ONLY DEVIDAS ! Me to myself & You ! Top Marathi and Hindi articles, poems and gazals. फक्त देवीदास ! साहित्यिक देवीदासाचा स्वतःशी आणि तुमच्याशीही सुरू असलेला सुसंवाद ! आयुष्य तितकेसे सोपे नसतेच कुणालाही . आयुष्याकडे बघतांना बरेच काही जाणवते , आढळून येते. स्वतःच्या व इतर अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची ही शिदोरी...फक्त देवीदासाच्या शब्दांत... खास तुमच्यासाठी !
Pages
- ABOUT ME
- Privacy Policy
- पान परिचय
- अशी शिका मराठी गझल व गझलविषयक अन्य लेख
- माझ्या मराठी गझला
- माझ्या हिंदी गझला
- माझे कार्यक्रम माझी भाषणे
- विचित्र स्वप्ने भयानक घटना
- माझ्या मराठी कविता
- माझी मराठी गाणी
- माझी मराठी भक्ती गीते
- आवडती गाणी
- माझे मराठी लेख
- राजकीय लेख
- मागे पुढे
- कोरोनाचा काळ
- स्फूट लेखन
- नवलाई पावणाई मंदिर , जाकीमिऱ्या
- कुटुंबासाठी
- पुस्तक परिक्षण
- सुंदर संदेश
- बोलके काव्य
शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४
रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२
Devanandchya cinematil gaane
देवानंदच्या सिनेमातील गाणे
#जुनी_गाणी कुणाला आवडत नाहीत ?
मी पाहिलेला देव आनंदचा पहिलाच चित्रपट : हरे रामा हरे कृष्णा .
तर...देव आनंदशी माझी ओळख ही अशी झाली !
देव आनंदच असंच एक जुनं गाणं...
खणखणतं नाणं... मला खूप आवडतं... आवडेल तुम्हांलाही... कमेंट्स करालच...
ख्वाब हो तूम या ... कोई हकीगत....
तीन देविया या चित्रपटातील हे सुंदर गीत आहे.
( फोटो सौजन्य : गुगल व यू ट्यूब .)
#देव_आनंद
#देवानंद
#cinema
#devanand
#picture
#gaana
#hindigeet
शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०
कोविड टेस्ट
व्हॉट्सॲप संदेश
संदेश पाठवणार : श्री. उदय मयेकर , रत्नागिरी
----------------
कोविड आजाराचा सध्या सगळीकडेच समुहसंसर्ग ( Community spread ) झाला आहे. सध्या सरकारी व खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. कधी कोणती तपासणी करावी ? कोणती तपासणी अधिक खात्रीशीर आहे ? कोणत्या तपासणीला अधिक खर्च येतो ? कोणत्या तपासणीला किती वेळ लागतो ? HRCT व त्याचा score म्हणजे काय ? Rapid antigen test आणि RT--PCR यांच्यात फरक काय ? या सर्व गोष्टी आपण या चवथ्या कोरोणा लेखात पाहणार आहोत.
कोरोनाच्या मुख्यत: २ प्रकारच्या तपासण्या असतात
1) Viral Test
2) Antibody Test
कोरोनाचे निदान होण्यासाठी Antibody Test चा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही.
कोरोना निदानासाठी Viral Test चाच मुख्यतः वापर होतो. त्याशिवाय रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास HRCT चा निदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता समजण्यासाठी उपयोग होतो.
Viral Test या मुख्यत्वेकरुन ३ प्रकारच्या असतात.
1. Rapid Antigen test
2. RT--PCR
3. True Nat Test
तपासण्यांचा खाजगी लॅबमध्ये येणारा खर्च
-----------------------------------------------------
1) Rapid Antigen test -- 450 रु
2) RT--PCR-- 2500 रु
3) True Nat Test -- 1200 रु
4) HRCT -- 6000 -- 8000 रु
तपासण्यांसाठी लागणारा वेळ
--------------------------------------
1) Rapid Antigen test -- अर्धा तास
2) RT--PCR-- 24 ते 48 तास
3) True Nat Test -- अर्धा तास
4) HRCT -- अर्धा ते एक तास
कोणती तपासणी कधी करावी
--------------------------------------
यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
# Antigen Test
a.) ज्या रुग्णांना त्वरीत उपचाराची गरज आहे त्यांच्यामध्ये
# RT--PCR
a.) ज्यांची Antigen Test ही निगेटिव्ह आली आहे पण लक्षणे असणारे पेशंट.
b.) कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या contact मधील लोक.
c.) परदेशातून येणारे लोक.
# True Nat Test
a.) Brought Dead व्यक्ती
b.) बाळंतपणासाठी आलेल्या माता
c.) Emergency Operation चे रुग्ण
( जर True Nat चाचणी उपलब्ध नसेल तर Antigen Test करावी. )
महाराष्ट्र शासनाने HRCT ला कोविडच्या निदानासाठी परवानगी दिलेली नाही. ही तपासणी कोविड निदानासाठी शासनातर्फे ग्राह्य मानली जात नाही.
आता सर्व तपासण्यांची विस्तारीत माहिती पाहुयात.
Rapid Antigen Test
--------------------------------
१) यामध्ये विषाणूंच्या surface spike मधील antigen protein तपासले जाते.
२) यासाठी नाक व घसा येथून स्वॅब घेतला जातो.
३) या चाचणीचा रिपोर्ट आपल्याला अर्ध्या तासात समजू शकतो.
४) ही तपासणी RT--PCR तपासणी पेक्षा स्वस्त व लवकर होणारी आहे.
५) या तपासणी साठी प्रशिक्षित व्यक्तीची ( Well Trainer ) ची गरज लागत नाही.
६) तपासणी तील दोष
a. कोरोना सदृशच लक्षणे असणाऱ्या फ्लू सारख्या आजारात या तपासणीची sensitivity ही केवळ ३४ ते ८० टक्के असते.
याच तर्काने अर्धे किंवा त्याहून अधिक कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते.
b. बऱ्याच Asymptomatic ( लक्षणे नसलेल्या ) पेशंट मध्ये नाकातून व घशातून योग्य प्रमाणात विषाणू मिळत नसल्याने ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते
कारण या तपासणीत antigen चे amplification केले जात नाही.
७) मग ही तपासणी का केली जाते ??
a.) ज्यावेळी viral load जादा असतो त्यावेळी ही तपासणी highly sensitive असते. त्यामुळे बाधित पेशंटचे विलगीकरण करणे सोपे जाते.
b.) ही तपासणी RT--PCR पेक्षा स्वस्थ व पटकन होणारी आहे.
c.) सर्व पेशंटची RT--PCR तपासणी करणे शक्य नसते अशावेळी RT--PCR चाचण्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी.
d.) समुह संसर्ग ( Community spread ) होत असताना जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करुन त्यानुसार पॉझिटिव्ह पेशंटचे विलगीकरण ( Isolation ) करणे व त्याअनुषंगाने रोगाचा प्रसार टाळण्यासाठी.
e.) Antigen test निगेटिव्ह येवूनही ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत अशा रुग्णांची नंतर RT--PCR तपासणी केली जाते.
f.) Antigen मशिन हे Treu Nat मशिनच्या तुलनेत स्वस्त असते व या मशिनवर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तपासण्या करणे शक्य असते.
RT--PCR
--------------
Reverse Transcriptase Polymerase Chain Reaction
१) यामध्ये ठराविक रसायनांद्वारे विषाणूच्या थोड्या RNA पासूनही हजार पटीने DNA तयार केले जातात जे तपासणीसाठी योग्य मात्रेत उपलब्ध होतात ( जरी स्वॅबमध्ये कमी प्रमाणात विषाणू असतील तरीही ).
२) यामुळे कोविड निदानासाठी ही सर्वात खात्रीशीर व अचूक तपासणी आहे.
३) पण ही तपासणी बरीच वेळखाऊ आहे. याचा रिपोर्ट यायला २४ ते ४८ तास इतका वेळ लागू शकतो.
४) यासाठी नाकातून व घशातून swab घेतला जातो. किंवा थुंकीही तपासायला घेतली जावू शकते.
५) या तपासणीसाठी योग्य प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागते.
जी इतर दोन तपासण्या करिता इतकी गरजेची नसते.
६) कोरोना विषाणू हा प्रामुख्याने पहिल्या आठवड्यात घश्यामध्ये वाढत असतो त्यानंतर तो फुफ्फुसांत वाढायला सुरु होतो. याचाच अर्थ घशातील स्वॅब हा जंतूसंसर्ग झाल्यानंतर एक आठवडा एवढ्याच कालावधी साठी पॉझिटिव्ह येतो. नंतर Throat swab हा False Negative येण्याची शक्यता दाट असते. त्यासाठी जंतूसंसर्गाच्या दुसऱ्या आठवड्यात श्वासनलिकेतील स्वॅब अथवा कफयुक्त थुंकी तपासणे गरजेचे असते.
बरेच असे video बघण्यात आले की आपण RT--PCR चा रिपोर्ट ज्यावेळी मागून घेतो त्यावेळी त्यातील CT value ( Cyclic Threshold ) ही विचारुन घ्या. ती जर २४ पेक्षा जादा असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा कमी असतो म्हणजेच त्या व्यक्तीद्वारे इतरांना संक्रमण ही कमी प्रमाणात होते व जर CT value ही २४ पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा जादा असतो म्हणजेच हे लोक इतरांमध्ये जादा संक्रमण पसरवतात.
हे जरी खरे असले तरी बऱ्याचदा असे पाहायला मिळते की अनेकदा viral load जादा असूनही त्यांच्यामध्ये लक्षणे ही अल्प किंवा मध्यम स्वरुपात बघायला मिळतात. जसे की लहान मुले ज्यांच्यामध्ये क्वचितच लक्षणे तीव्र स्वरुपाची असतात पण त्यांच्याद्वारे जंतूसंसर्ग मोठ्या प्रमाणात पसरवला जातो.
याउलट वयस्कर लोकांमध्ये viral load कमी असूनही तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसतात.
हा खरं तर विरोधाभास आहे.
व त्याचे कारण हे आहे की कोविड मध्ये होणारी complications ही केवळ शरीरात जाणाऱ्या विषाणू मुळे होत नसतात. तर ती प्रामुख्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीने ( Immune system ने ) त्या virus ला किती व कशा प्रकारे प्रतिसाद दिला व त्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या Inflammatory changes मुळे होत असतात. Immune system च्या प्रतिक्रिया व त्यामुळे होणाऱ्या Inflammatory changes या प्रत्येक पेशंट नुसार वेगवेगळ्या असतात. व त्यामुळे कोणाकोणामध्ये काहीच लक्षणे दिसत नाहीत तर कोणामध्ये खूपच Complications निर्माण होवू शकतात.
CT value ही प्रामुख्याने viral load किती आहे ते सांगते. कोविड किती घातक ठरु शकतो हे नाही. त्यामुळे ICMR ने RT--PCR च्या रिपोर्ट मध्ये CT value देण्यास परवानगी दिलेली नाही.
TrueNAT test
----------------------
१) हे मशिन गोव्यातील Malbio Diagnostic या कंपनीद्वारे बनवले आहे.
२) हे मशिन पूर्वी TB ची टेस्ट करण्यासाठी वापरले जात होते. अलिकडेच ICMR ने COVID 19 टेस्ट करण्यासाठी या मशिनला परवानगी दिली आहे.
३) हे मशिन छोट्या आकाराचे असून ब्रिफकेस मधून कोठेही घेवून जाता येवू शकते.
४) हे मशिन बॅटरीवर चालते एकदा बॅटरी चार्ज केली की १० तासांपर्यंत चालू शकते.
५) या मशिन मध्ये एका वेळी एकच टेस्ट करता येते. मशिन जर ४ स्लॉटचे असेल तर जास्तीत जास्त ४ टेस्ट एका वेळी करता येवू शकतात. ८ तासाच्या शिफ्टमध्ये जास्तीत जास्त ४५ टेस्ट होवू शकतात.
६) दुर्गम भागात जिथे मोठ्या लॅबची संख्या कमी आहे व जेथून स्वॅब घेवून RT--PCR साठी मोठ्या लॅबमध्ये पाठवणे हेदेखील मुश्किल असते अशा ठिकाणी प्रामुख्याने हे मशिन वापरले जाते.
७) या तपासणी मध्येही RT--PCR प्रमाणे विषाणूचा Genome हा Amplify केला जातो. त्यामुळे यामध्येही स्वॅबमधील विषाणूंचे प्रमाण कमी असले तरी टेस्ट रिपोर्ट अचूक येतो.
८) या तपासणीत मुख्यत: कोरोना विषाणूचा E Gene व विषाणूच्या RNA मध्ये असणारे RdRp हे Enzyme शोधले जाते.
९) ही तपासणी RT--PCR पेक्षा बऱ्याच जलद होते ( अर्धा ते एक तासात ) तसेच या तपासणीसाठी लागणारा खर्चही कमी असतो. (१२०० ते १३०० रुपये) तसेच ही तपासणी करायला सोपी आहे व त्यासाठी खास प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागत नाही.
१०) असे असले तरी या मशिनची किंमत जादा असल्याने (६.५ ते १२ लाख ) व पुरवठा कमी असल्याने हे मशिन अजून सगळीकडे उपलब्ध नाही आहे.
Antibody Test
-----------------------
१) शरीरात एखादा Antigen ( बाहेरचा कोणताही सजीव घटक जसे bacteria, virus इत्यादी ) गेल्यावर त्यांच्याशी लढण्यासाठी जे घटक शरीरामार्फत तयार केले जातात त्यांना Antibody म्हणतात.
२) Antibody Test ही मुख्यतः पूर्वी होऊन गेलेल्या आजाराची माहिती सांगते.
३) Infection झाल्यानंतर शरीरात Antibodies तयार व्हायला साधारण १ ते २ आठवडे इतका कालावधी लागतो. त्यामुळे कोविड निदानासाठी या तपासणीचा कोणताही उपयोग होत नाही.
४) सर्वच लोकांना कोविडमध्ये लक्षणे निर्माण होतील असे नाही. अशावेळी किती लोकांना हा आजार होवून गेला हे लक्षात येण्यासाठी व त्यावरुन या आजाराचा मृत्यूदर निश्चित करण्यासाठी प्रामुख्याने या तपासणीचा उपयोग होतो.
HRCT
----------
१) ही चाचणी म्हणजे छातीचा CT scan असतो.
२) ही चाचणी कोविड निदानासाठी शासनातर्फे जरी ग्राह्य धरली जात नाही.
३) तरीही लक्षणे सुरु होवून ४ ते ५ दिवसांनंतर रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास रोगनिदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता समजण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो.
४) RT--PCR च्या तुलनेत याचा रिपोर्ट लगेच मिळत असल्याने तसेच न्युमोनियाची तीव्रता लक्षात येत असल्याने याचा कोविड उपचारासाठी चांगला उपयोग होतो.
५) RT--PCR प्रमाणे याचा रिपोर्ट ही अधिक खात्रीशीर व अचूक असतो. तसेच यावरुन पेशंटच्या शरीरात सुधारणा होवू शकते की पेशंटची स्थिती आणखी बिघडू शकते याचेही याचेही अचूक निदान करता येते.
६) लक्षणे दिसायला लागल्यानंतर पहिल्या ४ दिवसांत HRCT हा इतकी sensitive नसते त्यामुळे ५०% कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये HRCT चा रिपोर्ट नॉर्मल येण्याची शक्यता असते. पण त्यानंतर HRCT ही Highly sensitive म्हणजेच एकदम अचूक असते.
७) HRCT च्या रिपोर्टमध्ये खालीलप्रमाणे लक्षणे दिसू शकतात
a.) सुरवातीला ( कोविड लक्षणे सुरु झाल्यानंतर ७ दिवसांमध्ये ) -- Ground Glass Opacity (GGO)
b.) ७ दिवसानंतर न्युमोनिया वाढल्यास ---
1. GGO वाढणे
2. Crazy paving pattern
3. Consolidation
4. Fibrosis
८) HRCT Score
------------------------
a.) न्युमोनिया हा फुफ्फुसांमध्ये किती प्रमाणात वाढला आहे हे समजण्यासाठी HRCT मध्ये Score दिला जातो.
b.) हा स्कोर 0 ते 25 या दरम्यान असतो. 0 स्कोर याचा अर्थ फुफ्फुसांत न्यूमोनिया अजिबात पसरलेला नाही असा होतो तर 25 स्कोर म्हणजे न्यूमोनिया फुफ्फुसांत सर्वत्र पसरलेला आहे असा अर्थ होतो.
c.) 25 पैकी स्कोर असताना
1) कमी प्रमाणातील न्यूमोनिया -- 12 पेक्षा कमी स्कोर असणे.
2) मध्यम न्यूमोनिया -- 12 ते 18 स्कोर असणे.
3) तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया -- 18 पेक्षा जास्त स्कोर असणे.
d.) फुफ्फुसे किती टक्के बाधित झाली आहेत हे कळण्यासाठी HRCT Score ला ४ ने गुणले जाते. पण ते दरवेळी बरोबर येईलच असे सांगता येत नाही.
e.) बऱ्याच रिपोर्ट मध्ये HRCT Score हा ४० पैकी दिला जातो त्यावेळी वरील दोन्ही नियम लागू पडत नाहीत.
९) पेशंटची न्यूमोनिया आणखी वाढू शकतो की कमी होवू शकतो हे कळण्यासाठी HRCT सोबतच C Reactive Protein,
serum ferritin, lymphocytes या तपासण्या करणेही गरजेचे असते.
१०) X रे मध्ये कोविड ची सुरवातीची GGO सारखी लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे X रे चा कोविड निदानासाठी हवा तितका उपयोग होत नाही.
कोविड टाईम लाईन
-------------------------
कोविड मध्ये कोणत्या दिवशी साधारण कोणत्या गोष्टी होतात हे आता पाहू.
दिवस ० -- जंतूसंसर्ग
दिवस ५ -- लक्षणे दिसण्यास सुरुवात
दिवस १ ते २८ -- RNA व Antigen पॉझिटिव्ह
दिवस २८ -- RNA व Antigen निगेटिव्ह
दिवस ० ते ७ -- फक्त RT--PCR टेस्ट पॉझिटिव्ह
दिवस ९ -- HRCT मध्ये लक्षणे दिसतात
दिवस ७ -- IgM Antibody पॉझिटिव्ह
दिवस १४ -- IgG Antibody पॉझिटिव्ह
दिवस २१ -- IgM Antibody निगेटिव्ह
दिवस १४ ते २१ -- रोगाचा लक्षणे कमी होण्याचा टप्पा पण तरीही इतरांना जंतूसंसर्ग करु शकतो.
दिवस २१ ते २८ -- RT--PCR
कधी कधी पॉझिटिव्ह येवू शकते पण इतरांना जंतूसंसर्ग होत नाही.
रविवार, ३० ऑगस्ट, २०२०
Lovely Messages 8
दिन विशेष
[8/15, 14:09] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२०*
🧷 *दिनविशेष*
▪️१९४७: भारत देश स्वतंत्र झाला.
▪️१९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.
▪️१९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
▪️१९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
▪️१९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
▪️१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
▪️१८६५: रेकी चे निर्माते मिकाओ उस्ईई यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९२६)
▪️१८६७: रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९२२)
▪️१८७२: क्रांतिकारक, तत्त्वचिंतक योगी अरविंद घोष यांचा जन्म.
▪️१८७२: भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ श्री अरबिंदो यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५०)
▪️१८७३: भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४२)
▪️१९०४: मोटार व्हीलचेअर चे शोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९२२)
▪️१९१२: इंदौर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४)
▪️१९१३: लेखक कवी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ बी. रघुनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३)
▪️१९१५: ऊर्दू कथा, पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९१)
▪️१९१७: लेखिका अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१)
▪️१९२२: लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.
▪️१९२९: साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोमरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९९९)
▪️१९४५: बांगला देशच्या पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचा जन्म.
▪️१९४७: चित्रपट अभिनेत्री राखी गुलझार यांचा जन्म.
▪️१९५८: अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिंपल कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९)
▪️१९६१: भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म.
▪️१९६४: बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म.
▪️१९७१: भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म.
▪️१९७५: भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक विजय भारद्वाज यांचा जन्म.
▪️१९९२: भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहान यांचा जन्म.
▪️१९४२: स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९२)
▪️१९७४: स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली (जन्म: १५ डिसेंबर १९०३)
▪️१९७५: बांगला देशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९२०)
▪️२००४: गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९४१)
▪️२००५: भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२७)
▪️१९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
▪️१९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.
▪️१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.
▪️१९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.
..............
[8/16, 14:44] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *रविवार दि. १६ ऑगस्ट २०२०*
🧷 *दिनविशेष*
▪️१९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.
▪️१९४६ कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.
▪️२०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.
▪️१८७९: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५)
▪️१९०४: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८)
▪️१९४८: भारतीय-डच रॉक संगीतकार बेरी हे यांचा जन्म.
▪️१९५०: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांचा जन्म.
▪️१९५२: गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म.
▪️१९५४: पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म.
▪️१९५७: भारतीय वकील व राजकारणी आर. आर. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)
▪️१९५८: अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका मॅडोना यांचा जन्म.
▪️१९६८: भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म.
▪️१९७०: नेपाळी-भारतीय अभिनेत्री मनीषा कोईराला यांचा जन्म.
▪️१९७०: अभिनेता सैफ अली खान यांचा जन्म.
▪️१९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन.
▪️१९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९४८)
▪️२०००: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९५२ - नवी दिल्ली)
▪️२००३: युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन यांचे निधन.
▪️२०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)
▪️२०१८: भारताचे १०वे पंतप्रधान व कवी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन (जन्म:२५ डिसेंबर १९२४)
....................
[8/17, 15:49] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *सोमवार दि. १७ ऑगस्ट २०२०*
🧷 *दिनविशेष*
▪️१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.
▪️१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.
▪️१९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.
▪️२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.
▪️१८८८: श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.
▪️१८९३: हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)
▪️१९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)
▪️१९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)
▪️१९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.
▪️१९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म.
▪️१९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.
▪️१९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.
▪️१३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.
▪️१८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)
▪️१९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)
▪️१९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.
.............
[8/18, 18:54] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२०*
🧷 *दिनविशेष*
▪️१८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.
▪️१९२०: अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
▪️२००५: जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.
▪️२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
▪️१७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)
▪️१७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १७८३)
▪️१७९२: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म.
▪️१८७२: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)
▪️१८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)
▪️१९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)
▪️१९२३: लेगस्पिनर गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९५५)
▪️१९३४: गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म.
▪️१९३६: हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म.
▪️१९५६: भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म.
▪️१९६७: पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म.
▪️१९८०: अभिनेत्री प्रीती जंघियानी यांचा जन्म.
▪️१९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९१३)
▪️१९९८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९४८)
▪️२००८: रहस्यकथाकार नारायण धारप यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)
▪️२००९: दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांचे निधन.
▪️२०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन.
.................
[8/19, 13:58] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *बुधवार दि. १९ ऑगस्ट २०२०*
🧷 *दिनविशेष*
▪️जागतिक छायाचित्रण दिन
▪️२९५ ख्रिस्त पूर्व: प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनसचे पहिले मंदिर पूर्ण झाले.
▪️१९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
▪️१८७१: विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राइट यांचा जन्म.
▪️१८८६: स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९३५)
▪️१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी एस. सत्यमूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४३)
▪️१९०३: लेखक चरित्रकार गंगाधरदेवराव खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)
▪️१९०७: केंद्रीय मंत्री सरदारस्वर्ण सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९४)
▪️१९०७: भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान हजारी प्रसाद द्विवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९७९)
▪️१९१३: भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक पीटर केम्प यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९३)
▪️१९१८: भारताचे ९वे राष्ट्रपती आणि ८वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)
▪️१९४७: अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९०६)
▪️१९७५: शिक्षणतज्ञ, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचे निधन.
▪️१९९०: पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक रा. के. लेले यांचे निधन.
▪️
१९९३: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२९)
▪️१९९३: निर्भिड पत्रकार य. द. लोकुरकर यांचे निधन.
▪️१९९४: रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते लिनसकार्ल पॉलिंग यांचे निधन.
▪️२०००: भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४८)
▪️२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन.
...............
[8/20, 14:12] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *गुरुवार दि. २० ऑगस्ट २०२०*
🧷 *दिनविशेष*
▪️१८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
▪️१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
▪️२००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
▪️१८९६: भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७६)
▪️१९४०: भारतीय- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रेक्स सेलर्स यांचा जन्म.
▪️१९४१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च २००६)
▪️१९४४: भारताचे ६वे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २१ मे १९९१)
▪️१९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म.
▪️२००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी यांचे निधन.
▪️२०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)
▪️२०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन.
▪️२०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)
▪️२०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)
..............
[8/24, 14:22] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *सोमवार दि. २४ ऑगस्ट २०२०*
🧷 *दिनविशेष*
▪️आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन
▪️१६९०: कोलकाता शहराची स्थापना.
▪️१६०८: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल.
▪️१८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
▪️१८३३: गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)
▪️१८७२: केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७)
▪️१८८०: निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)
▪️१८८८: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९५७)
▪️१८८८: मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२)
▪️१९०८: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)
▪️१९१७: किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्म.
▪️१९१८: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
▪️१९२७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांचा जन्म.
▪️१९२७: भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी यांचा जन्म.
▪️१९२९: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यासर अराफत यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)
▪️१९९३: क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू दि. ब. देवधर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८९२)
▪️२०००: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचे निधन. (जन्म: ३० जून १९२८)
▪️२००८: चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार वै वै यांचे निधन.
▪️२०१९: भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९५२)
...................
[8/26, 14:26] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *बुधवार दि. २६ ऑगस्ट २०२०*
🧷 *दिनविशेष*
▪️१९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.
▪️१९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
▪️१९१०: भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म.
▪️१९२२: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म.
▪️१९२७: प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.
▪️१९२८: हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म.
▪️१९४४: लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म.
▪️१९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन.
▪️१९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन.
▪️१९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन.
▪️१९९९: डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.
▪️२०१२: चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचे निधन.
...................
[8/29, 14:00] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२०*
🧷 *दिनविशेष*
▪️भारतीय क्रीडा दिन
▪️१९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
▪️१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
▪️१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
▪️१९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
▪️१९०१: सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म.
▪️१९०५: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म.
▪️१९१५: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्म.
▪️१९२३: भारतीय क्रिकेट खेळाडू हिरालाल गायकवाड यांचा जन्म.
▪️१९२३: इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते रिचर्ड अॅटनबरो यांचा जन्म.
▪️१९५८: अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार मायकेल जॅक्सन यांचा जन्म.
▪️१९५९: दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांचा जन्म.
▪️१९७६: इस्लाम क्रांतिकारक बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचे निधन.
▪️१९८२: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचे निधन.
▪️१९८६: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचे निधन.
▪️२००७: स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांचे निधन.
▪️२००८: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.
..............
[8/30, 12:41] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *रविवार दि. ३० ऑगस्ट २०२०*
🧷 *दिनविशेष*
▪️१५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.
▪️१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
▪️१८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.
▪️१९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.
▪️१८१३: बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९६१)
▪️१९३०: संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल २००८ – डोंबिवली, मुंबई)
▪️१९३०: अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म.
▪️१९३४: लेग स्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००५)
▪️१९३७: मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७०)
▪️१९५४: बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर लुकासेंको यांचा जन्म.
▪️१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.
▪️१९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२)
▪️१९८१: शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन.
▪️१९९४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)
▪️१९९८: स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)
▪️२००३: अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)
................
▪️२०१४: भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८)
▪️२०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)
................................
गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०
Lovely messages 7
नमस्कार मित्र हो ,








