शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

झोलर बंटी बबली

 

मागे - पुढे 



गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ...


..... तरी पण मी कुठेतरी मार्ग काढायचा प्रयत्न तर केला आहे. पण त्या समाधानातही आम्ही समाधानी नाहीयत...कोणीच ! पुढे काळ काय करतो ते पाहू....


.... आणि आता इथून पुढे....


12.09.2020


काल रात्री दोन स्वप्ने पडली. तीही दोनअडीचच्या दरम्याने. एकात इंग्लंडमध्ये क्रिकेटची मॅच चालू असते. एक चेंडू चक्क आमच्या खिडकीवर आपटून परत जातो ( आम्ही भारतात ! )  . नशीब तो आत येऊन आम्हांला लागत नाही. दुसरे स्वप्नं मजेशीर होते. मी व माझी पत्नी एका रस्त्याच्या कडेला इमारतीजवळ उभे असतो. मला इमारतीच्या प्रांगणात दोन एकसारख्या दिसणा-या पांढ-या रंगाच्या कार दिसतात. मी पत्नीला विचारतो की त्यांची किंमत किती असेल ? तर ती चक्क प्रत्येकी दोन हजार रूपये सांगते ! इथेच मला जाग येते ! तेव्हा अडीच वाजले होते. वर्क फ्राँम होम करीत असलेल्या मुलाला भूक लागली म्हणून त्याने भावाच्या घरातून चहा तयार ठेवायला फोन केला. त्याच्या रींगनेच मला त्या स्वप्नातून जाग आली. नाही तर मी नक्कीच त्या दोन्ही गाडया निदान स्वप्नात तरी खरेदी केल्याच असत्या 😀😀😀😀 . 


गेल्या आठवडाभरात बरेच काही घडून गेले आहे. मागे पुढे म्हणता म्हणता आपण मध्येच घरात जास्त लक्ष घातलं होतं. पण एक दोन दिवस वगळता घरच्या आघाडीवर सद्यातरी समाधानकारक शांतता आहे ! म्हणून आपल्या सवयीनुसार परत जरा मागे पुढे पाहू 😀😀😀😀😀. मागे बंदूच्या बायकोने पोष्टाच्या आर.डी. खात्यांचा केलेला घोळ घाबरत घाबरत त्याच्या कानावर घातला गेला खरा ; पण फार मोठा धक्का बसून बंदूलाच काही तरी होंईल ही अनेकांची अपेक्षा फोल ठरली . उलट , त्याने लाखभर रूपयांची परतफेड केली ! बायको सहीसलामत सुटली. बायको नव-याला तिच्यापुढे  किती हतबल बनवते , नव-याचा नाईलाज करून सोडते ते इथे दिसते. नवरा केवळ बायकोच्या मुठीत नसतो , तर ती त्याला पुरता असहाय्य बनवते, हेच हे उदाहरण दर्शवते. बरं तिची अशी अवस्था का झाली ? तर तिच्या नव-याच्या सकाळच मित्रमंडळी दाराघरात जमवण्याची सवय. आता यातला कोणी ना कोणी तरी संख्याशास्त्राचा उर्फ आकडेलावणेशास्त्राचा तज्ञ असतोच. शिवाय या बाईचे एका सर्वगूणसंपन्न मैत्रिणीकडेही जाणे येणे, फोनसुखसंवाद वगैरे वाढले होतेच. त्या मैत्रीणीकडे रोज चिठ्या न्यायला फंटर येतोच. या आकडेशास्त्राचा अभ्यास करण्यात ही बाई एवढी गुंतली की नव-याला आणि मुलाला वेळेवर जेवण मिळेनासे झाले ! अभ्यास वाढला तसा खर्च वाढला. उत्पन्न शून्याच्या खाली गेलं व शेवटी शून्यावस्था आली. तणावाने बाई दोनदा दवाखान्याची वारी करून आली. पण बाई निगरगट्टच ! पुन्हा आकडे लावण्यासाठी आर. डी. चे पैसे वापरायला तिने सुरूवात केली ! नव-याला बायको जेलमध्ये जाण्याची वेळ आली, लोक दाराशी आले , तेव्हा कळलं ! पण शेवटी इज्जत का फालुदा होऊ नये म्हणून बिचारा अजून पैसे परत करतो आहे !   अशीच दुसरी एक जोडी जवळच आहे. त्यातली बायको ही गळेपडू बाई आहे. माझा वाढदिवस तुमच्या लक्षात नाही का , तुम्ही जेवण छान बनवता , मग आम्हांला जेवायला कधी बोलवताय ते शाळेची फी थकलीय , खोलीभाडं थकलंय , पंधरा हजार द्या, वीस हजार द्या अशी मागणी करीत ही बाई दारोदार फिरते. कोणत्याही पुरूषाकडे बिनदिक्कत पैसे मागण्याचे  कौशल्य तिच्याकडे आहे. हयालाही स्कील इंडिया वुमन म्हणायचं काय ? की स्मार्टसिटीवुमन ? एक रूपया फेडू न शकणा-या हया बाईने एकीजवळ चक्क पन्नास हजाराची मागणी केली ! काय धाडस आहे पहा !  म्हणजे काहीही कामधंदा न करता जगाने हयांना पोसावं आणि तेही मेहरबानी नव्हे तर हयांचा हक्क म्हणून ! आहे की नाही जगावरच मेहरबांनी ! आम्ही दयेपोटी ती सांगेल त्या कहाणीवर विश्वास ठेवून दहापंधरा हजाराची मदत करूनही हया बाईची हाव वाढतच गेली . तिने आणखी पंधरा हजार द्या म्हणून माझ्या बायकोला आतल्या रूममध्ये नेवून माझ्या नाकावर टिच्चून बोलणी केली ! नवरा माझ्याबरोबर बिनदिक्कतपणे हवापाण्याच्या गप्पा मारत बसलेला.  तेव्हा मी काही बोललो नाही. पण दुस-या दिवशी येऊन ती तोंड उघडायच्या आतच मी तिला सणकावले. ती तशीच निघून गेली.  माझी बायको ( बायकोच ती ! ) मला म्हणाली, उगाच बोललात तिला एवढं . मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे ? मी बोललो,  होय , पण मेलेल्याला वाटतंय काय मेलो आहो असं ? हयांच्या सवयी गेल्या आहेत का ? आणि हयांची मग्रूमीही संपलेली नाही ! हे बाकी बायकोला पटलं ( नशिब ! ) .  गेली दहा वर्षे ही जोडी अशी जगतेय. एका ठिकाणी कर्जाचे हप्ते , भाडे, शाळेचे शुल्क थकले की दुसरीकडे पळायचं . तिकडे पुन्हा तेच उद्योग सुरू करायचे. वाट्टेल ती जीवघेणी कारणं पुढे  करायची , पैसे उकळायचे आणि काही काळ मजेत जगायचं. ही झोलर बंटीबबलीची जोडी आहे ! तुमच्याही गळयात पडेल म्हणून सावध करतो आहे. ही जोडी दहा वर्षे त्याच त्या चुका काहीही बोध न घेता करते आहे व वर जगाने मदत केलीच पाहिजे ही जगावर मेहरबानी आहेच ! हया जोडीचं असं का झालं ? कोरोना आता आला. पण त्यापूर्वी दहा वर्षापासूनच समस्वभावी जोडप्यांचा व मित्रमैत्रिणींचा गट बनत गेला. याची सुरूवात मुंबईला झाली. मग ही जोडी जाईल तिथे असले गट जोडत राहिली. गटातल्या हुशार मंडळींनी हयांना धूतलं आणि आता हयांना कोणीच विचारीत नाही. फुकटचंबूखावबांचं हे असंच असतं. ते खाऊन गेले पण शेवटी हे परिस्थितीत अडकले ! एकाकी पडले. पण त्यातून ते काही शिकतील ही सुतराम शक्यता नाहीच ! देव त्यांचं भलं करो ! दुसरीही एक जोडी आहे. तिच्यात बाई दिवसभर जगात फिरत असते . रात्रीही दुस-यांकडे जाऊन झोपते . नवरा घरात दारू पिवून फीस. गेली उडत म्हणत शिव्या देत बसतो. आता ही जोडी पार म्हातारी झाली. पण गूण तेच आहेत !  हया तीघांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे, तीन्ही बायकांना झाल्या प्रकारांचं काहीही वाटत नाही ! काही घडलेच नाही असे वागत असतात. बिनधास्त हसत असतात. काही केल्या आपले गूण सोडत नाहीत ! अश्या अनेक वैशिष्टयपूर्ण जोडया आमच्या मागे पुढे आहेत. पुन्हा त्याबद्दल कधीतरी नक्कीच बोलू. काय ?


(क्रमश:)

                          ....................






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: