Due to the great Bhimraoji Panchale and love for the great Suresh Bhat's marathi gazal , I was at Wai in Satara district. It was one of the grand programmes . It was a lovely function ! I still have the sweet memories in my mind . Many Marathi Gazalkars were also there . It was a fantastic travel of Marathi Gazal that brought all of us at Wai . It was totally a different atmosphere and we all enjoyed it lot . I also presented my gazal and got a loud of applause and once more too to my gazal named Teer meaning arrow . I generally write with social angle . The gazal lovers really liked it ! The love of the viewers at Wai I will remember fovever !
ONLY DEVIDAS ! Me to myself & You ! Top Marathi and Hindi articles, poems and gazals. फक्त देवीदास ! साहित्यिक देवीदासाचा स्वतःशी आणि तुमच्याशीही सुरू असलेला सुसंवाद ! आयुष्य तितकेसे सोपे नसतेच कुणालाही . आयुष्याकडे बघतांना बरेच काही जाणवते , आढळून येते. स्वतःच्या व इतर अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची ही शिदोरी...फक्त देवीदासाच्या शब्दांत... खास तुमच्यासाठी !
Pages
- ABOUT ME
- Privacy Policy
- पान परिचय
- अशी शिका मराठी गझल व गझलविषयक अन्य लेख
- माझ्या मराठी गझला
- माझ्या हिंदी गझला
- माझे कार्यक्रम माझी भाषणे
- विचित्र स्वप्ने भयानक घटना
- माझ्या मराठी कविता
- माझी मराठी गाणी
- माझी मराठी भक्ती गीते
- आवडती गाणी
- माझे मराठी लेख
- राजकीय लेख
- मागे पुढे
- कोरोनाचा काळ
- स्फूट लेखन
- नवलाई पावणाई मंदिर , जाकीमिऱ्या
- कुटुंबासाठी
- पुस्तक परिक्षण
- सुंदर संदेश
- बोलके काव्य
मंगळवार, २१ जानेवारी, २०२०
सोमवार, १३ जानेवारी, २०२०
मराठी गझल : गाणे
गाणे
भेटल्या खाचखळग्यांचा वाटला आधार होता
हा असा रस्ता निघाला चालण्याच्या पार होता
मी जरी बोलून गेलो शब्द थोडेसेच होतो
लागले होते जिव्हारी...खोल झाला वार होता ...
बोललो नाही कधी मी हया उजेडाची कहाणी
हया उजेडामागचा मी पाहिला अंधार होता
फक्त दु:खानेच केली साथ आयुष्यास होती !
तू कधी माझा सुखा रे घेतला कैवार होता .... ?
जे नको ते छेडले मी ...एकदा गाणे जरासे ...
ओठ माझे पोळले अन् ; कंठही बेजार होता !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९
राज्य म्हणजे सर्कस आहे काय ?
हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ?
निकालोत्तर धूमश्चक्री
गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यात निवडणूक निकालोत्तर धूमश्चक्री चालू आहे . युती म्हणून निवडणूक लढून आणि जिंकूनही दोन मोठे पक्ष मोठा भाऊ छोटा भाऊच्या भाऊबंदकीत अडकले आहेत . यापैकी सर्वात मोठ्या पक्षाने सरकार स्थापनेत पुढाकार घेणे किंवा युतीधर्म म्हणून संपूर्ण युतीनेच पुढाकार घेवून सहजशक्य असलेले सरकार स्थापन करणे अपेक्षित होते . निकालानंतर दहा दिवस उलटत आले तरी राज्यासमोरचे लोकांचे प्रश्न बाजूला ठेवण्याईतपत कोणते अडथळे आहेत , हे कोणीही जाहीर करीत नाहीत . मी येणार , मी येणारच्या अतीउत्साही आरोळयाही केव्हाच हवेत विरल्या आहेत . अजूनही कोणी वाघ बनतो आहे तर कोणी वनरक्षक बनतो आहे . हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ? कोण गाजराची शेती करतो आहे तर कोण राष्ट्रपती राजवटीचे भीतीयुक्त गाजर दाखवतो आहे . एकूण शिवरायांच्या या महाराष्ट्रात रयतेला राज्यकारभाराच्या पध्दतीचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे ! ही लढाई खरी आहे की लुटूपुटूची आहे , हेही जनतेला कळत नाहीय. निवडणूकीपूर्वी मोठमोठी भाषणे करून जनतेकडे मते मागायची आणि निवडून आल्यानंतर आपसात भांडत बसायचे , हे अनाकलनीय आहे . राजकीय अपरिपक्वतेचीच ही निशाणी आहे . राज्य ही गोष्ट गंभीरपणे घ्यायची असते . कोलांट्या माकडउडयांसाठी कुणाला दिलेले मोकळे मैदान म्हणजे राज्य नव्हे . राज्यकारभार गंभीरपणे आणि खंबीरपणे करावयाची बाब आहे . त्यासाठी स्थिर सरकार देणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे . वैयक्तिक किंवा पक्षाच्या हीत वा अहंकारापेक्षा राज्य किंवा राष्ट्र नेहमीच मोठे असले पाहिजे .
उशीर होऊ शकतो , पण...
सरकार स्थापनेला उशीर होऊ शकतो . पण त्याबाबतीतल्या हालचालींचे संकेत तरी लोकांना दिसले पाहिजेत. काही वेळा म्हणे ज्योतिषाला विचारून सत्ता स्थापनेचा मुहुर्त जाहीर केला जातो . पण इथे ठोस तारीख जाहीरच होत नाही . दहा दिवसात दोन पक्षात याबाबत कोणतीही चर्चाच होवू नये , हे संयुक्तिक नाही. दिवाळी असली तर तीही राज्याच्या सर्वात महत्वाच्या कामांसमोर किती दिवस करायची , हाही प्रश्न उरतोच. अती झाले की दिवाळीचाही शिमगा व्हायला वेळ लागत नाही . लोकांनी पारदर्शक वागावे ही अपेक्षा करतांना सरकारनेही तितकेच पारदर्शक असणेही महत्वाचे असते . पारदर्शक राज्यकारभार ही नंतरची गोष्ट झाली . राज्यकारभाराला शुभारंभ नक्की कधी होणार , हे तरी लोकांना वेळेवर कळले पाहिजे . नुसती मतदानाची लोकांना घाई करायला सांगून उपयोग नाही . त्यांनी केलेल्या मतदानाचा योग्य आदर राज्यकर्त्यांकडून झालाच पाहिजे . थोडक्यात , लोकांना अधिकृतपणे माहिती कळलीच पाहिजे . सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी चालविलेली एक यंत्रणा आहे . हया यंत्रणेने निवडून आल्यानंतर लोकांना अंधारात ठेवणे योग्य नाही .लोकशाहीचे भान
काही गोष्टी अशा असतात की तुमच्याही नकळत त्या तुमच्याविरूध्द आपोआप साचत असतात. सत्तेच्या धुंदीत वा अती कर्तव्यकठोर झाल्याने तुम्ही त्या केल्यामुळे तुमच्या लक्षात येत नाहीत . तुमची वेळ भरली की त्या तुमच्यासमोर उभ्या राहतात. या देशात लोकशाही आहे , याचे भान सतत ठेवावे लागते . ज्यांनी या देशाचा पाया रचला त्यांना पुढे तुम्ही काय करणार याची कल्पना होती . त्यांनी तुमच्या सगळया चावटपणावर आधीच इलाज करून ठेवला आहे आणि त्याची प्रचिती तुमचा फाजीलपणा वाढला की तुमच्या फाजील आत्मविश्वासाला जाणा-या तडयातून तुम्हांला येतेच येते . लोकशाही ही कुणाला भीती दाखवून किंवा सतत गाजर दाखवून फार काळ करता येत नाही. ईतिहास नाकारला तर तोच बोकांडी बसतो ! मग सगळे सुरळीत होत असतांना अश्वमेधाचा वारूही रोखला जातो . कमावलेली किंवा नशिबाने लाभलेली ईज्जत पार धुळीस मिळते ! फाजील तोंड आणि फाजील आत्मविश्वास तोंडघशीच पाडतात !सरकार स्थापन होणे आवश्यक आहे
आता ही गेलेली ईज्जत मिळवायची झाली तर त्यासाठीही एकच मार्ग आहे . निमूटपणे लोकांना जाहीर सत्य निवेदन करून मुकाटपणे , आता अबकी बार वगैरे कुचकामी ठरलेल्या घोषणा न देता , कोणी तरी सरकार स्थापन करणे , म्हणजे लोकांचे काम शत प्रतिशत होईल . तेच होणे आवश्यक आहे .
गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९
कवितांचा पाऊस आणि मी
जनसेवा ग्रंथालयाच्या वर्धापनदिनी कवितांचा पाऊस!
काव्यसंमेलनाला उत्तम प्रतिसाद; काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
BOI
Wednesday, September 18 , 2019 | 05:12 PM
बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९
संमेलनात बरसल्या काव्यधारा!
संमेलनात बरसल्या काव्यधारा!
रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
BOI

presiding the program
माझे प्रकाशित लेख
माझे प्रकाशित झालेले लेख
गेला काही काळ मी वर्तमानपत्रात दीर्घ लेखन करीत आहे. वाचकाना ते आवडतही आहे.
ब्लॉगवरील वाचकांसाठी मी काही लेख संबधित वर्तमानपत्राच्या सौजन्याने स्वतंत्र पानावर (लिंक : My Published Marathi Articles ) देत आहे. माझी खात्री आहे की ते तुम्हालाही आवडतील . माझे हे तसे अलिकडील लेख आहेत . मी पंधरा वीस वर्षपूर्वीही दीर्घ लेखन केले होते व् ते त्या काळी वर्तमानपत्रात प्रसिद्धही झाले आहेत .यथावकाश तेही इथे देईन . आपण आपली प्रतिक्रिया अवश्य कमेंटबॉक्समधे दया , ही विनंती .
सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९
सुरेश भटांची एक विलक्षण आठवण
सुरेश भटांची एक विलक्षण आठवण
सुरेश भटांचा आणि माझा पत्रव्यवहार सलग चार वर्षे सुरु होता. मी तो जपू शकलो नाही . त्यांना मी केवळ एकदाच भेटलो . बहुधा १९८८ मध्ये . पुण्यात . एक आख्खा दिवस मी त्यांच्या बरोबर होतो. त्यावेळी दीपक करंदीकर , नीता जोशी आणि पंढरपुरचे एक गझलकारही येवून गेले. भटसाहेब न थकता गझला ऐकवत होते. आम्ही जेवायला हॉटेलात गेलो तेव्हा वाटेत भटांचा वजनदार हात माझ्या खांद्यावर होता. त्यांना पेलवत रस्ता पार करण्याचे दिव्य मी कसेबसे पार पडले . दुसऱ्या बाजूने माझ्यासोबत आलेला प्रदीप मुरारी हातिसकर चालत होता. साक्षात सुरेश भटाना जेवताना आम्ही पहिले . जेवतानाही ते गझलबद्दल बोलत होते.
भट साहेबांचा निरोप घेवून रात्री आठ वाजता मी व हातिसकर पुणे स्टेशनला पोचलो . आम्हाला रत्नागिरीला यायचे होते . कसे कोण जाणे , पाठोपाठ भटसाहेब तिथे आले. आपला वजनदार हात पुन्हा एकदा माझ्या खांदयावर ठेवून मला म्हणाले , देवीदास , आज माझ्याकडेच थांब . पहाटे मुंबईला निघायचे आहे. मंगेशकरांकडे . लता, आशा , हृदयनाथही तिथे भेटणार आहेत . ते आग्रह करीत होते . एका दृष्ट्या कवीचा तो आग्रह होता. पण मी थांबू शकलो नाही. मी करंटा निघालो . भटांच्या मनात त्यावेळी काहीतरी होते . मी ते ओळखू शकलो नाही . त्यांचे मन मोडून मी रत्नागिरीला आलो . पण ते मनाने मोठे होते. मला रत्नागिरीला यायचे आहे असे त्यांच्या प्रत्येक पत्रात असायचे . पण अखेरपर्यंत ते येवू शकले नाहीत . त्यावेळी रेल्वे नव्हती एसटीने त्यांना झेपणारे नव्हते आणि गाडीने इतक्या दूर आणणे परवडणारे नव्हते . तो योग आलाच नाही . राहिली ती एक विलक्षण आठवण !
.............
टीप :
मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .
.........
रक्ताच्या नात्यापलिकडचे नाते
खालची आई !
खरं तर ती माझी कुणीच नव्हती आणि तरीही ती माझी सारे काही होती ! माझं बालपण तिच्याच छायेत अधिक गेलं ! ती माझ्या आजीची मैत्रीण , आजीच्याच वयाची .पण मी तिला कधीपासून खालची आई म्हणू लागलो ते आठवत नाही ! आमचे घर तिच्या घरापेक्षा जरा उंचावरच होते . पाय-या उतरून खाली गेले की तिच्या अंगणात जायचो . त्यामुळेच मी तिला कधीतरी खालची आई म्हणू लागलो ! ती माझी संरक्षक भिंतच होती ! बालपणी मला काही बोलायची वा त्रास द्यायची कोणाची टाप नव्हती ! हे अगदी मी चांगला मोठा झाल्यावर , म्हणजे मी चौवीस वर्षाचा होईपर्यंत चालू होते. त्याच वर्षी तिचे निधन झाले . सन 1984 मध्ये . अखेरच्या क्षणापर्यंत ती माझे संरक्षण करीत राहिली ! आजही मी आणि माझे कुटुंब तिच्याच छत्रछायेखाली सुरक्षित आहोत ! ही वस्तु:स्थिती आहे की सन 1984 ते आजतागायत आम्ही सुरक्षित आहोत ! मला आठवत नाही , म्हणजे मी तेव्हा खूपच लहान असणार , पण लोक सांगतात की ती चणेही आधी स्वत: चावून , बारीक करून मला भरवायची ! अगदी आख्यायिका वाटावी अशी ही सत्य घटना अनेकांनी पाहिली होती व मी मोठा झाल्यावर मला आवर्जून सांगितलीही होती ! ती माझी इतकी काळजी का घेत होती , हे मला कधीच समजू शकले नाही ! मी तिचा नातेवाईकही नव्हतो . पण तिचे नि माझे काही वेगळेच रुणानुबंध होते , हे अनेक घटनांनी सिध्द केले आहे !
तिचे किस्से
मी अगदी लहान असतांना आशाआते मला घेऊन पाय-यांवरून खालच्या आईच्या अंगणात गडगडत गेली . सुदैवाने मला लागले नाही . आयुष्यातल्या त्या पहिल्यावहिल्या अपघातातून मी सहीसलामत वाचलो होतो ! पण खालच्या आईचे काळीज हलले होते . त्या दिवशी तिने आशाआतेला इतके धू धू धूतले की पुढे कित्यक महिने आशाआते तिच्यासमोर जायला धजत नव्हती ! अर्थात , मला हे कळण्याचे माझे तेव्हा वय नव्हते . पण पुढे अनेकदा हा किस्सा सांगितला गेला . केवळ माझ्याच बाबतीत नव्हे ; तर गावातल्या अनेकांच्या बाबतीत तिचे किस्से आजही ऐकायला मिळतात . ती होतीच तशी ! अनेकांना तिने ऐन अडचणीच्या वेळेला मदत केलेली होती . कोणताही सण असो , तिने कधी एकटीने साजरा केला नव्हता ! प्रत्येक सणाला तिच्याकडे बायका जमायच्या . तिचे नातेवाईकही यायचे . पण ती स्वत: स्वयंपाक करून सगळ्यांना आवर्जून वाढायची ! तिच्या हाताला चवही सुंदर होती . तिचे एक मात्र होते , तिने केलेला प्रत्येक पदार्थ पहिल्यांदा ती मला खाऊ घालायची ! मग ती पुरी असो , पुरणपोळी असाे ! ती कोंबडीचे मटणही खूप मस्त करायची. गंमत म्हणजे , ती काळीज स्वत: होऊन माझ्या ताटात वाढायची ! मला आवडायचे म्हणून , मटणात ती आवर्जून बटाटे घालायची ! मीही ते आवडीने खायचो . पहिला पदार्थ मला देण्यात , तिची नातवंडं , पतवंडं तिथे असली तरीही कधी खंड पडला नाही ! हे असं का होतं , हे मला कधीच समजलं नाही ! तिला विचारण्याची कुणाची हिंमत झाला नाही . माझीसुध्दा ! खूप काही लिहायचं आहे . लवकरच अशा अनेक आठवणी मी सविस्तर लिहिणार आहे ....
तिचे किस्से
मी अगदी लहान असतांना आशाआते मला घेऊन पाय-यांवरून खालच्या आईच्या अंगणात गडगडत गेली . सुदैवाने मला लागले नाही . आयुष्यातल्या त्या पहिल्यावहिल्या अपघातातून मी सहीसलामत वाचलो होतो ! पण खालच्या आईचे काळीज हलले होते . त्या दिवशी तिने आशाआतेला इतके धू धू धूतले की पुढे कित्यक महिने आशाआते तिच्यासमोर जायला धजत नव्हती ! अर्थात , मला हे कळण्याचे माझे तेव्हा वय नव्हते . पण पुढे अनेकदा हा किस्सा सांगितला गेला . केवळ माझ्याच बाबतीत नव्हे ; तर गावातल्या अनेकांच्या बाबतीत तिचे किस्से आजही ऐकायला मिळतात . ती होतीच तशी ! अनेकांना तिने ऐन अडचणीच्या वेळेला मदत केलेली होती . कोणताही सण असो , तिने कधी एकटीने साजरा केला नव्हता ! प्रत्येक सणाला तिच्याकडे बायका जमायच्या . तिचे नातेवाईकही यायचे . पण ती स्वत: स्वयंपाक करून सगळ्यांना आवर्जून वाढायची ! तिच्या हाताला चवही सुंदर होती . तिचे एक मात्र होते , तिने केलेला प्रत्येक पदार्थ पहिल्यांदा ती मला खाऊ घालायची ! मग ती पुरी असो , पुरणपोळी असाे ! ती कोंबडीचे मटणही खूप मस्त करायची. गंमत म्हणजे , ती काळीज स्वत: होऊन माझ्या ताटात वाढायची ! मला आवडायचे म्हणून , मटणात ती आवर्जून बटाटे घालायची ! मीही ते आवडीने खायचो . पहिला पदार्थ मला देण्यात , तिची नातवंडं , पतवंडं तिथे असली तरीही कधी खंड पडला नाही ! हे असं का होतं , हे मला कधीच समजलं नाही ! तिला विचारण्याची कुणाची हिंमत झाला नाही . माझीसुध्दा ! खूप काही लिहायचं आहे . लवकरच अशा अनेक आठवणी मी सविस्तर लिहिणार आहे ....
...............................
प्रत्येक कुटुंबासाठी
Important Appeal to all families in the world
MY DEAR FRIENDS ,
HERE IS AN APPEAL FOR YOU !
IT IS VERY VERY IMPORTANT TO ALL THE
MEMBERS OF EVERY FAMILY . THERE ARE
QUARRELS IN FAMILIES . PLEASE GIVE
YOUR REASON OR REASONS BEHIND THE
FAMILY DISPUTES . IT IS A WORLWIDE
QUESTION AND REALLY CLOSE TO EACH
ONE AND EACH FAMILY . HOPE YOU WILL
EXPRESS YOUR VIEWS ON THIS
IMPORTANT ASPECT TO EVERYBODY.
SEND ME EMAIL ON devidaspatiljm@gmail.com
मित्र हो !
या , आपण व्यक्त होऊ या !
मतांची देवाणघेवाण करू या !
विविध विषयांवर आपली अनेक मते असतात ; विचार असतात ! या मतांची आपण देवाणघेवाण केली तर ? नव्हे , करुयाच ! मला माहीत आहे तुम्हांला फार वेळ नसतो . म्हणून थोडक्यात भाष्य करु या . सुरुवात म्हणून , मी जिव्हाळ्याचा एक विषय इथे देतो आणि त्यावरचे माझे भाष्यही मांडतो . तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा असाच एक विषय आहे –
“ कुटुंबातील भांडणांची कारणे “
या विषयावर माझे मत पुढीलप्रमाणे आहे –
“ एखाद्या किंवा अनेक विषयांवरील वेगवेगळी मते कुटुंबात मतभेद निर्माण करतात . परस्परांबद्दल आपुलकी कमी किंवा अजिबात नसेल तर कुटुंब सदस्यांमधली ही दरी अधिक रूंद होत जाते . कौटुंबिक वादावादींची किंवा भांडणाची ही दोन अत्यंत महत्वाची कारण आहेत . “
याशिवाय , इतरही अनेक कारणे आहेतच की ! बघु या , तुमच्यापैकी कोण कोण , कोणत्या कोणत्या कारणांवर भाष्य करतो ते ! तुमचे वास्तववादी , पारदर्शक भाष्य साधारणतः १०० शब्दात लिहा. आपण कृपया मंगल फॉंंट वापरून माझा ईमेल आयडी ' devidaspatiljm@gmail.com 'वर ईमेल करा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट्स लिहा .
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

