गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

Lovely messages 7

 नमस्कार मित्र हो , 


काही मित्र आपल्याला दररोज शुभ संदेश पाठवतात. कोरोनामुळे तर हे फार अावश्यक झाले आहे. संदेश अनेक जण पाठवतात. पण काही जण एका विशिष्ट प्रकारचे संदेश पाठवतात. अशा संदेशांमुळे आपल्याला आयुष्यात दिशा मिळते. कधी कधी तर मन उदास झाले तर असे संदेश मनाला नवी उर्जा देतात. विशेष म्हणजे असे सुंदर व उपयुक्त संदेश पाठवणा-या व्यक्ती ते गोळा करण्यासाठी व इतरांना पाठवण्यासाठी अपार मेहनत घेत असतात. त्यांच्या या चांगल्या उपक्रमाची माहिती या पानातून देण्याचा हा प्रयत्न आहे. ही कल्पना ज्यांच्या नियमितपणे उत्तम संदेश पाठविण्यामुळे सुचली ते म्हणजे 


          श्री. संतोष रामचंद साळगांवकर

 या , आपण त्यांचे संदेश वाचू व अशा चांगल्या गोष्टींचा प्रसार करू.
...........
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते......
   🌹 *Good Day* 🌹
..........

*विरोधक तयार  करण्यासाठी*
*मारामारी करावी लागत नाही*
*तुम्ही चांगले कार्य करु लागला की*
*आपोआप विरोधक तयार होतात कारण*
*कर्तृत्ववान व्यक्तीचे कार्य बघितले जात नाही* ,
*परंतु  तो कोठे अडकतोय* 
*याकडे सर्वांचे मात्र लक्ष असते ...!*
       🌹 *सुप्रभात*  🌹
..........
*जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय*
*नवीन वाटांचा शोध लागत नाही*..

  *🌹शुभ सकाळ🌹*
..........
*जेंव्हा एखादी व्यक्ती त्यांची समस्या आपल्या समोर मांडते, तेंव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्‍वास ठेवते*
         🌹सु प्रभात🌹
.........
वेळ , मित्र आणि नाती
 ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,
 त्यांना किंमतीचे लेबल नसते.
 पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते 
     🌹 *शुभ सकाळ* 🌹
...........
*गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो.* *मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.*
    🌹शुभ सकाळ🌹
..........
_*चांगला रस्ता पाहिजे असेल तर* 
*गतीरोधक सहन करा*, 
*आणि चांगला माणूस बनायचं असेल तर* 
*विरोधक सहन करा.*_

*🌹 शुभ सकाळ🌹*
.......
*पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो,*
*मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो.*
     
       *🌹 शुभ सकाळ* 🌹
.......
*चूक नसतानासुध्दा निव्वळ वाद टाळण्याकरिता मागितलेली माफी,जीवनातील संयमाचं एक मोठं उदाहरण ठरतं.!!* 
*जीवनात संयम राखला तर आपले अस्तिव कुणीच संपवू शकत नाही.!!*

         🌹*शुभ सकाळ *🌹
.......
जगण्यातले सगळ्यात कणखर आव्हान म्हणजे ? मनाला लावून न घेणे व येणारया संकटाला धैर्याने सामोरे जाणे यालाच जीवन म्हणतात.
     🌹सु प्रभात🌹
......... 
*एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी ज्ञानाची गरज लागते, पण तिची जाणीव होण्यासाठी अनुभवाची गरज असते.*

🌹 *शुभ सकाळ* 🌹
.......
*लोकांना आपण का खटकतो...*

*आपण वाईट वागतो म्हणून नाही*,
*तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून...*

*शब्द फिरवणारे लाख मिळतील*
*पण... शब्द पाळणारा एखादाच मिळेल ..*

          *💐 शुभ सकाळ 💐*
.........
*चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय मृगातील रिमझिमचा आनंद द्विगुणीत हाेत नाही.*
*तसेच,*
*जीवनात संकटांची वादळे झेलल्या शिवाय सुखाची चव कळत नाही.*
 
*🌹शुभ सकाळ🌹*
.......
*आयुष्य हि फार अवघड शाळा आहे.इथे कॉपी करता येत नाही.*

*कारण इथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.*

        🌹 *शुभ सकाळ* 🌹
..........
*जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते जे स्वतः सोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात...*

  🌹*शुभ सकाळ*🌹
.......
घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात तेव्हा
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....!

           🌹 सुप्रभात 🌹
........
*आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य..."*
*जिंकलो तर स्वतःला आवरायचं*
 *आणि हरलो तर ईतरांना सावरायचं..."*
         
       *🌹सुप्रभात🌹*
.........
*घराचा प्रमुख होणे सोपे नाही, त्याची स्थिती पत्र्याच्या शेड सारखी असते. जो ऊन, पाऊस, वारा, वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो, परंतु त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की, ‘हा खुप आवाज करतो’.*

           🌹   *सुप्रभात*   🌹
.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: