मंगळवार, २ जून, २०२०

Ek divas assahi dilasa denara

दिन विशेष :


                    आज सोमवार दि. 01 जून 2020 . काही दिवस उगवतात ते त्यांचे वेगळेपण घेऊनच ! अशा दिवशी अनेक दिवसानंतर किमान तीन चार गोष्टी तरी मनाला आनंद देणा-या , दिलासा देणा-या पाठोपाठ घडतात ! आजही काहीसे असेच झाले ! श्री. नितीन देशमुख हे आघाडीचे मराठी गझलकार फेसबूकवर त्यांना आवडलेले तीन गझलकारांचे शेर रसिकांसाठी देत असतात. गेले काही दिवस मी हया पोस्टस् वाचत होतो. लाईक देत होतो. कमेंटस् करत होतो. आजही मी फेसबूक उघडले तर नितीनची पोस्ट समोरच आली ! त्यात चक्क माझाही एक शेर होता ! मला हा ब-याच दिवसांनी आश्चर्याचा सुखद धक्का होता ! त्या पोस्टचा स्क्रीन शाॅट तुमच्यासाठी इथे देतो. 



             त्यापाठोपाठ फेसबूकवरील माझ्या टाईमलाईनवर अशीच एक पोस्टही अचानकपणे माझ्या नजरेस पडली ! तिचाही स्क्रीन शाॅट तुमच्यासाठी इथे देतो. 



                 आणखीही एक दिलासा देणारी घटना घडली . माझा मुलगा पुण्याला नोकरीनिमित्त असतो. तिथून त्याचा सकाळी फोन आला . आम्ही  जो फ्लॅट भाडयाने घेतला आहे तो दुस-या मजल्यावर आहे.  त्याच्या बाजुच्या फ्लॅटमधला भाडेकरू कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्याच्या गावाला गेला होता , तो दोन महिन्यांनी  काल परत आला. दोन महिने माझा मुलगा एकटाच वरच्या मजल्यावर रहात होता . आता शेजारी आल्यामुळे आमचे टेंशन कमी झाले . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: