मंगळवार, ७ जुलै, २०२०

Lovely Messages 4


*नीट लक्ष देऊन वाचा*आणि गाभिर्याने विचार करा

मित्र : अजून जागा आहेस ?
मी : हो रे भाई.  या टेन्शनमुळे जागरण वाढलं.
मित्र : हो ना. 
मी : तुझी तब्बेत कशी आहे ? रिकव्हरी ?
मित्र : हो. आज पाचवा दिवस ना. बऱ्यापैकी रिकव्हरी आहे.
मी : गुड. काळजी घे रे.
मित्र : हो रे. माझा निष्काळजीपणा नडला.
मी : चलता है. वेळेत निदान झालं, ते महत्वाचं.
मित्र : तेच तर.
मी : सहज मेसेज केलेला ना ?
मित्र : नाही. एक अनुभव शेअर करायचा होता.
मी : बोल ना.
मित्र : ५ दिवसांपूर्वी माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली, आणि तातडीने माझ्यावर उपचार सुरू झाले.
मी : हो.
मित्र : त्यापूर्वी मी रविवारी मित्राच्या लग्नाला जाऊन आलेलो. कलीग होता, म्हणून नाही टाळता आलं. नंतर समजलं की, लग्नाला उपस्थित राहिलेल्या इतरांनाही संसर्ग झालेला आहे.
मी : मग ?
मित्र : अरे मला मित्राचा मागच्या आठवड्यात कॉल आलेला. तुला यावच लागेल. मला बाकी काही माहीत नाही. नाही आलास तर बोलणार नाही. असा हट्ट केलेला त्याने.
मी : पुढे ?
मित्र : वास्तविक पाहता, मला लग्न टाळता आलं असतं. पण मी सध्याच्या परिस्थितीला सिरीयस घेतलं नव्हतं. कारण लग्नाचा एरिया ग्रीन झोन होता. 
मी : साहजिक आहे.
मित्र : तीच तर मोठी चूक झाली. नेमकं लग्नाला आलेल्या पाहुण्यांपैकी कुणीतरी संसर्गग्रस्त व्यक्ती माझ्या संपर्कात आली. त्यामुळे मला आणि इतर काही जणांनाही, लागण झाली.
मी : ओह.
मित्र : मी घरी आलो, त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मला त्रास सुरू झाला. तुला तर माहीत आहे की, आई-पप्पा गेल्याने घरी कुणीच मोठं नाही. दादाची फॅमिलीही लांब आहे.
मी : मग ?
मित्र : मी टेस्ट केली आणि माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याचं टेन्शन डोक्यावर स्वार झालेलं असतानाच, बायकोलाही खोकला सुरू झाला. त्यादरम्यान मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने, तिची एकटीची धावपळ झाली. मात्र तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण त्यानंतर आमच्या दोन्ही मुलांनाही, तातडीने टेस्ट करायला सांगण्यात आलं.
मी : अरे.
मित्र : सुदैवाने त्या दोघांची टेस्ट निगेटिव्ह आली आणि आमच्या दोघांचा जीव भांड्यात पडला. मात्र पुढे अजून एक संकट आमच्यासमोर आ वासून उभं राहिलं.
मी : कुठलं भाई ?
मित्र : आम्ही दोघे दवाखान्यात. मग मुलांना सांभाळणार कोण ? माझी मुलगी ८ वर्षांची आहे आणि मुलगा ४ वर्षाचा. दोघेही लहान, त्यामुळे आम्ही दोघेही अगदी हतबल झालो.
मी : फिर ?
मित्र : अरे जवळच्या सगळ्या लोकांनी हात वरती केले. वरून शेजाऱ्यांनीही साफ नकार कळवळा. म्हणून मग शेवटी, हिच्या एका मैत्रिणीच्या हातापाया पडून त्यांना मनवलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
मी : बरं झालं.
मित्र : अरे पण या सगळ्यात माझा बराच खर्च झाला. आधी सर्वांच्या टेस्ट आणि नंतर ट्रीटमेंट, यामुळे जवळ उरलेले सगळे पैसे संपले. एकतर लॉकडाऊनमुळे कॉर्पोरेटमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत.
मी : हो ना.
मित्र : मग काय. शक्य असेल त्या सगळ्यांसमोर हात पसरले. मात्र सगळ्यांनी नाईलाज सांगितला.
मी : हो ना. सगळेच कोंडीत सापडलेत.
मित्र : अखेरीस खूप अपेक्षेने त्या मित्राला कॉल केला. ज्याच्या लग्नाला त्यादिवशी रविवारी गेलो होतो.
मी : मग ?
मित्र : तू ऐकून शॉक होशील. मात्र एकतर सुरुवातीलाच त्याने पैसे द्यायला साफ नकार दिला. शिवाय शेवटी मला म्हणाला की, तू लग्नाला नसता आला तरी चाललं असतं. उगाच एवढा प्रॉब्लेम करून ठेवलास.
मी : कठीण आहे.
मित्र : तूच बघ आता. म्हणजे ज्याच्या शब्दखातर मी, स्वतःचा जीव धोक्यात टाकून, एवढ्या दूरच्या लग्नाला उपस्थित राहिलो. तोच मला सांगतोय की, उगाच मी तो बावळटपण केला.
मी : अक्कल बंद पडते.
मित्र : भाई कुणी कुणाचं नसतं. हे तेव्हा कळतं, जेव्हा आपण स्वतः संकटात असतो. बायकोने मला थांबवायचा प्रयत्न केला होता. पण माझा हट्ट माझ्याच पश्चातापाचं कारण बनला.
मी : सच बात.
मित्र : म्हणून आजच्या तारखेला, स्वतःपेक्षा स्वतःच्या कुटुंबाचा विचार करण्याची अधिक गरज आहे. कारण आपली एक चूक, त्या सर्वांचा जीव धोक्यात टाकू शकते.
मी : खरं आहे.
मित्र : आम्ही दोघेही कमावते आहोत. महिन्याला १ लाख रुपये पगार मिळतो आम्हाला. पण आजच्या तारखेला, आमची मुलं जेवलीत की उपाशी आहेत ? याचीही आम्हाला खबर नाही.
मी : नको तसा विचार करू.
मित्र : मनात येतात रे विचार. एवढ्या दिवसात कधी त्या तिघांना स्वतःपासून वेगळं होऊन दिलं नाही. मात्र आज माझ्या एका चुकीची शिक्षा, त्या तिघांना भोगावी लागते आहे.
मी : हो ना.
मित्र : लोक सध्याच्या परिस्थितीला फार कॅज्युअली घेत आहेत. त्यांना तुझ्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की, परिस्थितीचं गांभीर्य ओळखा. एखाद्या लग्नाला नाही जाणं झालं. कुणी नाराज झालं, तर आभाळ कोसळणार नाहीये. परंतु तिथे जाऊन जर अनावधानाने तुम्हाला या आजाराचा संसर्ग झालाच, तर मात्र तुम्ही एका संकटात अडकणार आहात. शिवाय तुमच्या मनमानीची झळ, निष्कारण तुमच्या कुटुंबालाही सोसावी लागणार आहे.
मी : सच बात.
मित्र : मी तर फक्त एक उदाहरण आहे. आजकाल आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच घटना घडत आहेत, ज्या ऐकून आपणही थक्क होतोय. म्हणून प्रत्येकाने निष्काळजीपणा बाजूला सारून, वेळीच शहाणं व्हायला हवं. नाहीतर माझ्याप्रमाणे पश्चातापाची वेळ अटळ आहे.
मी : खरं आहे.
मित्र : भाई नक्की लिही यावर. एखाद्याला तरी यातून शहाणपण आलं तरी पुरेसं आहे.
मी : हो भावा. आजच लिहितो आणि शेअर करतो.
मित्र : मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. 
मी : काळजी घे.
मित्र : हो. तुही काळजी घे.
*फक्त वाचून उडवू नका.*
................   

 व्हाॅटस्अप ग्रूप : तंत्रशिक्षण समन्वय
मेसेज बाय : श्री. अरूण नाईक 
मेसेज : 

*बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण*
१०-१० दिस अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!
धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!
तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…!
शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो…!
माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..!
मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…!
खर सांगतो गड्यानो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..!
आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…!
गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…!
पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक….!
महाराजांचा अभिषेक सुरु होता,महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता…!
जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता…..महाराजांनी जेव्हा त्या फकिरला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला…!
ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून या बहिर्जी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले….आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे,राज्य आनंदात आहे,आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे…!
काय बोलावे या प्रकाराला….कसली वेडी माणस असतील ती…!
एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?
स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे….तो खुद्द स्वराज्याच्या गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक आहे….इतकी कमालीची गुप्तता…!
आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते ओ …?
काहीच नाही….उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न…माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती…!
हि वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??
बस्स…एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नव्हते….!
...............

मेसेज बाय : श्री. अनिल अ. शिवलकर , रत्नागिरी

मेसेज : 

🟣 *दिनविशेष* 
🔖  *सोमवार दि. २९ जून २०२०*
▪️ १९८६: आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
▪️ २००१: पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
▪️ २००७: ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.
▪️ १८६४: शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म.
▪️ १८७१: मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९३४)
▪️ १८९१: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)
▪️ १९८१: मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)
▪️ २०००: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)
▪️ २०१०: विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९२७)
.........
🟣 🟣
फाँरवर्डेड मेसेज बाय : श्री. विनय परांजपे , रत्नागिरी

मेसेज : 
*आम्हाला २०२० ने काय दिले !! एक सुंदर विचार पुढे वाचा*:

नमस्कार मंडळी.
काल मला एका मित्राने विचारले, २०२०  काय देत आहे. 

कोरोना, चक्रीवादळ, व्यवसाय, नोकरीत आर्थिक झटका, मानसिक तणावात आत्महत्या. 
चीन, पाकिस्तान यांच्या कारवाया.
नाही मित्रा, 

*२०२० ने आम्हाला संघर्ष करायला शिकवला. *
देशात स्वच्छता किती गरजेची आहे. 
काळजी घेणे. 
एकमेकांना मदत करणे. 
निसर्गाला वाचविणे.
अन्नाची किंमत.
मानसिक भावना.
अनेक नवीन मेनू.
अनेक वैचारिक लेख आणि पोस्ट.
अनेक विनोदी पोस्ट मनाला आल्हाद देत आहेत.
कमी खर्चात विवाह.
कमी संख्येत अंत्यसंस्कार.
विना मेकअप चे खरे चेहरे.
घरात राहण्यासाठी लागणारा संयम.
घरातील लोकांशी संवाद साधण्यासाठी मिळालेली अमूल्य संधी.
आपल्या अवती भवती चे शेजारी नातेवाईकांन पेक्षा ऐन वेळी महत्वाचे.
प्रदूषण कमी.
पुढे येणाऱ्या कोणत्याही मोठ्या संकटाना सामोरे जाण्याची मानसिक तयारी, हे सगळे २०२० देत आहे.
या काळात खूप मौल्यवान लोक पण गमविले.
गरीब श्रीमंत एकाच पातळीवर आणले. 
खरे देवदूत आम्हाला दिसले, जे आम्ही फक्त आमच्या प्रार्थना स्थळात बघत होतो.
जगण्याची किंमत कळाली.
जीवन किती मौल्यवान आहे ते कळाले.
पुढील दिवस नक्की चांगले असू दे, ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
........

*फू बाई फू फुगडी फू* 
*कधी दमशील मेल्या*                 *corona तू रे corona तू*
आज बंद उद्या बंद
बंद किती बंद,
आज बंद उद्या बंद
बंद किती बंद,
कारण नसताना बाहेर फिरतात,        ते सगळे मंद...         
आत्ता फुगडी फू...
*फू बाई फू फुगडी फू* 
*कधि दमशील मेल्या*            
 *corona तू रे corona तू*

ताई नाही माई नाही
कोणी नाही भेटत,
ताई नाही माई नाही
कोणी नाही भेटत,
लॉक डाऊन चे दिवस 
चालले आहेत रेटत रेटत..
आत्ता फुगडी फू....
*फू बाई फू फुगडी फू*
*कधी दमशील मेल्या*               
*corona तू रे corona तू*
काम ना धंदा 
जेवण तीन तीनदा 
एबीपी वर ज्ञानदा 
आणि 
भांडी घासा चारदा
हाच उरलाय धंदा 
आता फूगडी फू....

*फू बाई फू फूगडी फू* 
*कधी जाशील मेल्या*           
     *corona तू रे corona तू*।
............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: