मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

मराठी गझल : काय बोलू ?


             काय बोलू ?


बोलतांना प्रश्न पडतो ; काय बोलू ?
मी मुक्याने गप्प बसतो ; काय बोलू ?


सारखे आढेवेढेच तुझे होते ....
मी सरळ सरळ विचारतो ; काय बोलू ?


पहा मी आभास नाही , सत्य आहे !
अन् तरी स्वप्नात असतो ; काय बोलू ?


काळजाचा थांगपत्ता लागतो का ?
फक्त काळा डोह दिसतो ; काय बोलू ?


तूच आता सांग माझी वाट कुठली  ?
मी तुझ्या वाटेत फसतो ; काय बोलू ?



... देवीदास हरिश्चंद्र पाटील

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

मराठी गझल : जे नको ते छेडले मी

    गाणे 

भेटल्या खाचखळग्यांचा वाटला आधार होता
हा असा रस्ता निघाला चालण्याच्या पार होता


मी जरी बोलून गेलो शब्द थोडेसेच होतो
लागले होते जिव्हारी...खोल झाला वार होता ...


बोललो नाही कधी मी हया उजेडाची कहाणी
हया उजेडामागचा मी पाहिला अंधार होता


फक्त दु:ख्खानेच केली साथ आयुष्यास होती !
तू कधी माझा सुखा रे घेतला कैवार होता .... ?


जे नको ते छेडले मी ...एकदा गाणे जरासे ...
ओठ माझे पोळले अन् ; कंठही बेजार होता !



...देवीदास हरिश्चंद्र पाटील

मेरी हिंदी गझले

तुममें है हिम्मत वो साथ करेगी क्यू डरते हो ?
साथी नहीं तो खुदके साथ क्यू न तूम चलते हो ?

इन गलियोमें आवारा कुत्ते घुमते रहते है ...
तूम सोचसमझकर मुरख , क्यू नादानी करते हो ?

उनके दिलका पैगाम सुनके भावूक बन जाओ
पत्थरदिलसा मूह लेकर अकेले क्यू फिरते हो ?

ढलता है तो ढलने दे सूरज , उसकी आदत है !
तूम अपने पावपर खडे , जमीपर क्यू ढलते हो ?

तुमसे बढकरभी कोई शायर हो , तो क्या हुआ ?
वो उसकी जगह और तूम अपनी जगह रहते हो !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



तूही नहीं , तेरा हर बहाना याद हैं
हर बहाना , मुझको सच बताना याद हैं

तूम तो हसते रहे सारी जिंदगीभर
जिंदगीभर मुझको यू रूलाना याद हैं

तेरी हर बातका पता था मुझको मगर
तेरा हर बातको घुमाफिराना याद हैं

तेरी हर जडको मैं कबसे जानता हूँ
तूहीं नहीं तेरा सब घराना याद हैं

तूम खुदको मुझसे अकसर छुडाते रहें
और मुझको तो मरमिट जाना याद हैं


..... देवीदास हरिश्चंद्र पाटील .



वो भी क्या जमाना था
हर कोई सयाना था

ये जिंदगीभी क्या थी ?
अनजाना फसाना था

जाने दो उसे , वो तो
बेचारा , दिवाना था

खुदको गैरोंसे नहीं
अपनोंसे छुडाना था

वो क्या बात थी यारो
होठोंसे पिलाना था

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



बडे बेरहम हो , दूरसे बात करते हो !
साया कहते हो और यू दूर रहते हो  !

तुम्हारी बेशरमी हमको क्यू भा गयी ?
हमे देखकर और क्यू बेशरम बनते हो ?

शायद ये सवाल नहीं... कुछ औरही होगा !
कुछ दिलमें हैं ... और कुछ जुबापे रखते हो !

हम क्या करे ? हमें बुरी आदतसी पडी हैं !
हर वक्त तूम हमें जो सुधरने लगते हो !

ये खेल तुम्हाराही रचा हुआ हैं देखो !
इसे खुद बनाकर तूम खुदही बिखरते हो !


..... देवीदास हरिश्चंद्र पाटील


जमाना तुम्हारा तो मेरे कामका नहीं !
तेरा सिंधूरभी तो मेरे नामका नहीं ...!

जितना हो सके उतना तो दौडते रहना
यह मामलाभी कोई आरामका नही !

उनसेभी बेहतर कोई शक्ती है यहाँ .....
ये अजुबा तो देख , राम या श्यामका नहीं !

मै तो अपनी धूनमें झुमताही चला हू ....
जान लो तुम , ये असर , किसी जामका नहीं !

प्यार वो रोग है जो बढताही जाता है
उसपर ईलाज चलता झंडूबामका नहीं !

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील .


आजभी हम तनहाही हैं
यू अकेले रहनाही हैं ...!


किसके साथ चले हम ?
खुदके बल चलनाही हैं !


कौनसा सूरज रोशनी देगा
कौनसा चाँद बननाही हैं ...


आँखमें सपने खूब लेकिन
इक ना सपना अपनाही हैं !


किसकिसको कहाँ ढुंढे ...?
किसके काबिल बननाही हैं ?



... देवीदास हरिश्चंद्र पाटील




शाम सबेरे दिलमें मेरे रामजी बोले जाये
सत्यवचन जो मैने दिया वो तो कौन निभाये ...

किसने मेरे हनुमानजीकी जात निकाली
किसके धर्म की हिम्मत हैं ये बात बताये

दिनदहाडे देखी सीता जलती रस्ते में ...
कोई नहीं हैं हिम्मतवाला जो उसे बचाये

देखी हमने हर दिलकी वो साफसफाई
देखा हमने हर कोई अपना शंख बजाये

आज तो सूग्रीव वाली भी इक हुये हैं ...
आज यहाँ कोई नहीं जो रामराज लाये


श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील



तूम जो मुझे देखते हो तो अच्छा लगता है
तूम जो मुझे चाहते हो तो अच्छा लगता है

मुझे मालूम नहीं के मैं तेरा कौन लगता हूँ
मुझे अपना मानते हो तो अच्छा लगता हैं

मुझे मालूम हैं के हम पास नहीं आ सकते
दूरसे तूम झाकते हो तो अच्छा लगता है

कोई बात नहीं हैं जब कोई बात नहीं हैं
खामोशीसे बोलते हो तो अच्छा लगता हैं

हाथमें तेरा हाथ नहीं तो कोई फर्क नहीं
नजरमें नजर डालते हो तो अच्छा लगता हैं


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



कुछ फर्क नहीं पडता , सिर्फ गरीब मरता हैं
नंगे पाँव घूमकर जो , आसूओंपे पलता हैं ...

अब तो यकीनसा हो गया हैं मुझको यारो ...
इन्सान जो करता हैं ,  वो खुदा क्या करता हैं ?

ये तेरी सोच हैं जो तुम्हेंही ठीक करनी होगी
देख, समय तो सिर्फ करवटे बदलता रहता हैं

तूम अपनी दिलमें अपने होशकी बात रखो ...
कहने दो उसको ,  वो तो अपनी बात कहता हैं

इक खयालसाही हैं , कोई जहर तो नहीं लाया
समझमें नहीं आता कोई इतना क्यू डरता हैं ...


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



लोग आते रहे 



लोग आते रहे , लोग जाते रहे
हम वही पे वही गम भुलाते रहे


प्यार उनका सही या न था भी सही
था निभाना हमें हम निभाते रहे


जख्म होते रहे , दर्द होता रहा
चंद आँसू बहे...हम छिपाते रहे


ये कहानी किसी और की थी मगर
रास आयी हमें , हम सुनाते रहे


रातभर सिलसिला ...खूब चलता रहा ...
आग लगती रही.... हम बुझाते रहें ...



... देवीदास हरिश्चंद्र पाटील



वो तो ...



वो तो कहा कहा पर हमें ढुंढते रहें
हम उन्हींकी आँखोंमें बसते रहें


वो मापने चले थे हमारी उचाईयाँ ...
हम उनके दिलमेंही डुबते रहें


आसमाँ छुनेकी चाहत थी उन्हे ...
हम जमीको आसमाँ समझते रहें !


हमने हर वक्त दिल बडाही किया
कहने दिया उनको जोभी कहते रहें


हमको निचा दिखाना चाहा मगर
खुदकी नजरोमें खुदही गिरते रहें




... देवीदास हरिश्चंद्र पाटील

माझ्या मराठी कविता

माळीण गांव




काल होते गांव

आज ते दिसेना ;

काळजाचं पाणी

डोळ्यात ठरेना !



डोंगरकुशीत

माळीण ते गांव;

त्याचा डोंगरात

लागे ना की ठाव !



अवघ्या क्षणात

मातीमोल झालं ;

एक आख्खं गांव

मातीखाली गेलं ! 

============================


 कचरा


झाडू मारून
कचरा हटेल
भ्रष्ट मंत्री
आणि गुंड
यांची युती
तुटेल काय ?

दंगली आणि
बलात्कार
झाडू मारून
हटतील काय ?

सामान्यांचा
फाटक्यात पाय
जायचा कधी
थांबेल काय ?

=====================

 माझ्या उरात कविता 

माझ्या उरात कविता
 कोणी कळे न कोरली
   दीप श्वासांचे विझले
      तरी कविता तेवली !


        कधी आकाश फाटले
           कधी जमीन खचली
              आले जखमांचे पूर
                  तरी कविता तरली !


                    भरोश्याच्या माणसानी
                        मान केसानी कापली
                            भरोश्याची राहिली ती
                               फक्त कविता आपली !

                                     ***************

 धावत्या ओळखीच राहिल्या

स्वप्नील त्या रात्री
 धुन्धीत मस्त गेल्या
  आज त्या मैफिलीन्च्या
    स्मृतीच  फक्त राहिल्या ...


      मैत्रीत ना राहिली
         पूर्वीची ती आत्मीयता
            अंगणात बसून पाहिलेल्या
                चांदण्याच फक्त राहिल्या ...


                  वेगळ्या होवून वाटा
                    चौफेर जेव्हा गेल्या
                       घाई गर्दीच्या त्या रस्त्यावर
                           धावत्या ओळखीच राहिल्या ...

                                  ***************

 विसर 

आता तुला पंख फुटले आहेत पाखरा
आता तुझा माझा संपला आहे सहवास
माझी तुला जराशीही उरली नाही गरज

तुझी स्वप्ने मी फूलवली आनंदात
तू एवढी दुनिया पहिली नव्हतीस
तेव्हा मीच होतो तुझ्या स्वप्नांचा राजकुमार

वाढत्या वयाबरोबर विस्तृत झालं तुझं जग
आणि मी बनून राहिलो एक धूलिकण

तुझ्याच डोळ्यातील ती स्वप्ने विसरून
तू आज झेपावतेयस उंचावरून
माझ्या जमिनीवरून खुरडण्याचा खेद नाही
तुझ्या भरारण्याचाच आनंद अधिक आहे

दुःखं एवढच : आता तुला पडला आहे माझा विसर
आता तुला पंख फुटले आहेत पाखरा
गतःकाल विसरून
भविष्याकडे झेपावण्यासाठी

***************


हसे 

तू मागू नकोस माझ्याकडे
फुलानी भरलेली ओंजळ
काटेच मिळतील तुला तिथे
आणि मिळतील आसुडांचे वळ

सोसण्याची आता ताकद नाही
पण सोसण्या- भोगण्याची खंतही नाही
आयुष्याने पार उलटेपालटे केले
याचेच हे दुःखं आहे बोचणारे !
असा मी तुला कसे देवू फुलांचे झेले ?


आकाशीचा चंद्रही मागू नको
शपथ आहे तुला माझी आणि
माझ्यातील खाचखळग्यांची !
माझ्याच असंख्य विवरातून
मी चालतो आहे अनवाणी !


आयुष्य पत्थर झाले आहे
या कातळाला ओलावा नाही
कशाला भिजवू तरी मी
माझ्या उदास अश्रुनी तुझी बाही ?


जेव्हा जेव्हा दिसलीस : हसलो !
आता याचेच हसे झाले आहे !
आता याचेच हसे झाले आहे !

***************


   स्मारकात बंद झालो !

जितेपणी घातली मी
गगनास गवसणी
हायआता मेल्यावरी
स्मारकात बंद झालो !

***************


 गुपित 

गुपित उरले आता कसले ग
मी तुज बोलून बसले ग
लटक्या रागाने रुसले ग
हसला तो अन मीही हसले ग
राजबिंडे रूप मनोहर दिसले ग
त्यावर भाळून मीही फसले ग
काय बाई प्रेम तरी असले ग
मीपण झाले असले नसले ग

***************

  कळली तुझी सोज्वळता ,  आगीपुढे विरघळता !

एका झाडाच्या दोन फांद्यांनी
दुसऱ्या झाडाच्या एका फांदीला घट्ट विळख्यात पकडले
आणि रगड रगड रगडले .
ही गोष्ट दोन्ही झाडांनी अनुभवली .पण पहिल्याने ती नाकारली .
ते म्हणाले ती माझी फांदीच नव्हे ;
तुझ्या माझ्यात किती हे अंतर !
तुझ्या फांदीला दुसऱ्याच झाडाची फांदी घासली असेल .
तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. पहाटे असे भ्रम होतातच ! दुसरे झाड काही बोलले नाही .

बराच काळ ती दोन्ही झाडे शांत होती .
मध्येच एकदा दुसऱ्या एका शांत रात्री ,
स्वत:होऊन पहिले झाड दुसऱ्याच्या जवळ आले होते.
दुसऱ्याने मग आपले एक पान पहिल्याच्या एका पानावर अलगद ठेवले .
हळूहळू दोघात स्पर्शतरंगांची उधळण सुरु झाली !

ही  गोष्टसुद्धा पहिल्या झाडाने चक्क नाकारली !
ते म्हणाले , एक तर मला तसल्या भावनाच नाहीत आणि झोपेतसुद्धा मी सावध असते.
मुळात मी सोज्वळ आहे.

दुसरे झाड बिचारे चूप बसले . ते फक्त मनात  एवढेच म्हणाले :
सोज्वळता वागण्यात दिसली पाहिजे ना !
बोलून काय उपयोग ?
वरून सोज्वळ आतून उठवळ झाडांचे हे असेच असते.
कळली तुझी सोज्वळता ,  आगीपुढे विरघळता !

***************

आता आतासे वाटू लागले आहे
काहीतरी पुन्हा सुरु करावे
निदान एखादी कविता तरी लिहावी
.
तेवढाच मनाचा निचरा !
कोंडलेले आभाळ तेव्हढेच मुक्त !
बाकी आपणच आपले कौतुक काय करायचे ?

तेव्हा कधी तरी हे असेच लिहायचे

***************

ही सुरी धारदार 
वार आरपार
काळजाच्या ....

गंधतो श्वास श्वास
तूच आसपास
काळजाच्या ....

प्रिय तू फक्त एक !
भोवती अनेक
काळजाच्या ....

.......................

माझी मराठी गाणी


..........................................................................................................


आहेस तूच मनात
सांगू कशी मी जनात ...

काय सांगू कसा
जीव होई पिसा !
कशी छळी चांदरात ....  1 ...

श्वास वर खाली
गालावर लाली !
धडधड काळजात .... 2 ....

मन झंकारते !
तुला पुकारते !
ये ना माडाच्या बनात ... 3 ...
....
*************************************

   पावसानं थैमान घातलं
माझ्या जमिनीला धू धू धूतलं … ॥ धृ ० ॥

  आलं आभाळ भरुन
  संग वा-याला घेवून
पाणी बदबदून ओतलं   … ॥ १  ॥…

  सोसंना त्याचा आवेग
  अंगाला लागली रग
इतकं कूट कूट कूट्लं   …. ॥ २ ॥ ….

  कसा घालावा आवर
  तो थांबना क्षणभर
घुसळून … घुसळून काढलं …  ॥ ३  ॥…


**************************************

  कृष्णा सोड सोड हा नाद , होेईल रे घात
जाशील तू वाहून ... ह्या गवळणींच्या नादात  ाा ध्रु oाा

            नटूनथटून येतील सा-या
             सुंदर नारी , गो-या नि घा-या
त्या करतील खाणाखुणा ... पाडतील मोहात  ाा o1 ाा

              जाशीलबिशील नजर चुकवून
              तुला नेतील त्या भुलवून
त्या येतील लाडात ... तुला नेतील झाडात ... ाा o2 ाा

               त्या तुझे गाल कुस्करतील
                त्या तुझे नाकही ओढतील
त्या येतील जोषात ... तुला घेतील पाशात ...  ाा o3 ाा

...... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील

########################################


स्वप्ने

स्वप्नेच पेरायची
 स्वप्नेच उगवायची ...

स्वप्नात खेळायचे
स्वप्नात बागडायचे
स्वप्नातच रहायचे ...

स्वप्नांनी झुलायचे
स्वप्नांनी फुलायचे
स्वप्नांनी झुरायचे ...

स्वप्नातच जगायचे
स्वप्नातच मरायचे
स्वप्नातच उरायचे ...

... देवीदास हरिश्चंद्र पाटील .

.............
  कृष्णा सोड हा नाद , होेईल तुझा घात 
वाहू नको तू  ... ह्या गवळणींच्या नादात  ाा ध्रु oाा

             नटूनथटून येतील सा-या
             सुंदर नारी , गो-या नि घा-या 
करतील खाणाखुणा ... तुला पाडतील मोहात  ाा o1 ाा

              जाशीलबिशील नजर चुकवून
              तुला नेतील त्या भुलवून 
त्या येतील लाडात ... तुला नेतील झुडपात ... ाा o2 ाा

               त्या तुझे गाल कुस्करतील
                त्या तुझे नाकही ओढतील 
त्या येतील जोमात ... तुला घेतील बाहुपाशात ...  ाा o3 ाा


...... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील


...........

पाणवठयावर राधा आली
तिला हरीबाधा झाली  !

जरा वाजता कुठे बासरी
झाली राधा कावरीबावरी !
फुलले गुलाब तिच्या गाली ....

झाली राधा हरीमय इतकी
तिला लागली हरीची उचकी !
हरीनामाचे पाणी प्याली ...

तिला दिसेना आणि काही 
हरीच भरला दिशा दाही !
आत , बाहेर , भोवताली ...

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

............
    गोकुळचा चोर
 लावी जिवाला घोर ...

    नटखट भारी
    कृष्ण मुरारी
 गोपिकांचा चितचोर ....

     देवकीनंदन 
     तो मनमोहन !
  तो गवळयाचा पोर.....


     डाव मोडुनी
     पुन्हा मांडुनी
  खेळतो बिनघोर .....


      उरून पुरतो
      पुरून उरतो
   चोरावर तो मोर.....


      लावुनी कळी
      दुनियेला छळी
   नामानिराळा थोर .....

     
...... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील














माझ्या मराठी गझला



                              आपण


जखमेवरती मीठ दुज्याच्या चोळत बसतो आपण
पुन्हा पुन्हा ही एकच संधी शोधत बसतो आपण

ज्याचे त्याचे भविष्य ज्याच्या त्याच्या हाती असते
तरीही ज्योतिष्याच्या नादी लागत बसतो आपण

सर्वज्ञानी स्वतःस समजून आपण बोलत जातो
खुळ्यापरी अकलेचे तारे तोडत बसतो आपण

जिकडे तिकडे माणूस म्हणुनी मिरवत असलो तरी
माणूसकीवर खुनी हल्ले चढवत बसतो आपण

किती चोरटे , किती लफंगे , किती बुवा अन बाबा !
फसूनसुध्दा त्यांच्या नादी लागत बसतो आपण

स्वतः स्वतःच्या निर्मळतेची जाहिरात करतो अन
क्षुद्र मनाची दूषित छिद्रे झाकत बसतो आपण


कंपू करूनी नको नको त्या चर्चा करतो सा-या 

नसेल त्याच्या पाठीमागे बोलत बसतो आपण


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील

-----------------------------------------------------



काही नवेनवेसे... 




काही नवेनवेसे . . . काही जुनेजुनेसे . . .

मज आजकाल बाई . . .वाटे हवेहवेसे . . .!


हातात हात माझ्या जेव्हा दिला तयाने . . .

मज वाटलेच नाही तेही खरेखरेसे !


तो चोर काळजाला घालीत हात आहे

लागे  ठाव त्याचा पण ते वाटे बरेबरेसे !


मज आजकाल माझा अंदाज येत नाही !

गिरकीत हाय करते मागे पुढेपुढेसे . . . !


हा तोच आरसा अन् हा तोच चेहराही !

बघणे मुळी  होई मजला पुरेपुरेसे . . . !


झाले तरी कळेना माझे असे कशाने . . .

बेचैन आतुनी मी ! होते कसेकसेसे !




... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील


खास   

 

       काही तरी खास होते !

       का होत हे भास होते ?


         जादू कशाची कळेना

         फुलले किती श्वास होते !


                होवून सेकंद गेले

               पण वाटले तास होते !


                       होते हवेहवेसे. . .

                      काही असे त्रास होते !


                               चाहूल लागे जराशी

                              कोणी आसपास होते !





... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील


---------------------------------------------------------------------------------

कड़े अन कपार मला

कड़े अन कपार मला
कुठे ना उतार मला !

कसे मी हसू उसने ?
इथे दू:ख्ख फार मला !

फुले देवुनी वर त्या --
फुलानी मार मला !

इथे माणसे फसवी
कशी तारणार मला !

अहा ! मानवी दृष्टी
चिरी जातवार मला !



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
----------------------------------------------------------------------

मन विषण्ण होते तेव्हा ....


मन विषण्ण होते तेव्हा त्यास कुठेतरी रमवावे लागते  !
एका विषयाकडून दुस-या विषयाकडे वळवावे लागते !

दुस-याला शिकवणे तसे हल्ली फारच सोपे झाले आहे !
विसरतात बरेच लोक की आधी स्वत:स शिकवावे लागते !

यशस्वी माणूस जाणीत होता त्याच्या यशामागचे वाक्य --
काहीतरी कमविण्यासाठी काहीतरी गमवावे लागते  !

कश्या सावल्या शोधीत येती उन्हास ह्या गरिबाच्या घरी ?
जिथे कवडसे जराश्या आशेचे ; ज्यांना लपवावे लागते !

रणांगणावर लढण्यावाचून खुला पर्यायच नसतो कुठला !
हारजीत ही नंतर ... आधी रणांगणाला पचवावे लागते !

....*********/////////-------@@@@@@@@@*****///+++++-



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील

मीच मजला पेश केले पाहिजे
जगाच्या दारात नेेले पाहिजे

गुरू बनायचे असेल जर कधी
आधीच शोधले चेले पाहिजे

जगायचे सुखी आयुष्य पुढे तर
रोजचेच आता मेेले पाहिजे

अहंकार नष्ट व्हावा यासाठी
षढरिपू वागून  गेले पाहिजे

'  त्या ' भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी
सोबती , बाटल्या , पेेले पाहिजे

.............***//////*@@@@@@$$$$$$$$$#######



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील

सोसणे                                     

हे कसे माझे तुझेही बोलणे झाले                      
जे खरे बोलायचे ते टाळणे झाले                      

मी किती आतुर होतो भेटण्यासाठी                   
शेवटी भेटीत खोटे भेटणे झाले                       

जे कधीकाळी तुझ्या ओठावरी होते                 
तेच माझे नाव आता शोधणे झाले                

कोठुनी आणू पुन्हा त्या चांदराती मी ?            
हे फिके माझेच आता चांदणे झाले !           
   
काय आयुष्यात आलो  सोसण्यासाठी 
सोसणेही एकट्याने सोसणे झाले ! 
                             
खुशाल आता चाखतो मजा  ह्या  जीवनाची 
मजेत आता लोक हो जगाया लागलो मी !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
-----------------------------------------------------------------------------------

                 
 शब्द                        
लोक जे वाचाळ काही सारखे चर्चीत होते                              
ते रिकामे लोक होते हे मला माहीत होते                              

बंगले बांधून गेले . . . झुंबरे लाऊन गेले                             
कोठुनी झाली कमाई उत्तरे टाळीत होते !                    

हाय हे चिक्कार गुत्ते हाय ही चिक्कार दारू                      
सर्व हप्ते बांधलेले जे नको ते पीत होते !                       

या दुकानी माल खोटा त्या दुकानी माल खोटा                      
ग्राहकांना हे लुटारू सारखे फसवीत होते !                            

जीवघेणे वार होते . . . जीवघेणी धार होती . . .                   
ह्या अश्या शब्दांस माझे अर्पिले मी गीत होते !                    



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
----------------------------------------------------------------------------------

             
 हट्ट               

हा तुझा हट्ट असा चंद्र बघायासाठी !                    
हात हातात असा घट्ट धरायासाठी   !                   

चित्त चोरून तुझे आज कुणी नेले ?                    
काय कारण झाले जीव जडायासाठी !                                          

हाय !  सरकेल जशी रात पुढे एकांती . . .            
जीव होतील पिसे एक बनायासाठी !                   

ठेव संकोच तुझा दूर अश्या ह्या वेळी                 
ही  आहेच घडी दूर सरायासाठी !                   

सरीमागून सरी कोसळती प्रेमाच्या !                   
ये अशी बिलग मला चिंब भिजायासाठी !           


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
---------------------------------------------------------------------------------
             भास                    


का फुलांचे वार व्हाया लागले                                
हाय काटेही फुलाया लागले !                            


मी तुझ्याशी आज थोडे हासलो                            
लोक सारे का जळाया लागले ?                          


लाख कानांनी कहाणी ऐकली                              
मोजके डोळे गळाया लागले !                                  


वाट माझी सांडली मागेच मी                                  
पाय आता सापडाया लागले !                                


 माळतो आहे तुला मी मोगरा                                
की मला हे भास व्हाया लागले ?      


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
                     
-------------------------------------------------------------------------------

आयुष्य आग आहे                                

आयुष्य आग आहे                                                                    
जळणेच भाग आहे !                                                                    

करतोस दुष्ट दैवा                                                                      
का पाठलाग आहे ?                                                                    

सारी उजाड राने                                                                        
उध्वस्त बाग आहे !                                                                        

साधा कटाक्षसुद्धा                                                                            
झाला महाग आहे !                                                                    

कुठल्या मनात गंगा ,                                                                  
काशी , प्रयाग आहे ?                                                                  

जे जे घडून गेले                                                                            
त्याचा  राग आहे !                                                                  

सूर्यास वेदना अन
चंद्रास डाग आहे !

... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
===================================


  हसून  दु:ख्खे      

 हसून  दु:ख्खे साजरी कराया लागलो मी 
सुखापरी  दु:ख्खातही हसाया लागलो मी !


हवे कशाला सोबती तरी खोट्या मनाचे ? 
खराखुरा माझा सखा बनाया लागलो मी !


 
नमून आता राहणार नाही दांभिकानो 
 नसानसानी पेटुनी उठाया लागलो मी !


तुझ्या ऋतुनी पाडल्या फिक्या ह्या चांदराती 
तुझ्या ऋतूना पाहुनी फुलाया लागलो मी !


खुशाल आता चाखतो मजा  ह्या  जीवनाची 
मजेत आता लोक हो जगाया लागलो मी !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
-----------------------------------------------------------------------------------

        
चेहरा  

 
आसवे  ढाळतो 
 मी हसून राहतो !


 
अंतरात माझिया 
 मी तुलाच पाहतो !


 संपले ऋतू जरी 
 मी तरी  संपतो !


 
मी तुझ्या मनातली 
 चांदरात मागतो !


 
मी तुझाच,  हे तुझा 
 चेहराच सांगतो !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
----------------------------------------------------------------------------------   

तुझ्या मालकीचे ! 


 सूर छेडू नको बासरीचे 
वेड लावू नको संगतीचे !


थांब थोडे ! जरा ऐक माझे !
रंग उधळू नको पंचमीचे !       
                  

बोल काही तरी बोल आता . . .
बोल काही तरी अंतरीचे   !


खातरी ना तुझ्या वागण्याची !       
भेटणेही तुला जोखमीचे !



 
रामपारी तुझा स्पर्श झाला  . . .
 श्वास झाले तुझ्या मालकीचे !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
---------------------------------------------------------------------------------


प्रश्न जेव्हा विचारला 

 प्रश्न जेव्हा विचारला
उत्तराने दगा दिला !


चेहऱ्यावर फुले जरी        
आत काटा विसावला !


घे नशीबा हसून तू
सूर्य माझा ढगाळला !


नाव माझी  भंगली
पण किनारा दुरावला !


  मी सुपाशी कसा लढू ?
  मीच दाणा सुपातला !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
-------------------------------------------------------------------------------
           सूर्य

    भंगला जरी आरसा
    चेहरा जसाच्या तसा !

    हे तुझे ऋतू कोठले ?
    मी दिला तुला हा वसा !

    शोभशील राजा घरी
    राहिला  राजा असा !

    राहूदेत कुंकू तरी
    तेवढाच माझा ठसा !

    लोक हे जरी बोलले
    ऐकतो कुठे मी तसा !

 सूर्य शेवटी भेटला . ..               
 सोडताच मी कवडसा !


... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
=========================


                        इशारे



कशी कोमेजली सारी फुलांची बाग ही लवकर ?
कसे काळीज हे झाले तुझेही सांग ना पत्थर !

असे काही तरी होते , असे काही तरी आहे !
असे आयुष्यही झाले  तुझ्या हातातले जर तर !

मला बोलायचे होते ... तरी मी बोललो नाही !
तुझी ती चौकशीसुद्धा तशी होती खरी वरवर !

सुगंधी श्वास ते होते तुझे मी ठेवले सोबत ...
कधी मी शिंपडू म्हटले तरी का सांग ना अत्तर !

तुझ्या सा-याच प्रश्नांची दिली मी उत्तरे होती !
अता एकाच प्रश्नाचे .... मला दे एक तू उत्तर !

जिथे मज जायचे होते ... तिथे मी पोचलो नाही !
तुझ्या डोळ्यातले काही ... इशारे जाणले नंतर !



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
     

                  जीवना

सोसली तुझी उन्हे ; सोसल्या तुझ्या झळा 
जीवना तरी मला ... लागला तुझा लळा ! 

रोजचेच वीष मी आत आत घेतले !
हा उगाच काय रे कंठ जाहला निळा ?

पीत पीत आसवे झिंग झिंग झिंगलो !
गोड गोड बोलुनी कापलास तू गळा !

पाहिले तुझेच मी चेह-यात चेहरे !
पाहिला तुझाच मी रंग रंग वेगळा !

दु:खं दु:खं वेचले मी कळयाफुलांपरी !
हासुनी व्यथेसवे शिंपला तुझा मळा !

एक एक वाट तू घेरलीस जीवना !
पाय टाकला तिथे लावलास सापळा !



... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील
            

                   कौतुक

हलकेच चंद्र माझा माझ्या कुशीत आला !
हलकेच देह माझा कोजागरीत न्हाला !

कळले मला न केव्हा पडली मिठी फुलांची !
कळले मला न केव्हा माझा सुगंध झाला !

आता कुठे जरासा दिसलो म्हणे मला मी !
माझाच चेहरा का नयनी तुझ्या निघाला !

जपले अबोल काही क्षण मी मनात हळवे ...
गेली करून लाली साराच बोलबाला !

पडतात रोज स्वप्नें मजला कशी गुलाबी ?
पडते धुके गुलाबी  ... माझ्या कसे उशाला !

घेवू तरी कसे मी माझेच नांव आता ?
माझ्यात पाहतो मी दुस-या तरी कुणाला !

अजुनी तुझे मला का इतके म्हणून कौतुक  ?
स्मरतो तुलाच आहे विसरून का स्वत:ला ?




... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील



            आयुष्यभर

तू बोलतांना तुला ऐकत रहावेसे वाटते 
तू एकसासारखे मग बोलत रहावेसे वाटते 

तू ती आग आहेस जी आग माझी शांत करते
तू जिवाला सारखे जाळत रहावेसे वाटते 

तुझ्या माझ्यातले अंतर ... जरी हे वाढले नंतर
पुन्हा जुन्या वाटेवर भेटत रहावेसे वाटते

कितीही पाहिले तरी हे मन भरतच नाही
कितीही पाहिले तरी पाहत रहावेसे वाटते

चार पावलांनी फारसे समाधान होत नाही
आयुष्यभर सोबत चालत रहावेसे वाटते




... श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील