शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

माझी मराठी गाणी


..........................................................................................................


आहेस तूच मनात
सांगू कशी मी जनात ...

काय सांगू कसा
जीव होई पिसा !
कशी छळी चांदरात ....  1 ...

श्वास वर खाली
गालावर लाली !
धडधड काळजात .... 2 ....

मन झंकारते !
तुला पुकारते !
ये ना माडाच्या बनात ... 3 ...
....
*************************************

   पावसानं थैमान घातलं
माझ्या जमिनीला धू धू धूतलं … ॥ धृ ० ॥

  आलं आभाळ भरुन
  संग वा-याला घेवून
पाणी बदबदून ओतलं   … ॥ १  ॥…

  सोसंना त्याचा आवेग
  अंगाला लागली रग
इतकं कूट कूट कूट्लं   …. ॥ २ ॥ ….

  कसा घालावा आवर
  तो थांबना क्षणभर
घुसळून … घुसळून काढलं …  ॥ ३  ॥…


**************************************

  कृष्णा सोड सोड हा नाद , होेईल रे घात
जाशील तू वाहून ... ह्या गवळणींच्या नादात  ाा ध्रु oाा

            नटूनथटून येतील सा-या
             सुंदर नारी , गो-या नि घा-या
त्या करतील खाणाखुणा ... पाडतील मोहात  ाा o1 ाा

              जाशीलबिशील नजर चुकवून
              तुला नेतील त्या भुलवून
त्या येतील लाडात ... तुला नेतील झाडात ... ाा o2 ाा

               त्या तुझे गाल कुस्करतील
                त्या तुझे नाकही ओढतील
त्या येतील जोषात ... तुला घेतील पाशात ...  ाा o3 ाा

...... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील

########################################


स्वप्ने

स्वप्नेच पेरायची
 स्वप्नेच उगवायची ...

स्वप्नात खेळायचे
स्वप्नात बागडायचे
स्वप्नातच रहायचे ...

स्वप्नांनी झुलायचे
स्वप्नांनी फुलायचे
स्वप्नांनी झुरायचे ...

स्वप्नातच जगायचे
स्वप्नातच मरायचे
स्वप्नातच उरायचे ...

... देवीदास हरिश्चंद्र पाटील .

.............
  कृष्णा सोड हा नाद , होेईल तुझा घात 
वाहू नको तू  ... ह्या गवळणींच्या नादात  ाा ध्रु oाा

             नटूनथटून येतील सा-या
             सुंदर नारी , गो-या नि घा-या 
करतील खाणाखुणा ... तुला पाडतील मोहात  ाा o1 ाा

              जाशीलबिशील नजर चुकवून
              तुला नेतील त्या भुलवून 
त्या येतील लाडात ... तुला नेतील झुडपात ... ाा o2 ाा

               त्या तुझे गाल कुस्करतील
                त्या तुझे नाकही ओढतील 
त्या येतील जोमात ... तुला घेतील बाहुपाशात ...  ाा o3 ाा


...... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील


...........

पाणवठयावर राधा आली
तिला हरीबाधा झाली  !

जरा वाजता कुठे बासरी
झाली राधा कावरीबावरी !
फुलले गुलाब तिच्या गाली ....

झाली राधा हरीमय इतकी
तिला लागली हरीची उचकी !
हरीनामाचे पाणी प्याली ...

तिला दिसेना आणि काही 
हरीच भरला दिशा दाही !
आत , बाहेर , भोवताली ...

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

............
    गोकुळचा चोर
 लावी जिवाला घोर ...

    नटखट भारी
    कृष्ण मुरारी
 गोपिकांचा चितचोर ....

     देवकीनंदन 
     तो मनमोहन !
  तो गवळयाचा पोर.....


     डाव मोडुनी
     पुन्हा मांडुनी
  खेळतो बिनघोर .....


      उरून पुरतो
      पुरून उरतो
   चोरावर तो मोर.....


      लावुनी कळी
      दुनियेला छळी
   नामानिराळा थोर .....

     
...... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: