सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

समजूत आपली

मागे - पुढे

गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ... असं सांगण्यापेक्षा सरळ 14.09.2020 रोजी सकाळी पडलेले स्वप्नंच सांगतो. ते असं होतं. पुढच्या बाजुला माझ्या घरासमोरील प-यात ईशान्य दिशेला काही लोक बांधकाम करायला उतरलेयत. काही जण वरच्या बाजुच्या शिरधनकरांच्या बागेत उभे आहेत. प-यातला एकजण मला त्याच्यापुढयात बोट दाखवून विचारतो की तिथे चि-याची एक लाईन वरपर्यंत उठवूया काय ? का कोण जाणे, पण मला ती जिवंत माणसे वाटत नाहीत. ती भूते असावीत असं त्यांच्या देहबोलीवरून वाटतं. तरीही मी त्यांना सांगतो , लगतचा हिस्सेदार बोंब मारील त्यामुळे तिथे काय करता येणार नाही. एवढयात बागेतला एकजण माझ्या अंगणात येऊन विचारतो की मग इथून लाईन टाकूया का ? मी सांगतो , हे आमचं आहे , इथे तर काहीच करता येणार नाही . स्वप्नं इथेच संपलं. आता हे तर स्वप्नंच होतं. पण ते विचित्रच होतं. सकाळपासूनच माझ्या मनात काय होईल काय नाही याचेच विचार येत होते.... आणि शेवटी ... शेवटी कसलं सकाळी दहा वाजताच पेटलं की राव ! अगदी जोरदार ! वणवा लागला ! आग भडकली ! कुठे म्हणता ? अहो, शेजारीच . उर्मीच्या नव्याने बांधल्या जात असलेल्या घरात ! आगीचा बंब नका आणू मध्ये. ती आग वेगळी . ती काडीने लावावी लागते. ही काडी लावल्याने लागलेली आग नाही. फार तर ती काडी केल्याने लागलेली आग म्हणता येईल. कोणी केली माहीत नाही , पण उर्मी आणि तिच्या जाऊबाईत कोणी तरी काडी केली. आग लावली. जोरदार भांडण पेटलं. आख्खा दिवस त्यातच गेला. अर्थात, बाहेरचा कोणीच मध्ये पडला नाही. कारण एक तर घर बांधण्यापूर्वी पुढे काय वाद होतील हे जाणून आपसात पुरेशी बोलणी केलेली नसावीत आणि त्यासाठी बाहेरच्या कोणाला चर्चेत सहभागीही करून घेण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे कसलीच माहिती बाहेरच्या कोणाला नव्हती. मग कसे कोण मध्ये पडणार ? तरीही आम्ही जाणार होतो पण सायंकाळी चार वाजता एकदाचं ते भांडण मिटलं. आम्ही निश्वास सोडला. शेवटी हे सगळे आपलेच ! 

      त्यानंतर तिस-याच दिवशी म्हणजे दि. 17 रोजी आम्हां दोघांना दोन स्वप्नं पडली. तिच्या स्वप्नात माझी आई आणि माझ्या स्वप्नात माझे वडील आले ! माझी आई कोणती तरी दोन ठिकाणं बघण्यासाठी कार आणायला सांगत होती तर माझे वडील घाबरलेले दिसत होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यांनी मला खुणा करीत पुढच्या बाजुला रस्त्याच्या दिशेने बोट दाखवलं. मी तिकडे बघितलं तर अगदी बंदूसारखाच दिसणारा , त्याच्यासारखीच सफेद पँट व फिकट गुलाबी रंगाचा हाफ शर्ट घातलेला व पांढरी टोपी घातलेला माणूस देवळाच्या कोप-यावर मोटरसायकल चालवत येतांना दिसला ! स्वप्नं तिथेच संपलं. आज सर्वपित्री अमावास्या ! आजच माझे आई बाबा आमच्या दोघांच्या स्वप्नात का बरे आले असतील ?.....

गेले दोन तीन दिवस रात्री धुव्वाधार पाऊस पडतोय. विशेषत: पहाटे ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रचंड पाऊस पडतोय. त्यानंतर नेमके पंधरा मिनिटांनी नळाला पाणी येतं. मागे जाऊन ते भरावं लागतं.  तेव्हा एक तर पायातून पाणी शोषले जाते आणि त्याचवेळी हवेतला पावसाळी गारवा बाधीत करीत असतो. त्यातच आसपास कोरोनाचा विळखा वाढतोय. कोरोनापेक्षा कोरोनाची पसरलेली भीतीच जास्त भयानक आहे. तसं 18 तारीखच्या संध्याकाळपर्यंत सगळंं ठीक होतं. पण रात्री दहा वाजता अंगणात फिरून पाय मोकळे करावेत , असा विचार अचानकच मनात आला. पाऊसही नव्हता. अंगण सुके दिसत होते. पाच दहा मिनिटे फिरलो असेन , अचानक कमरेत लटका पडतोय की काय असे दोनदा वाटले ! म्हटले बघुया परत काय तसे जाणवते काय , म्हणून पुन्हा फिरू लागलो. पण तसे काही जाणवले नाही. अर्धा तास फिरलो आणि मग मात्र पाठीचा कणा दुखू लागला. तसा मी घरात आलो. रात्री हिने कण्याला बाम लावला. थोडं बरं वाटलं. पण सकाळी पाठ आणि डोकंही दुखू लागलं. 19 तारीख उजाडली आणि त्रास वाढलाच. घसा खवखऊ लागला. डोळयातून गरम पाणी आले. त्यातच मेहुण्याच्या कामासाठी मायलेक स्टेट बँकेत गेलेली. शेजारच्या निलेशला माझ्या सोबतीला ठेवून गेलेले. मी त्याच्याशी तीन तास गप्पा मारीत बसलो. तो बिचारा बसून राहिला. जेवायलाही घरी जाईना. तेवढयात संत्या झोपून राहिलाय असा फोन त्याच्या घरातून आला. तो बघून आला तर संत्यालाही माझ्यासारखाच त्रास होत होता. मग निलेश म्हणाला मी डाॅक्टरकडे जातोय. काकाचा नंबर लावतो. तुमचा पण लाऊ का ? मी म्हटलं संत्याबरोबरच आमचा दोघांचाही लाव. तो बिचारा नंबर लावायला गावातल्या डाॅक्टरकडे गेला. तेवढयात ही लोकं आलीत. ही आली ती थेट घरात गेली. मी तिला डाॅक्टरकडे जायचंय म्हणून सांगितलं , तशी ती जेवणाची घाई करू लागली. तेवढयात तिला पिवळया पिशवीची आठवण झाली तशी ती एकदम टेंशनवर आली. सैरावरा होऊन पिशवी शोधू लागली. पिशवीत चार बँक पासबूक्स , हिचा फोन व मुलाचे पाकीटही होते. मी हिच्या नंबरवर फोन लावला. पण तो कोरोनाची कँसेट लागून बंद व्हायला लागला. इकडे निल्याचा डाॅक्टरकडून फोन आला की दहावा नंबर आत गेेलाय. तुम्ही या.  ही रडकुंडीस आलेली. मुलगा गाडी काढीत असलेला आणि मी दोघांच्यामध्ये साकटलेला ! ती पिशवी बाजारातच विसरली हे नक्की झाले तसा मी हिला धीर दिला आणि मुलगा आम्हांला डाॅक्टरकडे सोडून पिशवी शोधायला पुढे जाईल असे सांगितले. मुलाने तसे केले. मला डाॅक्टरनी तपासले , दोन इंजेक्शन्स दिली , गोळ्या लिहून दिल्या. ऑक्सीजन लेव्हल चेक केली व आणखी तीन दिवस ती लेव्हल चेक करायला या म्हणून सांगितले. सगळे टेंशनच आहे , पण टेंशन घेऊन उपयोगाचेही नाही. मी बाहेर येऊन बसलो. तेवढयात मुलगा आला . तो म्हणाला पिशवी सापडली नाही. मी म्हटले मग पोलीसांत तक्रार करावी लागेल. तो म्हणाला ती पण करून आलोय. तेवढयात ही बाहेर आली. हिलाही मुलाने तसेच सांगितले. आम्ही तिघंही घरी आलो तसा मुलगा खिडकीकडे बोट दाखवून हिला म्हणाला , रडू नकोस, ती बघ खिडकीला पिशवी लावलीय ! कधी गंमत करायची हे अजूनही मुलाला कळत नाही. जाऊ दे. त्याने न जेेवता धावपळ केली , हेही कमी नव्हे.  मग माझ्या गोळया सुरू झाल्या. दुस-याच दिवशी म्हणजे 20 तारीखला दुपारपासून मला बरे वाटू लागलेय. 

20 तारीखला दुपारी अंकीत माईणचा मेसेज आला. मग बोलणे सुरू झाले. अंकीतला मी प्रथम क्वोरावर भेटलो. तिथून  मराठी ब्लागर्सचा ग्रूप बनवायचा का या त्याच्या प्रश्नाला मी चटकन हो कळवले होते. मग त्यांने अनुदिनीसंवाद हा ग्रूप फेसबूकवर बनवला. मी आँनलाईन पसारा खूप वाढवला. पण मी सगळं चाचपडत शिकता शिकता केलंय. कुठला कोर्स , पुस्तके , कोणाचं मार्गदर्शन हे मला लाभलं नाही. मी रत्नागिरीत शोध घेतला नाही असंही नाही. पण ते सगळं शक्य झालं नाही. अपुरी साधनसामग्री , कौटुंबिक खर्च व विशेषत: नाउमेद करणारं घरातलंच वादग्रस्त वादळी वातावरण यातून सर्च सुरू ठेवून शिकता शिकता नऊ ब्लाग केले. त्यावर प्रचंड व चांगलंही लेखन केलं. पण मी पडलो कारकून . क्लेरिकल बाजूवाला. माझी टेक्नीकल बाजू लंगडीच. कित्येक तांत्रिक गोष्टी डोक्यावरून जातात. माझं इंग्रजी चांगलं असलं तरी शेवटीे अमेरिकन इंग्रजीतल्या तांत्रिक बाबी समजायला मला कठीण जातात. अशा अवस्थेत एक मराठी आणि आठ इंग्रजी ब्लाग उभे केले खरे, पण व्यावसायिक बाजूकडे लक्ष देणे शक्य झाले नाही. तेव्हा तर नोकरी होती. जबाबदारी  होती. रिटायर्ड होऊनही निवांतपणा लाभला नाहीच. घरातलं वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सतत तणावग्रस्तच राहिलेलं. त्यातून वेळ काढीत काढीत मन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. अंकीतला मी याची थोडक्यात कल्पना दिली आहे. अंकीत रत्नागिरीतलाच असून आमचा विद्यार्थीच निघाला.  त्याने मला मदत करतो म्हणून सांगितले आहे. अंकीतशी बोलतानाच माझ्या लक्षात आले की डाॅक्टरकडे चेकींगसाठी जायचे आहे. त्यामुळे मला बोलणे थांबवावे लागले.  मी त्याला साँरी म्हणालो . मी डाॅक्टरकडे जाऊन आलो. त्यांनी ऑक्सीजन लेव्हल चेक केली. तीही खूपच चांगली आहे. म्हणजे सत्त्याण्णव वर बराच काळ स्थिर होती. मग 98 झाली. मी मुलाच्या गाडीवरून घरी आलो.  त्याच संध्याकाळी मला जनावर चावता चावता वाचलो ! ही खालच्या बागेत गेली तेव्हा मीही मागच्या बाजूला जास्वंदीचे कळे काढत होतो. हिला जास्त पुढे जाऊ नको म्हणून दोनदा सांगितले. पायाखाली बघून चाल, रान वाढले आहे असेही सांगितले. पण बायकोच ती , ती काय मला भीक घालतेय ! ती पुढेच गेली. मी स्वत:शीच पुटपुटत आमच्या घराच्या मागे गेलो . कंपाऊंडच्या भिंतीवर चढणा-या जनावराचा करडा रंग बेमालूमपणे पावसामुळे हिरवट झालेल्या भिंतीत मिसळून गेलेला असल्याने मला ते जनावर सुरूवातीला जाणवलेच नाही. मला बघून त्याने हालचाल केली तसे ते माझ्या पायाजवळच पडले. तेव्हा कुठे लक्षात येऊन मी पाय मागे घेतले आणि चार पावलं मागे आलो. नशीब तिथे दोन दगड होते . त्याच्याखाली ते शिरले. मी ते कुठे जात नाही ना याची खात्री पुन्हा एकदा त्याच्या जवळ जाऊन केली. पण ते दगड आणि कंपाऊंड यांच्यामधल्या छोटयाश्या जागेत ते वळवळत होते. मी संत्याच्या घराकडे पाहिले तर त्याच्याकडे सत्त्या उभा दिसला. मी त्याला आधी संत्याला बरे वाटले का ते विचारले. तो होय म्हणाला. तेवढयात संत्याच दारात आला. मी त्यालाही विचारून खात्री केली. मग त्याला काठी आणायला सांगितली. जनावराचे वर्णन सांगितले. तसा तो काठी घेऊन आला. तोपर्यंत ते ऐकून ही धावत आली. पुन्हा स्वभावानुसार पँनिक होऊन चौकशी करू लागली. मी तिला विचारले मग देऊया का सोडून त्याला ? तशी ती म्हणाली नको. मारूदे. मग संत्याने त्याला त्या दगडाच्या कपारीतही अचूक टिपलं आणि मारून वरच्या बागेत जाळलंही.  माझ्या हातात त्याने काठी देऊन ठेवली होती. पण मला ती चालवावी लागलीच नाही . इतक्या शिताफीने त्याने काम तमाम केलं. आमच्याकडे कधीही जनावर आलं तर मी त्यालाच बोलवतो. मला त्या जनावराचं वाईट वाटलं पण पुढे ते कुणाच्याही जिवावर बेतू शकलं असतं , हेही खरेच ! An hectic day  हा हायस्कूलमधला धडा मला आज आठवला ! खरंच आजचा दिवस तसा दगदगीचा आणि धावपळीचा गेला. दुपारी पिशवी भेटली आणि रात्री मला जवळजवळ बरे वाटू लागले , हेच विशेष समाधान ! 

21.09.2020 

पण काल रात्री पहाटेपर्यंत दोघांनाही झोप आली नाही. साडेतीननंतर मात्र मी झोपलो. सकाळी साडेआठला जाग आली ! तरी झोप डोळयांवर होतीच. आज अनेक दिवसांनी पूर्वीच्या वेळेवर म्हणजे साडेआठला शौचाची जाणीव झाली. जाऊन आलो. शवासन केले. सकाळपासून डावी नाकपुडी चोंदलेली होती. घामही येत होता. नाश्ता केला. गोळया घेतल्या. घरातला कचरा काढला. तसे जरा हलके वाटले. चोंदलेली नाकपुडी सैल झाली. नुकताच आलेला दै. सकाळ (daily Sakal) वाचायला सुरूवात केली. तेवढयात सतिश आला. सतिश ही उर्मीची देणगी आहे. सतिश उर्मीच्या घराचं सद्याचं काम पाहतोय. मी त्याला माझ्या घराच्या गेली सहा वर्षे या ना त्या कारणाने पडून राहिलेल्या नुतनीकरणासाठी बोलावलंय. आम्ही चर्चा सुरू केली तेवढयात विलास भाटकरची आई आली. विलासने तो रिटायर होत असल्याने खालीलप्रमाणे मला व्हॉट्सॲपला मेसेज पाठवला होता. तो मेसेज त्याच्या आईला का दाखवलास नाही म्हणून त्याने मला काल फोन करून विचारले होते व त्याची आई माझ्याकडे येईल म्हणून सांगितले होते. मीही तिला फोन करून बोलावले होते. इतके सगळे झाल्यावर ती आली तशी मी तिला तो मेसेज दाखवला . तिने पाहिला आणि काही न बोलता फोन माझ्याकडे दिला. ती विलासजवळ काय ते बोलणार असेल अशी समजूत करीत मी पुन्हा सतिशबरोबर चर्चा सुरू केली. त्याच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. काही त्याला समजावून सांगितल्या. 

(क्रमश:)

                          ....................

 पुढे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: