बुधवार, ३० मार्च, २०२२

तारण : मराठी गझल

 तारण 

#gazal

#marathi_gazal


सोडून व्हायचे मी साजण दिले कधीचे

तेव्हा तसे तिनेही कारण दिले कधीचे...



जमिनीवरीच माझा संसार थाटला मी 

आकाश पाखरांना आंदण दिले कधीचे...



मजलाच हाय माझे झाले नकोनकोसे

सोडून हाय मीही भांडण दिले कधीचे 



माझा अखेर मीही झालो समुद्र होतो

त्यांना चिपीतले मी खाजण दिले कधीचे



आयुष्य सर्व माझे गेले तिच्याचसाठी !

गझलेस मीच माझ्या तारण दिले कधीचे



... देवीदास हरिश्चंद्र पाटील



२ टिप्पण्या:

निनावी म्हणाले...

खूप सुंदर, अप्रतिम गझल

निनावी म्हणाले...

मला तुमच्याकडून नक्कीच गझल शिकायला आवडेल