे
जळणेच भाग आहे !
करतोस दुष्ट दैवा
का पाठलाग आहे ?
सारी उजाड राने
उध्वस्त बाग आहे !
साधा कटाक्षसुद्धा
झाला महाग आहे !
कुठल्या मनात गंगा ,
काशी , प्रयाग आहे ?
जे जे घडून गेले
त्याचा न राग आहे !
सूर्यास वेदना अन
चंद्रास डाग आहे !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
हसून दु:ख्खे
हसून दु:ख्खे साजरी कराया लागलो मी
सुखापरी दु:ख्खातही हसाया लागलो मी !
सुखापरी दु:ख्खातही हसाया लागलो मी !
हवे कशाला सोबती तरी खोट्या मनाचे ?
खराखुरा माझा सखा बनाया लागलो मी !
नमून आता राहणार नाही दांभिकानो
नसानसानी पेटुनी उठाया लागलो मी !
तुझ्या ऋतुनी पाडल्या फिक्या ह्या चांदराती
तुझ्या ऋतूना पाहुनी फुलाया लागलो मी !
खुशाल आता चाखतो मजा ह्या जीवनाची
मजेत आता लोक हो जगाया लागलो मी !
-----------------------------------------------------------------------------------
चेहरा
आसवे न ढाळतो
मी हसून राहतो !
अंतरात माझिया
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
चेहरा
आसवे न ढाळतो
मी हसून राहतो !
अंतरात माझिया
मी तुलाच पाहतो !
संपले ऋतू जरी
मी तरी न संपतो !
मी तुझ्या मनातली
चांदरात मागतो !
मी तुझाच, हे तुझा
मी तुझ्या मनातली
चांदरात मागतो !
मी तुझाच, हे तुझा
चेहराच सांगतो !
----------------------------------------------------------------------------------
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
तुझ्या मालकीचे !
सूर छेडू नको बासरीचे
वेड लावू नको संगतीचे !
थांब थोडे ! जरा ऐक माझे !
रंग उधळू नको पंचमीचे !
थांब थोडे ! जरा ऐक माझे !
रंग उधळू नको पंचमीचे !
बोल काही तरी बोल आता . . .
बोल काही तरी अंतरीचे !
खातरी ना तुझ्या वागण्याची !
भेटणेही तुला जोखमीचे !
रामपारी तुझा स्पर्श झाला . . .
श्वास झाले तुझ्या मालकीचे !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
प्रश्न जेव्हा विचारला
प्रश्न जेव्हा विचारला
उत्तराने दगा दिला !
चेहऱ्यावर फुले जरी
आत काटा विसावला !
घे नशीबा हसून तू
सूर्य माझा ढगाळला !
नाव माझी न भंगली
पण किनारा दुरावला !
मी सुपाशी कसा लढू ?
मीच दाणा सुपातला !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
सूर्य
भंगला जरी आरसा
चेहरा जसाच्या तसा !
हे तुझे ऋतू कोठले ?
मी दिला तुला हा वसा !
शोभशील राजा घरी
राहिला न राजा असा !
राहूदेत कुंकू तरी
तेवढाच माझा ठसा !
लोक हे जरी बोलले
ऐकतो कुठे मी तसा !
सूर्य शेवटी भेटला . ..
सोडताच मी कवडसा !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
इशारे
कशी कोमेजली सारी फुलांची बाग ही लवकर ?
कसे काळीज हे झाले तुझेही सांग ना पत्थर !
असे काही तरी होते , असे काही तरी आहे !
असे आयुष्यही झाले तुझ्या हातातले जर तर !
मला बोलायचे होते ... तरी मी बोललो नाही !
तुझी ती चौकशीसुद्धा तशी होती खरी वरवर !
सुगंधी श्वास ते होते तुझे मी ठेवले सोबत ...
कधी मी शिंपडू म्हटले तरी का सांग ना अत्तर !
तुझ्या सा-याच प्रश्नांची दिली मी उत्तरे होती !
अता एकाच प्रश्नाचे .... मला दे एक तू उत्तर !
जिथे मज जायचे होते ... तिथे मी पोचलो नाही !
तुझ्या डोळ्यातले काही ... इशारे जाणले नंतर !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
जीवना
सोसली तुझी उन्हे ; सोसल्या तुझ्या झळा
जीवना तरी मला ... लागला तुझा लळा !
रोजचेच वीष मी आत आत घेतले !
हा उगाच काय रे कंठ जाहला निळा ?
पीत पीत आसवे झिंग झिंग झिंगलो !
गोड गोड बोलुनी कापलास तू गळा !
पाहिले तुझेच मी चेह-यात चेहरे !
पाहिला तुझाच मी रंग रंग वेगळा !
दु:खं दु:खं वेचले मी कळयाफुलांपरी !
हासुनी व्यथेसवे शिंपला तुझा मळा !
एक एक वाट तू घेरलीस जीवना !
पाय टाकला तिथे लावलास सापळा !
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
कौतुक
हलकेच चंद्र माझा माझ्या कुशीत आला !
हलकेच देह माझा कोजागरीत न्हाला !
कळले मला न केव्हा पडली मिठी फुलांची !
कळले मला न केव्हा माझा सुगंध झाला !
आता कुठे जरासा दिसलो म्हणे मला मी !
माझाच चेहरा का नयनी तुझ्या निघाला !
जपले अबोल काही क्षण मी मनात हळवे ...
गेली करून लाली साराच बोलबाला !
पडतात रोज स्वप्नें मजला कशी गुलाबी ?
पडते धुके गुलाबी ... माझ्या कसे उशाला !
घेवू तरी कसे मी माझेच नांव आता ?
माझ्यात पाहतो मी दुस-या तरी कुणाला !
अजुनी तुझे मला का इतके म्हणून कौतुक ?
स्मरतो तुलाच आहे विसरून का स्वत:ला ?
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
आयुष्यभर
तू बोलतांना तुला ऐकत रहावेसे वाटते
तू एकसासारखे मग बोलत रहावेसे वाटते
तू ती आग आहेस जी आग माझी शांत करते
तू जिवाला सारखे जाळत रहावेसे वाटते
तुझ्या माझ्यातले अंतर ... जरी हे वाढले नंतर
पुन्हा जुन्या वाटेवर भेटत रहावेसे वाटते
कितीही पाहिले तरी हे मन भरतच नाही
कितीही पाहिले तरी पाहत रहावेसे वाटते
चार पावलांनी फारसे समाधान होत नाही
आयुष्यभर सोबत चालत रहावेसे वाटते
... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा