सोमवार, २० जुलै, २०२०

Lovely messages 6


Messages fwd. By Mr. Anil Anant Shivalkar,  Ratnagiri 

        श्री. अनिल अनंत शिवलकर , रत्नागिरी 
                 

[5/31, 15:21] A A. Shivalkar: ✖➕➖➗*🌻

Today is National Mathematics Day 

(Birth Day of Ramanujam),


See this Absolutely amazing Mathematics given by great Mathematician *रामानुजम*


1 x 8 + 1 = 9

12 x 8 + 2 = 98

123 x 8 + 3 = 987

1234 x 8 + 4 = 9876

12345 x 8 + 5 = 98765

123456 x 8 + 6 = 987654

1234567 x 8 + 7 = 9876543

12345678 x 8 + 8 = 98765432

123456789 x 8 + 9 = 987654321


1 x 9 + 2 = 11

12 x 9 + 3 = 111

123 x 9 + 4 = 1111

1234 x 9 + 5 = 11111

12345 x 9 + 6 = 111111

123456 x 9 + 7 = 1111111

1234567 x 9 + 8 = 11111111

12345678 x 9 + 9 = 111111111

123456789 x 9 +10= 1111111111

9 x 9 + 7 = 88

98 x 9 + 6 = 888

987 x 9 + 5 = 8888

9876 x 9 + 4 = 88888

98765 x 9 + 3 = 888888

987654 x 9 + 2 = 8888888

9876543 x 9 + 1 = 88888888

98765432 x 9 + 0 = 888888888



And look at this symmetry :

1 x 1 = 1

11 x 11 = 121

111 x 111 = 12321

1111 x 1111 = 1234321

11111 x 11111 = 123454321

111111 x 111111 = 12345654321

1111111 x 1111111 = 1234567654321

11111111 x 11111111 = 123456787654321

111111111 x 111111111 = 12345678987654321


Brilliant isn't it?



Please Share This Wonderful Number Game 
[6/25, 11:31] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *गुरुवार दि. २५ जून २०२०*

▪️ १९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.

▪️ १९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.

▪️ १९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.

▪️ १९८३: भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.

▪️ १८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.

▪️ १८६९: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म.

▪️ १९७४: हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म.

▪️ १९७८: हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म

▪️ १९८६: अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्म.

▪️ १९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.

▪️ १९७९: मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब यांचे निधन.

▪️ १९९७: फ्रेंच संशोधक जॅक-इवेसकुस्तू यांचे निधन.

▪️ २०००: मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.

▪️ २००९: अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)
[6/27, 14:08] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖 *शनिवार दि. २७ जून २०२०*

▪️ १९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

▪️ १९९६: अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.

▪️ १८६४: काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)

▪️ १८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८९९)

▪️ १९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा  जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)

▪️ १७०८: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.

▪️ २०००: शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.

▪️ २००२: भारतीय उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.
[6/28, 16:03] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *रविवार दि. २८ जून २०२०*

▪️ १८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरि यांचा राज्याभिषेक झाला.

▪️ १९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.

▪️ १९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.

▪️ १४९१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १५४७)

▪️ १९२१: भारताचे ९वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिम्हा राव यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)

▪️ १९२८: चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)

▪️ १९३४: कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज रॉय गिलख्रिस्ट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २००१)

▪️ १९३७: साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक डॉ.गंगाधर पानतावणे यांचा जन्म.

▪️ १९८७: व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ पं. गजाननबुवा जोशी यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९११)

▪️ १९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन.
[6/29, 10:44] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *सोमवार दि. २९ जून २०२०*

▪️ १९८६: आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.

▪️ २००१: पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.

▪️ २००७: ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

▪️ १८६४: शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म.

▪️ १८७१: मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९३४)

▪️ १८९१: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)

▪️ १९८१: मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)

▪️ २०००: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)

▪️ २०१०: विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९२७)
[7/2, 09:17] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
प्रदोष
मास : आषाढ
तिथी : शु. द्वादशी
०२ जुलै २०२०
वार : गुरुवार
चंद्र राशी: वृश्चिक
नक्षत्र: अनुराधा
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: आर्द्रा: वाहन घोडा
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *प्रत्यय विवरण*
भूत म्हणिजे जितुकें जालें| 
जालें तितुके निमालें |
चंचळ आलें आणी गेलें| 
ऐसें जाणावें ||५||
अविद्या जड आत्मा चंचळ| 
जड कर्पूर आत्मा अनळ |
दोनी जळोन तत्काळ| 
विझोन जाती ||६||
ब्रह्म आकाश निश्चळ जाती| 
आत्मा वायो चंचळ जाती |
परीक्षवंत परीक्षिती| 
खरें किं खोटें ||७||
जड अनेक आत्मा येक| 
ऐसा आत्मानात्मविवेक |
जगा वर्तविता जगन्नायेक| 
तयास म्हणावें ||८||

जे निर्माण झाले ते नष्ट होते, पंचमहाभूते निर्माण झाली व ती नष्ट होतील म्हणून ती जड तरीही चंचल आहेत. पंचमहाभूते जड (अनात्मा) कापरा सारखी तर परब्रम्हाचे प्रतिबिंब म्हणजे चंचल आत्मा हा अग्नी रूप मानले तर दोनीही एकदिवस जळून लगेच विझून शांत होतील. परब्रम्ह व आकाश निश्चल आहेत तर आत्मा व वायू चंचल आहेत असे परिक्षावंत सांगतात. परब्रम्हाचे प्रतिबिंब स्वरुप आत्मा एकमेव सर्वव्याप्त परन्तु जडसृष्टी अनेक ह्या विचारला आत्मानात्मविवेक असे म्हणतात. म्हणून आत्मा जगाचा नियंता आहे.   

- प्रत्यय विवरण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०७
[7/3, 08:53] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
मास : आषाढ
तिथी : शु. त्रयोदशी
०३ जुलै २०२०
वार : शुक्रवार
चंद्र राशी: वृश्चिक
नक्षत्र: ज्येष्ठा
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: आर्द्रा: वाहन घोडा
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *प्रत्यय विवरण*
जड अनात्मा चेतवी आत्मा| 
सर्वीं वर्ते सर्वात्मा |
अवघा मिळोन चंचळात्मा| 
निश्चळ नव्हे ||९||
निश्चळ तें परब्रह्म| 
जेथें नाहीं दृश्यभ्रम |
विमळ ब्रह्म तें निभ्रम| 
जैसें तैसें ||१०||
आधी आत्मानात्माविवेक थोर| 
मग सारासारविचार |
सारासारविचारें संव्हार| 
प्रकृतीचा ||११||
विचारें प्रकृती संव्हारे| 
दृश्य अस्तांच वोसरे |
अंतरात्मा निर्गुणीं संचरे| 
अध्यात्मश्रवणें ||१२||

जड दृश्यसृष्टीला असणारे चेतनत्व आत्मा देतो व त्याचे अस्तित्व कणाकणात वसते. जडाला चेतनत्व देण्यासाठी परब्रम्हाचे प्रतिबिंब असलेला आत्मा चंचल स्वरूप असतो. परंतु परब्रम्ह विमळ, निश्चल असून त्यास दृष्टीभ्रम लागू होत नसल्याने मानवी डोळ्यांना दिसत नाही. आधी सृष्टीचा आत्मा कोण व कसा आहे हा आत्मानात्मविवेक जाणून मग सारासार विचार समजुन घ्यावा (परब्रम्ह सार, दृष्य सृष्टी असार). अध्यात्म श्रवणाने सारासार विचार समजल्याने दृश्यसृष्टी नष्ट होण्या आधीच वस्तूंचा मोह कमी झाल्याने अंतरात्मा निर्गुण स्वरूप घेतो.     
- प्रत्यय विवरण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०७
[7/4, 08:44] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
मास : आषाढ
तिथी : शु. चतुर्दशी
०४ जुलै २०२०
वार : शनिवार
चंद्र राशी: धनु
नक्षत्र: मूळ
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: आर्द्रा: वाहन घोडा
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *प्रत्यय विवरण*
चढता अर्थ लागला| 
तरी अंतरात्मा चढतचि गेला |
उतरल्या अर्थें उतरला| 
भूमंडळीं ||१३||
अर्थासारिखा आत्मा होतो| 
जिकडे नेला तिकडे जातो |
अनुमानें संदेहीं पडतो| 
कांहींयेक ||१४||
निसंदेह अर्थ चालिला| 
तरी आत्मा निसंदेहचि जाला |
अनुमान-अर्थें जाला| 
अनुमानरूपी ||१५||
नवरसिक अर्थ चाले| 
श्रोते तद्रूपचि जाले |
चाटपणें होऊन गेले| 
चाटचि अवघे ||१६||
जैसा जैसा घडे संग| 
तैसे गुह्यराचे रंग |
याकारणें उत्तम मार्ग| 
पाहोन धरावा ||१७||
         
अंतरात्मा कसा आहे याचा जेव्हढा वरचा गूढ विचार कराल तेवढा तो गूढ भासू लागेल. म्हणून निर्गुण निराकार परब्रम्हाचे प्रतिबिंब असलेला अंतरात्मा असा साधा अर्थ लावला तर त्याचे अस्तित्व तुमच्या आमच्यात या पृथीवरच जाणवू लागेल. अंतरात्मा चंचल सर्वव्यापी असल्याने त्याची शब्दात व्याख्या करणे कठीण आहे. त्यामुळे शब्दांच्या जंगलात अडकून पडलो तर अंतरात्मा कसा ते उमगण्या ऐवजी नुसता अंदाज बांधत बसून गोंधळ होईल. नव-रसपूर्ण कथा ऐकताना श्रोते तल्लीन होऊन जातात. मनाला उद्यपीत करणारी कथा सांगितली तर श्रोते उत्तानपणे वागू लगतात! सरडा ज्या रंगाच्या झाडावर चढतो तसा रंग त्याला प्राप्त होतो. याच नियमाने आपण सत्संग केला तर गुणी होऊ व कुसंग केला तर दुर्गुणी.

- प्रत्यय विवरण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०७
[7/4, 11:24] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *शनिवार दि. ४ जुलै २०२०*

▪️ १७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.

▪️१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला.

▪️१९३६: अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

▪️१९९७: नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.

▪️१९१४: जनकवी भावगीत लेखक पी. सावळाराम यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९९७)

▪️१९२६: विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ तथा वि. आ. बुवा यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २०११)

▪️१७२९: मराठा आरमारप्रमुख (सेना सरखेल) कान्होजी आंग्रे यांचे निधन.

▪️१९६३: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८७६)

▪️१९८०: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८९६)
[7/5, 09:48] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *रविवार दि. ५ जुलै २०२०*

▪️ आज गुरूपौर्णिमा 

▪️ १९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.

▪️ १९९६: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.

▪️ १९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म.

▪️ १९५४: न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.

▪️ १८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५)

▪️ २००५: लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)

▪️ २००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)
[7/6, 10:12] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *सोमवार दि. ६ जुलै २०२०*

▪️ साईबाबा उत्सव समाप्ती, शिर्डी 

▪️ १७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

▪️१८९२: ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.

▪️१९८२: पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.

▪️१८३७: प्राच्यविद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)

▪️१८६२: मानववंशशास्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)

▪️१९२०: अर्थतज्ञ डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९५)

▪️१९२७: लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)

▪️१९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९२१)

▪️१९९९: कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९३९)

▪️२००२: भारतीय उद्योगपती धीरुभाई अंबानी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३२)
[7/7, 09:01] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖

मास : आषाढ
तिथी : कृ. द्वितीया/ तृतीया
०७ जुलै २०२०
वार : मंगळवार
चंद्र राशी: मकर
नक्षत्र: श्रवण
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: पुनर्वसु: वाहन उंदीर
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *प्रत्यय विवरण*
मुख्य देवचि ठाईं पडिला| 
मग काये उणें तयाला |
लोक वेडे विवेकाला| 
सांडून जाती ||२७||
विवेकाचें फळ तें सुख| 
अविवेकाचें फळ तें दुःख |
यांत मानेल तें अवश्यक| 
केलें पाहिजे ||२८||
कर्तयासी वोळखावें| 
यास विवेक म्हणावें| 
विवेक सांडितां व्हावें| 
परम दुःखी ||२९||
आतां असो हें बोलणें| 
कर्त्यास वोळखणें |
आपलें हित विचक्षणें| 
चुकों नये ||३०||

देवाचे अस्तित्व ज्याला उमगले त्याला मग कसली कमतरता भासेल? पण प्रपंचात गुरफटलेला माणूस हा विवेक विसरतो. सारासार विवेकाचे फळ सुख असते तर अविवेकाचे फळ फक्त दुःख. हे लक्षात ठेऊन कर्माचे फळ मिळवताना सगळ्याचा मुख्य कर्ता परब्रम्ह आहे हे कायम ध्यानात ठेवले तर दुःख कधीच होणार नाही.

- प्रत्यय विवरण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०७
[7/7, 10:20] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *मंगळवार दि.७ जुलै २०२०*

▪️१९१०: पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना.

▪️१९८५: विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

▪️१९९८: इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.

▪️१९७३: भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.

▪️१९८१: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म.

▪️१३०७: इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचे निधन. (जन्म: १७ जून १२३९)

▪️१९९९: भारतीय क्रिकेट खेळाडू एम. एल. जयसिंहा यांचे निधन.
[7/8, 10:16] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *बुधवार दि.८ जुलै २०२०*

 🌝  आज संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री १०. ०३

▪️ २००८: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन.

▪️२००६: मुख्यनिवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

▪️ २०११: रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.

▪️ १९१४: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१०)

▪️ १९१६: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९८)

▪️ १९७२: भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म.

▪️ १९८४: पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी ‘बाकीबाब’ उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )

▪️ २००७: भारताचे ८वे पंतप्रधान चंद्रा शेखर यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९२७)
[7/9, 10:13] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *गुरुवार दि. ९ जुलै २०२०*

▪️ १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

▪️१९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.

▪️१९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)

▪️१९३८: चित्रसृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)

▪️१९६८: सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८९६)

▪️१९९३: संगीतकार जोडीतील सोनिक यांचे निधन.

▪️२००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)
[7/9, 10:19] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
मास : आषाढ
तिथी : कृ. चतुर्थी/ पंचमी
०९ जुलै २०२०
वार : गुरुवार
चंद्र राशी: कुंभ
नक्षत्र: शततारका
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: पुनर्वसु: वाहन उंदीर
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *कर्ता निरूपण*
जें जें कर्तयानें केलें| 
तें तें त्याउपरी जालें |
कर्त्यापूर्वीं आडळलें| 
न पाहिजे कीं ||२६||
केलें तें पंचभूतिक| 
आणि पंचभूतिक ब्रह्मादिक |
तरी भूतांशें पंचभूतिक| 
केलें तें घडेना ||२७||
पंचभूतांस वेगळें करावें| 
मग कर्त्यास वोळखावें |
पंचभूतिक तें स्वभावें| 
कर्त्यांस आलें ||२८||
पंचभूतांवेगळें निर्गुण| 
तेथें नाहीं कर्तेपण |
निर्विकारास विकार कोण|
लावू शके ||२९||
निर्गुणास कर्तव्य न घडे| 
सगुण जाल्यांत सांपडे |
आतां कर्तव्यता कोणेकडे| 
बरें पाहा ||३०||

एखादी वस्तू एखाद्याने बनवली असे म्हणले तर ती वस्तू बनवणाऱ्याच्या जन्मा आधी अस्तित्वात असणे शक्य आहे का? दृष्यसृष्टि म्हणजे पंचमहाभूते ब्रम्हदेवाने बनवली असे म्हणावे तर ब्रम्हदेव स्वतः सगुण असल्याने पंचमहाभूताचा अंश आहे. म्हणून पंचमहाभूते स्वतःच्या अंशातून जन्मली हे तर घडू शकत नाही! (स्वतःच स्वतःला जन्म देणे शक्य नाही) दृष्यसृष्टि मधून पंचमहाभूताना वगळले तर जे शिल्लक राहील तो मग एकमेव कर्ता ठरतो. कारण जन्मदात्याचा अंश मुलात स्वाभाविकपणे दिसणारच.  परब्रम्ह पंचमहाभूतापेक्षा निर्गुण असल्याने वेगळं आहे. परंतु मग प्रश्न असा पडतो कि कर्ता निर्गुणी कसा असेल किंवा निर्विकाराला विकार कसा होईल? परब्रम्ह निर्गुण असल्याने त्याला क्रिया किंवा कर्म नाही. सगुण (पंचमहाभूते) तर आधीच जन्मले आहे. मग या सगुणाचा (पंचमहाभूते) कर्ता कोण या प्रश्नाचे उत्तर सूक्ष्म विचार केला तरच सापडेल.

- कर्ता निरूपण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०८
[7/9, 10:19] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *गुरुवार दि. ९ जुलै २०२०*

▪️ १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

▪️१९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.

▪️१९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)

▪️१९३८: चित्रसृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)

▪️१९६८: सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८९६)

▪️१९९३: संगीतकार जोडीतील सोनिक यांचे निधन.

▪️२००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)
[7/10, 12:48] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *शुक्रवार दि. १० जुलै २०२०*

▪️ २०००: मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.

१९०३: साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्म.

१९१३: कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)

१९१४: सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते जो शस्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९२)

१९२३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)

१९४९: क्रिकेटपटू समालोचक सुनील गावसकर यांचा जन्म.

२००५: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)

१५५९: फ्रान्सचा राजा हेन्‍री (दुसरा) यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५१९)

१९६९: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. (जन्म: ३० मे १८९४)
[7/11, 09:27] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
मास : आषाढ
तिथी : कृ. षष्ठी
११ जुलै २०२०
वार : शनिवार
चंद्र राशी: मीन
नक्षत्र: उत्तरा भाद्रपदा
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: पुनर्वसु: वाहन उंदीर
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *कर्ता निरूपण*
केलें तें अवघेंच लटिकें| 
तरी कर्ता हें बोलणेंचि फिकें |
वक्ता म्हणे रे विवेकें| 
बरें पाहा ||३५||
बरें पाहाता प्रत्यये आला| 
तरी कां करावा गल्बला |
प्रचित आलियां आपणाला| 
अंतर्यामीं ||३६||
आतां असो हें बोलणें| 
विवेकी तोचि हें जाणे |
पूर्वपक्ष लागे उडवणें| 
येरवीं अनुर्वाच ||३७||
तंव श्रोता करी प्रस्न| 
देहीं सुखदुःखभोक्ता कोण |
पुढें हेंचि निरूपण| 
बोलिलें असे ||३८||

माणूस दृश्यसृष्टी/ पंचमहाभूते यांचे अस्तित्व खरे धरून याचा कर्ता कोण असा प्रश्न विचारतो परंतु ते मुळात मायिक, भ्रामक आहे म्हणून हा प्रश्न चुकीचा ठरतो. दृश्यसृष्टी/ पंचमहाभूते यांचा कर्ता कोण हा पूर्वपक्ष आहे तो समजण्यासाठी हे सर्व विवरण करावे लागते अन्यथा ते अनुर्वाच्य म्हणजे शब्दांच्या पलीकडचे आहे!  म्हणून जे भ्रमरूप आहे, क्षणिक आहे त्याचा लोभ धरू नये हा सिद्धांत विवेकी माणसाने कायम मनात घट्ट करावा. मग श्रोता विचारतो कि सृष्टी मायिक असल्याने तिला कर्ता नाही मग ज्याला आपण सुख किंवा दुःख म्हणतो ते नक्की काय व त्याचा भोक्ता कोण? पुढील समासात याचे निरूपण केले आहे.

- कर्ता निरूपण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०८
[7/11, 10:04] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *शनिवार दि. ११ जुलै २०२०*

▪️ जागतिक लोकसंख्या दिन.

▪️ १९०८: लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.

▪️१९५०: पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.

▪️१९७९: अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

▪️१९९४: पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.

▪️२००६: मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.

▪️१८८९: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ – कोरेगाव, जिल्हा सातारा)

▪️१८९१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १९६१)

▪️१९२१: दलित साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)

▪️१९५३: केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म.

▪️१९९४: परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचे निधन.

▪️२००३: कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक सुहास शिरवळकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)

▪️२००९: गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६)
[7/12, 09:18] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
मास : आषाढ
तिथी : कृ. सप्तमी
१२ जुलै २०२०
वार : रविवार
चंद्र राशी: मीन
नक्षत्र: उत्तरा भाद्रपदा/ रेवती
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: पुनर्वसु: वाहन उंदीर
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *कर्ता निरूपण*
आत्मयास शेरीरयोगें| 
उद्वेग चिंता करणें लागे |
शरीरयोगें आत्मा जगे| 
हें तों पगटचि आहे ||१||
देह अन्नचि खायेना| 
तरी आत्मा कदापि जगेना |
अत्म्याविण चेतना| 
देहास कैंची ||२||
हें येकावेगळें येक| 
करूं जातां निरार्थक |
उभयेयोगें कोणीयेक| 
कार्य चाले ||३||
देहाला नाहीं चेतना| 
अत्म्यास पदार्थ उचलेना |
स्वप्नभोजनें भरेना| 
पोट कांहीं ||४||
आत्मा स्वप्नअवस्थेंत जातो| 
परंतु देहामध्यें हि असतो |
निदसुरेपणें खाजवितो| 
चमत्कार पाहा ||५||

माणसाच्या अवयवांना चेतना देण्याचे काम आत्मा करतो त्याच बरोबर हे शरीर आत्म्याला राहायचे ठिकाण देते. त्यामुळे शरीराच्या माध्यमातून आत्म्याला सुख दुःख पीडा होत असते. आपण जेवलो नाही तर त्या शरीरात आत्मा राहाणार नाही आणि आत्मा नसेल तर देहाला चेतना नाही. त्यामुळे आत्मा व शरीर दोघेही एकमेकांना पूरक आहेत. दोघांना वेगळे केले तर कोणताच हेतू साध्य होणार नाही. आत्म्या शिवाय देहाला हालचाल करण्याची शक्ती नाही आणि आत्मा स्वतः एकटा काडी देखील उचलू शकत नाही अस हे कोड आहे. स्वप्नात पक्वान्नांचे भरलेले ताट नुसते बघून पोट भरेल काय? शरीर निद्रिस्त असताना आत्मा स्वप्नावस्थेत असतो तरीही तो शरीरात असतो कारण शरीराच्या कोणत्याही अवयवाला कंड सुटली तरी झोपेत देखील आपण सहजपणे खाजवतो! हा चमत्कार नाही का?

- आत्माविवरण -

- आत्माविवरण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०९
[7/12, 12:18] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖 *रविवार दि. १२ जुलै २०२०*

▪️ १६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.

▪️ १९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

▪️ १९९९: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.

▪️ ख्रिस्त पूर्व १००: रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्म.

▪️ १८६४: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६)

▪️ १९६१: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार यांचा जन्म.

▪️ १९६५: क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म.

▪️ २०००: मराठी कवयित्री इंदिरा संत यांचे निधन.

▪️ २०१२: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)
[7/13, 17:46] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *सोमवार दि. १३ जुलै २०२०*

▪️ १६६०: पावनखिंडीतील लढाई.

▪️१९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

▪️२०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६जण ठार, तर १३० जण जखमी.

▪️१९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.

▪️१८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)

▪️१६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.

▪️२०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९१४)

▪️२००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे निधन.
[7/14, 09:22] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *मंगळवार दि. १४ जुलै २०२०*

▪️ २००३: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.

▪️२०१३: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.

▪️१८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म. (मृत्यू: १७ जून १८९५)

▪️१९२०: केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)

▪️२००३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२२)

▪️२००८: सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९२०)

▪️१९६३: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)

▪️१९७५: संगीतकार मदनमोहन यांचे निधन. (जन्म: २५ जून १९२४)

▪️१९९३: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन.
[7/14, 09:27] A A. Shivalkar: *जागतिक गणित दिवसाच्या*
             *हार्दिक शुभेच्छा*🌹

आयुष्याचे *गणित* चुकले
असे कधीच म्हणू नये .
आयुष्याचे गणित 
कधीच चुकत नसते,

चुकतो तो *चिन्हांचा* वापर !

*बेरीज*
*वजाबाकी*,
*गुणाकार*,
*भागाकार*
हि चिन्हें योग्य पद्धतीने वापरली 
कि उत्तर मनासारखे येते.

आयुष्यात कुणाशी *बेरीज* करायची,
कुणाला केंव्हा 
*वजा* करायचे ,
कधी कुणाशी 
*गुणाकार* करायचा
आणि 
*भागाकार* करताना
स्वतः व्यतिरिक्त किती
लोकांना सोबत घ्यायचे 
हे समजले की 
*उत्तर* मनाजोगे येते..!

आणि मुख्य म्हणजे

जवळचे नातेवाईक,मित्र
आप्तेष्ट यांना 
*हातचा* समजू नये ,
त्यांना *कंसात* घ्यावे! (👨‍👨‍👦‍👦)

कंस सोडविण्याची 
हातोटी असली कि 
*गणित*
कधीच चुकत नाही ...!! 😊

आपल्याला शाळेत 
*त्रिकोण*,
*चौकोन*,
*लघुकोन*,
*काटकोन*,
*विशालकोन*
इत्यादी सर्व शिकवतात..
पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो
तो कधीच शिकवला जात नाही.

तो म्हणजे  *दृष्टीकोन*

आयुष्याचे *calculation* 
खूप वेळा केले, पण 
'सुख दुःखाचे' *accounts*
 कधी जमलेच नाही...
जेंव्हा *total* झाली तेंव्हा समजले..की  
*आठवण* सोडून काहीच *balance* उरत नाही...

 💐  जागतीक *गणित* दिवसाच्या     
                     हार्दिक शुभेच्छा.💐
🎲➕➖➗✖✔📊📈📉❌
[7/15, 13:37] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *बुधवार दि. १५ जुलै २०२०*

▪️ १९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.

▪️ १९६२: ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.

▪️ १९९६: पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

▪️ १९९७: पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

▪️ २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

▪️ १६११: जयपूरचे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)

▪️ १९२७: विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०१०)

▪️ १९४९: दलित साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा जन्म.

▪️ १९३२: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)

▪️ १९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन. (जन्म: २६ जून १८८८)

▪️ १९९९: पर्यावरणवादी लेखक जगदीश गोडबोले यांचे निधन.

▪️ १९९९: सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक यांचे निधन.

▪️ २००४: कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)
[7/15, 13:53] A A. Shivalkar: पुढील एक-दोन महिन्यात सर्वांना हवेहवेसे वाटणारे *सण* जवळ आले आहेत सहज आठवणीत रहावे म्हणून सारांश पाठवीत आहोत.

२० जुलै,  सोमवार *दीप पूजा अमावस्या* 
नंतर *श्रावण मास* आरंभ
२१ व २८ जुलै मंगळवार मंगलागौरी पूजन. 
२५ जुलै शनिवार *नाग पंचमी*.
२७ जुलै श्रावणी सोमवार पहिला.
३ ऑगस्ट सोमवार *नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन*.
४ ऑगस्ट मंगलागौरी पूजन तिसरा मंगळवार.
१० व १७ ऑगस्ट श्रावणी सोमवार.
११ ऑगस्ट मंगलागौरी पूजन आणि *श्रीकृष्ण जयंती*.
१२ ऑगस्ट बुधवार गोपालकाला.
१८ ऑगस्ट मंगळागौरी पूजन.
२१ ऑगस्ट शुक्रवार *हरितालिका पूजन*.
२२ ऑगस्ट शनिवार *श्री गणेश चतुर्थी*.
२३ ऑगस्ट ऋषी पंचमी.
२५,२६ व २७ ऑगस्ट मंगळवार  *ज्येष्ठागौर* आवाहन , बुधवार पूजन , गुरुवार विसर्जन.
१ सप्टेंबर मंगळवार *अनंत चतुर्दशी*.
१७ सप्टेंबर, गुरुवार सर्व दर्श अमावस्या.
१८ सप्टेंबर , शुक्रवार  *अधिक अश्विन मासारंभ*.
१७ ऑक्टोबर शनिवार, *घटस्थापना*. निज आश्विन मासारंभ.                               
 🙏 *सर्व हिन्दू बांधवांना विनंती*🙏
    *दीप (दिवे धुण्याची)* अमावस्येला काही लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे ...
    मुळात गटारी असा कोणताही सण आपल्या धर्मात नाहीये ... 
     हे नामकरण कोणी दारुडयाने केले आहे व दारुच्या  व्यापारात ज्यांचे आर्थिक  हितसंबध  गुंतले  आहेत त्यानी त्याला हवा दिली आहे ...
     👍  या सणाला *घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते.* दिवे आपल्या  जीवनातील *अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात,* त्यांच्याविषयी🙏 *कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण*🙏... 
     त्यामुळे ह्या सणाला दीप (दिवे धुण्याची) *दिप अमावस्याच* म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका. *कोणताही धर्म  ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही,* उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात ... *या दिवशी* *घरी तसेच मंदिरात दीपपूजन करावे*...
     वेळीच सावध व्हावे, *उद्या महाराष्ट्रातील नवीन पिढीला  वाटेल की धर्मच आम्हाला गटारी साजरी करायला लावतो,* सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावी. ...
     तेव्हा *हिंदू बांधवांनी* ह्या सणाविषयी लोकांमध्ये *जागृती* करून ह्या सणाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती ...
    तसेच आपल्या *हिंदू धर्माचा अभिमान राखून दीप अमावास्येला गटारी ना म्हणता *दीप अमावस्या* असेच म्हणावे व आपल्या *सणांचा व संस्कृतीचा मान राखावा.*
[7/16, 12:32] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *गुरुवार दि. १६ जुलै २०२०*

▪️१९९२ : भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड

▪️१९६९ : चंद्रावर पहिला मानव उतरवणार्‍या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण

▪️६२२ : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरची  सुरूवात

▪️१९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)

▪️१९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)

▪️१९६८: भारतीय हॉकी पटू धनराज पिल्ले यांचा जन्म.

▪️१९६८: विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा जन्म.

▪️१९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक यांचा जन्म.

▪️१९८४: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्म.

▪️१३४२: हंगेरीचा राजा चार्ल्स (पहिला) यांचे निधन.

▪️१८८२: अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरीटॉड लिंकन यांचे निधन.

▪️१९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)

▪️१९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ यांचे निधन.

▪️१९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे निधन.
[7/17, 11:48] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🧷 *शुक्रवार दि. १७ जुलै २०२०*

▪️१८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.

▪️१८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.

▪️१९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

▪️१९९३: तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान.

▪️१९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.

▪️१९१९: संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २००७)

▪️१९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २०००)

▪️१९३०: दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च २००८)

▪️१९५४: जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांचा जन्म.

▪️१९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.  (जन्म: १४ एप्रिल १९१४)

▪️१९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९१६)

▪️२०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचे निधन. (जन्म: २४ जून १९२८)

▪️२०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)हे.
[7/19, 19:27] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🧷  *रविवार दि. १९ जुलै २०२०*  

▪️१९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

▪️१९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

▪️१९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.

▪️१९८०: मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

▪️१८२७: क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)

▪️१८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)

▪️१९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)

▪️१९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९६८)

१९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)

▪️१९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

▪️१९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म.

▪️१३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.

▪️१९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन. (जन्म: २९ जून १९०८)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: