मराठी गझल
ही एक #मराठी_गझल आहे.
यामध्ये ज्या दोन दोन ओळी दिसत आहेत त्या प्रत्येकीला #शेर म्हणतात. शेर हा वेगळा काढून वाचला तरी तो अर्थपूर्ण असतो. गझलच्या पहिल्या दोन ओळीतच ( याला गझलचा मतला म्हणतात ) तिची जमीन तयार होते. म्हणजे , गझलचे #वृत्त , यमक , अंत्ययमक इ.सह अर्थातच रचना तयार होते. मूळात कोणतीही रचना कविता होणार आहे , गीत होणार आहे की गझल होणार आहे , हे प्रामुख्याने पहिल्या ओळीतच ठरते. आता वरती जी रचना आहे , तिची पहिली ओळच सांगून जाते की ही गझल होणार आहे. तर ही गझल झाली आहे. यात मिळते , जाळते , माळते , चालते , फेटाळते , पाळते ही ' अ ' अलामत असलेली #यमके आहेत , तर ' माहीत नाही ' हे #अंत्ययमक आहे. गझलच्या शेवटच्या शेराला मक्ता म्हणतात . मक्त्यामध्ये कवी स्वतःचे नांव गझलच्या वृत्तात बसेल असे लिहू शकतो.
रसिक वाचकांना विशेष विनंती
यातले सर्व शेर सुटे घेऊन वाचा. ज्यांचा स्वतंत्रपणे वाचल्यावर अर्थबोध होत नाही , अशा कोणत्याही एकत्रित असलेल्या दोन ओळी मला कमेंट द्वारे कळवा. तुमची प्रतिक्रिया मला माझ्या लेखनात #सुधारणा घडविण्यासाठी आवश्यक आहे !
मराठी गझल ही कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. यामध्ये रचनेचा म्हणजेच तंत्राचा आणि मंत्राचा म्हणजेच गझलीयतचा किंवा वृत्तीचा सामावेश असतो. यात प्रामुख्याने अनेकांना प्रश्न पडतो तो वृत्ताचा !
.........................................................
अशी शिका मराठी गझल या लिंकवर आपण वाचू शकता मराठी गझलबाबत एक विशेष लेख.
.........................................................
हा लेख वाचल्यानंतरही मराठी गझल लेखनाबाबत काही शंका असल्यास त्याही अवश्य विचाराव्यात , ही विनंती.