शुक्रवार, २९ मे, २०२०

Sleepless night


मागे - पुढे

28.05.2020

       पुन्हा काही सांगायचे तर पुन्हा एकदा चार सहा दिवसांनी जरा मागे-पुढे पाहू म्हटले.  काळाचा अंदाज आताही घेतोच आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे. दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3 आणि दि . 18.05.2020 पासूनचा 4 थाही धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला होता. तोच आता चौथ्या टप्प्यात18 मे पासून 31 मे पर्यंत पुढे ओढण्यात आला आहे. तो पुढे वाढेल न वाढेल.  लॉक डाऊनमध्ये कायदेशीर आणि अवैध प्रवासी वाहतूक होऊन रत्नागिरी जिल्हयात अनेक चाकरमानी आले आहेत. कोरोना अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहेत. तसे तसे चित्र स्पष्ट होत जाते आहे. कालपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 195 झाली होती ती आज सकाळीच 196 झाली आहे. 05 वा मृत्यूही झाल्याची बातमी  आहे. माझे मित्र श्री. राजन किल्लेकर आणि श्री. अलिमियाँ काझी हे विविध बातम्या मला मेसेंजरवर व व्हॉट्सॲपवर नियमितपणे पाठवीत असतात. त्यांच्यामुळे गावात राहूनही शहरातल्याच नव्हे तर जिल्ह्यातल्याही ब्रेकींग न्यूज मला घरबसल्या मिळतात. मी त्यांच्या हया सहकार्याबद्दल त्यांचा ऋणी आहे.  ब्रेकींग न्यूजपेक्षाही झंझावाती असतात त्या लंबूवहिनीच्या भयंकर बातम्या ! खरंच, मेरा महान भारत सुशिक्षित झाला आहे का ? असा प्रश्न पडावा , असे लंबूवहिनीचा दुषित दृष्टीकोण पाहून वाटते. पासष्टीतली ही बाई योग्य अयोग्य ओळखू शकत नाही. ती पुस्तकी शिक्षण नसेल शिकली पण आयुष्याचे , माणूसकीचे  उघडे पुस्तक वाचू शकली नाही. अर्थात , काही उच्चशिक्षितांनाही हे जमलेले नाही , हेही कितकेच खरे आहे ! कोरोनाकडे अजूनही ते पक्षीय दृष्टीकोनातूनच बघत आहेत , हे या महान देशाचे दुर्दैव आहे ! 

           ..... तर इकडे म्हणजे मागच्या पुढच्या दारी सांगायच्या  आधी कालच्या रात्रीबद्दल थोडेसे. काल रात्री आम्हां दोघांनाही भयंकर स्वप्नांच्या मालिकांना सामोरे जावे लागले. तिला देवाघरी गेलेल्या तिच्या आईवरून स्वप्नें पडत होती तर मला वेगवेगळीच स्वप्ने पडत होती ! ती घाबरून उठली की मी तिला धीर दयायचो आणि जरा कुठे डोळा लागतोय नाही तोच मी स्वप्नं पडून जागा व्हायचो ! पुन्हा मला पडलेले स्वप्नं तिला सांगायचीही सोय नव्हती ! ती डबल घाबरली असती ! या काही स्वप्नातले एक विचित्र स्वप्नं तुमच्यासाठी नमूद करतो. माझ्या बायकोला प्लीज सांगू नका ! तीन ते सव्वातीनच्या दरम्याने पडलेले हे स्वप्न पहा. त्यात मी रत्नागिरीच्या जयस्तंभाजवळ रस्त्यात उभा असतो. मी पुण्याला मुलाकडे जाण्यासाठी रात्री नऊ वाजता तिथे वाहन बघत असतो. तिथे बसथांब्याच्या अलिकडे एक सतरा सीटर प्रवासी बस लागलेली होती. मी तिच्या मागील बाजुने आत जाऊन शेवटच्या सीटवर बसतो. तेवढयात आबा त्या गाडीत येऊन माझ्या पुढच्या सीटवर बसतो. मी त्याला कुठे जातोयस विचारल्यावर तो म्हणाला , इथे जवळच, गयाळवाडीला . मी गाडीत पाहतो तर गाडी पूर्ण भरलेली असते. पुढच्याच क्षणी ती सुटते आणि दोन मिनिटातच सिव्हील हाँस्पीटलजवळ थांबते. एक धिप्पाड तरूणी उठते आणि तीन चार पुष्पगुच्छ घेऊन खिडकीजवळ उभी राहते . मागून काही जण येतात त्यांना ती ते देते आणि परत जाग्यावर येऊन बसते. ती चक्क नवरी असते. माझा लक्ष तिच्या टोपी घातलेल्या नव-याकडे जाते. आता कुठे माझ्या लक्षात येते की ही गाडी लग्नाची आहे. ही त्यांच्या लहरीप्रमाणे जाणार आणि आपण पुण्याला कधी पोहचणार देव जाणे , इथेच उतरून घरी जावे आणि उद्या परत प्रयत्न करावा असे मला प्रकर्षाने वाटते. मी उतरायला बघतो इतक्यात मला जाग येते ! यानंतरही पावणेपाचच्या दरम्याने आणखी एक विचित्र स्वप्नं पडले पण ते आता आठवत नाही.

                 संध्याकाळी पाचच्या दरम्याने डोंबिवलीतून विलासचा फोन आला. गावात आलो तर चालेल काय ? मी म्हटले ये आणि चौदा दिवस होम क्वारंटाईन रहा. घर तर तुझेच आहे. प्रवासाची परवानगी आणि प्रवासात चेक नाक्यावर गाडया तुंबतात तेव्हा बाधीत होण्याचा धोका यांचाही विचार कर असे मी त्याला सांगितले. फोन ठेवला आणि शिल्लक पाणी बघायला गेलो. ते कमी असल्याने दोनच झाडे शिंपली आणि गप्प बसलो. आज पाणी आलेले नाही, पण उद्या येणार म्हटल्यावर टाकी थोडी रिकामी करून ठेवली. रात्री उशिरा आणखी 12 रूग्ण वाढून जिल्ह्यात एकूण रूग्णसंख्या 208 झाल्याचा संदेश आलाच. विचारांनी आम्हांला झोपच येईना. आता आम्ही साठीत आलोत. सहनशीलता आणि ताकतही कमी झाली आहे. इकडे आणि सासरवाडीतही दोन्ही कुटुंबात वडीलधारे असे आम्हीच आहोत ! सासूबाई गेल्यानंतर तर आम्हांला सख्खे वडीलधारे असे आता कोणीच उरले नाही. मनावर ताण येतो. आताही तेच झाले. रात्री सव्वा बारा वाजता मुलाला फोन लावला तर त्याची कंपनीबरोबरची मिटींग नुकतीच संपली होती. याच्यानंतर तो आंघोळ करणार , मग जेवणार आणि नंतर झोपणार ! उन्हाळयामुळे तो दोनदा आंघोळ करतो. त्याच्याशी आम्ही बोललो . तरी झोप येईना. शेवटी दोघांनीही ब-याच रात्रीनंतर आपापले मोबाईल उचलले आणि दोन वाजेपर्यंत त्यातच होतो.  माझे एक उत्तर क्वोरावर नऊ हजार सहाशे वेळा पाहिले गेल्याचे  वाचले. रात्री दोन वाजता मी क्वोरावर एका प्रश्नाला उत्तर दिले आणि पाठ लादीला टेकली.  रात्री तीन नंतर बहुधा डोळा लागला असावा. 
           
( क्रमश: )
...........











   








बुधवार, २७ मे, २०२०

Ek gazalmay aathavan

फेसबूकने आज खूप चांगली आठवण करून दिली.  एक गझलमय आठवणची पुढील लिंक पहा ....

गझलमय आठवण


 आज आदरणीय अरुणोदयजी भाटकर आपल्यात नाहीत ... त्यामुळे तर ही आठवण अधिक तीव्र झाली आहे .  एक गझल मित्र आपण हरवला आहे...दर भेटीत पुस्तके देणारे अरुणोदयजी भाटकर ...गझलेवर अतोनात प्रेम करणारे अरुणोदयजी भाटकर ...ही आठवण माझ्या हया मित्रास समर्पित.....



टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  

........

Hindi Gazal

खुदगर्ज

जलते जलते खुदहीकी आसुओमें बह गये हो
अपनीही कहानी खुदको आज तूम कह गये हो


क्या बात हैं या कोई बात नहीं , फिर तनहा क्यू ?
लगता हैं तूम अपनाही सितम खुद सह गये हो ...


जिंदगी कल क्या थी और वैसेभी आज क्या हैं ?
खुदके पास आते आते कितने तूम दूर रह गये हो ...


वैसेभी तूम मिलते नहीं आजकल किसीको, कहाँ गये ?
वजह हो गयी हैं कोई , या बता दो बीनावजह गये हो ?


अब संभलनाभी मुश्किल हैं जब खुदपर भरोसा नहीं
कितने तूम खुदगर्ज हो जो खुदमेंही ढह गये हो  !




...देवीदास हरिश्चंद्र पाटील

शनिवार, २३ मे, २०२०

Living with corona



मागे - पुढे

22.05.2020

        पुन्हा एकदा चार दिवसांनी जरा मागे-पुढे पाहू म्हटले.  काळाचा अंदाज आताही घेतोच आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे. दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3 आणि आज दि  18.05.2020 पासूनचा चौथाही धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला होता. तोच आता चौथ्या टप्प्यात आजपासून म्हणजेच 18 मे पासून 31 मे पर्यंत पुढे ओढण्यात आला आहे.  लॉक डाऊनमध्ये कायदेशीर आणि अवैध प्रवासी वाहतूक होऊन रत्नागिरी जिल्हयात सुमारे पंधरा हजार चाकरमानी आले आहेत. कोरोना अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहेत. तसे तसे चित्र स्पष्ट होत जाते आहे. कालपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 126 झाली होती ती आज 135 झाली आहे. 04 था मृत्यूही झाल्याची बातमी काल रात्री उशिरा कळली आहे. माझे मित्र श्री. राजन किल्लेकर हे विविध वर्तमानपत्रातील बातम्या मला मेसेंजरवर नियमितपणे पाठवीत असतात. चाकरमान्यांची आवक वाढतीच राहणार आहे. आता इकडेही कोरोनासवे जगावे लागणार हे उघड झाले आहे.

           ..... तर इकडे म्हणजे मागच्या पुढच्या दारी सांगायचे तर गेले दोन तीन दिवस सकाळी सहा वाजता उठलो की मी पुढच्या दारात तासभर फिरत राहतो. गरम्यामुळे लादीवर झोपतो. दोन पंख्यांची हवा लागत असते. नाही म्हटले तरी कोणी म्हटले नाही तरी आपला आपल्याला वात होतोच !😀😀😀😀😀 सकाळचे कोवळे ऊन्ह हळूहळू येऊ लागले की कसे बरे वाटते. माझ्या घराच्या पुढील दारातून आणि खिडक्यांमधूनही मस्त कोवळे ऊन्ह येत असते.  मी अगदी घरात बसून हे ऊन्ह अंगावर घेऊ शकतो आणि घेतोही !


 हो एक सांगायचे राहिलेच. मला काही विचित्र स्वप्नं पूर्वीपासूनच पडतात. सगळयांचेच अर्थ लगेच लागतातच असे नाही . काहींचे तर कधीच लागलेले नाहीत ! पण ही सर्वच स्वप्ने विचित्रच असतात व काही काळ मला तणावाखाली ठेवतात , हे मात्र खरं ! गेले सलग तीन दिवस अशी भयानक स्वप्ने पडत आहेत. परवा स्वप्नात , बाथरूममध्ये मी आंघोळ करत असतांना माझी नजर बाथरूमच्या खिडकीकडे जाते तर खिडकीच्या काचांऐवजी भिंतच दिसते आणि त्या भिंतींच्या पाच भोकांमधून पाच लहान बालकांची डोकी मानेपर्यंत आत आलेली. सुरूवातीला ती भूतेच वाटली पण नंतर माणसे असल्याचं लक्षात आलं. त्यांच्या डोळ्यांतले सेक्स अाॅर्गन्सबद्दलचे आव्हान मला स्पष्ट जाणवते. मी म्हणतो , थांबा , तुम्हांला बघायचेच आहे ना, मी दाखवतोच  ! असे म्हणून मी माझी अंडरपँट खाली सरकवू लागतो आणि तेवढयात मी स्वप्नामधून जागा झालो ! तेव्हा पहाटेचे पावणेतीन वाजले होते.  परवा पाच मुंडकी दिसली तर काल तीन जण  ( जे स्मशान कार्यात नेहमी पुढे असतात ! ) दिसले . आठवडा बाजारात मी येतो तर गांधी काँलनीला रस्त्यावर एका ट्रँवल्स बसच्या समोर पपू, दीपक आणि बंदू तिघेही एकत्र उभे ! खरे तर मला पुन्हा एकदा पाच गोष्टी दिसल्या. ते तिघे, ती बस आणि मी ! आज मात्र एकटी स्नेहा आमच्या अंगणात येऊन बोलतांना स्वप्नात दिसली ! अर्थात, अर्थ लागलेला नाही. पण विचारांना चालना मात्र मिळते आहे. ऊन्हं घेता घेता मी हाच विचार करतो आहे. सात वाजले की मी तुळशीची पाने खुडून काढा शिजत टाकतो. अर्ध्या तासाने तो चांगला उकळला की सौ. ला उठवतो. तिच्यावर गोळीचा अंमल असतोच. पण त्यातूनही ती एकदा उठली की सडसडीतपणे व पटापटा सगळे आवरते. हे तिचे वैशिष्ट्यच आहे ! चहा पिऊन झाली तोच बंदूची हाक आली. आज साडेआठ वाजता नळाला पाणी आले होते. आज कुठे जायचे नव्हतेच.  लॉक डाऊन सुरू झाल्यापासून काल पहिल्यांदाच मितेशच्या बाईकवरून शहरात जाऊन दोन तास फिरून आलो. शहर रिते ओस पडल्यासारखे वाटले ! तुरळक रहदारी दिसली तीच काय ती शहराच्या जिवंतपणाची खूण !


( क्रमश: )
...........











   








शुक्रवार, २२ मे, २०२०

Lovely fowarded messages


मित्र हो,
आता आपल्याला कोरोना विषाणूसोबतच काही काळ तरी जगायचे आहे. अनेक वादळेही येऊ घातली आहेत. एकूणच कठीण काळ आहे.  म्हणूनच या काळात अनेकांची मानसिक स्थिती चांगली राखणे , हे सर्वात महत्वाचे सामाजिक काम आपल्याला करायचे आहे.  यासाठीच हे एक सुंदर पान या ब्लाँगवर सुरू करीत आहोत.

हे एक पान आहे वाचकांना नवनवीन व्यक्तींकडून , ग्रूपसकडून , विविध ठिकाणांहून आलेले सुंदर संदेश जसेच्या तसे वाचायला देण्यासाठी. यातले काही संदेश फाँरवर्डेड आहेत व ते अन्यत्रही उपलब्ध असतील . पुन:प्रत्ययाचा आनंदही वेगळाच असतो , नाही का ? शिवाय , अनेक चांगल्या व्यक्तींची , समूहांची ओळखही वाचकांना व्हावी , हाही शुभ हेतू यामागे आहेच. यासाठीच , ज्यांनी हे संदेश पाठविले आहेत , त्यांची नांवे व मोबाईल नंबर्सही इथे नमूद करीत आहोत. समूहातील संदेशाच्या ठिकाणी समूहांचीही नांवे देण्यात आलेली आहेत. काही वर्तमानपत्रात समाजोपयोगी चांगल्या गोष्टी येतात. त्याही आपल्या मनावर बिंबण्यासाठी इथे देण्याचा प्रयत्न राहील. कठीण काळात मनोरंजन , माहिती , आपत्तीबाबतच्या सूचना याद्वारे  चांगल्या गोष्टींचा प्रसार करणे  हाही एक शुध्द हेतू यामागे आहेच.

व्हाॅटस्अप ग्रूप : जनसेवा ग्रंथालय वाचकगट , रत्नागिरी

फाॅरवर्डेड बाय : श्रीनिवास सरपोतदार
मोबाईल नंबर. :  8530887761

फाॅरवर्डेड मेसेज  :

*सुंदर मेसेज*.....

👉TEMPLE मध्ये 6 अक्षरें आहेत आणि MASJID मध्ये 6 CHURCH मध्येपण 6 आहेत...!!

👉GEETA मध्ये 5 अक्षरें आहेत आणि QURAN मध्ये 5  BIBLE मध्येपण 5 च आहेत....!!

👉LIFE मध्ये 4 अक्षरें आहेत आणि DEAD मध्येपण 4 च आहेत..!!

👉HATE मध्ये 4 अक्षरें आहेत आणि LOVE मध्येपण 4 च आहेत...!!

👉NEGATIVE मध्ये 8 अक्षरें आहेत आणि POSITIVE मध्येपण 8 च आहेत..!!

👉FAILURE मध्ये 7 अक्षरें आहेत आणि SUCCESS मध्येपण 7 च आहेत...!!

👉BELOW मध्ये 5 अक्षरें आहेत आणि ABOVE मध्येपण 5 च आहेत..!!

👉CRY मध्यें 3 अक्षरें आहेत आणि JOY मध्येपण 3 नच आहेत..!!

👉ANGER मध्ये 5 अक्षरें आहेत आणि HAPPY मध्येपण 5 च आहेत..!!

👉RIGHT मध्ये 5 अक्षरें आहेत आणि WRONG मध्येपण 5 च आहेत..!!

👉RICH मध्ये 4 अक्षरें आहेत आणि POOR मध्येपण 4 च आहेत...!!

👉FAIL मध्ये 4 अक्षरें आहेत आणि PASS मध्येपण 4 च आहेत...!!

एकमेकांच्या विरोधी असणारे शब्द किती मोठी समानता जपून आहेत.
तर मग आपण माणसामाणसांत इतका भेदभाव का मानतो.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


व्हाॅटस्अप ग्रूप : निर्मिती ग्रामसंघ , मि-या - रत्नागिरी

फाॅरवर्डेड बाय : अशोक . मोबाईल नंबर  : 9518322583

फाॅरवर्डेड मेसेज  :


कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये गेले एक महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या सेवेमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर आदित्य शिंदे यांनी दिलेला सल्ला तुम्हा सगळ्यांसाठी लिहून पाठवत आहे तुम्ही पण नक्की वाचा तुमची पण भीती नक्की कमी होईल
😊😊😊

जर कोरोना व्हायरस वर अजुन औषध निघाले नाही , तर मग जगातील 1 लाख 21 हजार 197 लोक बरे कशे झाले ?
त्यांनी बरे होण्यासाठी काय केले?
जर भविष्यात तुम्हाला किंवा शहरातील नातेवाईक व मित्र यांना हा आजार झाल्यास , डॉक्टर त्यांना कसे उपचार करतील ?
सर्वांच्या मनातील अनुत्तरीत प्रश्न !

*म्हणूनच या विषयी थोडीसी माहिती ....*

कोरोना हा विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर तुमच्या फुफ्फुसां(Lungs) मध्ये जाऊन बसतो. त्यानंतर तो आपल्यावर आक्रमण करतो. आपली फुफ्फुसे त्याला प्रतिकार करण्यासाठी एका द्रव पदार्थाचे स्रवण करतात . ( ज्याला सर्वजण शेंबूड/Mucus म्हणतात).  या Mucus मुळे आपल्या शरीराची ऑक्सिजन शोषण करण्याची क्षमता कमी होते. या आजारात मृत्युचे प्रमाण 3% आहे . म्हणजेच , जर १०० व्यक्तींना हा आजार झाला तर त्यापैकी ३ व्यक्ती मरण पावतात आणि ९७ व्यक्ती बरे होतात.
मग प्रश्न हा आहे , या ३ व्यक्ती का मरण पावल्या आणि ९७ जण कशे बरे झाले?

ज्यांचे वय वर्ष १० ते ५० यामध्ये आहे व ज्यांना कोणताही इतर आजार नाही , तसेच ज्यांचे आरोग्य ठीक आहे, त्यांच्या शरीरात हा विषाणू गेल्यानंतर , त्या विषाणू बरोबर आपले शरीर ७ ते ८ दिवस युध्द करते आणि ७ ते ८ दिवसात कोरोना व्हायरसला मारून टाकते.
चीन मधील भारतीय डॉक्टर *Dr. Sanjiv Chube* ज्यांनी स्वतः 30 हजार ते 40 हजार कोरोना व्हायरस बाधीत व्यक्तिवर उपचार केले . ते सांगतात , यावर काही औषध जरी नाही घेतले , तरी तुमचे शरीर ७ ते ८ दिवसामधे या कोरोना व्हायरसला मारून टाकते .  ते असे पण सांगतात, 85% रूग्ण हे घरी राहून बरे झाले आहेत . आम्ही त्यांना Antiviral medicine दिली.
Antiviral medicine म्हणजे विशेष़ काही नाही......
आपल्या भारतात मिळणारी VICKS ACTION 500 ही सुद्धा एक Antiviral Medicine आहे . ती तुम्ही वापरू शकता. (तत्पूर्वी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.)  तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल... असे डॉ Sanjiv Chaube सांगतात.

*मग ज्या व्यक्ती मरण पावल्या त्या का मरण पावल्या ?*

जेव्हा व्हायरस फुफ्फुसांमध्ये जातो , तेव्हा त्याला प्रतिकार करण्यासाठी फुफ्फुसे  mucus/ शेंबडाचे स्रवण करतात व त्यामुळे आपली ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते... जे तरूण आहेत ते ही स्थिती सहन करतात आणि त्या विषाणूला पूर्णपणे मारुन  ७ ते ८ दिवसात बरे होतात . पण जे म्हातारे आहेत, ज्यांचे वय ६० च्या वर आहे, ज्यांना कँसर, ब्लड प्रेशर, हृदय विकार इत्यादीं सारखे आजार आहे, ज्यांची प्रतिकार क्षमता कमी आहे , त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.  कारण त्यांची फुफ्फुसे कमजोर आहेत व ते फक्त ऑक्सिजन त्यांच्या पूर्ण शरीराला न पोहचू शकल्यामूळे मरत आहेत.


*आता हॉस्पीटलमध्ये काय उपचार होतात ते बघा.......*

कोरोना बाधित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये Admit केल्यानंतर डॉक्टर त्याला शक्यतो ग्लूकोजचे सलाईन देतात. त्याचबरोबर साधे Antiviral medicine देतात.
जर त्यांना वाटले की या व्यक्तीची ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होत आहे , तरच ते Extra ऑक्सिजन देतात किंवा Ventilator वर ठेवतात, अन्यथा नाही. बऱ्याच व्यक्तींना याची आवश्यकता पडत नाही. तसेच ते तुम्हाला दोन वेळचे जेवण आणि एक वेळ नाश्ताही देतात. ९ ते १० दिवसात परत तुमची टेस्ट घेतली जाते व ती जर Negative आली , तर तुम्हाला घरी सोडले जाते.

कोरोना झाल्यावर खाण्यापिण्याची काहीही पत्थ्ये नाहीत .
पोटभर जेवा,
आराम करा,
व्यायाम करा.
फक्त...
सर्दी व कफ होईल असे पदार्थ खाऊ नका किंवा कटाक्षाने टाळा.
( थंड पाणी, Cold drink, Ice cream etc.)
पुण्यामधे काही MNC कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना Vitamin C /टॅब्लेटचे वाटप केले आहे , ज्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
इटली मध्ये ७ ते ८ हजार व्यक्ती मरण पावल्या , कारण त्या देशात २१% लोक वृद्ध आहेत. युरोप खंडात सर्वाधिक वृध्द व्यक्ती इटलीमध्ये आहेत.

त्यामुळे या आजाराला घाबरू नका. घरी रहा, सकस आहार घ्या, व्यायाम करा आणि तुमचे आई वडील, भाऊ बहिण , मित्र व नातेवाईक यांना व्यवस्थित समजून सांगा . कारण त्यांची भिती व गैरसजूत घालवणे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
कारण.....

*!!! भित्यापाठी ब्रम्हराक्षस !!!*

चला तर मग.....
आपल्या मनातील भिती थोडी का होईना , नक्कीच कमी झाली असेल , याचा विश्वास वाटतो .

धन्यवाद .

 🙏🙏🙏🙏🙏
................
व्हाॅटस्अप ग्रूप : जनसेवा ग्रंथालय वाचकगट , रत्नागिरी

फाॅरवर्डेड बाय : श्रीनिवास सरपोतदार

मोबाईल नंबर. :  8530887761

फाॅरवर्डेड मेसेज  :

जैवविविधतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दर वर्षी २२ मे रोजी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा केला जातो. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाची संकल्पना आहे - ‘अवर सोल्युशन्स आर इन नेचर.’ म्हणजेच ‘आमच्या समस्यांची उत्तरं निसर्गात आहेत.’...

याविषयी अधिक वाचण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5625487307552041470
......
_‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख, बातम्या, व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/917447792795 येथे क्लिक करून Hi असा मेसेज पाठवावा. तुम्ही ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या कोणत्याही ग्रुपमध्ये अगोदरच असाल तर पुन्हा हे करण्याची गरज नाही._

............

संदेशकर्ता  : जादूगार मनोहर भाटकर

सुप्रभात 👏🙏🎩, 24 मई 2000 फिल्म जगत के मशहूर शायर *मजरूह सुल्तानपुरी* जी का देहान्त *मुंबई* मे हुआ, उन्हे *श्रद्धांजलि अर्पित करते है* 🌹👏, उनका जन्म यु.पी. के आजमगढ़ जिल्हे के सुल्तानपुर में हुआ, उनका पढाई मे ध्यान नही था गुजारेके लिए वह दवाईया बनाने सीखें और हाकिम का काम करनें लगे यह काम करते करते वोह शायरी करने लगे, उन्हें उस जमाने के मशहूर निर्माता-निर्देशक *करदार* जी ने पहला मोका दिया, उनके गाने भावपूर्ण और रोमँटिक रहते थें, 1993 मे वह *दादा साहब फालके* पुरस्कार हासिल करने वाले पहले शायर थे, उन्हें 1965 मे *फिल्म फेअर अवार्ड* मीला था, भारत सरकार ने उनका *पोस्ट टिकट* निकालकर सन्मानित किया था, 🌹

..............

उष्णतेची लाट येऊ घातली आहे . काय परिस्थिती होऊ शकते ? याची माहिती दि. 27.05.2020 च्या दै. रत्नागिरी टाईम्स या वर्तमानपत्रातून साभार .
.................

फाॅरवर्डेड बाय : श्री . दत्ताराम गोपीनाथ नरवणकर सर, रत्नागिरी
                       माजी फोरमन ,  आय. टी.आय.

मोबाईल नंबर. :  91375 68674


🙏 *वेळ काढून वाचावे असे* 🙏     

जिवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे.....
                    🌵
               *बाभळीच्या*
               *झाडाशेजारी*
                  *केळीचे*
                   *झाड*
                  *वाढले*
                     ❕
                    *तर*
                     ❗
                *बाभळीच्या*
                 *काट्याने*
                  *त्याची*
                  *संपुर्ण*
                   *पाने*
                  *फाटून*
                  *जातात.*
                    🌿
                    *या*
                   *उलट*
               *चंदनाच्या*
               *झाडाशेजारी*
                 *लिंबाचे*
                  *झाड*
                 *वाढले*
                   *तर*
               *लिंबाच्या*
               *गाभ्याला*
               *चंदनाचा*
                *सुवास*
                 *येतो*
                    🌾
            *श्रीकृष्णाच्या*
             *सहवासाने*
                *अर्जुन*
               *सर्वश्रेष्ठ*
                *योध्दा*
                 *झाला.*
                   🍂
                *याउलट*
             *दुर्योधनाच्या*
              *सहवासाने*
                 *भीष्म,*
                  *कर्ण*
                *सर्वश्रेष्ठ*
                *असुनही*
                 *त्यांचा*
                  *नाश*
                 *झाला.*
                   🌳
                *आपण*
             *"ज्यांच्या"*
                *सोबत*
                *रहातो*
               *त्यांच्या*
                  👇
             *विचारांचा,*
                  👇
             *रहाणीचा,*
                  👇
             *वागण्याचा,*
                  🚸
            *"अंमल"*
                 *हा*
           *आपल्यावर*
               *होत*
              *असतो.*
             🎊👏🎊

            *"संगतीने*
               *विचार*
                *श्रेष्ठ*
              *अथवा*
               *दुषित*
               *होतात"*
                  🙏

               *म्हणून*
            *चांगल्यांची*
               *संगत*
                *धरा*
                 *व*
              *आपले*
               *जिवन*
              *सुखकर*
                *करा.*

 *आपलं "वय" व "पैसा"* *यांच्यावर कधीच*
*घमेंड करू नये,*
*कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात*
*त्या नक्कीच संपत असतात ...*

*" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"*

*1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत*
*2:-"समाज" स्मशाना पर्यंत*
*3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत*

      *फक्त आणी फक्त*
              *"कर्म"*
          *ईश्वरा  पर्यंत*

*जिच्या उदरात जन्म होतो ती माता,*
*आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती*
*यातील वेलांटीचा फरक*
       *म्हणजेच माणसाचे जीवन...*
🙏🌷🙏
.......................


फाॅरवर्डेड बाय : श्री . दत्ताराम गोपीनाथ नरवणकर सर,
                       माजी फोरमन ,  आय. टी.आय.

मोबाईल नंबर. :  91375 68674

एक सुंदर फाॅरवर्डेड संदेश :

*👌मीच मला सांगतो👌*
   ********************

*झाली साठी,येईल सत्तरी*
*करत नाही मी चिंता*
*प्रत्येक दिवस मजेत जगतो*
*वाढवत नाही गुंता*

*वय झालं म्हातारपण आलं*
*उगीच बोंबलत बसत नाही*
*विनाकारण बाम लावून*
*चादरीत तोंड खुपसत नाही*

*तुम्हीच सांगा खेळायला  जायला*
*वयाचा संबध असतो का ?*
*नेहमी नेहमी घरात बसून*
*माणूस आनंदी दिसतो का ?*

*पोटा पाण्यासाठी पोरं*
*घर सोडून जाणारच*
*प्रत्येकाच्या आयुष्या मधे*
*असे रितेपण येणारच*

*करमत नाही करमत नाही*
*सारखे सारखे म्हणत नाही*
*मित्रां सोबत दिवस घालवतो*
*घरात कुढत बसत नाही*

*घरातल्या घरात वा बागेत*
*हिंडाय-फिरायला जातो*
*वय जरी वाढलं तरी*
*रोमँटिक गाणं गातो*

*गुडघे गेले , कंबर गेली*
*नेहमी नेहमी कण्हत नाही*
*आता आपलं काय राहिलं*
*हे बोगस वाक्य म्हणत नाही*

*पिढी दर पिढी चाली रीतीत*
*थोडे फार बदल होणारच*
*पोरं पोरी त्यांच्या संसारात*
*कळत नकळत गुंतणारच*

*तू-तू , मैं-मैं  , जास्त अपेक्षा*
*कुणाकडूनही करत नाही*
*मस्तपैकी जगायचं सोडून*
*रोज रोज थोडं मरत नाही*

*स्वतःलाच समजून घेतो*
*पुढे पुढे चालत राहतोे*
*वास्तू तथास्तु म्हणत असते*
*हे उमजुन मी जास्तीच जगत असतो*

  (सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ मंडळींना समर्पित)
.................


फाॅरवर्डेड बाय : श्री . अशोक विष्णू पेडणेकर,
                       स्थापत्य अभियंता,  सावंतवाडी , जि. सिंधुदुर्ग

मोबाईल नंबर. :  70381 73861


फाॅरवर्डेड मेसेज  :

तुम्हांला आठवतंय :

👉 ग्रामपंचायत मध्ये आलेला ब्लैक ऐण्ड वॉईट टिव्ही...?

👉 तो दूरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो

👉 दूरदर्शनचा तो पट्टया-पट्टयाचा स्क्रीनसेव्हर

👉 मालगुडी डेज

👉 देख भाई देख

👉 रामायण / महाभारत...

👉 जंगलबुक मधील मोगली...

👉 चंद्रकांता....(याक्कू)

👉 मिले सुर मेरा तुम्हारा...

👉 टर्निंग पॉइंट...

👉 भारत एक खोज...

👉 अलिफ लैला...

👉 ब्योमकेश बक्षी

👉 तहकीकात

👉 ही मॅन..

👉 सलमा सुलताना - ती दुरदर्शनवरची न्युज रीडर

👉 विको टरमरिक, नहीं कौस्मेटीक....
विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम...

👉 दर रविवारी मराठी चित्रपट...

👉 ट्वँ.........ग!

👉 वाशिंग पाउडर निरमा...
वाशिंग पाउडर निरमा...
दुध सी सफेदी,
निरमा से आयी...
रंगीन कपडे भी खिल-खिल जायें!

👉 निळू फुले यांची चहाची जाहीरात...

👉 घराला घरपण देणारी माणसं...

👉 आय ऐम कॉम्प्लॅन बौय [छोटा-शाहिद कपुर] आणि आय ऐम कॉम्प्लॅन गर्ल [छोटी-आयेशा टाकिया]

👉 "सुरभि" वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ

👉 आणि त्यानंतरचे - "मुंगेरीलाल के हसिन सपने", करमचंद, विक्रम वेताळ आणि असे बरे........च!

८० आणि ९० सालचा काय काळ होता तो!

नो सिटबेल्टस् ... नो एअरबॅग्ज .... ट्रकच्या मागच्या 'फाळक्यात' बसणेही एक पर्वणी असायची!

लहाण मुलांच्या त्या रंगबिरंगी "बाबा-गाड्या" ... "टँपरप्रुफ बाॅटल टॉप्स" चा अता-पता ही नाही!

सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्डचा तुकडा लाऊन त्याचा फटरररररार - मोटार सायकल सारखा - आवाज करत तासन्-तास फिरायचे..

त्या सायकलच्या शर्यती...
नो सेप्टी हेल्मेट्स,
नो क्नी / एल्बो पॅड !

तहान लागली की ओढ्यातील ढवरयाचे पाणी प्यायचे...

नंतर गावात सार्वजनिक नळकोंडाळे आल्यावर नळालाच तोंड लाऊन पाणी पिणे...

बॉटल्ड वौटर - एक रहस्यच होते!

ते पोष्टाची तिकीटं...
काडीपेटीचे कव्हर्स आणि बरंच काही जमा करण्याचा आणि जोपासण्याचे छंद...!

सुट्टीच्या दिवशी,
दिवसभर उनाडक्या - खेळ..
मात्र अंधार व्हायच्या आत घरी,
ब-याचदा अगदी जेवणाच्याच वेळी...!

घरातील सर्वांनी वरांड्यांत एकत्र बसून जेवन करण्याचे ते दिवसच वेगळे होते नाही का...?

खेळाच्या नादात अनेकदा पडलेले दात,
खरचटलेलेे हात - पाय ...
मात्र कुणीही तक्रार करायची नाही...!

मित्रांसोबत चालत शाळेत जाणं...
मोबाईल शिवाय सुध्दा आम्ही एकमेकांना नेहमीच शोधुन काढत असू! कसं? काही माहित नाही..!

खाण्यात अगदी केक, ब्रेड, चॉकलेटस्, निंबुपाणी, साखरेचा तो आले-पाक...
सगळं चालायचं...
नो डायट-नथिंग!!

मित्रांना खेळायला बोलवाची ती ट्रीक-बेल न वाजवता अगदी चुपचाप मागच्या रस्त्याने जाणं...

बॅटच्या जागी ते लाकडी फळीचे क्रीकेट, त्या आट्या-पाट्या, सुरपारंब्या... डॉक्टर-डॉक्टर, लपाछपी ...
असे किती तरी खेळ....

परीक्षेत नापास झालो तरी त्याच ग्रेडवर - वरच्या वर्गात ढकलला - अशी सोय.....
नो नीड टु विजिट सायकॅट्रिस्ट, सायकोलोजिस्ट वा कौन्सेलर्स...
काय दिवस होते ते...!

स्वातंत्र्य, यश, अपयश , जबाबदा-या ...
आणि या सर्वांसोबत एकमेकांबद्दल कमालीचा आदरही द्यायला अन् घ्यायलाही शिकलो..

................

................

तुम्ही ही याच 'कालखंडातील' आहात का?
हो..! तर मग मित्रांनाही याचा उल्लेख करा....
काय सांगावे कदाचित हे वाचुन
अन् मित्रांचा थोडा स्ट्रेस कमी होईल...

नाहीच झाला तर वाढणार नाही हे मात्र नक्की...

.................................

चक्रीवादळाबाबत रत्नागिरीकरांना महत्वाचे आवाहन


*माझ्या बंधू-भगिनींनो,*

 *आपणा सर्वांना मी येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना देऊ इच्छितो.*

2, 3 व 4 जून 2020 या तारखांना एक चक्रीवादळ अरबी समुद्रातून आपल्या रत्नागिरी किनाऱ्याजवळून पुढे उत्तर दिशेला जाणार आहे. या दिवशी अत्यंत महत्वाचे वा तातडीचे काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा या दिवशी घरीच थांबा.

कृपया आपल्या घरांमध्ये औषधांसह पाणी, अन्न आणि अत्यावश्यक वस्तूंचा साठा करा आणि वीजप्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपली संपर्क साधने (मोबाईल फोन्स) वेळीच चार्ज करून ठेवा.

आपल्या घराच्या जवळ एखादे मोठे झाड असेल, किंवा नगरपालिकेचा जाहिरात बोर्ड किंवा होर्डिंग असेल तर त्या नजिकच्या खोलीत थांबणे टाळा. खिडकीजवळ कोणतीही वाऱ्याच्या धक्क्याने पडू शकेल अशी वस्तू ठेऊ नका, तसेच खिडकीतून आतमध्ये बाहेरील कोणतीही वस्तू उडत येणार नाही याची खात्री करून ठेवा.

गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्यास कृपया जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा.

रत्नागिरी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष
टोल फ्री क्र : 1077
दूरध्वनी: 02352-226248

आपल्या परिचयातील सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचवा.

--  *राजीव यशवंत कीर , मांडवी रत्नागिरी*

.............


.................

व्हाॅटस्अप ग्रूप : तंत्रशिक्षण समन्वय

फाॅरवर्डेड बाय :
मोहन चंपतराव एस.

संदेश : 

🙏🏻 *सावधान* 🙏🏻
😳😳       😳😳
*पोलीस आयुक्तांकडून सूचना*   
आपल्या ग्रुप मधील सर्व लोक जबाबदार आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणारे नागरीक आहात. याचा मला अभिमान आहे.

आतां आपलयाला या पुढे म्हणजे 8/6/2020  पासून लॉकडाउन अंशतः / पूर्णपणे काढल्यास फार काळजी घ्यावी लागणार आहे. कारण या पुढे  खालील प्रकार घडू शकतात..
          या कालावधीत बर्‍याच जणांची धंदा  नोकरी गमावल्यामुळे / व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे, काही विक्षिप्त लोकांकडून गुन्हे घडण्याची‌ शक्यता आहे.
          घराबाहेर रहदारीच्या नियमांचे पालन करण्यात, *आपण स्वतःची व आपल्या वस्तूंचे संरक्षण करण्यात कृतीशील असणे* आवश्यक आहे.

          आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे,
          महागडी घड्याळे घालू नका. चैन साखळ्या,घरातील महिलाना सोन्या चे  कानातले बांगड्या घालू नका,  आपल्या हाताच्या पिशव्यांबाबत सावधगिरी बाळगा.
          आपल्या *मोबाईल फोनचा जास्त उपयोग* गर्दीत लोकांमध्ये करु नका. सार्वजनिक ठिकाणी मोबाइल वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.

.           आवश्यक पैशापेक्षा *जास्त पैसे* कॅश जव़ळ ठेऊ नका.
.          आपण बाहेर‌ जात असताना आपले *क्रेडिट आणि डेबिट कार्ड* सुरक्षित ठेवा.
              आपल्या वडीलधारी, पत्नी आणि मुले सुरक्षीत आहेत की नाही हे पहाण्यासाठी, *वेळीच कॉल* करा.

          . घराच्या लोकांना सूचना द्या की दरवाजा ऊघडताना, *मुख्य दरवाजापासून एक सुरक्षित अंतर ठेवा,* शक्य असल्यास ग्रील गेट्स, ग्रिलच्या जवळ जाऊ नका.
               मुलांना वेळोवेळी *शक्य तितक्या लवकर* घरी परत जाण्याची सूचना द्या.
               घरी पोहोचण्यासाठी निर्जन किंवा *शॉर्ट कट रस्ते* घेऊ नका, प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त मुख्य रस्ते वापरा.
             जेव्हा आपण बाहेर असाल तेव्हा आपल्या *आसपासच्या हालचालींवर लक्ष* ठेवा. मोबाईल वर गुंतू नका.
.           नेहमी आपत्कालीन *मदत क्रमांक* जवळ हाताला ठेवा.
           लोकांपासून जास्तीत जास्त *सुरक्षित अंतर* ठेवा.
              सगळेच जण‌ बहुधा *मुखवटा परिधान* करणारे असतील‌ त्यामुळे गुन्हेगार ओळखणे कठीण जाईल.
              जे कॅब टॅक्सी सेवा वापरतात, त्यांनी प्रवासाचा तपशील आपले पालक, भावंड, नातेवाईक मित्र किंवा संरक्षकांसह सामायिक करा. प्रत्येक वेळी कॅब क्रमांक त्यांना मेसेज करा.

  कमीत कमी रोख व्यवहार करा आणि सुटे पैसे जवळ ठेवा.

 आवश्यकता नसल्यास खरेदी करू नका.
मोठे व्यवहार शक्यतो एकट्याने करू नका. वाद करु नका.
             वाहनांमध्ये लॉक मध्ये *कोणतीही मौल्यवान वस्तू* सोडू नका. काचा फोडल्या जाऊ शकतात.

         विनाकारण बाहेर भटकू नका.

             पुढील काही महिन्यांपर्यंत किंवा एकंदरीत *परिस्थिती सुधारण्यापर्यंत याचे पालन करावे लागेल.* 

*सुरक्षित रहा*🙏🏻

महाराष्ट्र पोलिसां तर्फे सार्वजनिक हितासाठी प्रसारीत..
......


व्हाॅटस्अप ग्रूप : जनसेवा ग्रंथालय वाचकगट , रत्नागिरी

फाॅरवर्डेड बाय : श्रीनिवास सरपोतदार

मोबाईल नंबर. :  8530887761

फाॅरवर्डेड मेसेज  :

*राजापूरच्या या जगदविख्यात चित्रकाराची* *भेट आता पुन्हा कधीच होणे नाही*.... !
         जन्म 1951 मुंबई येथे. शाळेत मस्ती करतो.घरचच्यांचे ऐकत नाही.त्रास देतो ...मग शिक्षा म्हणून त्याला गावी पाठवले जाते.तर गावी पण तेच उद्योग. शाळेत जातो म्हणून सांगून नदीवर, जंगलात मित्रासोबत ऊनाडक्या ..शेवटी या मस्तीखोर मुलापुढे त्याच्या आजी आजोबांनी देखील हात टेकले.. म्हणून पुन्हा याचे वडील राजापूरला येऊन त्याला मुंबईला घेऊन जातात... याचा शालेय अभ्यासक्रमात रस नाही हे जाणून कागद,रंग,ब्रश याच्या आवडीखातर चित्रकलेचे शिक्षण घ्यायची  परवानगी वडील नाईलाजाने त्याला देतात.....  आयुष्याला योग्य वेळी मिळालेल्या या संधीचे सोने मात्र या मुलाने केले. 1977 मधे जीडी आर्टस( ड्रॉईंग अॅन्ड पेंटींग ) चा शासनमान्य डिप्लोमा पूर्ण केला.मुलंड येथे वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालयात कला शिक्षक म्हणून नोकरी केली.चित्रकला विश्वात मग याने कधी मागे वळून पाहिलेच नाही.जहांगीर आर्ट गॅलरी हे त्यांचे होम ग्राउंड झाले.  आपल्या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीने जागतिक स्तरावर आपल्या चित्राची अनेक प्रदर्शन भरवली भारतात मुंबई,चेन्नई,बेंगरूळ,दिल्ली,वाराणसी, कोचीन.... तर परदेशात फ्रान्स, जर्मनी, लंडन,लेक्झेंबर्ग,बेल्जियम,नेपाळ,
स्वित्झलॅड,अमेरिका... एकट्यानेच 75 तर 150 हून अधिक सांघिक प्रदर्शन भरवली...
आपल्या चैतन्यशील व वास्तववादी लॅन्डस्केपनी जगातील चित्रकला प्रेमींवर मोहिनी घातली. वाराणसी येथील धार्मिक
नदी घाटावरची त्यांची चित्रे जागतिक स्तरावर विषेश गौरवली गेली. सोथेबीज , क्रिस्ट्री येथील आंतरराष्ट्रीय लिलावात त्यांची चित्रे चाहत्यानी विक्रमी किंमतीत विकत घेतली. चित्र काढताना त्यानी नदी घाटावरील पाय-या- पाय-या दर्शवताना त्यात जिवंतपणा येण्यासाठी कॅनव्हासवर ब्रश ऐवजी पॅलेट चाकूचा वापर केला. ही त्यानी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी शैली त्यानी विकसीत केली . जगभरात नावलौकिक कमावला. त्यांची चित्रे बघताना आपणच त्या ठिकाणी आहोत आणि ते समोर दृश्य पहातोय इतके वास्तववादी साकारलेली असत.
उगवत्या सूर्याची उष्णता आपल्या अंगाला जाणवावी इतकं प्रत्यशदर्क्षी अनुभव देणारे चित्र साकारण्याची त्यांची हातोटी अद्वितीय होती.....
असा हा असामान्य कलाकार राजापूरला गावी आल्याचे मला कळले.त्यांच्या भावाकडून फोन मिळवला आणि त्यांना फोन लावला. हॅलो, मी फोटोग्राफर प्रदिप कोळेकर बोलतोय मला तुमची दोन मिनिटे हवेत.माझं वाक्य पुरे व्हायच्या आत आपण कोळेकर...म्हणजे दादा कोळेकर, नगराध्यक्ष होते त्यांचे कोण ? माझा धीर चेपला म्हटलं मी त्यांचा पुतण्या मला तुमची भेट हवेय.मला आपल्या शालेय जीवनातील राजापूरच्या वास्तव्याबद्दल तसेच चित्रकलेतील आपल्या प्रवासा बद्दल जाणून घ्यायचे आहे.तुम्ही जगप्रवास केलाय तरि देखील तुमच नात  राजापूरशी घट्ट आहे.तुम्ही येथे समुद्र किनारी जागा घेऊन विविध फळांची बागायत केली आहात.तेही पहायला यायचयं मला, कधी भेटायला येऊ ? तू भेटायला नक्की ये ! दादांचा पुतण्या आणि फोटोग्राफर आहेस, तर मला भेटायला आवडेल मी सकाळी मुंबईला चाललोय आत्ता मी फार्म हाऊस वर आहे.आज तुला नाही जमल तर मी परदेशातील माझे एक्झीबीशन आटपून परत राजापूरला आलो की तुला फोन करेन मग भेटू .मला लहानपणी राजापूरला शिक्षा म्हणून पाठवल होत.या राजापरच्या मातीतच माझ्या कलेची बीज आहेत.मी या मातीचा ॠणी आहे.मला पुढे राजापूरलाच वास्तव्याला यायचयं.भेटुया आपण...
मला त्यानी आश्वस्त केल्याने, त्यांचे फार्म हाऊस दुर असल्याने एवढ्या सायंकाळी मला जाणे सोयीस्कर न्हवते म्हणून त्यांचे आभार मानून व तुमच्या फोन च्या प्रतिक्षेत मी राहीन हे सांगून फोन ठेवला.त्यावेळी असे सुतराम वाटल नाही की हे त्यांच्या माझ्यातील  शेवटचे संभाषण असेल......
काल बातमी आली हृदयविकाराने वयाच्या 69 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले ( 1951 ते 2020 ).......
राजापूर च्या या जागतिक दर्जाच्या चित्रकाराचे नांव ......
 *यशवंत*बाळकृष्ण *शिरवडकर* गांव-दोनिवडे, राजापूर.. फार्म हाऊस आंबोळगड, ता.राजापूर
 या घटनेचे अतिव दुःख झाले...
बातमीची त्यांच्या नातेवाईकांकडे खातरजमा केली..
या असामान्य प्रतिभा असलेल्या कलाकाराला
आपलंस करण्यात आपण कमी पडलो,ही सल तेव्हा जास्त वेदना देऊन गेली जेव्हा संकेतस्थळावर त्यांच्या महान कलेचा चढता आलेख पहात होतो.2014 मधे 
आपल्या शेजारील देवरूखच्या पित्रे संग्रहालयने त्याची दखल घेऊन त्यांच्या चित्रकलेचे प्रदर्शन भरवून उदयोन्मुख कलाकारांना प्रेरणा दिली....
            ते राजापूर येथे येऊन देखील मी 
त्यांची भेट घेऊ शकलो नाही.याची खंत मनाला लागून राहीली, जी कधीही दुर होणार नाही....
प्रदिप कोळेकर आणि परिवार शिरवडकर
कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग आहेत..
एका महान कलाकाराला ईश्वराचे कडून स्वर्ग प्राप्ती लाभो...🙏😪
कलाप्रेमी व जिज्ञासूंना कै.यशवंत शिरवडकर यांचे विषयी जाणून घ्यायचे असल्यास खाली लिंक देत आहे.
 https://www.saffronart.com/artists/yashwant-shirwadkar

.......

व्हाॅटस्अप ग्रूप : तंत्रशिक्षण समन्वय

फाॅरवर्डेड बाय : श्री. विश्वास जाधव , 

मोबाईल नंबर. :  9860229098

संदेश : 

*ऋणानुबंध* 

        दुपारचं जेवण करून मी  बाहेर कट्ट्यावर पुस्तक वाचत बसलो होतो झाडाखाली. लॉकडाऊन मुळे सगळे घरातच होते. मी थोडं आजूबाजूला पाहिलं. सर्वत्र स्मशान शांतता होती. भर दुपारची वेळ होती. चांगलंच कडकडीत ऊन होतं. नाक्यावरून एक बाई डोक्यावर कापड घेऊन तोंडावर पदर ठेवून चालत येताना दिसली. कोण असेल? जरा जवळ आल्यावर बघितलं, तर अंदाज आला. माझी चुलतीच होती. मी बघून न बघितल्यासारखे केले आणि पुस्तकात डोकं घातलं. चुलती माझ्यासमोरून हळू हळू चालत गेली, हे मला जाणवलं. पण मी काही लक्ष दिले नाही.
गेली पंधराएक वर्षांपासून आमचं बोलणं नाही. चुलतीनेच बोलणं बंद केलं होतं. आमच्या ह्या वडिलोपार्जित वाड्यावरून वाद होता चुलत्यात आणि वडिलांत. वडील जाऊन पाच वर्षे झाली. घराच्या वाटणीत अर्धा वाडा त्यांना आणि अर्धा आम्हाला आला होता. आम्ही वरती खोल्या बांधून घर प्रशस्त, व्यवस्थित केले होते. शेजारी चुलता आणि चुलती राहायची. दोन घराच्या मधोमध भिंत बांधली होती चुलत्यानं. नंतर वाटणीच खूळ चुलतीनं काढलं होतं. भावकीतून कळले होते. आम्ही दोन्ही भाऊ कधी लक्ष देत नसू. आम्ही आणि आमचं घर एवढंच. कधी येणं जाणं नाही, बोलणं नाही. पण वडील जातांना एकच सांगून गेले होते- *माझ्या भावाला अंतर देऊ नका. तो चुकला असेल, तरी पण तो माझा भाऊच आहे!* हीच एक हुरहूर ते हृदयात घेऊन गेले.
       थोड्या वेळाने चुलती परत बाहेर आली आणि नाक्यावर गेली. मी पाहिलं, गाडी काढली आणि मागे गेलो. पुढं चुलती वळणावर उभी होती. मी तिच्यापाशी गेलो. विचारलं, काय गं काकू, काय झालं? चुलती थोडं घाबरल्या स्वरात म्हणाली, अरं, तुझ्या काकांच्या बीपी आणि शुगरच्या गोळ्या संपल्यात! दोन दिवस झाले, लै त्रास होतोय त्यांना! गाडी मिळत नाही ना! रिक्षा गाड्या सगळं बंद आहे!
मी म्हटलं, बघू गोळ्या पाकीट! तिनं जुने पाकीट दिले आणि दोनशे रुपयांची नोट देऊन म्हणाली, जमल्यास अर्धा किलो डाळ पण मिळाली तर घेऊन ये! मी पिशवी आणि पैसे घेऊन गाडीवरून निघालो.
चुलतीला एकच मुलगा होता, सुनील! आम्ही बंटी म्हणायचो. लहानपणी एकत्र खेळायचो. आम्ही एकत्र खात पीत. खेळायचो. तो मला दाद्या म्हणायचा. पुसटसं आठवते. पण नंतर येणंच बंद केलं त्यांनी. फार जीव होता माझ्या आईचा त्यांच्यावर ! आणि छोटी चिमू, ती पण फार गोड होती ! नंतर त्यांनी यायचेच बंद केल्यापासून परत बोलणं नाही!
चिमू परदेशी असते. पाच वर्षांपूर्वी आली होती आणि बंटी हा कलकत्त्यात असतो. लव मॅरेज करून तिकडेच सेटल झाला. तो पण चिमू आली तेव्हाच दिसला होता. परत काही आला नाही.
चुलता भूसंपादन विभागातून सेवानिवृत्त झाला होता. पेन्शन वर घर चालत असेल! अधेमधे चिमू आणि बंटी पैसे पाठवत असतील! जर नसतील पाठवत, तर कसे दिवस काढत असतील, ह्या विचारांच्या घालमेलीत मेडिकलचे दुकान कधी आले कळालंच नाही! उतरून गोळ्या घेतल्या. दोन महिन्यांच्या एकदाच घेतल्या. परत त्रास नको म्हणून! बाजूला किराणा मालाचे दुकान चालू होतं. तिथून डाळी, तांदूळ आणि इतर भाजी व टमाटे, बटाटा, कांदा अशा वस्तू त्याच दुकानात घेतल्या. मग ते सर्व घेऊन निघालो, घरासमोर गाडी लावली. आई गेटसमोर आली होती. मी आईकडे बघत चुलत्याच्या घरात गेलो. चुलता खुर्चीवर बसला होता. त्यांनी माझ्याकडे बघितले. भिंतीवर वडिलांचा फोटो लावला होता. कुंकू लावलेल्या फोटोला बघून माझं मन भरून आलं. भावांचं प्रेम होतं शेवटी !
चुलती आली. मी पिशवी तिच्याकडे दिली. चुलती भारावून गेली होती. चुलता उठला. माझ्या डोक्यावर हात ठेवत डोळे पुसत आत गेला. चुलती स्वत:ला सावरून म्हणाली, एवढं सगळं आणलंस! घरात खरंच काही नव्हतं रे! वरचे किती पैसे देऊ?
मी दोनशेची नोट तिच्या हातात ठेवत राहू दे म्हणालो. सगळं ह्या पैशापायी झालंय गं!
चुलती न राहवून माझ्या गळ्यात पडून रडली!
चुलता आतून गूळ शेंगा घेऊन आला. माझ्या खिशात टाकल्या. लहानपणी तो माझ्या खिशात असंच गपचिप टाकायचा. हे आठवलं मला. चुलता विसरला नव्हता. मी सावरलो.
चल येतो, मी म्हणालो! काय लागलं सवरलं तर हाक मार, असं म्हणून मी बाहेर आलो. आईनं फाटक उघडलं. आत गेलो. आईचे डोळे पाणावले होते. तिनं माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि वडिलांच्या फोटोसमोर दिवा लावला.
             मग मी कधी काही आणायला जायचो, तेव्हा चुलती बाहेर यायची. खिशात पैसे ठेवत आणि पिशवी देऊन जे काय पाहिजे ते सांगायची.
आज महिना होत आला, लॉक डाउनला. दिवस जात आहेत. पण आज सकाळपासून पलीकडील भिंतीचा आवाज येत होता, जोरात. जसे भिंतीवर ठोकल्यासारखे. आम्ही सर्व उठून बाहेर गेलो. बघतो तर, चुलती घराबाहेर रडत उभी होती. मी विचारायच्या आधी ती मला रडून सांगू लागली, बघ रे पिंट्या! काका कसं करायला लागलेत. मी, आई आणि लहान भाऊ पटकन आत गेलो. चुलता पहार घेऊन भिंतीवर मारत होता. आम्हाला बघितल्यावर पहार बाजूला टाकली, आईकडे बघत पुढं आला. आईच्या समोर येऊन, हात जोडत माफ कर मला वैने ! असं म्हणत खाली बसला आणि ओक्साबोक्सी रडू लागला. आईच्या डोळ्यांत पाणी वाहू लागलं. चुलती तिथंच होती. ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली.
मी, माझा भाऊ, आमच्या बायका हे सर्व बघत उभे होतो. आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते, चुलत्याला उठवून खुर्चीवर बसवले. तो थोडा शांत झाला. आईच्या डोळ्यांतले पाणी बघून, त्याला कळले, आईने त्याला कधीच माफ केलंय!
शेवटी ऋणानुबंधांची नाती तुटत नसतात! अखेर घर एकत्र आलं होतं. आम्ही दोन्ही भावांनी आणि आमच्या बायकांनी काय बोध घ्यायचा तो घेतला आणि तो कायम मनाशी बांधून ठेवला.

*जगातील लॉकडाउन कधी संपेल, माहीत नाही! पण आमच्या दोन घरांच्या मधला लॉकडाउन मात्र संपला होता...*

🙏 ही लेखणी समाजासाठी

...........
गोबरा मासा


.........

Very important Whatsapp Message forwarded by Mrs.  Akshata Ashok Pednekar,  Vengurla .

The message  :

To all parents🙏

There was a very brilliant boy, he always scored 100% in Science.

Got Selected for IIT Madras and scored excellent in IIT.

Went to the University of California for MBA.
Got a high paying job in America and settled there.

Married a Beautiful Tamil Girl.

Bought a 5 room big house and luxury cars.
He had everything that make him successful but a few years ago he committed suicide after shooting his wife and children.

*WHAT WENT WRONG?*

California Institute of Clinical Psychology Studied his case and found *“what went wrong?”*

The researcher met the boy's friends and family and found that he lost his job due to America’s economic crisis and he had to sit without a job for a long time. 

After even reducing his previous salary amount, he didn't get any job. 

Then his house installment broke and he and his family lost the home. 

They survived a few months with less money and then he and his wife together decided to commit suicide. 

He first shot his wife and children and then shot himself.

The case concluded that the man was Programmed for *success* but he was not *trained for handling failures*.

Now let's come to the actual question.

*What are the habits of highly successful people?*

First of all, I want to tell you that if you have achieved everything, there is a chance to lose everything, nobody knows when the next economic crisis will hit the world. 

*The best success habit is getting trained for handling failures*.

I want to request every parent, please do not only program your child to be *successful* but *teach them how to handle failures* and also teach them proper lessons about life. 

Learning high-level science and maths will help them to clear competitive exams but a knowledge about life will help them to face every problem.

Teach them about how *money works* instead of teaching them to *work for money*. 

Help them in finding their passion because these degrees will not help them in the next economic crisis and we don’t know when the next crisis will hit the world.

*"Success is a lousy teacher. Failure teaches you more."*

*_Please share with other parents._*

........

बुधवार, २० मे, २०२०

Amphan coming


मागे - पुढे

18.05.2020

        चार पाच दिवसांनी जरा मागे-पुढे पाहू म्हटले.  काळाचा अंदाज आताही घेतोच आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे. दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3 आणि आज दि  18.05.2020 पासूनचा चौथाही धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला होता. तोच आता चौथ्या टप्प्यात आजपासून म्हणजेच 18 मे पासून 31 मे पर्यंत पुढे ओढण्यात आला आहे.  लॉक डाऊनमध्ये कायदेशीर आणि अवैध प्रवासी वाहतूक होऊन रत्नागिरी जिल्हयात सुमारे पंधरा हजार चाकरमानी आले आहेत. कोरोना अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहेत. तसे तसे चित्र स्पष्ट होत जाते आहे. इथेही राजकारण आहेच. राजकीय पक्ष हीच गेल्या काही वर्षात अनेकांची जात झालेली आहे. हया पक्षाची माणसे त्या पक्षाविरूध्द ओरडणार आणि त्या पक्षाची माणसे हया पक्षाविरूध्द ओरडणार, सगळेच काही ना काही राजकारण करणार , हे आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. आयटी सेलचे महात्म्य बघून सगळयांचेच आयटी सेल आता जागे होऊ लागले आहेत . काही शिकूनही अडाणी आणि काही अडाणी असून उपद्व्यापी ! तर सांगायचं म्हणजे सकाळपासून नेहमीचे कार्यक्रम यथासांग पार पडले. सकाळी बीनाने पुन्हा डाॅक्टरकडे जाण्याचा आग्रह धरला. तिला काही गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्याश्या वाटतात. काय करायचे ? मिलेश तिला डाॅक्टरकडे घेऊन गेला. आम्ही दुपारी जेवत असतांना बीना डाॅक्टर काय म्हणाले ते सांगायलाही आली. ती लगेच गेलीही. नंतर आली नाही. तर चहा घेऊन बीनाच्या आईबरोबर ही आनंदनगरला कुणाचे तरी घर बघायला गेली. मी अंगणात फिरत होतो. फिरता फिरता एक पोलीस व्हँन खालच्या बाजुच्या शाळेजवळ येऊन थांबली. बघता बघता तिच्या भोवती माणसे गोळा होऊ लागली. नंतर कळले की घरेलू कामगारतर्फे घरेलू महिला कामगारना मदत म्हणून अन्नधान्य देत होते. काहींना याची आगावू कल्पना दिली गेल्याने काहींनी आधीच नंबर लावले आणि त्या गेल्याही धान्य घेऊन घरी. लंबूवहिनीला कशी कोणजाणे पण ही खबर उशिरा मिळाली. ती धावत गेली , तिथे जाऊन तिचे नावच त्या यादीत नसल्याचे सांगण्यात आले. तिने बोंबलायला सुरूवात केली पण कोणीच तिच्या बाजुने बोलायला तयार नव्हते.  ती एकचीच बोंबलतेय हे तिच्या लक्षात आले असावे. ती एकदम नरमलेली दिसली . ती तशीच आमच्याकडे येवून मला म्हणाली हया राजकारण्यांबरोबर काय लागणार ! आता बोला ! काही लबाड राजकीय नेतेच सोयीनुसार यू टर्न घेतात असे नाही, तर लंबूवहिनीसारखी दारिद्र्य रेषेखालची सामान्य माणसेही यू टर्न घेऊ शकतात ! साठा संपल्याने गाडी निघून गेली. काही महिला कुरकुरत थोडा वेळ तिथेच घोटाळल्या आणि उद्या गाडी येईल या आशेवर घरी परतल्या. मी हे सारं अंगणातून बघत होतो. अजून आपल्या देशात समतोल वाटप व्यवस्थेचे नीट नियोजन होत नाही, अंमलबजावणी तर फारच दूरची गोष्ट आहे ! आणि इकडे आपण बुलेट ट्रेनच्या वेगाने जागतिक महासत्ता बनण्याच्या वल्गनेचे ढोल बडवत असतो ! जागतिक सोडा , ही आगतिक महासत्ता झाली आहे.


       मी हा आगतिकपणा सोडून मागे गेलो. म्हणजे घराच्या मागच्या बाजुला गेलो. आज पाण्याचा शिल्लक साठा कमी आहे. त्यामुळे आज आमची दोनच झाडे शिंपून घेतली.  तेवढयानेही मन प्रसन्न झाले. निसर्ग आजही आपल्याला प्रामाणिकपणाने देत असतो. पण आपण आजही लांडीलबाडीने राजकारण करून आपलीच वाट लाऊन घेत आहोत. मग कोरोना येईल नाही तर काय ? मग अम्फान सुपर चक्रीवादळ येईल नाही तर काय ?


( क्रमश: )
...........











   








सोमवार, १८ मे, २०२०

From Quora

क्वोरावर अधूनमधून उत्तरे लिहायचा छंद मला लागला आहे. तसे मला क्वोरावर लिहून दोन तीन महिने झाले आहेत. क्वोराने माझ्या एका उत्तराचा  विशेष उल्लेख केला आहे. क्वोराला धन्यवाद आणि त्याचा फोटो खास आपल्यासाठी ...



 क्वोरावर माझी ऊत्तरे एका आठवडयात किती वेळा पाहिली गेली ते पहा :





आणि आता.....






गुरुवार, १४ मे, २०२०

Chakarmani


मागे - पुढे

13.05.2020

        गेले काही दिवस काही लिहिलंच नाही. काळाचा अंदाज घेतो आहे. आताही अंदाज घेतघेतच लिहितो आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे.   दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच  कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3  ( आणि आता आगामी चौथाही मनात ) धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला आहे.  कालच मापंप्रनी नेहमीप्रमाणे रात्री 08 वाजता भाषण केले आहे. आत्मनिर्भरतेचा महान मंत्र त्यांनी दिला आहे. अर्थात , तुमचे तुम्ही बघा. निवडणूक आली की मी तुमच्याकडे बघतो. केवळ पंप्रच नाही तर कोणत्याच पक्षाचे लोक दिसायला पाहिजे तितके कुठे दिसत नाहीत. निवडणूक आली की प्रचार करायला बाहेर पडा, मतदान करायला बाहेर पडा , शंभर टक्के मतदान करा, असा प्रेमळ दम भरणारे ते लोकशाहीचे कार्यकर्ते आता जीवनमरणाच्या वेळी घरात बसा म्हणून सांगायलाही कुठे फिरकत नाहीत, असं आता लोकच म्हणू लागलेयत  ! म्हणजे, लोक फक्त निवडणुकीपुरतेच महत्वाचे असतात का ? असा प्रश्न खुद्द लोकांनाच पडू लागला आहे ! लॉक डाऊन वाढणार हे तर आता अपरिहार्यच झाले आहे. याबाबत 18 तारीखला तपशील जाहीर होणार आहे ! पुन्हा एकदा दोन्ही गटातल्या गैरशिस्त लोकांना आयत्या वेळचा गोंधळ घालायची संधी तर कोणी देत नाहीय ना ? काही गोष्टी वाटतात तितक्या सहज घडत नसतात.  देशात केवळ गोंधळ सुरू आहे. माणसे हैराण झाली आहेत . माणसांच्या या हवालदिल होण्याने देशात कोण कुणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत राहणार नाही व देश अराजकतेकडे वाटचाल करू लागेल ! अनेक ठिकाणी प्रशासन हताश होत आहे. काही ठिकाणी तर प्रशासनावर कुठून दबाव तर येत नाही ना, अशी शंका येण्याइतपत प्रशासन हतबलता व्यक्त करू लागले आहे. एकीकडे कोरोनाची होणारी लागण आणि न ऐकणारे लोक या कात्रीत प्रशासन सापडले आहे. न ऐकणा-या लोकांमागे काही बोलावते धनी ( मास्टरमाईंडस् ) असावेत की काय अशी शंका येण्याइतपत परिस्थितीचे केले जाणारे राजकारण बोट दाखवते आहे ! हजारो लोक उपाशी पोटी शहरे सोडून गावांकडे पायी चालत निघाले आहेत आणि आपण अजूनही त्यांच्याबद्दल चकार शब्द न काढता, आपलीच पाठ थोपटून स्वदेशीचे नारे भलत्याच वेळी देत आहोत की काय ? असे वाटत आहे. एकूण कशाचे काही तारतम्य उरलेले दिसत नाही. अवतारही ढेपाळत आहेत ! सतत परदेश वा-या करणा-यांकडून स्वदेशी हा शब्द ऐकतांना जरा कसेसेच वाटते, नाही का ? थोडक्यात , विमाने आणि रस्ते यातले अंतर उघड होत चालले आहे. हया लॉक डाऊनला नेमका काय अर्थ आहे ? माणसे इकडून तिकडे येत जात आहेतच , आणली आणि पोचवलीही जात आहेत. त्याच्याही बातम्याच केल्या जात आहेत ! काही जण योगींचे गुणगान गाता गाता योगींनी आपल्याच माणसांना घ्यायला नकार दिला या व्हिडीयोने विव्हळ झाले आहेत ! या पार्श्वभूमीवर काही लोक महाराष्ट्राला अधिक पसंती देत आहेत. कोरोनाने आधीच्याच दोन गटातली दरी वाढवली आहे. हे लोक देशभक्तीचे केवढे नारे देतात ! सोयीनुसार आम्ही सारे भारतीय (!) म्हणतात ! विसंगती तुला सलाम !

                 इकडे आमच्या मागील दारी सकाळी पाणी वेळेवर आले, ही कडक उन्हाळ्याच्या दिवसातली समाधानाची बाब ! बाकी तसे सगळे चालूच असते. घटना आणि लोकसुध्दा ! नाना येऊन मुलाची चौकशी करून गेला. गंमत म्हणजे त्याने तासाभरात मोदींबद्दल चकार शब्दही काढला नाही ! योगींचा उल्लेखही केवळ एकदाच केला ! मला हे खरोखरच आश्चर्यकारक वाटले. पण मी त्याला काहीच विचारले नाही. हे नेतेवगैरे खूप दूरचे आहेत. नेत्यांपेक्षा आमची नाती अधिक जवळची व पिढीजात आहेत. हे नेते येतील आणि जातील. त्यांच्यामुळे आपल्यात दुरावा निर्माण होण्याएवढे आपणच त्यांना मोठे करणे चूक आहे ! राजकारण हे राजकारणापुरतेच ! त्याची योग्यता तेवढीच आणि आपणही ती तेवढीच ठेवली पाहिजे. हे आता कोरोनाने पुन्हा एकदा शिकवले आहे. उद्या पाणी येणार नाही, असे संज्याने सांगितले. खरे तर पाणी न येण्याचे वार सोमवार आणि शुक्रवार आहेत. पण दुरूस्तीसाठी बदल करण्यात आला आहे. त्याला आपण सहकार्य केले पाहिजे. उद्या पाणी नाही म्हणजे आज झाडांना पाणी देता येणार नाही. संध्याकाळचे सहा वाजून गेले आहेत. मी अंगणात फिरतो आहे. वरच्या बाजुला कठडयाजवळ एक पांढरी लुकडी गाय येऊन उभी राहिली आहे. अशा गायी दररोज इथे येऊन उभ्या राहतात. मग आम्ही त्यांना चपाती, भात , भाकरी खायला देतो. यापैकी काहीच शिल्लक नसेल तर बिस्कीटेही खायला देतो. काही गायी हलता हलत नाहीत. काही मात्र जे मिळेल ते खातात आणखी निघून जातात. काही गायी तर थोडी वाट बघून आज काही मिळणार नाही हे समजतात व निघूनही जातात . हया गायीची परिक्षा घ्यायची म्हणून मी काहीच हालचाल केली नाही. गंमत म्हणजे ही गाय हुशार असावी. हा काही देणार नाही असे ओळखून ती लगेच निघालीही. मला कसेसेच झाले. कोरोनाचे दिवस आहेत. तिला काही मिळालेही नसेल. ती उपाशी असेल. मी विचार करीपर्यंत ती दहापंधरा फुटांवर गेली पण ! मी तिला हाका मारताच मात्र  ती माझ्याकडे यायला लागली. मी धावतच घरातून बिस्कीटे आणली . तोपर्यंत ती कठडयावर मान पुढे करून उभी राहिलीही. मी तिला बिस्कीटे दिली . ती तिने पटकन खाल्ली. मी तिला आता जा म्हटले तशी थोडया वेळाने ती गेलीही. आता वयाच्या साठीत पूर्वीसारखे धाऊन जमत नाही. पायरी चुकली तर अंगणात कपाळमोक्ष तर ठरलेलाच ! आता अंगण कोरी लादी असते ; प्रेमळ सारवलेली जमीन नसते !  म्हणून जपूनच धावलो होतो . दिवाबत्ती, प्रार्थनेची वेळ आहे. ते झाल्यावर बातम्या लावल्या तर आमच्या जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या 74 झालेली . टीव्ही बंद केला. येणा-या चाकरमान्यांचा प्रश्न सारी रात्रभर आवासून बघत होता !


( क्रमश: )
...........











   








सोमवार, ११ मे, २०२०

Baan Marathi Gazal

बाण


किती बाण त्यांनी सोडले होते
फुलांसारखे मी झेलले होते  !


सुखी मी असे दु:खासवे हेही
सुखाच्या जिव्हारी लागले होते


करू सांग मी तक्रार कोणाशी ?
धरेला नभाने झोडले होते !


कसा सांग बोलू आपल्यांशीही ?
कुठे आपलेही आपले होते ?


कसे मी तुलाही ओळखायाचे ?
कुठे तू मलाही जाणले होते !


कितीदा ख-याचे पूर आलेले
कितीदा खरे ना वाटले होते !


गुणाकार होता शून्य आयुष्या !
जमेला वजाने भागले होते !


किती उंच गेला आपला झोका !
किती श्वास आपण रोखले होते !


तरी राहिले ते केवढे मागे ...
जरी लोक शिकले सवरले होते !




... देवीदास हरिश्चंद्र पाटील

शनिवार, ९ मे, २०२०

Lord Krishna enters


मागे - पुढे

08.05.2020

         पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे.   दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच  कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3  धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला आहे. तर काल रात्री झोप नीट लागलीच नाही. साडेअकरा वाजता सौ.ला तहान लागली म्हणून उठलो. तिला पाणी आणून दिले आणि मोबाईल घेऊन कोरावर गेलो. कोरावर एक अधिसूचना आहे. माझी माहिती कोरावर दहा हजार लोकांनी पाहिली आणि माझे एक उत्तर एक हजार लोकांच्या ज्ञानभांडारात कोराने सामाविष्ट केल्याचीही दुसरी अधिसूचना होती. हे काही तरी ब-यापैकी होत आहे. लेखनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. कोरावर एका सुप्रसिध्द ब्लाॅगरचे एक उत्तर वाचता वाचता मला माझ्या ब्लाॅगसाठी एक वेगळीच कल्पना बारा वाजून दोन मिनिटांनी सुचली. ती आता इथे सांगत नाही. कारण त्यावर अजून खूप विचार व्हायचा आहे. शिवाय ती कल्पना dehdays या माझ्या इंग्रजी ब्लाॅगसाठी अधिक उपयुक्त आहे. पहिला लेख तयार झाला की तुम्हांला या ब्लाॅगवरही कळवतोच. ती लेखांची मालिका असेल , त्याचे एक स्वतंत्र पानही dehdays या माझ्या इंग्रजी ब्लाॅगवर असेल व ही लेखमालिका आपल्यापैकी अनेकांना स्वत:च्या आयुष्याशी पडताळून बघण्याच्या मोहात पाडणारी असेल, एवढे नक्की. अर्थात , लवकरच ही मालिका आणि पान इथेही (मराठीत) सुरू करीन . तुम्हांला कळवीनच.  दरम्याने कोरोनाचा हैदोस सुरू आहेच. मुलाकडे पुण्याला जायचे अजून तरी शक्य होत नाहीय. 17 मे ला लॉक डाऊन उठेल न उठेल. काय करायचे हेच कळेनासे झाले आहे. सकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजता जाग आली पण आज नळाला पाणी येणार नसल्याने व रात्री झोप नीट न लागल्याने झोपलो तो पावणेआठ वाजता उठलो. सूर्य त्याची किरणे खिडकीतून पाठवून मला कधीपासून जागा करण्याचा प्रयत्न करीत होता कोण जाणे ! हल्ली कोरोना लॉक डाऊनपासून व उकाडयामुळे बरेचदा झोप नीट लागतच नाही. त्यामुळे दिवसाचे शेडयूल बरेचदा बदलत चालले आहे. काही गोष्टी वेळेवर करणे तब्बेतीसाठी अत्यावश्यक असते, पण तेच होत नाहीय. असे किती दिवस चालणार आहे कोण जाणे ! नाश्ता झाल्यानंतर सौ. बीनाकडे जाऊन आली. तिचे चित्त ठीक नाही. गोळयांच्या अर्धवट ग्लानीत ती काही तरी बडबडत होती. ती हयातून कधी बाहेर येणार तेच कळत नाही. वाईट वाटते. तिकडे मागच्या दारी उर्मिच्या घराचे लॉक डाऊनमुळे बंद पडलेले बांधकाम गेल्या चार दिवसापासून सुरू झाले आहे. सत्त्या त्यावर लक्ष ठेवून आहे. त्यातच आमचा जिल्हा रेड झोनमध्ये जातोय. आज एकूण रूग्णसंख्या 18 झाली आहे.

          दुपारी वामकुक्षीच्यावेळी डोळयांवर एक हॉस्पिटल दिसले. रूम खूप मोठी आहे. मी मध्यावर उभा आहे.  हॉस्पिटलमध्ये पेशंटस् , स्टाफ आहेत. स्टाफची कामे सुरू आहेत. माझ्या समोरच्या भिंतीला टेकून उजवीकडील काॅटवर झोपलेला एक उभटगोल चेह-याचा चाळीसपंचेचाळीशीतील मध्यमगौरवर्णीय पुरूष माझ्याकडे बघून हसतोय. त्याला बहुतेक डिस्चार्ज मिळणार असल्याचा भाव त्याच्या चेह-यावर आहे. अचानक त्याच्या शेजारी स्वामी समर्थ येवून काॅटवर बसतात. तेही माझ्याकडे बघून हसतात. त्यांच्या हातात जपमाळ असते. त्या हातानेच ते पुढे निर्देश करतात. मी तिकडे बघतो तर चक्क श्रीकृष्ण डाॅक्टरचा अॅप्रन घालून , स्टेथोस्कोप  लावून, सलाईन स्टँड नीट लावत असतो ! त्याने काही तरी निश्चय केलेला त्याच्या ठाम चेह-यावर दिसत होता.  अगदी तरूण वयातला हा श्रीकृष्ण आहे व तो आता कोरोनाच्या लढाईत डाॅक्टर बनून स्वत:च उतरतो आहे, असे मी मनात म्हणत असतानाच माझी लिंक तुटली. आता परमेश्वरच लढायला उतरला तर कोरोनावरचा विजय फार दूर नाही. संध्याकाळी पाच वाजता उर्मिला धावती भेट देवून गेली. थोडा काळ लंबूवहिनीही येऊन तिचे सुकवण घेऊन गेली. आज दिवसभरात ती दोनदा येऊन गेली. बीनाही संध्याकाळी दोनदा येऊन गेली. उद्या ती डाॅक्टरकडे जाणार आहे. त्यांना सांगायचे मुद्दे तिला लिहून द्यायचे आहेत. ते डाॅक्टर माझेही मित्र आहेत. मी व्यक्तिश: त्यांना व्हॉट्सॲपवर बीनाकडे अधिक लक्ष देण्याबाबत विनंती करावी का हा प्रश्न आहे. बीनाची आई आली तर विचारून बघू. सद्या सात वाजले आहेत. दिवाबत्ती करूया. दोन्ही घरातील दिवाबत्ती झाली. जगतकल्याणाची प्रार्थना झाली. सिरियल बघून झाली. बीनाच्या आजारपणाचे मुद्दे लिहून झाले.  तोवर जेवणाची वेळ झाली. आज उकडया तांदळाची पेज प्यायची. मग पेज प्यायला बसलो तेवढ्यात बीनाची आई आली. पेज लवकर संपवून तिला मुद्दे वाचून दाखवले. बीनाला लवकरात लवकर यातून बाहेर काढले पाहिजे म्हणून सांगितले. डाॅक्टरांना विषयही काढला तर तीच म्हणाली की तुम्ही त्यांच्याशी फोनवर तिच्या आजाराच्या मूळ कारणाबद्दल बोला. मी म्हटलं मी त्यांना थोडया वेळाने व्हॉट्सॲपवर मेसेज करतो. तो तयार केला व सौ. कडून नीट वाचून घेतला. तिने दोन बदल सुचवले ते केले आणि सव्वा दहा वाजता डाॅक्टरांना मेसेज केलाही. आता रात्री 11.23 ला धन्यवाद देणारा त्यांचा संदेश आला आहे. चला निदान अंथरूणावर तरी पडूया....


( क्रमश: )
...........











   








गुरुवार, ७ मे, २०२०

Think twice


मागे - पुढे

07.05.2020

          दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच  कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3  धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला आहे, एवढेच खूप झाले ! गेले तीन दिवस वैतागून इथे तरी काहीच लिहिले नाही. काय लिहायचे ? सगळे तेच तर सुरू आहे. जागतिक महासत्तेचा विनोद करणारी माणसे स्वयंशिस्त पाळतील ही अपेक्षा तरी कशी करायची ! संचारबंदीतच माणसे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मुक्तपणे रस्त्यावर विनाकारण वावरत असतील तर ती हे जाणूनबुजून करतात असेच म्हणावे लागते. अतिशय उच्चवगैरे संस्कृतीचा टेंभा मिरवून फायदा नसतो, तर ती आचरणात दिसावी लागते. ईतिहासाची पुण्याई ही खरे तर पूर्वीच्या खरोखरच्या महान माणसांची कमाई असते. आपले दिवे लावणारे कर्तृत्व पाहता , त्या कमाईवर आपला वर्तमान फार काळ तग धरू शकत नाही. अर्थात आपल्याला आपल्या वर्तनानाची पर्वा नाही तिथे भविष्याबद्दल न बोललेलेच बरे ! बेशिस्त मेंढरांचे कळप सांभाळत तरी किती बसणार ! ही मेंढरे बेशिस्त असली तरी एका बाबतीत हुशार आहेत. ती गनिमी काव्याने कळप सोडून अवैधरित्या स्वत:चीच वाहतूक करीत आहेत वा करून घेत आहेत. सुरूवातीला कसे आहात तिथेच थांबा, सर्व व्यवस्था करण्यात येत आहे , असे आवाहन हया मेंढरांना करण्यात येत होते. पण तरीही ही मेंढरे कधी पायी तर कधी अधिकचे पैसे देऊन वाहनाने गावाकडे पळत सुटली. आता त्यांना गांव आठवला. गावात जाऊन काय पराक्रम गाजवणार , तर गावाला कोरोना महामारीची अभूतपूर्व भेट देणार ! हे थांबायला हवे होते , पण बुलेट ट्रेनच्या तयार करण्यात आलेल्या हवेच्या गतीने चालूच राहिले. कधी मालगाडी तर कधी आंबा वा जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीच्या ट्रकने ! शेवटी अधिकृतपणे रेल्वेगाडया सोडून रवानगी करावी लागली. काय झाले त्या आवाहनांचे ? सारा देश माझ्यासोबत हे दाखवण्याची संधी काळाने कोणालाच मिळू दिली नाही ! जेव्हा गोष्ट दाखवण्यावर जाते तेव्हा काळ असेच करतो. लोक खरोखरच तुमच्यासोबत तेव्हाच असतात जेव्हा तुम्ही लोकांसोबत खरोखरच असता ! नीतीमत्तेने असता ! वंदनीय महात्म्यांना बाजूला सारून त्यांची जागा घेणे एवढे सोपे नाही. लोकांनीच त्यांना महात्मा बनवलेले असते. शब्दांतली खरी कळकळ आणि मतांची आकडेेमोड करण्यामागची तळमळ यातला फरक बेशिस्त लोकही चांगलाच ओळखतात. थोडक्यात , आवाहनांचा फारसा उपयोग न होण्यामागची ही पोटतिडकीने केलेली कारणमीमांसा. ती चुकूही शकते. म्हणूनच म्हणतो , की काय लिहिणार सद्यस्थितीत ! आता कोरोनामुक्त म्हटले गेलेले व अभिमानाने अभिनंदन करून मोकळे झालेले कोंकणचे सिंधूदुर्ग व रत्नागिरी हे जिल्हे पुन्हा कोरोनायुक्त झाले आहेत. म्हणून मुक्त मुक्त असे हजारदा बोंबलू नका , तुम्हीच युक्त होता ! हा ताजा ईतिहास आहे ! लोकांचे जीव जात असतांना जो उतावीळ राजकीय कोरोना सुरू आहे तो निंदनीयच आहे व त्याबद्दल बोललेच पाहिजे. ती लोकांचीच जबाबदारी आहे. शेवटी लोकांच्याच भावनांशी आणि जीवनाशी खेळले जाते. काही मूठभरांचे नुकसान टाळण्यापायी लाखोंचे नुकसान करणे चूक आहे. हे कोरोना महामारीच्या काळात तर पाळले गेलेच पाहिजे. अर्थव्यवस्था रस्त्यात कशी  कोलमडते ते दारू दुकाने उघडल्यानंतर केवळ काही तासातच दिसले ! माझ्या दोन फेसबूक पोस्ट पहा 


  प्यायला अधीर झालेले लोक सोशल डिस्टन्सींगचे तीन तेरा वाजवणार हे आपल्याला आधीच कळत नाही हे म्हणणे धाडसाचे ठरेल ! इतकेच नव्हे तर लोक दारूसाठी किंवा दारू पिऊन धुमाकूळ करीत आहेत. कांदीवलीत दारूडयाने चक्क महिवेवर व दुकानदारावरच हल्ला केल्याची बातमी जय महाराष्ट्र चँनेलवर दाखवत आहेत. टाळया ते थाळया ते दिवे हया प्रवासाला फार काळ लोटलेला नाही. आपले निर्णय आणि आपल्या आवाहनांचे असे का होते याचा ( जर विचार केला जाणार असेल तर ) विचार करावा लागेल ! आवाहनांचे परिणाम माहीत असल्याने कोणती आवाहने करायची याचे तारतम्य बाळगावेच लागेल. आता चाकरमांनी लपूनछपून येऊन कोंकण कोरोनाबाधित करीत आहेत. ते अधिकृतपणे आणले गेले तर इथली अवस्था काय होईल हे सांगण्यासाठी कुण्या तज्ञाची गरज नाही. प्रशासनातही आता कोरोना शिरू लागला आहे. अधिका-याचा कोरोनामुळे जीव गेल्याची बातमी सुरू आहे.  आपण पोलीसांवरचा भार वाढवून त्यांना अधिकच कमकुवत करीत चाललो आहोत. लोकांपुढे पोलीस हताश झाले तर अराजक होईल. पोलीसही माणसेच आहेत. त्यांनाही कुटुंब आहे , जे डोळ्यांत प्राण आणून त्यांची वाट बघत असते . त्यांनाही गांव आहे. पोलीसांचे अधिक हाल होणे म्हणजे आपलेच संकटमोचक आपण हरवून बसणे होय. पोलीस हतबल झाले तर प्रशासनावरही त्याचा परिणाम होईल. प्रशासन हैराण झाले तर लोक सैराट होतील. अपप्रवृत्ती डोके क्षणात वर काढतील आणि मग मारामा-या , खून , लुटालूट , दंगली, दरोडे, बलात्कार हे ओघाने येईलच.

         कोरोनाबाबत अनेक भाकिते वर्तवली जात आहेत. लसीबाबत संभ्रम आहेच. एक मात्र खरे आहे की, कोरोना चीनने जगाला दिला असे ट्रंफतात्यांनी म्हटले तरी अमेरिकेनेच तो चीनमघ्ये नेला असावा असा खुद्द अमेरिकन लोकांत संभ्रम आहे म्हणा वा निर्माण केला गेला आहे !  म्हणूनच अजूनही जग याबाबतीत ठोस बोलतांनाही दिसत नाही. जग बोलणार नाही तिथे बोलणारे आणि आपल्याकडचे चीनच्या बहिष्काराच्या बाता मारणारे ( चीनचेच ! ) मूग गिळून गप आहेत. अधूनमधून ते सोयीनुसार आणि सवयीनुसार फेसबूकवर उसळी मारतीलच. 😀😀😀😀 आपण वाचून करमणूक करून घेऊया !

             आज सकाळी मित्रवर्य जादूगार मनोहर  भाटकर यांनी दत्ता डावजेकरांच्या संग्राह्य आठवणींचा सुंदर संदेश  पाठविला आहे. त्याची फेसबूक पोस्ट टाकली आहे. तिची लिंक इथे पहा दत्ता डावजेकरांच्या आठवणी. काल  रात्री दोन पंखे लावून झोपलो. त्यामुळे जराशी झोप तरी मिळाली. सकाळी सहा वाजता उठलो , थोडया हालचाली केल्या आणि पावणेसातला उठूया म्हणून झोपलो तो सात वाजता धडपडत उठलो. मागच्या दारी जाऊन पाहिले तर नळाला पाणी चालू होते. लगेच भांडी नेली. पुरेसे पाणी मिळाले आणि पाणी गेले ! सुटलो. नाही तर विहिरीवरून पाणी आणावे लागले असते. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून विहिरीवर गेलोच नाहीय ! या गडबडीत बंदू कुठे दिसला नाही. मला उशीर झाला असल्याने मीही लक्ष दिले नाही. काही वेळाने आंघोेळ करून सहजच मागचा दरवाजा उघडला तर बंदूकडे पाण्याचा टँकर आलेला. तसा तो अधूनमधून येतोच पण गडबड झाली होती. बंदू आणि कंपनी काल रात्रभर गरम्यामुळे झोपलेली नसल्याने सकाळी पाणी आले तेव्हा उठलीच नव्हती ! हे बंदूनेच सांगितले.  तरीच सकाळी बंदू कुठे पाणी भरतांना दिसला नव्हता.  मी समजलो होतो की तो पाणी भरून झोपला असावा. उद्या शुक्रवार म्हणजे पाणी येणार नाही. पाणी प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे.
   


( क्रमश: )
...........

........................ ........ 











   








सोमवार, ४ मे, २०२०

Radha krishna राधा कृष्ण


मागे - पुढे

03.05.2020

          आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग चाळीसावा दिवस. आजपर्यंतचा लॉक डाऊन उद्यापासून 17 मे पर्यंत वाढवलेला आहे.       काल रात्री उकाडयामुळे बेडवरून बरोबर 12 वा. 12 मि. नी लादीवर झोपायला आलो. डोळे मिटून पडलो होतो. पुढच्या दोन तीन मिनिटातच डोळे मिटलेले असतांना मला देवळाच्या पुढच्या दारातील भाग दिसू लागला.  ( फोटो पहा )
Pimple tree
Navalai Pavnai Temple Area
पिंपळाच्या उजवीकडेपर्यंत नजर गेली आणि अचानक मी नजर डावीकडे वळवली. पिंपळाच्या डाव्या बाजुला असलेल्या कठडयापर्यंत पोचलेल्या लालमातकट रेघा असलेल्या घाग-यातल्या दोन गवळणी चक्क कठडयाची चि-याची भिंत भेदून सहजगत्या शेजारच्या  प-यात उतरल्या . ती चि-याची भिंत सांधतांना मी पाहिली ! वरच्या थरातले अखेरचे टोकाचे सिमेंट जागेवर बसतांना मला दिसले ! एवढीच हालचाल  चि-याच्या वरच्या भागात झाली. बाकी एक चिराही पडला नव्हता ! लगेच दुसरे आश्चर्य नजरेस पडले ते म्हणजे क्षणापूर्वी कठडयापेक्षाही उंच दिसलेल्या त्या दोन्ही गवळणी प-यात उतरताच बुटक्या दिसत होत्या. त्यातली एक अधिक उंच होती.  हातात माठ घेऊन त्या प-यात काही तरी करीत होत्या. त्या पुढे काय करणार हे बघण्याच्या आतच माझी लिंक तुटली . मी सौ. ला हे सांगितलं आणि जाऊन बघुया का विचारलं तर घरातच तिची भीतीने गाळण उडाली.  ती म्हणाली, आता साडेबारा होत आलेयत. आता कुठे बाहेर जाता ? झोपा गुपचूप ! मी एकटा जातो म्हटलं तर मलाही जाऊ देईना. तसा मी रात्रीअपरात्री कितीही वाजता बाहेर येऊन आसपास बघत असतो. एकदा सिंधुदूर्गात मी एका दहा बारा वर्षाच्या भगत मुलाबरोबर रात्रभर स्मशानात रहायला तयार झालो होतो , पण त्याचे आईवडीलच काही तरी कारणे सांगून टाळू लागले आणि माझे नातेवाईकही जास्त हुशारी दाखऊ नका म्हणू लागले ! त्या मुलाच्या डोळयात चरकल्याचा भाव मला स्पष्ट दिसत होता. गरीबी माणसांना कोणत्या पंथाला आणते या विचाराने मीही मग माझा विचार सोडून दिला. मला खरंच त्या कुटुंबाची दया आली. खूप वाईट वाटले. पोटाच्या खळगीसाठी लहान मुलांचाही वापर करणारी अशी किती कुटुंब आसपास असतील या विचाराने मी अस्वस्थ झालो. मी निघतांना शंभर रूपये त्या मुलाच्या हातावर ठेवले आणि अभ्यास करून खूप मोठा हो म्हणून सांगून बाहेर पडलो. त्या मुलाच्या डोळयात सुटका आणि आश्चर्य यांचा विचित्र संगम झाला होता. तर मी काल रात्री बाहेर जाऊन बघितले नाही. देवळाच्या दारातल्या त्या पिंपळामध्ये श्रीकृष्णाचे अस्तित्व आहे हे मला काही वर्षापूर्वी सिंधूदुर्गातच पडलेल्या एका स्वप्नात दिसले होते.  त्या दोन गवळणींचा वावर त्यामुळे स्वाभाविकच ठरत होता. ते स्वप्नं मी काही वर्षापूर्वी सावंतवाडीत एका रात्री झोपलेलो असतांना पडले होते.  माझ्या घरासमोरच्या तुळशीचा पुढील भागात श्रीमहाविष्णूची ( माझ्यासाठी श्रीकृष्णाची ) मूर्ती आहे. त्यात त्याच्या उजव्या हाताचा पंजा थोडा पुढे येऊन आशीर्वाद देतो आहे. ( फोटो पहा) .
तर मला स्वप्नात ती मूर्ती जिवंत झालेली दिसू लागली व श्रीकृष्णाची ताकत कमी पडत असल्याचे जाणवले. श्रीकृष्णाचा आशीर्वाद देणारा तो हात वाढून खालच्या बाजुच्या देवळाच्या दारातील पिंपळात उभ्या असलेल्या सुकुमार तरूण श्रीकृष्णाच्याच दिशेने सरकत होता. तेवढयात पिंपळातल्या घननीळ श्रीकृष्णानेही त्याचा एक हात पुढे करून काही वेळ तुळशीतल्या श्रीकृष्णाला हस्तांदोलनाव्दारे शक्ती पुरवली . दोघेही हसले आणि ते दोन्ही हात लहान लहान होत पूर्ववत झाले ! तुळशीतली मूर्ती पूर्ववत होऊन अधिक ठळक दिसू लागली. तिकडे पिंपळातला श्रीकृष्ण पिंपळात लुप्त झाला आणि माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या घराच्या अंगणात  नसून सासरवाडीला अंथरूणात झोपलो आहे , हे समजायला मला काही वेळ लागला होता ! तुळशीतला हाच श्रीकृष्ण मला नोकरीत आलेल्या संकटाच्या वेळी उपयोगी पडला होता. मीच कृतघ्न निघालो. त्याची मनासारखी पूजा करू शकलो नाही . समोर असूनही त्याला ओळखू शकलो नाही. आता त्याच्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

           आज लंबूवहिनी उगवली. बीना आणि तिची आई येऊन गेली. राजूची बायको व मुलगीही येऊन गेली. माणसे येतात म्हणून बरे वाटते. संध्याकाळ होऊन गेली आहे. मुलाने त्याचे भाडे घरमालकाच्या खात्यात आजच अाॅनलाईन भरले आहे. जेवणाची वेळ आली की कसे तरीच होऊन जाते. तो आणि त्याच्यासारखी परक्या शहरात एकटे राहणारी व जेवण बनवता न येणारी मुलं काय करून खात असतील, या विचाराने जेवणही जात नाहीय. झोप तर कधीच उडाली आहे !


( क्रमश: )
...........

रविवार, ३ मे, २०२०

Nothing to say more अधिक सांगण्यासारखे काही नाही


मागे - पुढे

02.05.2020

         आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग एकोणचाळीसावा दिवस.  सकाळपासून फारसे मागच्या वा पुढच्या दारावर विशेष असे काही घडलेच नाही.   चिपळूण व संगमेश्वर येथे मिळून दोन कोरोनाबाधित रूग्ण मिळाल्याची बातमी आली आहे. संपूर्ण दिवसांत लंबूवहिनी कुठे झळकली नाही , हेच आजच्या दिवसाचे विशेष ! तिकडे चीन अमेरिका जोरात सुरू आहे. भारतासारखे देश मध्येच लटकत राहणार हे उघड आहे. धड चीनचा बहिष्कारही करता येत नाही आणि अमेरिकेच्या पुरस्काराचा मोहही सोडवत नाही. अमेरिका जे करायचे ते करतेच आहे. ते पक्के व्यापारी लोक . आपल्याला सोयीनुसार वापरायलाच बघणार. आम्ही त्यांच्याकडून आमच्याबद्दल  साधारणसे का होईना पण दोन शब्द आमच्याच कानावर कधी पडतात त्यासाठी तोंड उघडे करून बघत बसलेलो असतो ! प्रजासत्ताक लोकशाही देशाची मान आपण किती ताठ ठेवतो आहोत ! इकडे महाराष्ट्रात उतावळा नवरा आणि नाच्या कंपनी व-हाड लिमिटेड आपल्याच गळयात माळ पडणार या कल्पनेने कोरोनात लोकांचे जीव जात असतांनाही सतत मोहरलेले असतात ! मुंबईचे आयएफसी गुजरातला हलवून मुंबईला अनेक वर्षे तरी फारसा फरक पडणार नाही. मुंबई ही काही एक दोन वर्षात उभे राहिलेले ठिकाण नव्हे ! त्यामागे अनेकांचे कष्ट , प्रामाणिकपणा , नीतीमत्ता , कल्पकता व हुशारी हे गूण आहेत. हा पाया भक्कम आहे. बालीश प्रयत्नांनी तडा जाण्याएवढा तो नक्कीच कमकुवत नाही !
बाकी कोरोनाचा प्रसार होतोच आहे. बरे होणा-यांचेही प्रमाण ब-यापैकी आहे. तिन्ही सेनादलांकडून कोरोना वॉरीयर्सवर पुष्पवृष्टी केली जात आहे. तिकडे नाशिकहून परप्रांतीयांना ट्रेनने त्यांच्या गावी रवाना करण्यात आले आहे. आता इतर ठिकाणांहूनही हेच होणार आहे. पुण्यात  तहसिलदार कार्यालयात प्रवासासाठी परवाने मिळणार असा संभ्रम पसरल्याने लोकांनी तोबा गर्दी केली आहे. वास्तविक पुढील सूचना मिळण्यासाठी लोकांकडून फक्त त्यांचे ईमेल अॅड्रेस तेही अाॅनलाईनच मागविण्यात आले होते.  एकूणच लॉक डाऊनबाबत लोक प्रचंड संभ्रमात पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाचा त्रासही प्रचंड वाढतो आहे. लोकांसाठी काही करायला जा , ते त्यांना करायचे तेच करतात ! थाळया वाजवायला सांगितले की ड्रम वाजवतात. फटाके वाजवतात. कोणत्या वेळी काय करावे हेच त्यांना कळत नाही असे झाले आहे. हे लोक भारताला जागतिक महासत्ता बनवण्यात महान योगदान देणार आहेत म्हणे ! तेही बुलेट ट्रेनच्या ( काल्पनिक ) वेगाने !
            बाकी सकाळ , दुपार क्रमाने पार पडली आहे. आता संध्याकाळ झाली आहे. ही खालच्या अंगणात ईव्हीनिंग वॉक करतेय. मी पाण्याचा साठा पाहून झाडे शिंपू की नको या विचारात पडलो आहे. अखेर मागच्या अंगणातली दोन झाडे शिंपली. खालच्या बाजूची झाडे शिंपण्याएवढे पाणी शिल्लकच नव्हते. आज लंबूवहिनी अजून खाली आलेली नाही. रस्त्याने दुकानात जाणा-या चिंग्याला सौ.ने बिस्कीट पुडे व दूध आणायला पैसे दिले . रात्र झाली. आज दूध बिस्कीटे खाऊन पोटाला आराम दिला . रात्री अकरा वाजता लादीवर पहूडलो.

( क्रमश: )
...........

शनिवार, २ मे, २०२०

The missing clue हरवलेला दुवा


मागे - पुढे

01.05.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग अडतीसावा दिवस. 01 मे. महाराष्ट्र दिन + कामगार दिन. त्याच्या पूर्वरात्रीला अर्धी रात्र झोपच आली नाही. आधीच गरम्यामुळे झोप येत नव्हती.  त्यात रात्री 11.15 ला मेसेंजरवर झोप उडवणारा मेसेज आला. तो असा :

 🔴 *रत्नागिरी खबरदार ब्रेकिंग न्यूज : मुंबई ते आंध्रप्रदेश व्हाया रत्नागिरी गाडीतून जाणारा एकजण आढळला कोरोना पॉझिटिव्ह*

➡️ *रत्नागिरी :* पाईपच्या गाडीतून रत्नागिरी ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या तीन इसमांना मलकापूर चेक नाक्यावर पकडले असता त्यातील एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर इसमाला शाहुवाडी पोलिसांनी मलकापूर चेक पोस्टवर २६ एप्रिल रोजी पकडले आहे. हा इसम मुंबईतून रत्नागिरीत आणि रत्नागिरीतून कोल्हापूरकडे जात होता अशी माहिती मिळत आहे. रत्नागिरी पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलीस या इसमाच्या प्रवासाची साखळी शोधत आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी रत्नागिरी खबरदारला दिली आहे. रत्नागिरीतील एका नामांकित कंपनीत हा ट्रक आला होता व या ट्रक मधून या इसमाने प्रवास केला आहे अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

*रत्नागिरी खबरदार*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
www.ratnagirikhabardar.com
10:30 PM 30/Apr/2020

              तिकडे कोरोना मुक्त म्हटला गेलेला सिंधुदूर्ग जिल्हा असाच पुन्हा कुणा बाहेरून आलेल्या कोरोनाग्रस्तामुळे धास्तावला आहे. आता मलकापूरात सापडलेला माणूस रत्नागिरीत कुणाकुणाला भेटून गेला आहे , काय माहीत ! पुन्हा एकदा पोलीसांना साखळी शोधायचे काम करीत बसावे लागणार. लोकांनाच शिस्त नसेल तर पोलीस तरी कुणाकुणाच्या मागून धावणार !  यानंतर तर परदेशातून माणसे आणली जाणार आणि पुण्यामुंबईतून चाकरमानी कोंकणात आणण्यात येणार , यावरही चर्चा सुरू आहेत. हा जर विचार असेल तर पुण्यामुंबईत ज्यांच्या मुलांना नोकरीधंदयामुळे एकटे राहणे आजही अपरिहार्य झाले आहे , त्यांच्या मदतीला  किमान त्यांच्या आईवडिलांना कोंकणातूनही पुण्यामुंबईला जायचे असल्यास जाता यावे , अशी त्यांची अपेक्षा असणारच आहे. याही विचाराचा विचार शासनाला करावा लागेल असे दिसते.  असो. तर शेवटी रात्री एक वाजता पलंगावरून खाली नुसत्या लादीवर जाऊन झोपलो. तेव्हा कुठे दोनच्या दरम्याने जरा झोप लागली . सकाळी नळाला पाणी येणार नसल्याने सहा वाजता जाग येऊनही पुन्हा झोपलो तो पावणेआठला उठलो. अकरा वाजता उदू येऊन गेला. बाकी कुणीही आलेले नाही. दुपारी दोन वाजता जेवलो . जेवताजेवता मला मिनाक्षीच्या माहेरच्या घराकडे जाणारा रस्ता दिसू लागला. विशेषत: तो पूल आणि त्यापलीकडील भाग दिसला आणि माझी लिंक तुटली. ब-याच दिवसांनी मला हा अनुभव आला. मी लगेच सौ. ला मिनाक्षी संदर्भात एक दोन प्रश्न विचारले. लिंकबाबत काहीच सांगितले नाही. जेवल्यानंतर शतपावली झाली. वामकुक्षी  करता करता झोपच लागली ! पाच वाजता मुलाचा फोन आला तो घेतांनाच पुढच्या दरवाजावर जोरातच थापा ऐकायला आल्या तसा मी धडपडत उठलो. एवढी कोणाला अर्जन्सी आहे म्हणून शर्ट न घालताच दरवाजा उघडला तर बाहेर मराठवाडीतल्या दोघीजणी !  त्यांना बसायला सांगून सौ. ला उठवलं. सौ.ला त्यांनी बीनाच्या आईला बोलवायला सांगितले. मला जेवतानाची माझी लिंक व मीनाक्षीची मी सौ.कडे केलेली चौकशी आठवली. आतापर्यंत पार हिमालयातल्यावगैरे दूरच्या गोष्टी डोळयावर दिसत होत्या, आता तर जवळच्याच गोष्टी दिसतायत आणि त्याची प्रचितीही अवघ्या तीन तासातच येत आहे ! हे गूढ काय आहे ? काही गोष्टी मला उघडया डोळयांनी का दिसतात ? त्या कोण दाखवतंय आणि का ? कळत नाही !  बीनाची आई आली आहे. त्यामुळे  त्यांची चर्चा सुरू झाली आहे. मी आतल्या खोलीत बसून ऐकतो आहे.  प्रकरण गळयाशी आलेले आहे असे त्यांच्या बोलण्यावरून जाणवले. मीनाक्षीने उसने पैसे घेतले आणि त्यानंतर काही कारणांनी ती जी माहेरी जाऊन बसली ती वर्ष होत आले तरी सासरी येतच नाहीय. फोनही उचलत नाही.  बीनाच्या आईने त्या कर्ज प्रकरणात मीनाक्षीची जबाबदारी घेतल्याने ती अडचणीत आली आहे. मीनाक्षीचा नवरा पैसे देतो देतो एवढेच सांगतो आहे. थोडे थोडेही देत नाहीय. त्यामुळे त्याचा विश्वास हया बायकांना नाहीय. शेवटी तुम्ही दोन दिवसांत पैसे द्या नाही तर वाईटपणा येईल , असे बीनाच्या आईला निक्षून सांगून त्या दोघीही गेल्या.  आता सात वाजले आहेत. हिने बातम्या लावल्या होत्या पण फोन आल्याने ती बीनाकडे गेली आहे तोपर्यंत मी चँनेल बदलले. बीबीसीवर इंग्लंडमधल्या चीनच्या अँम्बँसीडरची मुलाखत चालू आहे. ते महाशय प्रत्येक आरोप नाकारत आहेत. सत्य अजूनही जगापासून दूर आहे. राहवत नाही अशावेळी हटकून कविता जन्म घेते. वाचा माझी ताजी कविता इथल्याइथे....

ज्याला त्याला आपापल्या देशात आपापली खुर्ची टिकवायची आहे  !
सत्ताचक्रात अडकलेल्यांची तडफड बघवत नाही !
कोरोनाचा कोणताच धागा कोणाशीच कोणी जुळवत नाही !
कोरोनापूर्व वर्षभर झालेल्या मान्यवरांच्या सगळयाच गळाभेटी पारदर्शक असतील काय ?
राजकीय व्यापारीकरणाची महत्वाकांक्षा जागतिक महासत्तेचे गाजर दाखवून काय साधत होती बरे ?
करोडो माणसांचे कोरोनामागचे असलेच जर खुनी तर ते मूठभर असतील काय ?
चीन अमेरिकेकडे आणि अमेरिका चीनकडे बोट दाखवीत राहीलही ,
कदाचित चीनला शिक्षा होईलही पण त्यानंतर घडलेल्या मानवी हत्याकांडात जगाचा इटली होऊन गेला आहे , हे सत्य राहीलच !
विमानातून आयात केलेल्या कोरोनामुळे मधल्यामध्ये आपलाच इटली होतांनाही आपण भांडत राहू आपल्यातच,
कुणाच्या तरी राजकीय महत्वाकांक्षांना खतपाणी घालीत ,
डोळयांवर भक्तीची आणि गुलामीची पट्टी लाऊन !

                   बघा कवितेतून काही दुवा मिळतो का ? नाही तरी  बातम्या सुरू आहेतच ...भारतात केंद्र सरकारने 03 मे रोजी संपत असलेला लॉक डाऊन 04 मे ते 17 मे 20  पर्यंत वाढवला आहे. झोननिहाय शहरांची विभागणी झाली आहे. बातम्या सुरू आहेत. बातम्याच सुरू राहणार आहेत. जगाचा अंत झालाच तर त्याची शेवटची ब्रेकींग न्यूज कोण सांगणार आहे आणि कोण ऐकणार आहे ?

( क्रमश: )
...........