माझ्या मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझ्या मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २ जानेवारी, २०२१

Kahi kavita

 कवितेतून शोधत आलो 



कवितेत शोधत आलो 

जीवनभर दिलासा 

कधी वाट चुकतांना, 

कधी निराश होतांना

कवितेनेच धीर दिला...


बाकी आजूबाजुला माणसेच होती 

कोरोनाग्रस्त झाल्यासारखी अंग चोरून ,

ज्यांना मी कवितेइतकीच माझी समजत आलो !

ठेवली नाही कधीच मी अपेक्षा 

की माझ्या कवितेला कुणी चांगलं म्हणावं,

कौतुक करावं ,

माझ्यासाठी एक छंद म्हणून मी लिहीत आलो

दु:खावरचे औषध म्हणून कविताच पीत आलो 

कवितेनेच कंठातील वीष भिनू दिलं नाही शरीरात

आणि बनू दिलं नाही रक्ताला व्देषयुक्त !



कवितेनेच धीर दिला 

कधी निराश होतांना

कधी वाट चुकतांना 

जीवनभर दिलासा

कवितेतच शोधत आलो....



जाऊ कुठे, जाणार कुठे 

कवितेशिवाय 

माणसे अशी कोरोनाग्रस्त झाल्यासारखी अंग चोरून असतांना 


माणसापासूनच .....



... अर्थात आपलीच !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



....................


तुझ्यामुळे कवितेला

जाग माझ्या आली ;

एक एक ओळ माझी

तुझ्या श्रावणात न्हाली !



तुझ्या चांदण्यात माझा

शब्द शब्द मोहरला ;

तुझी साद येता कानी

जीव माझा आतूरला !



बघे आयुष्य नव्याने

पुन्हा वळायास मागे;

असे अचानक आले

बघ जुळायास धागे !



सुन्या सुन्या मैफिलीला

सूर नवा सापडला ; 

तू वाचताच कविता

देह सारा झंकारला !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील.




मेघांआडून चंद्रानं अधूनमधून डोकवावं 

तसं तुझं व्हाॅटसअॅपवर डोकावणं

मनाला भुरळ पाडून जातं...


असं कधी झालं नव्हतं

पण आज वाटतंय कुठे तरी

मनाला विचारावं स्वत:च्याच...


हे स्वप्नं आहे की सत्य ?

किती सांभाळलं होतं ...

आज ओठात आलंच ! 


पण कसं सांगू ? 

.........


कविता ओलांडते हद्द

अनावर होऊन बरसते

आषाढासारखी...



ऐकतच नाही मनाचं

मनालाच उतरवते

कागदावर....



कोणी तरी वाचील

ही धाकधूक मनात

असते तरी....


........


असे होऊ नये

असे वाटते तरी

असे होत आहे...



कधी होत नव्हते

कधी झाले नव्हते

तसे होत आहे...



आता प्रश्न हा

सुरु राहूदे का

जसे होत आहे....



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


............................................


उदास एकटेपण


उदास एकटेपण

रिते मन ;

कुणी न सोबती

 हे घुमेपण !


मूळचा देवीदास 

बिनधास्त ;

आता तसा

दुरापास्त !


चेहरा ओळखीचा

आरशास ;

प्रतिबिंब

हाच भास !


कळे न जातसे

कुठे जीवन ;

वळणामागून

येई वळण !


चालत राहणे

हेच हाती ;

विझेपर्यंत

जीवनवाती !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


रत्नागिरी. २०.१२.२०२० सायं. ०६.३५

............................................


असाच मी बसतो कुण्या संध्याकाळी

अंधाराला सोबत घेऊन 

कातरवेळेनंतर अंतर वाढत जाते उजेडापासूनचे 

दुस-या दिवशीचा सूर्य येईपर्यंत

काही पडला उजेड तर पडला माझ्याही डोक्यात

म्हणून असाच मी बसून राहतो डोक्यावर किरणे घेत 

बाकी काही नाही झाले तरी डोके उबदार होते

आणि सुचते एखादी कविता ही अशीच एखादी....


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

29.12.2020

..........................

वाढलेल्या अपेक्षांचं ओझं वागवीत 

वाकलेल्या अवस्थेत चालत असतो

म्हातारपणाच्या दिशेने

अशा वेळी पावलं जड तर होणारच ना...


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

29.12.2020

...............


अस्व:स्थ मनस्थितीत बाकी काहीच सुचलं नाही तरी कविता सुचते ! 

हे कसं होतं काहीच कळत नाही

पण होतं हे खरं आहे

कविता इतकी कशी अभिन्न आणि समजूतदार निघाली ?

कोण सांगू शकेल काय ?


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.१२.२०२०

.....................


इतक्या सगळ्या खस्ता खाल्ल्या त्या कशासाठी ?

आता अखेरच्या पर्वात तरी शांतता, समाधान मिळून मनाजोगते जगायला मिळावे ही अपेक्षा गैर वाटावी

असे जीवन पुन्हा वाट्यास का यावे ? 

सृष्टीचक्रात काही घोळ तर नाही ना ? 

की देवाचे आणि दैवाचे अस्तित्व जाणवावे म्हणून हा अट्टाहास आहे ? 

की काळच सूड उगवतोय माझ्यावर ? 

रावणाने अशाच कुणाची तरी सत्ता मानण्यास नकार दिल्यानेच त्याला मारण्यात आले का ? 

मला शरण आलेच पाहिजे हा मत्तपणा 

आणखी किती मानवांचे बळी घेणार आहे ? 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.१२.२०२०

........................


आता ते येतील पुन्हा पाच वर्षांनी हसत हसत

आणि आम्हीही तोंडदेखले तोंडभर हसतहसत

त्यांच्या आश्वासनांना आणि एकमेव मागणीला 

त्यांच्यासारख्याच मुखवटयाने प्रतिसाद देऊ😃

मास्कआडून😷😷😷😃😃😃😄😄😄


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०१.०१.२०२१

...................

गझल कळून घेतांना...


पटकन मला त्या शेराचा अर्थच कळला नाही .

असे का व्हावे ? माझ्यातील स्वयंघोषित गझलगुरूला

शेराचा अर्थ चटकन लागत नाही म्हणून कित्ती राग आला ! 


पण मग इथे माझ्यातील तथाकथित आकलनकर्त्याला राग का आला नाही ?


गझल काही वेळा कळूनही घ्यावी लागते

हे मला कळले गझल कळून घेतांना

तर किती बरे होईल 😃 😃😃


किमान माझ्यातला स्वयंघोषित गझलगुरू तरी हद्दपार होईल 😃😃😃😃😃

गझल कळून घेतांना.....


..... देवीदास हरिश्चंद्र पाटील


०१.०१.२०२१

...................

काही क्षण अस्वस्थ करतात

काही क्षण ती अस्वस्थता अधिकच वाढवतात

आणखी काही क्षणांनी हे शांत होईलही कदाचित

पण हे क्षण तरी असे अस्वस्थ करणारे आहेत हे नक्की 

पुढे तरी काय लिहू अस्वस्थ क्षणांच्या सोबतीत .....



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०२.०१.२०२१


रविवार, २६ एप्रिल, २०२०

Marathi kavita pravah Don asale tari

प्रवाह दोन असले तरी....


प्रवाह दोन असले तरी 
सागर एकच असायला हवा ना  !
सागरातून प्रवाह वेगळा काढता येईल ?
एक प्रवाह वेगळा काढायचा की
दुसरा प्रवाह वेगळा काढायचा 
आपल्याच शरीराच्या सागरातून ?
हया प्रवाहाच्या लाटा
त्या प्रवाहाहून वेगळया रंगाच्या आहेत
पण त्या आधी लाटा आहेत की
एकीकडे किना-याकडे येऊन परततात 
आणि दुसरीकडे परततच नाहीत
असं काही अगम्य त्यांच्याबाबतीत आहे का ?
कोण आहे लाटा उठवणारा ?



... देवीदास हरिश्चंद्र पाटील

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

माझ्या मराठी कविता

माळीण गांव




काल होते गांव

आज ते दिसेना ;

काळजाचं पाणी

डोळ्यात ठरेना !



डोंगरकुशीत

माळीण ते गांव;

त्याचा डोंगरात

लागे ना की ठाव !



अवघ्या क्षणात

मातीमोल झालं ;

एक आख्खं गांव

मातीखाली गेलं ! 

============================


 कचरा


झाडू मारून
कचरा हटेल
भ्रष्ट मंत्री
आणि गुंड
यांची युती
तुटेल काय ?

दंगली आणि
बलात्कार
झाडू मारून
हटतील काय ?

सामान्यांचा
फाटक्यात पाय
जायचा कधी
थांबेल काय ?

=====================

 माझ्या उरात कविता 

माझ्या उरात कविता
 कोणी कळे न कोरली
   दीप श्वासांचे विझले
      तरी कविता तेवली !


        कधी आकाश फाटले
           कधी जमीन खचली
              आले जखमांचे पूर
                  तरी कविता तरली !


                    भरोश्याच्या माणसानी
                        मान केसानी कापली
                            भरोश्याची राहिली ती
                               फक्त कविता आपली !

                                     ***************

 धावत्या ओळखीच राहिल्या

स्वप्नील त्या रात्री
 धुन्धीत मस्त गेल्या
  आज त्या मैफिलीन्च्या
    स्मृतीच  फक्त राहिल्या ...


      मैत्रीत ना राहिली
         पूर्वीची ती आत्मीयता
            अंगणात बसून पाहिलेल्या
                चांदण्याच फक्त राहिल्या ...


                  वेगळ्या होवून वाटा
                    चौफेर जेव्हा गेल्या
                       घाई गर्दीच्या त्या रस्त्यावर
                           धावत्या ओळखीच राहिल्या ...

                                  ***************

 विसर 

आता तुला पंख फुटले आहेत पाखरा
आता तुझा माझा संपला आहे सहवास
माझी तुला जराशीही उरली नाही गरज

तुझी स्वप्ने मी फूलवली आनंदात
तू एवढी दुनिया पहिली नव्हतीस
तेव्हा मीच होतो तुझ्या स्वप्नांचा राजकुमार

वाढत्या वयाबरोबर विस्तृत झालं तुझं जग
आणि मी बनून राहिलो एक धूलिकण

तुझ्याच डोळ्यातील ती स्वप्ने विसरून
तू आज झेपावतेयस उंचावरून
माझ्या जमिनीवरून खुरडण्याचा खेद नाही
तुझ्या भरारण्याचाच आनंद अधिक आहे

दुःखं एवढच : आता तुला पडला आहे माझा विसर
आता तुला पंख फुटले आहेत पाखरा
गतःकाल विसरून
भविष्याकडे झेपावण्यासाठी

***************


हसे 

तू मागू नकोस माझ्याकडे
फुलानी भरलेली ओंजळ
काटेच मिळतील तुला तिथे
आणि मिळतील आसुडांचे वळ

सोसण्याची आता ताकद नाही
पण सोसण्या- भोगण्याची खंतही नाही
आयुष्याने पार उलटेपालटे केले
याचेच हे दुःखं आहे बोचणारे !
असा मी तुला कसे देवू फुलांचे झेले ?


आकाशीचा चंद्रही मागू नको
शपथ आहे तुला माझी आणि
माझ्यातील खाचखळग्यांची !
माझ्याच असंख्य विवरातून
मी चालतो आहे अनवाणी !


आयुष्य पत्थर झाले आहे
या कातळाला ओलावा नाही
कशाला भिजवू तरी मी
माझ्या उदास अश्रुनी तुझी बाही ?


जेव्हा जेव्हा दिसलीस : हसलो !
आता याचेच हसे झाले आहे !
आता याचेच हसे झाले आहे !

***************


   स्मारकात बंद झालो !

जितेपणी घातली मी
गगनास गवसणी
हायआता मेल्यावरी
स्मारकात बंद झालो !

***************


 गुपित 

गुपित उरले आता कसले ग
मी तुज बोलून बसले ग
लटक्या रागाने रुसले ग
हसला तो अन मीही हसले ग
राजबिंडे रूप मनोहर दिसले ग
त्यावर भाळून मीही फसले ग
काय बाई प्रेम तरी असले ग
मीपण झाले असले नसले ग

***************

  कळली तुझी सोज्वळता ,  आगीपुढे विरघळता !

एका झाडाच्या दोन फांद्यांनी
दुसऱ्या झाडाच्या एका फांदीला घट्ट विळख्यात पकडले
आणि रगड रगड रगडले .
ही गोष्ट दोन्ही झाडांनी अनुभवली .पण पहिल्याने ती नाकारली .
ते म्हणाले ती माझी फांदीच नव्हे ;
तुझ्या माझ्यात किती हे अंतर !
तुझ्या फांदीला दुसऱ्याच झाडाची फांदी घासली असेल .
तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. पहाटे असे भ्रम होतातच ! दुसरे झाड काही बोलले नाही .

बराच काळ ती दोन्ही झाडे शांत होती .
मध्येच एकदा दुसऱ्या एका शांत रात्री ,
स्वत:होऊन पहिले झाड दुसऱ्याच्या जवळ आले होते.
दुसऱ्याने मग आपले एक पान पहिल्याच्या एका पानावर अलगद ठेवले .
हळूहळू दोघात स्पर्शतरंगांची उधळण सुरु झाली !

ही  गोष्टसुद्धा पहिल्या झाडाने चक्क नाकारली !
ते म्हणाले , एक तर मला तसल्या भावनाच नाहीत आणि झोपेतसुद्धा मी सावध असते.
मुळात मी सोज्वळ आहे.

दुसरे झाड बिचारे चूप बसले . ते फक्त मनात  एवढेच म्हणाले :
सोज्वळता वागण्यात दिसली पाहिजे ना !
बोलून काय उपयोग ?
वरून सोज्वळ आतून उठवळ झाडांचे हे असेच असते.
कळली तुझी सोज्वळता ,  आगीपुढे विरघळता !

***************

आता आतासे वाटू लागले आहे
काहीतरी पुन्हा सुरु करावे
निदान एखादी कविता तरी लिहावी
.
तेवढाच मनाचा निचरा !
कोंडलेले आभाळ तेव्हढेच मुक्त !
बाकी आपणच आपले कौतुक काय करायचे ?

तेव्हा कधी तरी हे असेच लिहायचे

***************

ही सुरी धारदार 
वार आरपार
काळजाच्या ....

गंधतो श्वास श्वास
तूच आसपास
काळजाच्या ....

प्रिय तू फक्त एक !
भोवती अनेक
काळजाच्या ....

.......................