मंगळवार, ७ जुलै, २०२०

A question about life



07.07.2020 

     दि. 24.06.2020  नंतर इथे लिहीलंच नाही. याचा अर्थ इतके दिवस मागे-पुढे काही घडलंच नाही असं नाही. तसं ते घडतच राहतं . सृष्टीच्या प्रारंभापासूनच घटनाचक्र फिरते आहे. खरे तर त्यापूर्वीपासूनच ते फिरत असावे.  सृष्टीचा जन्म हीसुध्दा त्या घटनाचक्रातली घटना आहे. अधिक माहितीसाठी  घटनाक्रमाबाबत मी लिहिलेल्या इंग्रजी लेखाच्या हया लिंकला टच करा. अशीच एक घटना होती 28 वर्षापूर्वी घडलेली. तारीख 07-07 च होती. वार वेगळा होता. पण ती घटना माझ्या वैवाहिक जीवनात पुढे घडणा-या सर्व घटनांची जन्मदात्री होती. तर 07-07 रोजी मी माझ्या तत्कालीन भावी पत्नीला बघायला गेलो होतो , जी हे लिहीत असतांना आताही माझ्या शेजारी तिच्या मोबाईलमध्ये तिचे अस्वस्थ मन रमवण्याची कसरत करते आहे. याचे कारण मार्च 2020 पासून आम्ही दोघेही आमच्या मुलाच्या काळजीने हैराण आहोत. आमचा मुलगा पुण्यात नोकरीला आहे. तो तिथे फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. होळी पौर्णिमेला आम्ही गावी आलो होतो व गुढी पाडव्यानंतर लगेच पुण्याला जाणार होतो. तितक्यात कोरोनाचा प्रकोप झाला . तोे तिकडे अडकला आणि आम्ही इकडे ! त्याच्या काळजीने आम्हांला काही सुचेनासे झाले आहे.  तर आज 07-07. त्यामुळे सकाळीच हिच्या वहिनीचा मला मेसेज आला. 
    [7/7, 10:34] Vibha 1: Chaha, nashta zala?
[7/7, 10:35] Vibha 1: Aaj kay special breakfast?
        काय सांगणार होतो ? सांगितलं जे घडतंय....
कालपासून हिची मन:स्थिती ठीक नाही. त्यातच काल रात्री सव्वा बाराच्या दरम्याने हिला भयंकर स्वप्नं पडलं. काही तरी भयंकर घडतंय हे बघून ही स्वप्नातच मुलाला हाका मारून उठवत होती . हाका मारतामारता तिची बोबडीच वळते आणि जीभ दाताखाली मिळते . ती झोपेतच उ उ करायला लागली म्हणून मी तिला उठवलं. तर ही घाबरलेली. मी पाणी दिलं ते पिऊन ती थोडी भानावर आली.  म्हणाली मला कोणाच्या तरी मानेवर दोरीचा निळा वळ दिसला स्वप्नात. त्यानंतर  आज सकाळी सात वा. मेघाचा फोन आला. आम्ही ज्यांच्या विहीरीवरून पाणी आणतो त्या समोरच्या घरातल्या मुलाने मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली ! म्हणजे तिकडे ते घडत असतांनाच बहुधा हिला हेे स्वप्नं पडत असावं. तो वकील होता. रत्नागिरीत बायको व मुलीसह रहात होता.  केवळ 34 वर्षांचा ! आम्हांला मुलासारखाच ! फार धक्का बसला. आता आमची दोघांचीही मन:स्थिती बिघडली आहे. पाऊसही सकाळपासूच धुव्वाधार कोसळतोय. अशा पावसात तिकडे जाताही येत नाहीय. आम्ही दोघंच घरात आहोत. एकमेकांना खचलो आहोत हे दाखवण्याचे टाळून धीर देत आहोत. 

              परवाच आमच्या मागच्या बाजुच्या दोन घरे सोडून तिस-या घरातली वनिता पायरीवरून तिच्या दारात पडली. तिचा डावा हात प्लँस्टरमध्ये आहे. गेल्या वर्षी ती बसला लटकत फरफटत गेली होती. नशिबाने वाचली.   तिच्या अलिकडच्या व आमच्या अगदी मागच्या घरातील संत्याचा भाऊ संज्याची तब्ब्येतही तितकीशी चांगली दिसत नाहीय. परवा कलू आते आमच्याकडे राहून गेली. संध्याकाळी आली आणि दुस-या दिवशी सकाळी चहा नाश्ता खाऊन ती आपल्या घरी गेली. संध्याकाळ झाली की एवढं मोठं घर आम्हां दोन म्हाता-या माणसांना कसं खायला येत असेल , ते कलू आतेला जाणवलं . कलू आतेने निग्रहाने लग्नं केलेलं नाहीय. ही स्टोरी कधी तरी नंतर सांगेन. तिची हकीगत आता सांगण्याच्या मन:स्थितीतही मी नाहीय. एवढं खरं की कधी कधी वाटतं की आयुष्य ही आपणच आपली घातलेली एक समजूत तर नसावी ना ? 


( क्रमश: )
...........

Lovely Messages 4


*नीट लक्ष देऊन वाचा*आणि गाभिर्याने विचार करा

मित्र : अजून जागा आहेस ?
मी : हो रे भाई.  या टेन्शनमुळे जागरण वाढलं.
मित्र : हो ना. 
मी : तुझी तब्बेत कशी आहे ? रिकव्हरी ?
मित्र : हो. आज पाचवा दिवस ना. बऱ्यापैकी रिकव्हरी आहे.
मी : गुड. काळजी घे रे.
मित्र : हो रे. माझा निष्काळजीपणा नडला.
मी : चलता है. वेळेत निदान झालं, ते महत्वाचं.
मित्र : तेच तर.
मी : सहज मेसेज केलेला ना ?
मित्र : नाही. एक अनुभव शेअर करायचा होता.
मी : बोल ना.
मित्र : ५ दिवसांपूर्वी माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली, आणि तातडीने माझ्यावर उपचार सुरू झाले.
मी : हो.
मित्र : त्यापूर्वी मी रविवारी मित्राच्या लग्नाला जाऊन आलेलो. कलीग होता, म्हणून नाही टाळता आलं. नंतर समजलं की, लग्नाला उपस्थित राहिलेल्या इतरांनाही संसर्ग झालेला आहे.
मी : मग ?
मित्र : अरे मला मित्राचा मागच्या आठवड्यात कॉल आलेला. तुला यावच लागेल. मला बाकी काही माहीत नाही. नाही आलास तर बोलणार नाही. असा हट्ट केलेला त्याने.
मी : पुढे ?
मित्र : वास्तविक पाहता, मला लग्न टाळता आलं असतं. पण मी सध्याच्या परिस्थितीला सिरीयस घेतलं नव्हतं. कारण लग्नाचा एरिया ग्रीन झोन होता. 
मी : साहजिक आहे.
मित्र : तीच तर मोठी चूक झाली. नेमकं लग्नाला आलेल्या पाहुण्यांपैकी कुणीतरी संसर्गग्रस्त व्यक्ती माझ्या संपर्कात आली. त्यामुळे मला आणि इतर काही जणांनाही, लागण झाली.
मी : ओह.
मित्र : मी घरी आलो, त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मला त्रास सुरू झाला. तुला तर माहीत आहे की, आई-पप्पा गेल्याने घरी कुणीच मोठं नाही. दादाची फॅमिलीही लांब आहे.
मी : मग ?
मित्र : मी टेस्ट केली आणि माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याचं टेन्शन डोक्यावर स्वार झालेलं असतानाच, बायकोलाही खोकला सुरू झाला. त्यादरम्यान मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने, तिची एकटीची धावपळ झाली. मात्र तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण त्यानंतर आमच्या दोन्ही मुलांनाही, तातडीने टेस्ट करायला सांगण्यात आलं.
मी : अरे.
मित्र : सुदैवाने त्या दोघांची टेस्ट निगेटिव्ह आली आणि आमच्या दोघांचा जीव भांड्यात पडला. मात्र पुढे अजून एक संकट आमच्यासमोर आ वासून उभं राहिलं.
मी : कुठलं भाई ?
मित्र : आम्ही दोघे दवाखान्यात. मग मुलांना सांभाळणार कोण ? माझी मुलगी ८ वर्षांची आहे आणि मुलगा ४ वर्षाचा. दोघेही लहान, त्यामुळे आम्ही दोघेही अगदी हतबल झालो.
मी : फिर ?
मित्र : अरे जवळच्या सगळ्या लोकांनी हात वरती केले. वरून शेजाऱ्यांनीही साफ नकार कळवळा. म्हणून मग शेवटी, हिच्या एका मैत्रिणीच्या हातापाया पडून त्यांना मनवलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
मी : बरं झालं.
मित्र : अरे पण या सगळ्यात माझा बराच खर्च झाला. आधी सर्वांच्या टेस्ट आणि नंतर ट्रीटमेंट, यामुळे जवळ उरलेले सगळे पैसे संपले. एकतर लॉकडाऊनमुळे कॉर्पोरेटमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत.
मी : हो ना.
मित्र : मग काय. शक्य असेल त्या सगळ्यांसमोर हात पसरले. मात्र सगळ्यांनी नाईलाज सांगितला.
मी : हो ना. सगळेच कोंडीत सापडलेत.
मित्र : अखेरीस खूप अपेक्षेने त्या मित्राला कॉल केला. ज्याच्या लग्नाला त्यादिवशी रविवारी गेलो होतो.
मी : मग ?
मित्र : तू ऐकून शॉक होशील. मात्र एकतर सुरुवातीलाच त्याने पैसे द्यायला साफ नकार दिला. शिवाय शेवटी मला म्हणाला की, तू लग्नाला नसता आला तरी चाललं असतं. उगाच एवढा प्रॉब्लेम करून ठेवलास.
मी : कठीण आहे.
मित्र : तूच बघ आता. म्हणजे ज्याच्या शब्दखातर मी, स्वतःचा जीव धोक्यात टाकून, एवढ्या दूरच्या लग्नाला उपस्थित राहिलो. तोच मला सांगतोय की, उगाच मी तो बावळटपण केला.
मी : अक्कल बंद पडते.
मित्र : भाई कुणी कुणाचं नसतं. हे तेव्हा कळतं, जेव्हा आपण स्वतः संकटात असतो. बायकोने मला थांबवायचा प्रयत्न केला होता. पण माझा हट्ट माझ्याच पश्चातापाचं कारण बनला.
मी : सच बात.
मित्र : म्हणून आजच्या तारखेला, स्वतःपेक्षा स्वतःच्या कुटुंबाचा विचार करण्याची अधिक गरज आहे. कारण आपली एक चूक, त्या सर्वांचा जीव धोक्यात टाकू शकते.
मी : खरं आहे.
मित्र : आम्ही दोघेही कमावते आहोत. महिन्याला १ लाख रुपये पगार मिळतो आम्हाला. पण आजच्या तारखेला, आमची मुलं जेवलीत की उपाशी आहेत ? याचीही आम्हाला खबर नाही.
मी : नको तसा विचार करू.
मित्र : मनात येतात रे विचार. एवढ्या दिवसात कधी त्या तिघांना स्वतःपासून वेगळं होऊन दिलं नाही. मात्र आज माझ्या एका चुकीची शिक्षा, त्या तिघांना भोगावी लागते आहे.
मी : हो ना.
मित्र : लोक सध्याच्या परिस्थितीला फार कॅज्युअली घेत आहेत. त्यांना तुझ्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की, परिस्थितीचं गांभीर्य ओळखा. एखाद्या लग्नाला नाही जाणं झालं. कुणी नाराज झालं, तर आभाळ कोसळणार नाहीये. परंतु तिथे जाऊन जर अनावधानाने तुम्हाला या आजाराचा संसर्ग झालाच, तर मात्र तुम्ही एका संकटात अडकणार आहात. शिवाय तुमच्या मनमानीची झळ, निष्कारण तुमच्या कुटुंबालाही सोसावी लागणार आहे.
मी : सच बात.
मित्र : मी तर फक्त एक उदाहरण आहे. आजकाल आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच घटना घडत आहेत, ज्या ऐकून आपणही थक्क होतोय. म्हणून प्रत्येकाने निष्काळजीपणा बाजूला सारून, वेळीच शहाणं व्हायला हवं. नाहीतर माझ्याप्रमाणे पश्चातापाची वेळ अटळ आहे.
मी : खरं आहे.
मित्र : भाई नक्की लिही यावर. एखाद्याला तरी यातून शहाणपण आलं तरी पुरेसं आहे.
मी : हो भावा. आजच लिहितो आणि शेअर करतो.
मित्र : मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. 
मी : काळजी घे.
मित्र : हो. तुही काळजी घे.
*फक्त वाचून उडवू नका.*
................   

 व्हाॅटस्अप ग्रूप : तंत्रशिक्षण समन्वय
मेसेज बाय : श्री. अरूण नाईक 
मेसेज : 

*बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण*
१०-१० दिस अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!
धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!
तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…!
शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो…!
माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..!
मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…!
खर सांगतो गड्यानो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..!
आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…!
गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…!
पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक….!
महाराजांचा अभिषेक सुरु होता,महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता…!
जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता…..महाराजांनी जेव्हा त्या फकिरला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला…!
ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून या बहिर्जी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले….आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे,राज्य आनंदात आहे,आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे…!
काय बोलावे या प्रकाराला….कसली वेडी माणस असतील ती…!
एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?
स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे….तो खुद्द स्वराज्याच्या गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक आहे….इतकी कमालीची गुप्तता…!
आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते ओ …?
काहीच नाही….उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न…माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती…!
हि वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??
बस्स…एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नव्हते….!
...............

मेसेज बाय : श्री. अनिल अ. शिवलकर , रत्नागिरी

मेसेज : 

🟣 *दिनविशेष* 
🔖  *सोमवार दि. २९ जून २०२०*
▪️ १९८६: आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
▪️ २००१: पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
▪️ २००७: ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.
▪️ १८६४: शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म.
▪️ १८७१: मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९३४)
▪️ १८९१: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)
▪️ १९८१: मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)
▪️ २०००: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)
▪️ २०१०: विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९२७)
.........
🟣 🟣
फाँरवर्डेड मेसेज बाय : श्री. विनय परांजपे , रत्नागिरी

मेसेज : 
*आम्हाला २०२० ने काय दिले !! एक सुंदर विचार पुढे वाचा*:

नमस्कार मंडळी.
काल मला एका मित्राने विचारले, २०२०  काय देत आहे. 

कोरोना, चक्रीवादळ, व्यवसाय, नोकरीत आर्थिक झटका, मानसिक तणावात आत्महत्या. 
चीन, पाकिस्तान यांच्या कारवाया.
नाही मित्रा, 

*२०२० ने आम्हाला संघर्ष करायला शिकवला. *
देशात स्वच्छता किती गरजेची आहे. 
काळजी घेणे. 
एकमेकांना मदत करणे. 
निसर्गाला वाचविणे.
अन्नाची किंमत.
मानसिक भावना.
अनेक नवीन मेनू.
अनेक वैचारिक लेख आणि पोस्ट.
अनेक विनोदी पोस्ट मनाला आल्हाद देत आहेत.
कमी खर्चात विवाह.
कमी संख्येत अंत्यसंस्कार.
विना मेकअप चे खरे चेहरे.
घरात राहण्यासाठी लागणारा संयम.
घरातील लोकांशी संवाद साधण्यासाठी मिळालेली अमूल्य संधी.
आपल्या अवती भवती चे शेजारी नातेवाईकांन पेक्षा ऐन वेळी महत्वाचे.
प्रदूषण कमी.
पुढे येणाऱ्या कोणत्याही मोठ्या संकटाना सामोरे जाण्याची मानसिक तयारी, हे सगळे २०२० देत आहे.
या काळात खूप मौल्यवान लोक पण गमविले.
गरीब श्रीमंत एकाच पातळीवर आणले. 
खरे देवदूत आम्हाला दिसले, जे आम्ही फक्त आमच्या प्रार्थना स्थळात बघत होतो.
जगण्याची किंमत कळाली.
जीवन किती मौल्यवान आहे ते कळाले.
पुढील दिवस नक्की चांगले असू दे, ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
........

*फू बाई फू फुगडी फू* 
*कधी दमशील मेल्या*                 *corona तू रे corona तू*
आज बंद उद्या बंद
बंद किती बंद,
आज बंद उद्या बंद
बंद किती बंद,
कारण नसताना बाहेर फिरतात,        ते सगळे मंद...         
आत्ता फुगडी फू...
*फू बाई फू फुगडी फू* 
*कधि दमशील मेल्या*            
 *corona तू रे corona तू*

ताई नाही माई नाही
कोणी नाही भेटत,
ताई नाही माई नाही
कोणी नाही भेटत,
लॉक डाऊन चे दिवस 
चालले आहेत रेटत रेटत..
आत्ता फुगडी फू....
*फू बाई फू फुगडी फू*
*कधी दमशील मेल्या*               
*corona तू रे corona तू*
काम ना धंदा 
जेवण तीन तीनदा 
एबीपी वर ज्ञानदा 
आणि 
भांडी घासा चारदा
हाच उरलाय धंदा 
आता फूगडी फू....

*फू बाई फू फूगडी फू* 
*कधी जाशील मेल्या*           
     *corona तू रे corona तू*।
............

सोमवार, ६ जुलै, २०२०

Lovely Messages 3

नमस्कार मित्र हो , 

काही मित्र आपल्याला दररोज शुभ संदेश पाठवतात. कोरोनामुळे तर हे फार अावश्यक झाले आहे. संदेश अनेक जण पाठवतात. पण काही जण एका विशिष्ट प्रकारचे संदेश पाठवतात. अशा संदेशांमुळे आपल्याला आयुष्यात दिशा मिळते. कधी कधी तर मन उदास झाले तर असे संदेश मनाला नवी उर्जा देतात. विशेष म्हणजे असे सुंदर व उपयुक्त संदेश पाठवणा-या व्यक्ती ते गोळा करण्यासाठी व इतरांना पाठवण्यासाठी अपार मेहनत घेत असतात. त्यांच्या या चांगल्या उपक्रमाची माहिती या पानातून देण्याचा हा प्रयत्न आहे. ही कल्पना ज्यांच्या नियमितपणे उत्तम संदेश पाठविण्यामुळे सुचली ते म्हणजे 


          श्री. संतोष रामचंद साळगांवकर

 या , आपण त्यांचे संदेश वाचू व अशा चांगल्या गोष्टींचा प्रसार करू.
...........

जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतः वर बंधने आवश्यक...
शरीराने दूर राहा, मनाने नाही.......
Social distance ठेवा, Heart distance नाही....
करोनाला दूर ठेवा , माणुसकीला नाही......
सुचनांना जवळ करा
अफवांना नाही.....
              🌹सुप्रभात🌹
..........
*राग म्हणजे दुसऱ्याची चूक* 
*असताना स्वतःला त्रास*
*करून घेणे...*

*🌹शुभ सकाळ🌹*
............
अंगाअंगात भिनलाय आळस,_
टीव्ही इंटरनेट ने गाठलाय कळस,_
कंटाळून गेल्या आरामाच्या इच्छा,_
लॉकडाऊन वाढीच्या तुम्हाला पुन्हा    शुभेच्छा..._
जगावरील कोरोनाचे संकट टळुन सर्वांना निरोगी आरोग्य लाभो हिच सदिच्छा   
              🌹शुभ दिवस 🌹
...........
*जीवन बदलण्यासाठी*
*वेळ ही सगळ्यांनाच मिळते*
   *पण वेळ बदलण्यासाठी*
*दोन वेळा जीवन नाही मिळत* .
    *नेहमी आनंदाने जीवन जगा*......
        🌹 *शुभ सकाळ* 🌹
.............
*अति विचारामुळे आपण आपल्या  आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो,*
*ज्या अस्तित्वातच नसतात...!!!*

         🌹*सुप्रभात*🌹
...........
शांत व प्रसन्न मन" हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील "कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना" सामोरे जाण्यास सज्ज असते. 
स्वतःची आणि आपल्या परिवाराची  काळजी घ्या. 
          🌹शुभ सकाळ🌹
......... 
आठवणी खरंच चांदण्यासारख्या असतात. कोणती आठवण कधी लुकलुकेल सांगता येणार नाही.
          🌹शुभ सकाळ🌹
.........
पानगळ झाल्याशिवाय झाडाला 
नवीन पालवी येत नाही..
त्याचप्रमाणे आयुष्यात 
कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय 
चांगले दिवस येत नाहीत..

       🌹...शुभ सकाळ...🌹
.........
*मानलंतर मौज*
          *नाहीतर समस्या रोज.....!*
             *🌹शुभ सकाळ🌹 *
.......
*कठीण परिस्थितीमध्ये*
*संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते...*
*ज्याच नाव आहे....*

*""आत्मबल-" "Will Power"*

       *🌹शुभ सकाळ🌹*
.........
*"विनम्रता"*
 *म्हणजे शरणागती नव्हे ,*
*तर ते संबंध अबाधित राहण्यासाठी,*
*वापरलेले प्रभावी  शस्र आहे...!*

          🌹शुभ सकाळ 🌹
........
*प्रोत्साहन अशी गोष्ट आहे ज्यामुळे सामान्य माणूस असामान्य काम ही सहज करू शकतो.*
     
             *🌹शुभ सकाळ🌹*
.........
आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही
ओळखले जाता ....
एक म्हणजे.....
तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला
" संयम " ....
दुसरे म्हणजे .....
तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे
असलेली " नम्रता " ....
🌹 शुभ सकाळ 🌹
..........
जीवनात यशस्वी होण्यासाठी दररोज एक पदार्थ लागतो ,
तो म्हणजे  *""आईसक्रीम""....*

🍦🍦🍦🍦🍦🍦🍦
आ :  आत्मविश्वास.
ई :    ईच्छाशक्ती.
स :   सकारात्मक दृष्टिकोन.
क्रि :  क्रियाशीलता.
म :   महत्वाकांशा.
         🌹 शुभ दिवस 🌹
.........
*जर मधा सारखे*
*गोड परिणाम हवे असतील.....*

           *तर*
*मधमाशी प्रमाणे*
*एकत्र राहणे गरजेचे आहे.*

          🌹शुभ सकाळ🌹
.........
*काही माणसं आयुष्यात भेटतात.* 
*आणि* 
*काही माणसामुळे आयुष्य भेटतं..*
         *🌹शुभ सकाळ 🌹*
........
*मदत ही अशी बाब आहे*
*केली तर लोक विसरतात*
*आणि*...
*नाही केली तर लक्षात ठेवतात...* 

*शुभ  सकाळ*...🌹🌹
............
निसर्ग आपल्याला देतो तो चेहरा,
आणि आपण तयार करतो ती
ओळख.

     🌹शुभसकाळ 🌹
.......
आयुष्यात तुम्ही कितीही *positive* असला तरी सध्या तुमचा मेडिकल रिपोर्ट *निगेटिव्ह*  येणे गरजेचे आहे.... म्हणून  स्वतःची काळजी घ्या... 
     🌹सुप्रभात 🌹
...........
*जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेव्हा तुमची चुक ही गंमत  म्हणून स्वीकारली जाते.*

*परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो!* 
*🌷शुभ सकाळ🌷*
........
ज्याला धन कमवायचे आहे त्याने कण सुद्धा वाया घालवू नये, आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षण सुद्धा वाया घालवू नये ...

         🌹 शुभ सकाळ 🌹
..........
*आयुष्य म्हणजे*
   *अनुभव, प्रयोग, अपेक्षा*
      *यांचे समीकरण आहे*
*कालचा दिवस हा अनुभव होता,*
*आजचा दिवस हा प्रयोग असतो,*
*उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.*
    *🌹शुभ सकाळ🌹*
.......

शनिवार, ४ जुलै, २०२०

Bollywood Memories 4

Bollywood memories by Manoharji Bhatkar Part 4.....

01.05.2020 
सुप्रभात 👏🙏🎩, 1 मे 1919 मशहूर गायक *मन्ना डे* जी का जन्म कोलकाता में हुआ, उनके स्मृति को विनम्र अभिवादन...🌹, उन्हें बचपन से गाने का बडा शौक था उनकी आवाज़ अच्छी थी, पढाई के बाद वह मुंबई में आये उन्हें 1943 मे फिल्म *तमन्ना* मे गाने का पहला मोका मिला, उनके सभी गाने सुपरहिट हुए चाहे *राज कपूर* जी के लिए और औरोंके लिए गायें *युगल गीत* हो या *एकल* गीत उन्होंने हिंदी के अलावा  बंगाली,मराठी, गुजराती,मल्यालम और कन्नड़ मे भी सब मिलकर 3500 गीत गायें.. 🌹🌹🌹
.............
सुप्रभात 👏🙏🎩, 1 मई 1913 को अदाकारा लेखक  *बलराज सहानी* जी का जन्म "भेरा-पंजाब प्रांत में हुआ था,महात्मा गांधीजी के साथ उनके अच्छे सबंध थे वह भेरा से "शांति निकेतन" आये, वहाँ से वह 1941 से 44 तक इंग्लैंड BBC में काम करके वापस दिल्ली में आये *इप्टा* मे सक्रिय होनेसे "ए.के.अब्बास" जीने उन्हें 1945 मे पहला मोका दिया फिल्म का नाम था "धरती के लाल" बादमे निर्माता निर्देशक *फणी मुझुमदार-बिमल रॉय* जीने उन्हें चोटीपर पहुंचा दिया उनकी सभी फिल्मे कामयाब रही वह अच्छे लेखक थे, भारत सरकार ने उन्हें 1969 को *पद्मविभूषण* से सन्मानित कीया था .. 🌹🌹🌹
...................
सुप्रभात 👏🙏🎩, 3 मई 1981 बेहतरीन अदाकारा और समाज सेविका *नर्गिस* जी का मुंबई में देहान्त हुआ, उनको *श्रद्धांजलि* अर्पित करते है 👏🌹उनकी माँ *जद्दनबाई* वोह जमाने की मशहूर संगीतकार और अभिनेत्री थी उनके वोह जमाने कें कामयाब निर्माता निर्देशक *मेहबूब खान* जी के पास भेजा उन्होंने 1935 मे बाल कलाकार के रूप में फिल्म *तकदीर* मे मोका दिया अपनी फिल्मी कारकीर्द मे उन्होंने *राज कपूर-दिलीप कुमार* जी के साथ बहुत सफल फिल्मों में काम कीया लेकिन वह जादा ध्यान मे रही *राज-नर्गिस* के दिलचस्प  भुमिका में, उन्हें *फिल्म फेअर अवार्ड* के साथ *मदर इण्डिया* के लिये *नॅशनल अवार्ड* से सन्मानित कीया गया था, भारत सरकार ने उन्हें *पद्मश्री और सांसद* से नवाजा था, 11 मार्च 1958 मे *सुनिल दत्त* जी से शादी करके फिल्मों से सन्यास लिया, मुंबई में उनके परिवारों ने उनके याद में *कैन्सर हॉस्पिटल* बनाया है .... 🌹
.........
सुप्रभात 👏🙏🎩,
 भावगीत गायक *अरुण दाते* यांचा जन्मदिन (जन्म : ४ मे, १९३४ )
अरुण दातेंचे वडील रामूभैय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठित बॅरिस्टर होते,त्याच बरोबर रसिकाग्रणी आणि गाण्याचे जाणकारही होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण मुंबईला के. महावीर यांच्याकडे घेतले,
अरुण दाते १९५५ पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. १९६२मध्ये शुक्रतारा मंदवारा ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक त्यांना आग्रह करीत. आपण हिंदी भाषिक प्रदेशातील असल्याने मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाण्याचे टाळले. शेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित झाले आणि प्रचंड  गाजले.त्याची पण गम्मत झाली. 
आकाशवाणीच्या  कमलिनी विजयकर यांच्या  हाती एक  भावगीत आले.त्या मध्ये गायकाचे नाव ए.आर.दाते असे होते. भावसरगम हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम होता ,त्या मधे  गायकाचे नाव असल्याशिवाय ते गाणे लावता  येणार नव्हते  म्हणून त्यांनी यशवंत देवांना त्यांचे नाव विचारले. घरात त्याचे वडील अरु म्हणून हाक मारताना त्यानीं ऐकले होते तेव्ह्ड्यावरून त्यांनी त्यांचे नाव  अरुण दाते असे सांगितले आणि प्रत्यक्षातले अरविंद दाते पुढे कायमचेच अरुण दाते झाले.....  त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बमही लोकप्रिय आहेत. अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा,कविता कृष्णमूर्ती यांबरोबर युगुल  गीते गायली आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला पुन्हा एकदा लोकप्रियता प्राप्त करून दिली.... 👏🌹
...........
सुप्रभात 👏🙏🎩, 5 मई 2006 मशहूर संगीतकार *नौशाद अली* जी का मुंबई में देहांत हुआ, उनको भावपूर्ण श्रद्धांजलि 👏🌹, लखनौ में जन्में नौशाद अली जीको बचपन से ही संगीत का शौक था 13 साल की उम्र में उन्होंने *उस्ताद युसुफ अली* जी से *शास्त्रीय संगीत* सीखना शुरू कीया और वे 1931 से संगीत कार्यक्रम करनें लगे, 1937 मे वह फिल्मों में काम करने के लिये  मुंबई-कुलाबा में आये वहां से वह *दादर ब्रॉडवे सिनेमा* के सामने रहने लगे और उस वक़्त के मशहूर संगीतकार *खेमचंद प्रकाश* जी के सहायक बने निर्माता *ए.एस.करदार* जीने उन्हें पहला मोका 1940 मे दिया फिल्म का नाम था *प्रेमनगर* यही से *सुरैया* जी ने गानें में कदम रखा, 1942 से 1960 तक वोह फिल्म जगत के नंबर एक पर रहे, वह ऐसे पहले संगीतकार रहे जो फिल्म *आन* के लिए *एक साथ 100 म्युजिशियन* और *मुगल ए आझम* के लिये *एक साथ 100 कोरस गान* कलाकार लगाये, उनका संगीत  कर्ण मधुर रहता था, वोह पियानो और ऑर्गन जादा इस्तेमाल करते थे उन्होंने *रागदारी शास्त्रीय राग* पर आधारित बहुत गाने बनाये, उन्हें फिल्म फेअर अवार्ड, 1981 मे सर्वश्रेष्ठ *दादा साहब फालके* पुरस्कार और *पद्मश्री* से नवाजा गया था...🌹
..........
सुप्रभात 🙏👏🎩, 09 मई 1998 मखमली आवाज़ के जादूगर मशहूर खुबशुरत गायक अभिनेता *तलत मेहमूद* जी का देहान्त मुंबई में हुआ, उन्हें *श्रद्धांजलि* अर्पित करते है 👏🌹, उन्होंने 10 साल शास्त्रीय संगीत की तालीम की और "तपन कुमार" नामसे बंगाली गीत गाने लगे, उन्होंने लखनऊ आकाशवाणी के लिये काम कीया था वह कोलकाता से  मुंबई  आये उन्हें हिंदी फिल्म में पहला मोका दिया मशहूर संगीतकार *अनिल बिश्वास* जीने फिल्म *आरजू* के लिये, उन्होंने 16 फिल्मों में हीरो का रोल अदा कीया था, उन्होने 40 साल की कारकीर्द मे *820 गाने* उस वक्त के संगीतकारों के पास मशहूर अभिनेताओं के लिए गाये.... 👏👏👏🌹🌹🌹
..............
सुप्रभात 👏🙏🎩, 10 मई 1905  अभिनेता - गायक - संगीतकार *पंकज मलिक* जी का जन्म कोलकाता मे हुआ, उन्होंने *रवींद्रनाथ टैगोर* जी के कविता को काफी लोकप्रिय कीया, वह *रवींद्र संगीत* के जानकार थे,उन्होंने 100 के उपर बंगाली और हिंदी फिल्मों को संगीत दिया,वो जमाने में उन्होंने के.एल.सहगल, के.सी.आत्मा से गवाये गाने काफी लोकप्रिय हुए,1973 उन्हें *दादासाहेब फालके* पुरस्कार दिया गया, उन्हें *पद्मश्री* से नवाजा गया था.... 🌹
..............
सुप्रभात 👏🙏🎩, मुंबई में एक *मिमिक्री* आर्टिस्ट है *गजानन नार्वेकर* हम दोनों ने मीलकर देश में अलग अलग *ऑर्केस्ट्रा ग्रुप* के साथ कार्यक्रम कीये, सिंगर *येसुदास जी* के ऑर्केस्ट्रा में सब आर्टिस्ट साऊथ इंडियन रहते थे लेकिन मिमिक्री के लिये सिर्फ़ मुंबईकर *गजानन नार्वेकर* ही रहता था, वह *फिल्मस्टार और गायक* के आवाज़ *हुबहुब * निकलता था, मुंबई के कार्यक्रम में वह *से.रेल्वे स्टेशन का माहोल* पेश करता था, चिंचपोकली से दादर-माटुंगा तक वह *सुधिर फडके* जी का गाना *देहाची तिजोरी-भजन* शुरू करता था *कुर्ला स्टेशन* आते ही माहोल बदलता था और शुरू होता था *चढता सुरज धीरे-धीरे- कव्वाली अझिज नाजा* जी के आवाज़ मे 😂🤣 , लोग टालीयोंसे दाद देते थे,,,, 👏🌹
.............
सुप्रभात 👏🙏🎩, बॉलिवुड में पदार्पण मे सुपरहिट संगीत देने वाले संगीतकारों मे एक नाम है *कल्याणजी विरजी शहा* वह औरोंके पास काम करते थे, हेमंत कुमार जी के *नागिन* मे उन्होंने *क्ले व्हायोलिन पर बिन* की धुन बजाई तभी से वह चमक गये और उन्हें पहला संगीत देने का मौका 1958 मे मिला फिल्म का नाम था *सम्राट चंद्रगुप्त* ....
..............
सुप्रभात 👏🙏🎩, बॉलिवुड में पदार्पण मे सुपरहिट संगीत देने वाले संगीतकारों मे एक नाम है *लक्ष्मीकांत-प्यारेलाल * वह औरोंके पास काम करते थे, उन्हें पहला संगीत देने का मौका 1963 मे मिला फिल्म का नाम था *पारसमणी* यह फिल्म के सभी गाने सुपर डुपर हिट हुए थे ....♥️🌹
............
सुप्रभात 👏🙏🎩, आज 17 मई 1951 को मशहूर गजल गायक *पंकज उदास* जी का जन्म राजकोट-गुजरात में हुआ था, उनके  पिताजी जमींदार थे वह 1965 में परिवार के साथ दिल्ली बसें यहाँ ही पंकज जीने तबला वादन और शास्त्रीय संगीत सिखा, उनका परिवार दिल्ली से मुंबई आकर बसा यहाँ पंकज जीने *सेंट झेवियर* कॉलेज मे अपनी पढाई पुरी करके वह *कॅनडा* गये और वहाँ गजलों के कार्यक्रम करनें लगे वहाँ उन्हें बहुत कामयाबी मिली, वह मुंबई आने के बाद उन्हे संगीतकार *उषा खन्ना* जीने फिल्म *कामना* मे गाने का पहला मोका दिया बाद में चारों तरफ उन्होंने कामयाबी हासिल की, सुनिये यह गजल उन्होंने 13 अप्रैल 1984 को पहली बार *लंदन के रॉयल अल्बर्ट हॉल* के कार्यक्रम मे पेश कीं थी....... 💕🌹
.............
सुप्रभात 👏🙏🎩, 17 मई 2009 मशहूर निर्माता निर्देशक *प्रकाश मेहरा* जी का मुंबई में देहांत हुआ था, उन्होंने *शशी कपूर बबिता* के साथ पहली फिल्म बनाई *हसीना मान जायेगी* उसके बाद उन्होंने 70 80 और 90 के दशक में *जंजीर* से लेके बनाई हुई सभी फिल्मे सुपर डुपर हिट हुई थी, उनको भावपूर्ण श्रद्धांजलि 👏🌹
..........
सुप्रभात 👏🙏🎩, 19 मई 1938 को मशहूर लेखक-निर्देशक-अभिनेता *गिरीष कर्नाड* जी का जन्म महाबलेश्वर में हुआ, उनकीं प्रारंभिक शिक्षा मराठी मे हुई उनका परिवार कारवार बसने से आगे पढाई कन्नड़ मे की, उन्होंने चैन्नई यूनिवर्सिटी में सात साल काम कीया था, 1970 मे कन्नड़ फिल्म *संस्कार* से उन्होंने अपनी फिल्मी कारकीर्द शुरू कीं थी, उन्हें 1974 पद्मश्री 1992 पद्मभूषण से नवाजा गया था, संगीत नाटक अकादमी के वह अध्यक्ष रहे, उनके स्मृति को अभिवादन करतें है 👏🌹
..............
सुप्रभात 👏🙏🎩, आज के दिन 21 मई 1991 को *आधुनिक भारत के निर्माता जिन्होंने C.Dot & PCO कीं शुरुआत की राजीवजी गांधी* की हत्या *आतंकी संगठन लिठ्ठे* ने तमिलनाडु के *श्रीपेरंबदुर* मे कीं, हम उनकी यादगार में *श्रद्धांजलि* अर्पित करतें 👏👏👏🌹है और *कोरोना व्हायरस* से बचने के लिए प्रार्थना करते हैं...... 🌹
...........
सुप्रभात 👏🙏🎩, कल *21 मई को मुंबई का 338 वा सालगिरह* हुआ, *21 मई 1662* को इंग्लैंड का राजपुत्र *चार्लस् दुसरा* कीं *शादी* पोर्तुगाल की राजकन्या *कैथरिन ऑफ ब्रॅगांझा* से हुई, उस वक्त पोर्तुगाल ने इंग्लैंड को *दहेज (आंदण)* मे 7 बेट का समुह *Mombaym* दी, बादमे इंग्लैंड ने *ईस्ट इण्डिया कंपनी* को यह 7 बेट का समुह *Bombaim* हर साल 10 *पौण्ड किराया* से दिया.... *I Love My Mumbai♥️💕* 🤠😂 *Happy Birthday Mumbai 🕯🌹*🌹
.............
23.05.2020
सुप्रभात 👏🙏🎩,
 *"गोपाल शर्मा यांचे दुःखद निधन!"*😭😭
*गोपालजी हे 'रेडीओ सिलोन'वरचे एक महान 'उद्घोषक' होते.* पन्नास आणि साठच्या दशकात रेडीओ सिलोनला लोकप्रियतेच्या चरमसीमेवर पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्या काळातली गाणी सुंदर होतीच. अर्थात, ती 'इतर केंद्रांवरुनही' वाजत होती. पण सिलोन रेडीओला जी अद्भुत जनप्रियता लाभली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे गोपाल शर्मा, दलजितसिंग परमार, विजयकिशोर दुबे, मनोहर महाजन, विमल कश्यप,  ज्योती परमार , पद्मिनी परेरा यासांरखे  सर्जनशील निवेदक आणि कार्यक्रम 'पेश करण्याची' त्यांची अनोखी शैली. नुसती एकापाठोपाठ एक छानछान गाणी लावणं हे फारच सोपं काम आहे. परंतु अत्यंत कल्पक असे कार्यक्रम तयार करुन, ही गाणी अतिशय आकर्षक सूत्रात गोवण्याची कला सिलोनच्या या निवेदकांना साध्य झाली होती. या सा-यांची आपल्या श्रोतृवर्गावर एवढी हुकुमत होती की, "हम जल्दी वापस आएंगे, आप कही जाइयेगा मत", अशी विनवणी करायची आवश्यकताच त्यांना कधी भासली नाही. 'जब आप गा उठे', 'दृश्य और गीत', 'अनोखे बोल', 'बदलते हुए साथी', 'बहनोंकी पसंद', 'जाने पहचाने गीत', 'साज और आवाज', 'हमेशा जवाँ गीत', 'पुरानी फिल्मों का संगीत', 'ये भी सुनीये' असे अनेक कल्पक कार्यक्रम या मंडळीनी तयार केले. अमीन सायानींची  'बिनाका गीतमाला' ऐकणं हा तर  रसिकतेचा मानदंडच समजला जावू लागला. 'रेडीओ श्रवणानंदाचं सुवर्णयुग' या लोकांनी घडवलं आणि रसिकांना अभिरुचीसंपन्न बनवलं. 'गाणी ऐकणं' हे केवळ 'वेळ घालवण्यापुरतं मनोरंजन' न राहता, त्या आस्वादनाला  अभिजाततेचं कोंदण लाभलं. 
*'गोपाल शर्मा' यांनी काही खास शब्द वापरात आणले. *आवाज की दुनियाके दोस्तो* हा शब्दप्रयोग त्यांचाच. (त्यांच्या आत्मचरित्राचं नावही हेच आहे. ) *शुभाशिष', 'शुभरात्री', 'बंधूवर' हे शब्दही त्यांनीच प्रथम रेडीओवर आणले*.
आज सकाळी, वयाच्या 89 व्या वर्षी, मुंबई येथे त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या कलासक्त व्यक्तित्वाच्या स्मृतीस नम्र अभिवादन 👏🙏🏻🌹 
............
सुप्रभात 👏🙏🎩, 24 मई 2000 फिल्म जगत के मशहूर शायर *मजरूह सुल्तानपुरी* जी का देहान्त *मुंबई* मे हुआ, उन्हे *श्रद्धांजलि अर्पित करते है* 🌹👏, उनका जन्म यु.पी. के आजमगढ़ जिल्हे के सुल्तानपुर में हुआ, उनका पढाई मे ध्यान नही था गुजारेके लिए वह दवाईया बनाने सीखें और हाकिम का काम करनें लगे यह काम करते करते वोह शायरी करने लगे, उन्हें उस जमाने के मशहूर निर्माता-निर्देशक *करदार* जी ने पहला मोका दिया, उनके गाने भावपूर्ण और रोमँटिक रहते थें, 1993 मे वह *दादा साहब फालके* पुरस्कार हासिल करने वाले पहले शायर थे, उन्हें 1965 मे *फिल्म फेअर अवार्ड* मीला था, भारत सरकार ने उनका *पोस्ट टिकट* निकालकर सन्मानित कीया था... 🌹
............
सुप्रभात 👏🙏🎩, 24 मई 1955 को मशहूर संगीतकार *राजेश रोशन* लाल नागराह का जन्म मुंबई में हुआ,उनके पिताजी *रोशन* जी बडे संगीतकार थे इसलिए घर में संगीतमय वातावरण था और आने वाले लोगों की सेवा छोटा *राजु* करता था, अभिनेता निर्माता निर्देशक *राकेश रोशन* उनका बडा भाई, पिता के देहान्त बाद उनकी माँ ने परिवार के दोस्त *शायर आनंद बक्शी* जी को राजु के काम के बारेमें कहा, बक्शी जी ने उन्हें *आर डी बर्मन, कल्याणजी-आनंदजी और लक्ष्मीकांत-प्यारेलाल* जी के यहाँ *म्यूजिक कंपोजर* का काम दिया, सबसे जादा काम उन्होंने लक्ष्मीकांत प्यारेलाल के पास कीया, उन्हें संगीत देने का पहला मोका दिया  *हरफनमौला मेहमूद* जी ने 1974 अपनी फिल्म *कुवाँरा बाप* मे, आगे की उनकी *ज्युली वगैरा* सभी फिल्मे कामयाब रही, उनका यह अनोखा गाना सुनते है... यह गाने मे *मेहमूद* के पिता *मुमताज अली* जीने काम कीया है, मुझे याद है उस वक़्त मैने जीस जीस ऑर्केस्ट्रा में काम कीया वहाँ देखा यह गाने को लोगों ने बहुत पसंद कीया और पैसा भी इनाम में बहुत फेका.... 👏🌹
...........
सुप्रभात 👏🙏🎩, 25 मई 1998 को संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडी के *लक्ष्मीकांत* शांताराम कुडालकर जी का देहान्त मुंबई में हुआ, उनका बचपना मुंबई - विलेपार्ले में गुजारा उनके पिता जी का देहान्त होंने से कम उम्र में बडे भाई और उनके उपर परिवार की जिम्मेदारियां आई, बडे भाई ने उन्हें मशहूर *मेंडोलीन वादक हुसैन अली* जी के पास भेजा और खुद तबला वादन सीखें,बादमे लक्ष्मीकांत जीने उस वक़्त कीं मशहूर संगीतकार जोडी *हुस्नलाल-भगतराम* के हुस्नलाल जी के पास *व्हायोलिन* बजाना सीखा,10 साल की उम्र में उन्होंने *लता जी* के कार्यक्रम मे *मेंडोलीन* बजाया उनका वादन सुनके लताजी ने उन्हें अपने परिवार का सदस्य बनाया वहाँ उनकी पहचान *प्यारेलाल* शर्मा जी से हुई, दोन्होंकी पहचान लताजी ने और संगीतकारोंसे कराई सिर्फ ओ पी नय्यर और शंकर जयकिशन जी छोडकर दोनों ने सभी के साथ काम कीया था,उन्होंने पहला काम फिल्म *भक्त पुंडलीक* मे कीया सिलसिला शुरू हुआ और 1963 मे उन्होंने खुद संगीतबद्ध की हुई  फिल्म *पारसमणि* जबरदस्त हीट हुई, 1963 से 1998 तक यह जोडी ने *635* फिल्म को संगीत दिया यह फिल्मे उनके संगीत के वजह से हिट हुई थी *(दोस्ती,मिलन वगैरा)* उनके *स्मृति को श्रद्धांजलि* 👏🌹... 🌹🌺
..........
सुप्रभात 👏🙏🎩, 29 मई 2007 भजन गायक मराठी और हिंदी फिल्म संगीतकार *स्नेहल भाटकर* तथा *व्ही.जी.भाटकर बुवा* जी का देहान्त मुंबई में हुआ, उन्हें *श्रद्धांजलि👏🌹अर्पित* करते हैं, बचपनमे पिताजी गुजरने के बाद उनके माताजी ने स्कूल मास्टर की नौकरी करके उन्हें पढाया, उनकी आवाज़ अच्छी थी *दादर प्रभादवी* मोहल्ले मे *विश़्वंभर प्रासादिक भजन मंडळी* माध्यम से उनके *एकनाथ बुवा हातीसकर,फुलाजी बुवा,केसरीनाथ भाये* जीं के साथ बडे बडे *जलसे* होते थे, यह करके वो *हिज मास्टर व्हाईस कं.* मे वोह  *हार्मोनियम वादक* की नौकरी करके थे, HMV ने उन्होंने गायें हुवे *भजन अभंग गौळण* कीं *रेकॉर्ड्स* निकाली, वह *संगीतकार* 1947 मे बने *सुधीर फडके* जी और उन्होंने मिलके *रुक्मिणी स्वयंवर* फिल्म को संगीत दिया था, उनके संगीत मे शास्त्रीय बाज था उन्होंने *गीता दत्त,शमशाद बेगम,राज कुमारी, लता आशा जी,मुबारक बेगम, सुमन कल्याणपूर,तलत मेहमूद,मुकेश,हेमंत कुमार,सुरेश वाडकर जी* से गाने गवाके लिए, उन्हें *लता मंगेशकर पुरस्कार* और *कालिदास पुरस्कार* से नवाजा गया था अॅक्टर *रमेश भाटकर* उनका सुपुत्र था और *मुंबई उच्च न्यायालय की रिटा.न्यायाधीश मृदुला भाटकर*  उनकी बहु है .....👏👏👏🌹
.................................................................................

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

Lovely messages 2


व्हाॅटस्अप ग्रूप : जनसेवा ग्रंथालय , रत्नागिरी
मेसेज बाय : श्री. विनय परांजपे 

*कोकणची गझल*
भाग- 8
   
    विदर्भ,मराठवाडा,पश्‍चिम महाराष्ट्र,खानदेश इथे गझल खूप आधीपासून बहरलेली आहे . कोकणात अलीकडील पिढीत गझल लिहिणारे खूप आहेत. श्रेष्ठ गझलकार  *खावर*  हे फार मोठे शायर होते.मराठी आणि उर्दूमध्ये त्यांनी सकस गझला लिहील्या आहेत.नऊ उर्दू संग्रह आणि चार मराठी गझल संग्रह त्यांच्या नावावर आहेत. 
  श्री.वा न सरदेसाई हे सुरेश भटांच्या कालखंडातील एक महत्त्वाचे गझलकार ..गझलच्या वृत्तावर हुकमत असणारे  हे उत्तुंग प्रतिभेचे शायर आहेत.
 *हे का कुणी फुलांना* *सांगायला हवे*
*कोणी कसे ऋतूंशी* *वागायला हवे* 

ही त्यांची प्रसिद्ध गझल आहे.

   *कैलास गांधी*
हे अलीकडे मराठी गझलमध्ये कौतुकाने घेतले जाणारे नाव आहे. गांधी दापोलीत राहतात. *देवीदास पाटील* रत्नागिरीचे ..सुरेश भटांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गझलची सुरुवात केली. त्याच दरम्यान राजापूरचे *अजीज मुकरी* गझल लिहायला लागले..
  *केदार पाटणकर* गेली वीस-पंचवीस वर्ष तन्मयतेने गझल लिहीत आहेत ..
  रत्नागिरीचे *विजयानंद जोशी* अगदी अलीकडे लिहू लागले आहेत. निष्ठेने गझल लेखन करणारे जोशी आता हळूहळू गझलच्या प्रांगणात सराईतपणे वावरू लागले आहेत.
    नामवंत पत्रकार *दिनेश केळुसकर* हे मालवणी कवी म्हणून प्रसिद्ध आहेत पण त्यांनी उत्तम गझल रचनाही केलेल्या आहेत.
 देवगडच्या *डॉ. माधुरी चव्हाण जोशी* यांचे नाव सध्या गझलच्या क्षेत्रात अग्रस्थानी आहे. गझलच्या अंगणात त्यांच्यासाठी एक मानाचा चौरंग आहे. त्यांनी मेहनतीने हे स्थान मिळवले आहे ..
 माधुरी जोशींच्या नंतर देवगडच्या *उत्तरा जोशी* याही निष्ठेने गझल लेखन करत आहेत.दोडामार्गचे *सचिन मणेरीकर* हे ही उत्तम गझला लिहितात.
  मालवणी मुलखातल्या *गोविंद नाईक* नावाच्या गझलकाराने  मराठी गझल रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. *अनिल विद्याधर आठलेकर* हे छंदशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत . आणि ते उच्च दर्जाचे गझलकार आहेत..
    *आनंद पेंढारकर* हे उत्तम गझल लिहितात.ते गझल गातातही उत्तम.
आता या गझलकारांच्या गझलांची झलक पाहू.....

*ठेवतो हा चोख बंदोबस्त मी* 
*घालतो साऱ्या जगावर गस्त मी*
*सूर्य आहे मावळावे लागते*
*पाहतो दररोज माझा अस्त मी*     
       - खावर

*हे का कुणी फुलांना सांगायला हवे*
*कोणी कसे ऋतूंशी वागायले हवे*
      -वा.न.सरदेसाई

*करते थोडी स्वप्ने गोळा,* 
*स्वप्नांचे वय कायम सोळा ....*

*सखे जरी तू सती पार्वती,*
*हरेक शंकर नसतो भोळा....*

*उरी वेदना मणामणाची,*
*वजन सुखाचे तोळा तोळा....*
- माधुरी चव्हाण जोशी 
    देवगड


*हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही* 
*श्वास नुसता येत जातो गंध टिपता येत नाही*

*व्यक्त ओठांनाच व्हावे लागते प्रत्येकवेळी* 
*काळजाच्या भरवश्यावर प्रेम करता येत नाही* 

*पान अळवाचे तशी तू थेंब पाण्याचा असा मी*
*भेट होते स्पर्श होतो पण बिलगता येत नाही*
      - गोविंद नाईक

*चढला बराच जेव्हा बाजारभाव माझा*
*माझ्याच माणसांनी केला लिलाव माझा ...*

*इतक्यात ताकदीची घेऊ नका परीक्षा*
*इथल्या रणांगणांना नाही सराव माझा ...*
   
-अनिल आठलेकर


*सैरभैर झालेला वारा सांगत सुटला आहे* 
*कुणीतरी या आभाळाला खडा मारला आहे*

*उडणारा पाचोळा त्याच्या मागे मागे फिरतो* 
*पण वारा हे सांगत नाही कुठे चालला आहे*

*कपारितुनी आवाज ऐकू येतो गुदमरल्याचा* 
*काय झऱ्याचा त्या खडकाने गळा दाबला आहे ?*

*झाडाचे मुळ शोधत आहे का जमिनीचा गाभा ?*
*का फांद्यांनी आभाळाला हात लावला आहे ?*

*पोट खपाटीला गेलेला आड विचारत आहे*
*पोहरा काढुन कुणि इथे हा पंप लावला आहे ?*

- कैलास गांधी

*कधी आवेश नव्हता तर कधी वेडावलो नाही*
*फुलांच्या सोबतीनेही कधी गंधाळलो नाही*

 *कितीदा भेटलो आपण कितीदा बोललो आपण* 
 *मला बोलायचे तेही कधीही मी बोललो नाही*

 *कितीदा नेमक्या वेळी असे मागेपुढे झालो*
*कधी आलो जवळ तेव्हा जवळचे वाटलो नाही*

- देविदास हरिश्‍चंद्र पाटील, रत्नागिरी


 *चालती येथे हजारो माणसे*
 *मात्र होते वेगळे माझे ठसे*

   *कासवांशी शर्यती लावू नका*
*लाजुनी सांगायचे गोरे ससे*

*सारखी झोळीत असणार याकडे*
*लक्ष कोणी देत नाही फारसे*
    -अजीज हसन मुक्री, राजापूर

*लाडिकसे घुंगुरवाळे रस्त्यातुन वाजत गेले*
 *अंगावर हलकी हलकी कोवळीक पसरत गेले*

 *कुठल्याही पंथामध्ये मी कधी मिसळले नाही* 
 *जे दिसले  सुंदर निर्मळ  तेवढेच वेचत गेले*
 
 *मोकळे बोलणेसुद्धा वाटली खूपदा शिक्षा*
 *अन बरे वाटले जेव्हा काळजात साठत गेले*

 *तू हसल्यानंतर कसली माझ्यावर जादू झाली*
 *रंगीत पाखरू कोणी हृदयात भिरभिरत गेले*

 *मेलेले होते म्हणुनी ते काही बोलत नव्हते*
 *जे जिवंत होते तेही मेल्यागत वागत गेले*

 *चिरडून मारण्यामध्ये संपली जिंदगी ज्यांची*
 *मुंगीचे मरणे त्यांचे काळीज पिळवटत गेले*

- उत्तरा जोशी

*तसा छोटाच पॅराग्राफ आहे मी*
*असू द्या.. एक छोटा विषय आहे मी*

*न सांडावे कुठेही रक्त किंचितसे*
*असा हळुवार रेशिमवार आहे मी*

*तुला वाटे कसा मी सांग, वारा की*
*न दिसणारा हवेचा दाब आहे मी?*

*कधी रोखून धरतो तो भितीने की*
*कठिणसा सोडलेला श्वास आहे मी?*

*तशी आलीच जर का वेळ माझ्यावर*
*तुझ्या पानांमधे लपणार आहे मी*

*कुठे रेंगाळतो कोलाहलामध्ये*
*मनीच्या घुंगुरांचा नाद आहे मी*

*कसा झुंजू खवळत्या या प्रवाहाशी*
*भरुन आल्या नदीचा काठ आहे मी*
  - विजयानंद जोशी, रत्नागिरी 



*गंध जर तुम्हास परिसरात पाहिजे*
*छानसा गुलाब अंगणात पाहिजे*

*ओळ पाहिजे तशी तुला सुचेलही*
*एक चंद्र आपल्या मनात पाहिजे*

*जा नि आण पाखरा झकास बातमी*
*ती मला दिल्या घरी सुखात पाहिजे*
    
    - केदार पाटणकर,चिपळूण


*वाटते की दूर जावे फार आता*
*राहिली ना कोणती तक्रार आता*

*कालपरवाचीच आहे बातमी कि*
*माणसे होतील सारी ठार आता*

- दिनेश केळुसकर, रत्नागिरी- कणकवली


*प्राजक्ताचा जन्म मिळावा समोर यावे दार तुझे*
*अगदी नकळत स्पर्श हजारो व्हावे वारंवार तुझे* 

*परत कधीही होणे नाही निवडणूक या मनामधे*
*तुझीच सत्ता जन्म सातही कायमचे सरकार तुझे*

*दारे, खिडक्या, तुळस, माजघर, गाभारा हि विहिरहि*
*तुझा न उरलो मी आता पण अजून हे घरदार तुझे* 

- कौस्तुभ अरुण आठल्ये ,रत्नागिरी 


*पुन्हा आठवण छळते आहे* 
*अश्रूंना बोलवते आहे*

 *मनात झाले गिधाड जागे*
*स्वप्न कोणते सडते आहे*

*स्वप्नामध्ये असावीस तू* 
*रात्र पटापट सरते आहे*
 - सचिन मणेरीकर,दोडामार्ग

   
आता काही मालवणी गझला पाहू...

*सांग तुझ्या काळजाक माझे स्पर्श घुटमाळतत कशे ते*
*बघ तुझ्या कलमार माझे श्वास म्होवार्तत कशे ते* 

*मी तसो आंगाक माझ्या लाव्न घेव्चय नाय काय्यक*
*जा इचार वा-याक माझ्या केस इस्काट्तत कशे ते*

*पाय तू ठेय्शीत थय्सर पसरलय काळीज माझा*
*गो नको सांगाक माका पैंजणी व्हाज्तत कशे ते* 

*नाय गो समजाचा तुका ह्या पापण्यांचा राजकारण*
*आवाज नाय येणा तरीपण गजाल बघ सांगतत कशे ते*

*घे जरसो रंग माझो लाव्न तू गालाक आप्ल्या*
*मग तुका सम्जात गुलाबी गाल हे आस्तत कशे ते*

*वाय्चसा काजाळ माझा लाव तुझ्या डोळ्यांत निळसर*
*आणि बघ फुलवित पिसारे मोर तुझे नाच्तत कशे ते*

गोविंद नाईक ,वेंगुर्ला


*पाव्ळेक पाशिटा तू सांगा नको गजाली*
*सगळे तुझे मिजाशी येतत वरून खाली*

*इतको तुझो कसो गो चेहरो खुलान येता?*
*वाट्ता जशी दवांतच निक्ती सकाळ न्हाली ...*

*आता नको दडव ता पोटात दु:ख सगळा*
*डोळे बघून कळता सगळी तुझी खुशाली* 

*कोणीच नाय काय्येक बोलनत घरात आता,*
*चिकटान भिंतियेकच ऱ्हवतत कित्याक पाली ?*

*खयच्या दिशेक नक्की चललव खरेच आपण*
*हातात जातियेचे दिसतत बरेच ढाली*

*देता निसर्ग जा जा, ता ता जपून ठेया*
*नायतर नसात कोणी नंतर जगाक वाली* 

*दररोज फक्त आता स्वप्नात गाव येता,*
*बहुतेक याद माझी गावाकडे निघाली ....*

-अनिल वि. आठलेकर, 
 कुडाळ

-मधुसूदन नानिवडेकर
............................. 

फाॅरवर्डेड बाय :  श्री. अनिल अ. शिवलकर
फाॅरवर्डेड मेसेज  :

🟣 *दिनविशेष* 

🔖  *गुरुवार दि. २५ जून २०२०*

▪️ १९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.

▪️ १९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.

▪️ १९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.

▪️ १९८३: भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.

▪️ १८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.

▪️ १८६९: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म.

▪️ १९७४: हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म.

▪️ १९७८: हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म

▪️ १९८६: अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्म.

▪️ १९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.

▪️ १९७९: मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब यांचे निधन.

▪️ १९९७: फ्रेंच संशोधक जॅक-इवेसकुस्तू यांचे निधन.

▪️ २०००: मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.

▪️ २००९: अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)
.......