माळीण गांव
काल होते गांव
आज ते दिसेना ;
काळजाचं पाणी
डोळ्यात ठरेना !
डोंगरकुशीत
माळीण ते गांव;
त्याचा डोंगरात
लागे ना की ठाव !
अवघ्या क्षणात
मातीमोल झालं ;
एक आख्खं गांव
मातीखाली गेलं !
…
============================
कचरा
झाडू मारून
कचरा हटेल
भ्रष्ट मंत्री
आणि गुंड
यांची युती
तुटेल काय ?
दंगली आणि
बलात्कार
झाडू मारून
हटतील काय ?
सामान्यांचा
फाटक्यात पाय
जायचा कधी
थांबेल काय ?
=====================
माझ्या उरात कविता
माझ्या उरात कविता
कोणी कळे न कोरली
कोणी कळे न कोरली
दीप श्वासांचे विझले
तरी कविता तेवली !
कधी आकाश फाटले
कधी जमीन खचली
आले जखमांचे पूर
तरी कविता तरली !
भरोश्याच्या माणसानी
मान केसानी कापली
भरोश्याची राहिली ती
फक्त कविता आपली !
***************
धावत्या ओळखीच राहिल्या
स्वप्नील त्या रात्री
धुन्धीत मस्त गेल्या
आज त्या मैफिलीन्च्या
स्मृतीच फक्त राहिल्या ...
मैत्रीत ना राहिली
पूर्वीची ती आत्मीयता
अंगणात बसून पाहिलेल्या
चांदण्याच फक्त राहिल्या ...
वेगळ्या होवून वाटा
चौफेर जेव्हा गेल्या
घाई गर्दीच्या त्या रस्त्यावर
धावत्या ओळखीच राहिल्या ...
***************
विसर
आता तुला पंख फुटले आहेत पाखरा
आता तुझा माझा संपला आहे सहवास
माझी तुला जराशीही उरली नाही गरज
तुझी स्वप्ने मी फूलवली आनंदात
तू एवढी दुनिया पहिली नव्हतीस
तेव्हा मीच होतो तुझ्या स्वप्नांचा राजकुमार
वाढत्या वयाबरोबर विस्तृत झालं तुझं जग
आणि मी बनून राहिलो एक धूलिकण
तुझ्याच डोळ्यातील ती स्वप्ने विसरून
तू आज झेपावतेयस उंचावरून
माझ्या जमिनीवरून खुरडण्याचा खेद नाही
तुझ्या भरारण्याचाच आनंद अधिक आहे
दुःखं एवढच : आता तुला पडला आहे माझा विसर
आता तुला पंख फुटले आहेत पाखरा
गतःकाल विसरून
भविष्याकडे झेपावण्यासाठी
***************
हसे
तू मागू नकोस माझ्याकडे
फुलानी भरलेली ओंजळ
काटेच मिळतील तुला तिथे
आणि मिळतील आसुडांचे वळ
सोसण्याची आता ताकद नाही
पण सोसण्या- भोगण्याची खंतही नाही
आयुष्याने पार उलटेपालटे केले
याचेच हे दुःखं आहे बोचणारे !
असा मी तुला कसे देवू फुलांचे झेले ?
आकाशीचा चंद्रही मागू नको
शपथ आहे तुला माझी आणि
माझ्यातील खाचखळग्यांची !
माझ्याच असंख्य विवरातून
मी चालतो आहे अनवाणी !
आयुष्य पत्थर झाले आहे
या कातळाला ओलावा नाही
कशाला भिजवू तरी मी
माझ्या उदास अश्रुनी तुझी बाही ?
जेव्हा जेव्हा दिसलीस : हसलो !
आता याचेच हसे झाले आहे !
आता याचेच हसे झाले आहे !
***************
स्मारकात बंद झालो !
जितेपणी घातली मी
गगनास गवसणी
हाय, आता मेल्यावरी
स्मारकात बंद झालो !
***************
गुपित
गुपित उरले आता कसले ग
मी तुज बोलून बसले ग
लटक्या रागाने रुसले ग
हसला तो अन मीही हसले ग
राजबिंडे रूप मनोहर दिसले ग
त्यावर भाळून मीही फसले ग
काय बाई प्रेम तरी असले ग
मीपण झाले असले नसले ग
***************
कळली तुझी सोज्वळता , आगीपुढे विरघळता !
एका झाडाच्या दोन फांद्यांनी
दुसऱ्या झाडाच्या एका फांदीला घट्ट विळख्यात पकडले
आणि रगड रगड रगडले .
ही गोष्ट दोन्ही झाडांनी अनुभवली .पण पहिल्याने ती नाकारली .
ते म्हणाले , ती माझी फांदीच नव्हे ;
तुझ्या माझ्यात किती हे अंतर !
तुझ्या फांदीला दुसऱ्याच झाडाची फांदी घासली असेल .
तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. पहाटे असे भ्रम होतातच ! दुसरे झाड काही बोलले नाही .
बराच काळ ती दोन्ही झाडे शांत होती .
मध्येच एकदा दुसऱ्या एका शांत रात्री ,
स्वत:होऊन पहिले झाड दुसऱ्याच्या जवळ आले होते.
दुसऱ्याने मग आपले एक पान पहिल्याच्या एका पानावर अलगद ठेवले .
हळूहळू दोघात स्पर्शतरंगांची उधळण सुरु झाली !
ही गोष्टसुद्धा पहिल्या झाडाने चक्क नाकारली !
ते म्हणाले , एक तर मला तसल्या भावनाच नाहीत आणि झोपेतसुद्धा मी सावध असते.
मुळात मी सोज्वळ आहे.
दुसरे झाड बिचारे चूप बसले . ते फक्त मनात एवढेच म्हणाले :
सोज्वळता वागण्यात दिसली पाहिजे ना !
बोलून काय उपयोग ?
वरून सोज्वळ आतून उठवळ झाडांचे हे असेच असते.
कळली तुझी सोज्वळता , आगीपुढे विरघळता !
***************
धावत्या ओळखीच राहिल्या
स्वप्नील त्या रात्री
धुन्धीत मस्त गेल्या
आज त्या मैफिलीन्च्या
स्मृतीच फक्त राहिल्या ...
मैत्रीत ना राहिली
पूर्वीची ती आत्मीयता
अंगणात बसून पाहिलेल्या
चांदण्याच फक्त राहिल्या ...
वेगळ्या होवून वाटा
चौफेर जेव्हा गेल्या
घाई गर्दीच्या त्या रस्त्यावर
धावत्या ओळखीच राहिल्या ...
***************
विसर
आता तुला पंख फुटले आहेत पाखरा
आता तुझा माझा संपला आहे सहवास
माझी तुला जराशीही उरली नाही गरज
तुझी स्वप्ने मी फूलवली आनंदात
तू एवढी दुनिया पहिली नव्हतीस
तेव्हा मीच होतो तुझ्या स्वप्नांचा राजकुमार
वाढत्या वयाबरोबर विस्तृत झालं तुझं जग
आणि मी बनून राहिलो एक धूलिकण
तुझ्याच डोळ्यातील ती स्वप्ने विसरून
तू आज झेपावतेयस उंचावरून
माझ्या जमिनीवरून खुरडण्याचा खेद नाही
तुझ्या भरारण्याचाच आनंद अधिक आहे
दुःखं एवढच : आता तुला पडला आहे माझा विसर
आता तुला पंख फुटले आहेत पाखरा
गतःकाल विसरून
भविष्याकडे झेपावण्यासाठी
***************
हसे
तू मागू नकोस माझ्याकडे
फुलानी भरलेली ओंजळ
काटेच मिळतील तुला तिथे
आणि मिळतील आसुडांचे वळ
सोसण्याची आता ताकद नाही
पण सोसण्या- भोगण्याची खंतही नाही
आयुष्याने पार उलटेपालटे केले
याचेच हे दुःखं आहे बोचणारे !
असा मी तुला कसे देवू फुलांचे झेले ?
आकाशीचा चंद्रही मागू नको
शपथ आहे तुला माझी आणि
माझ्यातील खाचखळग्यांची !
माझ्याच असंख्य विवरातून
मी चालतो आहे अनवाणी !
आयुष्य पत्थर झाले आहे
या कातळाला ओलावा नाही
कशाला भिजवू तरी मी
माझ्या उदास अश्रुनी तुझी बाही ?
जेव्हा जेव्हा दिसलीस : हसलो !
आता याचेच हसे झाले आहे !
आता याचेच हसे झाले आहे !
***************
स्मारकात बंद झालो !
जितेपणी घातली मी
गगनास गवसणी
हाय, आता मेल्यावरी
स्मारकात बंद झालो !
***************
गुपित
गुपित उरले आता कसले ग
मी तुज बोलून बसले ग
लटक्या रागाने रुसले ग
हसला तो अन मीही हसले ग
राजबिंडे रूप मनोहर दिसले ग
त्यावर भाळून मीही फसले ग
काय बाई प्रेम तरी असले ग
मीपण झाले असले नसले ग
***************
कळली तुझी सोज्वळता , आगीपुढे विरघळता !
एका झाडाच्या दोन फांद्यांनी
दुसऱ्या झाडाच्या एका फांदीला घट्ट विळख्यात पकडले
आणि रगड रगड रगडले .
ही गोष्ट दोन्ही झाडांनी अनुभवली .पण पहिल्याने ती नाकारली .
ते म्हणाले , ती माझी फांदीच नव्हे ;
तुझ्या माझ्यात किती हे अंतर !
तुझ्या फांदीला दुसऱ्याच झाडाची फांदी घासली असेल .
तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. पहाटे असे भ्रम होतातच ! दुसरे झाड काही बोलले नाही .
बराच काळ ती दोन्ही झाडे शांत होती .
मध्येच एकदा दुसऱ्या एका शांत रात्री ,
स्वत:होऊन पहिले झाड दुसऱ्याच्या जवळ आले होते.
दुसऱ्याने मग आपले एक पान पहिल्याच्या एका पानावर अलगद ठेवले .
हळूहळू दोघात स्पर्शतरंगांची उधळण सुरु झाली !
ही गोष्टसुद्धा पहिल्या झाडाने चक्क नाकारली !
ते म्हणाले , एक तर मला तसल्या भावनाच नाहीत आणि झोपेतसुद्धा मी सावध असते.
मुळात मी सोज्वळ आहे.
दुसरे झाड बिचारे चूप बसले . ते फक्त मनात एवढेच म्हणाले :
सोज्वळता वागण्यात दिसली पाहिजे ना !
बोलून काय उपयोग ?
वरून सोज्वळ आतून उठवळ झाडांचे हे असेच असते.
कळली तुझी सोज्वळता , आगीपुढे विरघळता !
***************
आता आतासे वाटू लागले आहे
काहीतरी पुन्हा सुरु करावे
निदान एखादी कविता तरी लिहावी
.
तेवढाच मनाचा निचरा !
कोंडलेले आभाळ तेव्हढेच मुक्त !
बाकी आपणच आपले कौतुक काय करायचे ?
***************
ही सुरी धारदार
वार आरपार
काळजाच्या ....
गंधतो श्वास श्वास
तूच आसपास
काळजाच्या ....
प्रिय तू फक्त एक !
भोवती अनेक
काळजाच्या ....
.......................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा