मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

Useful messages

  आपल्याला कोविड-19 बरोबरच राहायचं आहे, चला घाबरू नका किंवा नाकारू नका: 




डॉ. फहीम यांगनस, 

संसर्गजन्य रोग क्लिनिकचे प्रमुख, मेरीलँड विद्यापीठ,

यूएसए (अमेरिका):


  1. आपल्याला कोविड-19 (COVID-19) बरोबर कदाचित काही महिने किंवा वर्षे जगावे लागेल. घाबरू नका किंवा नाकारू नका, आपले जीवन निरुपयोगी करू नका. चला या वास्तवासह जगायला शिकू या!


  2. अधिकाधिक लिटर गरम पाणी पिऊन, पेशीमध्ये  घुसलेल्या/शिरकाव केलेल्या कोविड-19 (COVID-19) विषाणूचा नाश तुम्ही करू शकत नाही - तुम्हाला फक्त अधिक वेळा बाथरूम/वॉशरूमला जावे लागेल.


  3. आपले हात नियमित धुणे आणि दोन मीटरचे शारीरिक अंतर राखणे ही आपल्या संरक्षणाचा उत्तम मार्ग आहे.


 4. आपल्या घरात कोविड-19 (COVID-19) रुग्ण नसल्यास, आपले घर निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नाही.


  5. किराणा साहित्य/सामान, पिशव्या/प्लास्टिक, गॅस सिलेंडर, शॉपिंग कार्ड्स आणि एटीएममुळे हा संसर्ग पसरत नाही.

 आपले हात वारंवार धुवा, नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगा.


  6. कोविड-19 (COVID-19) हा अन्नातून संसर्ग होत नाही. हा फ्लू सदृश्य संक्रमण लहानशा थेंबांशी/थुंकीशी संबंधित आहे. बाहेरील अन्न/खाद्यपदार्थ  मागवून मागणी कोविड-19 (COVID-19) संक्रमित झाल्याचा कोणताही धोका आढळून आलेला नाही.


7. अँलर्जी प्रतिरोध आणि हवेतील संसर्ग/प्रादुर्भाव (व्हायरल इन्फेक्शनमुळे) यामुळे ‘नाक’ या ज्ञानेद्रियाचा (वास, गंध इ.) याची उपजत क्षमता कमकुवत होऊ शकते. ही केवळ कोविड-19 (COVID-19) ची अनियमित/असाधारण लक्षणे आहेत. 


  8. एकदा आपण घरी आल्यावर आपल्याला त्वरित कपडे बदलण्याची आणि अंघोळ करण्याची आवश्यकता नाही.

 ‘स्वच्छता हा एक सद्गुण आहे, परंतु भोळेपणा नाही’.


  9. कोविड-19 (COVID-19) व्हायरस हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रादुर्भाव/संक्रमण होत नाही किंवा उडू शकत नाही. हे श्वसनमार्गातून होणारा संक्रमण/संसर्ग आहे ज्यात नजीकचा संपर्क आवश्यक आहे.


  १०. हवा स्वच्छ आहे, आपण उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी फिरायला जाण्यास काहीही हरकत नाही. (फक्त आपले शारीरिक संरक्षणाचे अंतर ठेवा)


  ११. कोविड-19 (COVID-19) विरुद्धच्या लढयात फक्त नियमित साबण वापरा, जीवाणू प्रतिरोधक (अँटी-बॅक्टेरियल) साबणाची गरज नाही. हे विषाणू (व्हायरस) आहेत, जीवाणू (बॅक्टेरिया) नाहीत.


  12. आपण दिलेल्या अन्न/खाद्यपदार्थाच्या ऑर्डरबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु, आपल्याला गरज वाटल्यास मायक्रोओव्हनमध्ये सर्व अन्न/खाद्यपदार्थ गरम करू घेऊ शकता.


  13. आपल्या बूट/शूजमध्ये कोविड-19 चा संसर्ग/ प्रादुर्भाव घरी होण्याची शक्यता म्हणजे दिवसातून दोनदा विजेचे दिवे लावण्यासारखे आहे. मी 20 वर्षांपासून व्हायरस विरूद्ध कार्यरत आहे - ड्रॉप इन्फेक्शन (लहानश्या थेंबांशी/थुंकीशी संबंधित संसर्ग) असे पसरत नाही. 


  14. व्हिनेगर, उसाचा रस आणि आले खाऊन तुम्हाला व्हायरसपासून वाचविता येणार नाही. हे फक्त रोग प्रतिकारशक्तीसाठी आहे, औषध नाही.


  15. बराच काळ मुखपट्टी (मास्क) परिधान केल्याने आपल्या श्वासोच्छवासामध्ये आणि ऑक्सिजनच्या पातळीत व्यत्यय/अडथळा येतो. केवळ गर्दीत परिधान करणे आवश्यक आहे.


  16. हातमोजे घालणे देखील एक चांगली कल्पना नाही; व्हायरस ग्लोव्हजमध्ये जमा होऊ शकतो आणि आपण आपल्या तोंडाला स्पर्श केल्यास ते सहजतेने संक्रमित होऊ शकतो. फक्त नियमितपणे आपले हात धुणे आवश्यक आहे.


  17. नेहमीच निर्जंतुकीकरण वातावरणात राहिल्याने प्रतिकारशक्ती खालावते, कमकुवत होते. जरी आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी पूरक आहार / औषधे घेत असलो तरी, त्यामुळे कृपया पार्क, समुद्रकाठ किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे फिरायला जाणे आवश्यक आहे. घरी बसून तळलेले, मसालेदार, गोड पदार्थ आणि शीतपेये (फिझी ड्रिंक्स) सेवन करून, खावून/पिऊन नव्हे! तात्पर्य, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी रोगजन्य परिस्थितीत देखील घराबाहेर पडणे उचित  ठरते.

मूळ लेख: https://theazb.com/we-will-live-with-covid19-for-months-lets-not-deny-it-or-panic- 

डॉ. फहीम यांगनस,

संसर्गजन्य रोग क्लिनिकचे प्रमुख, मेरीलँड विद्यापीठ,

यूएसए (अमेरिका)


खूप चांगला लेख ..... सर्वांनी अवश्य वाचलाच पाहिजे असा.....

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

Happpy Navratrotsav

 

Happpy Navratrostav  !




सर्वात प्रथम तुम्हांला आजपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो ! गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ... अशी समजूत करीत मी पुन्हा सतिशबरोबर चर्चा सुरू केली. त्याच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. काही त्याला समजावून सांगितल्या.... अशी समजुतीची समजूत करीत पुढील भागात प्रवेश करू... चला तर ' मागे पुढे ' मध्ये पुढे काय घडतेय ते पाहू....


        माझ्या आयुष्यातील हा आतापर्यंतचा सर्वात खडतर कालखंड.... मुलाचे वर्क फ्राँम होम सुरू होऊन महिना होत आला. सुरूवातीला तो पुण्याहून यायलाच तयार नव्हता,  अखेर आम्ही तिकडे यायला निघतोय असं सांगितल्यावर पाठवलेल्या कारने तो घरी आला , हे तुम्हांला आठवत असेलच. आला तेव्हा स्वारी घुश्श्यातच होती. आमच्याकडे बघायलाही तयार नव्हती. विशेषत: त्याच्या आईवर त्याचा जास्त राग दिसत होता. शेजारच्या चुलत भावाच्या घरात तो 14 दिवस होम क्वारंटाईन होता. ते दिवसही खडतर गेले. सुरूवातीला इकडे नेटवर्क मिळणारच नाही , मला उगाच बोलावलंत , असा त्याने लावलेला सूरही हळूहळू निवळू लागला. घडी जरा कुठे बसतेय असे वाटते तोच कालचक्र फिरले. 1995-96 पासून डिसेंबर ते जुलै महिन्यात दुर्दैवाचे फटके बसायचे. नंतर काही वर्षांनी हेच कालचक्र बदलून 01 सप्टेंबर ते फेब्रुवारी मध्यापर्यंत वाईट कालखंड यायचा. यंदा फेब्रुवारी बरा गेला , पण 06 मार्च पासून पुन्हा आमचे दिवस फिरले. याच दिवशी आम्ही मुुलाला पुण्यात एकटे सोडून आमच्या गावी आलो . गुढी पाडवा झाला की दोनच दिवसांनी पुन्हा मुलाकडे जाऊ असा विचार आम्ही केला होता, पण कोरोना लाटेने आम्हांला गावातच बंदिस्त केले. मुलगा घरी आला हा आनंद बराचसा क्षणिकच ठरला. मायलेकांचे बोलीभाषण जसे वाढले तसे त्यांच्यात उडणारे खटकेही वाढू लागले. कोणीच कोणाला समजून घेईनासे झाले. कोण कोणाला हुकसवतोय आणि कोण कोणाची पाठ घेतोय हे सांगणे कठीण होऊ लागले. आयुष्यभर ज्या कुटुंबासाठी मी जीव टाकला , नोकरीतही खुळयासारखा वरिष्ठांशी भांडलो, तेच कुटुंब फुटणार हे आता उघड होऊ लागले. माझे ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीच नव्हते. तरी अजून कश्यातच काही नव्हते , मुलाचे लग्नं झाले नाही तर ही परिस्थिती होती. पुढे काय होणार ? कुटुंबाच्या काळजीने मी हैराण होत होतो.  खरे तर , मला कोणी खिजगणतीतच धरत नव्हते. ज्यांच्यासाठी प्रत्येक क्षण जगलो त्यांना एकमेकांशी भांडतांना मी दिसतच नव्हतो ! इतकी वर्ष किमान ज्याचे अस्तित्व ज्यांच्या सतत अवतीभवती होते , ते अस्तित्वच विसरून , माझ्याकडे ढुंकूनही न बघता , दोघेही आपलेच मुद्दे रेटू लागले. मी प्रचंड व्यथित झालो. कधी नव्हे ती हरल्याची भावना मनात येऊ लागली ! अनेक वादळे एकटयाने झेलली, पण हे वादळ मला आडवे करून गेले. परिणामत: सकाळी पाणी भरतांना पावसात भिजल्याचे निमित्त होऊन मी आजारी पडलो. दोन दिवस सर्दी , ताप यांनी त्रास दिला. कोरोनाच्या कालावधीत डाँक्टरकडे जायचीच चोरी होती. पण न जाऊनही चालणारे नव्हते. अखेर 19 सप्टेंबरला दोन इंजेक्शन्स घेतली. दोन तीन दिवस गोळया घेतल्या. आँक्सीजन लेव्हल रोज चेक करून घेतली. साठ वर्षात अनेक आजारपणं पाहिली पण कधी कोणत्याही डाँक्टरने आँक्सीजन लेव्हल हया प्रकाराचा उपयोग वा प्रयोग केला नव्हता ! माझी लेव्हल उत्तम होती म्हणून बरे,  नाही तर मला तो आजार नसतांनाही कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले असते. कोरोनाची हकीगत ही अशी आहे ! ही हकीगत मरो , पुढे काय हाल झाले ते पहा. मी ब-यापैकी बरा झालो नाही तोच पत्नी आजारी पडली. तिला सुरूवातीला कोहाळयाचा रस नडला. 23 सप्टेंबरला तिला डाँक्टरकडे नेले. डाँक्टरने मला दिलेल्याच गोळया तिलाही दिल्या. त्यातली एक गोळी घेतली की तिची फक्त कपाळपट्टी तापायची . कानशिलापासून पायापर्यंतचं अंग गार असायचं. पहिल्या रात्री तर मी व मुलगा मिठाच्या पाण्याच्या घडया तिच्या कपाळावर ठेवीत राहिलो. तेवढेच नव्हते , तर त्याचवेळी तिला प्रचंड अंगदुखी व्हायची. त्यामुळे तिला काय होतंय हेच तिला समजेनासं झालं. ती ग्लानीत विचित्र बडबडू लागली.  असे दोन दिवस , दोेन रात्री गेल्या. त्या गोळीमुळेच तिला हायपर अँसिडीटी होत होती , त्या गोळीचे साईड इफेक्टस होत होते , हे नेटवर सर्च करायला तिनेच सांगितलं तेव्हा लक्षात आलं. लगेच ती गोळी बंद केली. लगेच पन्नास टक्के उतार पडला. पण त्यातच तिला खूपच अशक्तपणा आला. हे आजारपण पंधरा दिवस चालले. पाच-सहा तारखेला तिला प्रथमच थोडा आराम पडला. तरी एक दोनदा त्रास झाला. पण आता त्रास कमी कमी होतोय. मुलगाही आता ब-यापैकी बरा बोलतोय. खडतर काळ थोडा सुसहय होतोय. 


           बीना हल्ली पुन्हा विचित्र वागू लागली आहे. तिच्या आईचा तर तिने छळ मांडलाय. घराच्या मालकिणीलाच घर सोडून कुठेतरी दूर निघून जावे असे वाटते आहे, यावरून लक्षात येईलच. बीनाला लग्न हवे आहे. पण लग्नानंतर ती सासरी पण राडे करू लागेल , ही सार्थ भीती पाहता तिची आईसुध्दा पुढे पाऊल टाकायला कचरणे स्वाभाविक आहे. तेवढयात परवा म्हणजे 07.10.2020 रोजी तिचे काका वारले. वायंगणकर काका. खूप चांगला माणूस. अनेकांना उमेद दिलेले काका स्वत:च्या जीवनाच्या एका टप्प्यावर मात्र खचून गेले. अखेर ते गेलेच. अर्थात, बीनाला आईच्या दु:खाचे काहीच वाटत नसल्याचे व ती स्वत:च्याच कोषात असल्याचे सतत निष्पन्न होते आहे. ती सरडयासारखे रंग बदलते आहे. मूड बदलते आहे. तिचे वागणे अनाकलनीय होत चालले आहे.  आहे. व्यक्ती अशा का होतात ? अशा विचित्र का वागतात ? व्यक्तीनिहाय किंवा कुटुंबनिहाय असा कालखंड किती वर्षे राहतो ? शनीची साडेसातीवगैरे हल्ली कोण फारसे बोलत नाही. कारण , दुर्दैवाचा कालखंड साडेसात वर्षांपेक्षाही कितीतरी अधिक होत चाललाय. मग आता याला काय म्हणायचे, हा प्रश्न मला पडू लागला आहे. काळाच्या मनात आहे तरी काय ? माझ्या आजीपासून पाहतोय. न संपणारी दु:खाची वर्षे म्हणजे माझ्या आजीचे आयुष्य.  मी यू टयूबवरील माझ्या Devidas Patil या चँनेलवर " आयुष्याकडे बघतांना  " या प्लेलिस्टमध्ये " आज्जीची गोष्ट " सांगितली आहेच. आपण ती आवर्जून ऐका. अर्थात त्या दहा मिनिटात आजीचे आयुष्य मांडता येणे शक्यच नव्हते. तरी पण तिच्या जीवनावर मी नेमके भाष्य मात्र तिथे केले आहे. आजीची गोष्ट तशी. वडिलांचीही गोष्ट फार वेगळी नाहीच. त्यांचेही आयुष्य खडतरच गेले. अखेरच्या काही दिवसांत तर ते बोलूही शकले नाहीत. " आयुष्याकडे बघतांना " या प्लेलिस्ट मध्ये शेवटी शेवटी मी माझ्या जन्मरहस्याबद्दल भाष्य करणार आहे. मधल्या भागांमध्ये मी सूचक शब्द वा प्रसंग ( क्लूज ) पेरणार आहे. माझेही जीवन फारसे सुखावह नव्हते. पण माझ्या आताच्या जीवनात तरी मी काहीसा सुस्थितीत आहे असे म्हणता येईल. निदान नोकरीतल्या कटकटी नाहीत आणि पैसे कमवण्यासाठी वयाच्या साठीत कुठे जावे लागण्याचे कारण नाही . पण एक पाहतो आहे की अनेकांच्या जीवनात प्रत्येक वर्षातला काही काळ सलग सुखाचा तर काही काळ सलग दु:खाचा तसेच काही काळ सलग सुखदु:खाच्या मिश्रणाचा येतो. माझ्या जीवनात हे मी अनेकदा अनुभवले आहे. हे विचित्र काळचक्र का फिरत असते ? त्या त्या काळात काही विशिष्ट घटना घडतात , काही सूचक स्वप्नेंही पडतात. असे का होते ? यामागे कोण आहे ? गेली काही वर्षे मी याच्याच मागे आहे. मध्यंतरीचे पुराणातले ग्रंथवाचून उत्तरे शोधण्याचा तो विचारही आता मागे पडला आहे. भाऊ ग्रंथालय करणार होता तेही लांबले आहे. आता घटनांचे विश्लेषण करण्याशी काळाचे वागणे जोडून काही हाती लागते का ते पहावयाचा विचार आहे. बाकी आता आँनलाईन लेखनाचा कंटाळा येऊ लागला आहे.  LinkedIn, Rediffmail, Facebook,  Twitter,  YouTube, Instagram , Quora यात आता फारसे मन गुंतत नाही. माझ्या मनाचा हा मुख्य प्रश्न आहे. मला सतत काही काळानंतर त्याच त्या गोष्टी करण्यात स्वारस्य वाटेनासे होते. त्यामुळे Blogging चाही मला आता कंटाळा येऊ लागला आहे. मी हल्ली कविताही करीत नाही . पत्नीला गंभीर आजारपणातून बाहेर काढण्यासाठी व पत्नीला आणि मलाही विषयांतर हवे झाले म्हणून सहा वर्षे रखडलेले घराचे करायचे राहिलेले कामही हाती घेतले. तेही आता संपत आले आहे. पण अजून एक मुख्य प्रश्न सुटला नाहीय. तो सुटल्याशिवाय पत्नी , मी व मुलगा यांच्या जिवाला निश्चिंतता लाभणार नाही. बघू कसे होते ते पुढे. 




(क्रमश:)

                          ....................